नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांनी विविध प्रादेशिक भाषेत अभंगाची रचना केली.मराठीमध्ये त्यांनी २६८ अभंगाची रचना केली.यापैकी 33 अभंग ”नितिबोध” म्हणजे माणसाने आपल्या जीवनात कशा पद्धतीने आचरण केले पाहिजे? सत्संगत कशी असावी?Sayings of Sant Sena Maharaj
व्यसनाचे दुष्परिणाम.आशा विषयावर साध्य, सोप्या भाषेत अभंगाची रचना केली आहे.आज आपण “नीतिबोध” अभंगाची या पोस्ट मध्ये माहिती घेऊ .हि पोस्ट आवडल्यास इतरांना जरुर शेयर करा.
Sayings of Sant Sena Maharaj
संत शिरोमणी सेना महाराज यांनी माणसाचं आचरण कसे असावे? माणसाने जीवनात कसे वागावे? व्यसनाचे दुष्परिणाम, सत्संगती चे फायदे याबद्दल “नीतिबोध” मध्ये ३१ अभंगाची रचना केली. त्या सर्व अभंगाची आर्थासहित माहिती पुढीलप्रमाणे आहे.
अभंग क्रमांक एक
स्वहित सांगावे भलें |
जैसे आपणासी कळे ||१||
त्याच्या पुण्या नाही पार |
होय अगणित उपकार ||२||
मोहपाशें बांधिला |
होता तोही मुक्त केला ||३||
जेणे वाट दाखविली |
सेना म्हणे कृपा केली ||४||
भावार्थ:- सेनाजी म्हणतात- स्वतःचे कल्याण चांगल्या प्रकारे कसे करून घ्यावे, हे आपणास कळेल त्या पद्धतीने दुसऱ्याला समजावून सांगत जावे. जो असे इतरांना मार्गदर्शन करतो, त्याचे समाजावर अगणित उपकार होतात व त्याच्या पुण्याला पारावर राहत नाही.
तोच खरा संत अथवा साधू. तो माया मोहनी बद्ध केलेल्या बाबड्या जनांच्या पाशातून मुक्त करतो व अज्ञ लोकांस योग्य वाट दाखवतो. संसारात रखडणाऱ्या लोकांवर संतजन हीच मोठी कृपा करतात.
अभंग क्रमांक दोन
स्वधर्म सांडूनि परधर्मीं जाय |
त्यांचे गुण गाय वर्णी सदा ||१||
कुरूप ती आई मुलासी जीवन |
दुजी रंभा जाण व्यर्थ आहे ||२||
पाण्यातुनी मासा तुपा डोहीं गेला |
प्राणसी मुकला दुःख पावे ||३||
सेना म्हणे नका भुलू मोहशब्दा |
असेल प्रारब्ध कैसे होय ||४||
भावार्थ:- स्वतःचा मूळ धर्म सोडून जो दुसऱ्या धर्माचा स्वीकार करतो आणि परधर्माचे गुण गाऊन सदा त्याचे वर्णन करतो तो पापभ्रष्टच म्हणावा. अहो, स्वतःची जन्मदात्री आई ही कुरूप असली तरी तीच त्या मुलाचे जीवन होय. तिच्या जागी दुसरी रंभा, अप्सरा जरी आणली तरी ती त्या मुलाच्या लेखी व्यर्थ आहे.Sayings of Sant Sena Maharaj
पाण्यात राहणारा मासा तुपाच्या डोहात शिरला तर दुःख पावून शेवटी प्राणास मुकेल. म्हणून सेनाजी सांगतात, शाब्दिक मोहजाळात फसू नका. स्वधर्म वाटेल ते झाले तरी सोडू नका. तुमचे प्रारब्ध जसे असेल तसे शांतपणे स्वीकारा.
संत सेना महाराज यांच्या बद्दल अधिक माहिती साठी
अभंग क्रमांक तीन
आपुलिया हिता बोलू गेली वाणी |
ठेवा अंतःकरणी सांभाळून ||१||
देव धर्म शुद्धाचरणीं वागा |
भजा पांडुरंग नित्य नेमें ||२||
ऋण वैर हत्या नका उगवू सूड |
होईल पुढे जड भोगावया ||३||
सेना म्हणे सोडा व्यसनी व्यसन |
असता अवगुण जाय लया ||४||
भावार्थ:- सेनाजी म्हणतात- तुमच्या सर्वांच्या हिताकरिता मीही उपदेश वाणी बोलत आहे. तरी माझा उपदेश अंतःकरणात दृढपणे सांभाळून ठेवा. देव आणि धर्म यांच्या विषयात शुद्ध आचरणाने वागा आणि पांडुरंगाला नित्य नेमाने भजत जा. ऋण कधी घेऊ नका. कोणाशी वैर धरू नका.
कोणाची हत्या करू नका. कोणावर सूड उगवू नका. ही दृष्कृते केल्यास पुढे त्यांच्या दुष्परिणाम भोगणे तुम्हाला जड जाईल. व्यसनी लोकांनो, आपापली व्यसने सोडून द्या. तुमच्या अंगी अवगुण असतील तर तुम्ही लयाला जाल.
अभंग क्रमांक चार
हलकटासंगें तों हलकट बनला |
कोळसें नासिला शुभ्र वर्ण ||१||
ऐसे पाहू जाता आहे तया जगीं |
पस्तावून भोगी दुःख पीडा ||२||
सत्संगामाजी अब्रुबळ वाढे |
परमात्मा जोडे तयासिया ||३||
सेना म्हणे ऐसे बोलिलों सकळां |
मनुष्यदेहीं वेळा चुकवू नका ||४||
भावार्थ:- सेनाजी सांगतात- जसा कोळसा पांढऱ्या वरणाचा नाश करतो, तद्वत् हलकट माणसाच्या संगतीने चांगला माणूस हलकट बनतो. खरे पाहू जाता जगाचा असा हा न्याय आहे. कुसंगतीने माणूस बिघडल्यावर अंती पस्तावतो आणि दुःख व पीडा भोगीत राहातो.
सत्संगीच्या योगे प्रतिष्ठेचे बळ वाढते व अशा सदाचरणी मनुष्यांच्या परमात्मा प्राप्त होतो. मी हे सर्वांना कळकळीने बोललो आहे की गेलेली वेळ परत येत नसते, यास्तव मनुष्यदेहाच्या सार्थकाच्या वेळा चुकवू नका.
अभंग क्रमांक पाच
गांजा भांग अफू घेऊ नका सुरा |
दारिद्र संसारा आणाल ते ||१||
रांडबाजी आणिक खेळू नका जुगार |
भांडण बाजार दृष्ट वाणी ||२||
धन जाय अब्रू हीन होय बल |
शरिराचे हाल दुःख भोगी ||३||
सेना म्हणे करा हरिनाम व्यसन |
भगवंताचे गुण आचरावे ||४||
भावार्थ:- गांजा, भांग, अफू किंवा दारू यांपैकी कोणत्याही व्यसनाच्या जाळ्यात सापडू नका. कोणतेही व्यसन तुमच्या संसाराला नक्कीच दारिद्र्यात लोटील. रंडीबाजी करू नका तसेच जुगार खेळू नका. भांडणाचा बाजार मांडू नका. लोकांना दृष्ट उद्गार बोलू नका.Sayings of Sant Sena Maharaj
या सर्व गोष्टींमुळे तुमचा द्रव्य नाश होईल, अब्रू जाईल आणि तुमचे बळ क्षीण होऊन जाईल. शरीराचे हाल हाल होतील व दुःख भोगावे लागेल. हा बहुमोल सदुपदेश करून सेनाजी बजावतात, हरिनाम हेच एकमेव व्यसन तुम्ही अंगी बाणवून घ्या आणि भगवंताच्या गुणांचेच आचरण करा.
अभंग क्रमांक सहा
नका सेवू अफू नका पिऊ दारू |
गांज्याच्या धुरें नाश होय ||१||
या व्यसनापाई बुडाले हे किती |
रांडापोरें मरती ना खावया ||२||
शरीरासी भंग मान गेले धन |
पाहती किलवाणें जनामध्ये ||३||
सेना म्हणे सांगतो धरा अंतःकरणीं |
करितो विनवणी तुम्हालागी ||४||
भावार्थ:- सेनाजी संसारी जनांस विनवणी करून म्हणतात- मी काय सांगतो ते नीट अंतःकरणात साठवून ठेवा. अफूचे सेवन करु नका. दारु पिऊ नका. गांज्याचा धूर सोडू नका. या दूर्व्यसनांनी तुमचा नाश होईल. या व्यसनांच्या नादी लागून असंख्य लोकांची धूळधाण झाली आहे.
त्यांची बायकापोरे खायला न मिळाल्यामुळे उपासमार होऊन मरत आहेत. त्यांचे शरीर दुर्बल होते, मानहानी होते व जवळच्या धनाचा चुराडा होतो.असे अपयशी लोक केविलवाणेपणे समाजात मान खाली घालून वावरतात.म्हणून या व्यसनापासून दूर रहा.
संत सेना महाराज यांच्या बद्दल अधिक माहिती साठी
अभंग क्रमांक सात
सुरा पिऊनी जगीं केली मात |
जननीचा हात धरीतसे ||१||
न मानी कोणासी वाढवी अज्ञान |
घाली मानपान चुलीमाजी ||२||
उतरता नशा संकोच मानसी |
तोंड तो जनाशी दावीच ना ||३||
सेना म्हणे ऐसे वर्तू नका जनीं |
विनंती चरणी सकलांशी ||४||
भावार्थ:- दारू पिऊन या दारुड्याने जगात भलतीच बहादुरी करून दाखविली.त्याने आपल्या जन्मदात्या आईचा हात धरून खेचला.हा कोणाची पर्वा करीत नाही व असल्या असभ्य आचरणाने आपली मान प्रतिष्ठा चुलीत घालतो आणि स्वतःचे अज्ञान मात्र वाढवतो.
दारूचा कैफ उतरल्यावर तो मनामध्ये खजील होतो व लोकांत आपले काळे तोंड दाखवीत नाही. सेनाजी म्हणतात लोक हो, जगात अशी लांछनास्पद वागणूक करू नका, हीच तुम्हा सर्वांच्या पायावर मस्तक ठेवून मी विनंती करतो.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक आठ
परकीय त्या स्त्रिया मानाव्यात माता |
ज्ञानाबोध चित्ता सांभाळावे ||१||
परस्त्री नादाने डुबले कित्येक |
धुळीं मिळे, रंक झाले पहा ||२||
होता रोग तया इंद्रियें भंगती |
आणि ती पत्नी, दूजा पाहे ||३||
सेना म्हणे जैसे कराल तैसे फळ |
नरदेह अमोल नरकीं गेला ||४||
भावार्थ:- सेनाजी उपदेशितात की, परस्त्रिया माते समान मानाव्यात आणि या ज्ञानाचा बोध सदासर्वदा आपल्या चित्ताशी जतन करून ठेवावा. परस्त्रियांच्या नादाबाई असंख्य लोक आजवर बुडाले आहेत, धुळीला मिळाले आहेत आणि कितीतरी जण रावाचे रंक बनले आहेत.
त्यांना नाना प्रकारचे गुप्त रोग होतात व त्यांची इंद्रिये भंगून जातात. त्यांची पत्नी विन्मुख होऊन दुसऱ्याशी यौनसंबंध जोडते. तात्पर्य, तुम्ही जसे कर्म कराल त्यानुसार त्याचे फळ तुम्हास भोगावे लागते. परणारी चा छंद धराल तर तुमचा अमोल नरदेह नरकगतीस प्राप्त होईल.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक नऊ
व्रत करा तुम्ही परस्त्री माऊली |
चोरी ती चुगली करू नका ||१||
नित्य उठून या देवासी भजावे |
उद्योगी असावे कष्टसार ||२||
उपासतापास नका करू व्रत |
रहा धरुनि चित्त हरी पायीं ||३||
सेना म्हणे तुम्हा प्रपंच तरिजे |
रामकृष्ण राजी आठवावा ||४||
भावार्थ:- सेनाजी हितबोध करतात – परस्त्री स्वमातेसमान मानण्याचे पवित्र व्रत तुम्ही धारण करा. कोणाची चोरी अथवा चहाडी- चुगली करू नका. रोज झोपेतून उठल्यापासून देवाचे भजन करीत जावे. आपापल्या उद्योगाला रममाण होऊन तो सफल होण्यासाठी कष्ट करावेत.
उपासतापास, वृत्त वैकल्ये वगैरे मुळीच करू नये, तर हरिचरनाशी आपले चित्त समर्पित करून निर्धास्त रहा. प्रेमाने व भक्ती बाबांनी पुरुष रामकृष्णाचे स्मरण करीत जा, म्हणजे तुम्ही विनासायास हा प्रपंच तरुण जाल.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक दहा
सोड सोड प्राण्या राडेची संगती |
प्राण्यांचे आहुती होईल ती ||१||
प्रमाणे एक सुख भार्येचे ते घ्यावे |
इतरां लेखावे मायबहिणी||२||
पैसे वर्तमान प्रजाही सद्गुणी |
आचारी विचारणे नांदतसे ||३||
सेना म्हणे कुटुंब सात्विक |
पंढरीनायक भजताती ||४||
भावार्थ:- बदफैली माणसाला सेनाजी मायेने समजून सांगतात.अरे पदभ्रष्ट प्राण्या,तू रांडेची अथवा वेश्येची संगत कायमची सोडून दे, अन्यथा या पापाचारात तुझे प्राणही तुला गमवावे लागतील.. प्रामाणिकपणे पत्नीपासून मिळणारे शररसख पाहिजे तेवढे घ्यावे.
इतर सार्या स्त्रियांना मायबहिणी समजून वागावे.अशा सात्विक वर्तनाने तुमची संततीसुध्दा सद्गुणी आचारी निपजते आणि शुद्ध आचारविचार युक्त बनून नांदते.असे कुटुंब सत्वशील जीवन जगते व प्रत्यक्ष पंढरीनायक विठ्ठल त्यांचा अंकित बनून राहतो.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक आकरा
विषयी तो प्रेमा दुःख वाढवितो |
वृध्दा रडवितो शक्तिहीन ||१||
अब्रु बल दोन्ही धननाश होय |
काबाडकष्टी होय रोगी सदा ||२||
जग देत नाही तयासी सन्मान |
पाहे केविलवाणा दरिद्री तो ||३||
सेना म्हणे होय अंतकाळी दशा |
श्री मोहपाशा लया जाय ||४||
भावार्थ:-सेनाजी सांगतात की कामुक व विषयांसक्त प्रेम दु:खाची वृध्दी करण्यास कारणीभूत ठरते.हा विषयाचा नाद वृध्दांना व अशक्तांना सुध्दा घेरतो व त्यापायी त्यांना रडत बसावे लागते.अब्रु व ताकद दोन्हींचे वाटुळे होऊन जवळच्या धनसंपत्तीचा नाश होतो.
पोटापाण्यासाठी अशा विषयांध जिवांना अखेर जिवापाड काबाडकष्ट करावे लागतात व ते कायमचे रोगी बनतात. जगात त्यांना काहीच मानसन्मान मिळत नाही.दरिद्री होऊन ते सगळ्यांकडे केविलवाण्या मुद्रेने पाहतात.अंतकाळी त्यांची भयंकर दुर्दशा होते व विषयाच्या मोहपाशामुळे त्यांचे सर्व वैभव लयाला जाते.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक बारा
कामातुर सांडी सज्जन लक्षण |
मदिरा व्यसन बडबडी ||१||
गांजा भांग अफू सेवी, दृष्टी क्रुर |
शरीर मुर्दार, कळत नाही ||२||
आला विनाशकाळ विपरीत बुद्धी |
जुगारीचे छंदी नागवला ||३||
सेना म्हणे धन घालविती द:की |
परी हरी मुखी येईचिना ||४||
भावार्थ:- काहातुर पुरुषाचा क्रमशा: कसा अधःपात होतो याचे विवेचन करताना सेनाजी सांगतात की कामातुर माणूस सज्जनपनाचे सर्व गुणधर्म सोडून देतो. त्याला मद्यपानाचे व्यसन लागून तो बेताल बडबड करु लागतो.गांजा ,भांग, अफू यांचे सेवन तो करु लागतो.
त्यांच्या दृष्टीत क्रूरता येते, पण आपले शरीर मुर्दाड बनत चालले आहे हेही त्यास कळत नाही.विनाशकाळ येऊन ठेपला म्हणजे माणसाला आत्मघातक उलटी बुद्धी सुचते, त्याचप्रमाणे जचगाराचा छंद लागून तो त्यात नागवला जातो.जवळचे सर्व धन घालवून तो दु:ख पावतो.परंतू इतके होऊनही या साऱ्या विपत्तीतून तारणारे हरीनाम काही त्यांच्या तोंडी येत नाही.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक तेरा
काम वाढवी जया आस |
झाला बाइलीचा दास ||१||
वचन मोडणे नाही सत्ता |
काय पुरुषार्थ असता ||२||
प्रेम इच्छा अवकाळी |
श्वान नित्य लोंडा घोळी ||३||
दोन स्त्रिया जो करील |
तो मरणमुख होईल ||४||
वीरश्री नाही तो माना |
अज्ञान होत किलवाना ||५||
सेना म्हणे लोचट झाला |
जन्मुनिया व्यर्थ गेला ||६||
भावार्थ:-सेनाजी सांगतात की ज्यांच्या अंगी कामवासनेची वाढ होते तो आपल्या पत्नीचा गुलाम बनून राहतो , त्याच्या ठायी पुरुषार्थ असुनही बायकोला प्रेमभरात दिलेले अयोग्य वचन लाथाडण्याची सत्ता त्याच्या अंगी राहात नाही.तिच्या प्रेम लाभाच्या इच्छेने त्याला अवकळा प्राप्त होते व तो रोज तिच्यापुढे कुत्र्याप्रमाणे गोंडा घोळत राहतो आणि जो दोन स्त्रिया करतो त्याची तर याहून अधिक फजिती होऊन तो जिवंतपणीच मृतप्राय बनतो.
स्वत: च्या अंगी मूलभूत असलेली बहादुरी तो मानीत नाही.आणि स्वतः विषयी अज्ञान पांघरूण बायकांच्या पायी दीनवाण होऊन राहतो.अशा प्रकारे पक्का कोडगा बनून तो लाचारीचे जिने जगतो व नरदेही जन्माला येऊनही वाया जातो.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक चौदा
कामाचा लोभी बाइल सेवेसी|
म्हणे आज्ञा मशी करा तुम्ही ||१||
घर झाड झुड उटीतसे भांडी |
लागे चरणां,तोंडी दीन झाला ||२||
श्वानासारिखा लोंडा घोळी पुढे |
बोले लाडेलाडें कीलवाणी ||३||
सेना म्हणे अशाचे तोंड पाहू नये |
वीरश्री जाये जळोनिया ||४||
भावार्थ:-सेनाजी म्हणतात की कामपुर्तिसाठी लालचावलेला नर बाटलीच्या सेवेला सदैव तत्पर रहातो . तिला म्हणतो, मला नुसती आज्ञा कर,ती पुरी केल्याशिवाय राहणार नाही.
घराची झाडझूड करतो,उष्टी भांडी घासून ठेवतो, तीचे पाय दाबतो, तिच्या पाया पडतो, लाचारीने तिच्यापुढे तिच्यापुढे तोंड वेंगाळतो.कुत्र्यासारखा तिच्यापुढे गोंडा घोळून पुढे पुढे करतो.केविलवानी मुद्रा करून तिच्याशी लाडेलाडे बोलतो.खरोखर अशाचे तोंड सुध्दा पाहु नये.नाहीतर आपला पुरुषार्थ जळून खाक होईल.
अभंग क्रमांक पंधरा
ऐश्वर्या आले घरा |
म्हणती आमचा आहे बरा ||१||
दारिद्र्याने केली मात |
कोणी ढुंकुनी न पाहत ||२||
चोरी छिनाली लबाडी |
म्हणे याला बहुखोडी ||३||
सेना म्हणे बदलती गुण |
तैसे तैसे वर्ते जण ||४||
भावार्थ:- एखाद्याच्या घरी वैभव प्राप्त झाले तर लोक नावाजुन म्हणतात,तो आमचा हा फार सज्जन आहे बरका.त्यांच्यावर दारीद्र्याने कब्जा केला तर मात्र त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही.त्याने चोरी,छिनाली, लबाडी असे काही प्रकार केले तर म्हणतात, या बिलंदराच्या अंगी भल्या भलत्या खोड्या आहेत.Sayings of Sant Sena Maharaj
म्हणून सेनाजी सांगतात,माणसाचे गुणावगुण जसजसे बदलतील, त्या अनुरोधाने लोक त्यांच्याशी वर्तनुक ठेवतात.सबब, लोकांच्या स्तुतीने फुशारुन न जाता वा निंदेने हिरमुसून न जाता प्रत्येकाने सन्मार्ग आचरावा.
अभंग क्रमांक सोळा
खोटे कर्म जरी करिता वाटे गोड |
पुढे अवघड होईल ते ||१||
संसाराचा भोवरा आणील गोत्यात |
मग गणगोत कामा नये ||२||
अब्रू धन जाय निपुत्रिक होती |
किलवाने पाहती जनांकडे ||३||
सेना म्हणे ज्यांचे तोची भोगीला |
इतर हासतील, दुःखी होय ||४||
भावार्थ:- जरी खोटे कर्म करताना गोड वाटते, तरी त्याचे दुष्परिणाम भोगणे पुढे अवघड होऊन जाते. संसाराचा भोवरा तुम्हाला गोत्यात आणील व अशा वेळी गणगोतांपैकी कोणीही तुमच्या मदतीला धावून येणार नाही.Sayings of Sant Sena Maharaj
खोटे काम करणाऱ्यांची अब्रू जाईल, जवळचे धन नष्ट होईल व ते निपुत्रिक होतील. अशी दुःस्थिती ओढवल्यावर ते लोकांकडे केविलवाने पाहतील; पण एकही सहानुभूती दाखवणार नाही. यास्तव सेनाजी बोध करतात, कर्माचे फळ ज्याचे त्यालाच भोगावे लागते, खोट्या कर्माचे दुःख ज्याचे त्याला सोसावे लागते. इतर लोक त्याला हसत राहातात.
अभंग क्रमांक सतरा
लबाडी करूनी साठविले धन |
मृत्यू येता जाण घेता नये ||१||
नागवेचि येई नागवेचि जाई |
सुखें उतराई झाले पाही ||२||
कोणी ना कोणाचे एका देवाविण |
म्हणा नारायण सद्बुद्धीने ||३||
सेना म्हणे देवाविण नाही गती |
आठवा श्रीपती कामा येई ||४||
भावार्थ:- मनुष्याने लांड्यालबाड्या करून खूप धन साठवले तरी मृत्यू आल्यावर त्याला ते बरोबर घेऊन जाता येत नाही. खरे पाहाता माणूस नागवेच जन्माला येतो आणि मेल्यावर नागवेच जातो. अशा तऱ्हेने ते नरजन्मप्राप्तीच्या ऋणातून सुखेनैव मुक्त होत असते.
एका देवाखेरीज कोणीच कोणाचे असत नाही, तेव्हा सद्बुद्धीपूर्वक नारायणाचे नाम जपीत जा. सेनाजी म्हणतात, देवाशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. श्रीपतीला सदैव आठवीत जा. तोच तुमच्या साह्याला धावून येईल.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक आठरा
न मागे कोणासी तोचि करा गुरु |
उपदेश तारू होईल गा ||१||
ऐसियाचे बोलें जोडे नारायण |
असता असता अज्ञान जाईल गा ||२||
धन मान तुच्छ वागतसे जगीं |
तोच हा त्यागी अच्युत गा ||३||
सेना म्हणे ऐसियासी शरण जावे |
शुद्ध मानोभावें करोनी गा ||४||
भावार्थ:-गुरु कोणास करावे याविषयी बहुमोल सल्ला सेनाजी देत आहेत- जो कोणाला काहीही मागत नाही अशाच ज्ञानी व नि:स्पृह माणसाला तुम्ही गुरु करा. त्याच्या उपदेशरूपी नौकेतून तुम्ही हा भवसिंधू सहजपणे तरुन जाल.Sayings of Sant Sena Maharaj
अशा सुपात्र व्यक्तीच्या बोलांनी नारायण प्राप्त होतो आणि आपले अज्ञान संपूर्णपणे नष्ट होऊन जाते. असा सद्गुरु धनदौलत व मानमरातब तुच्छ मानून जगात वावरतो आणि असाच त्यागी महापुरुष आपल्या कर्तव्यकर्मात अढळ असतो. अशा महापुरुष शुद्धा मनोभावेकरून शरण जावे.
अभंग क्रमांक ऐकोनीस
कुसंगतीने वाढते अज्ञान |
जळते हे ज्ञान सत्य माना ||१||
ताक सेविता आंबट ढेकूर |
दुधाला मधूर येईल तो ||२||
विषा प्राशीत मरण ओढवते |
सेवी अमृताते अमर होई ||३||
सेना म्हणे धरा बोल माझे चित्तीं |
एसे हे वेदान्तीं सांगितले ||४||
भावार्थ:- वाईट संगतीने मनात अज्ञान वाढीस लागते आणि जे ज्ञान आपण संपादित केले असेल ते जळून नष्ट होते याविषयी संदेह धरू नका. ताक प्राशन केले असता आंबट ढेकर येते; पण दुधाचे सेवन केल्यास मधुर ढकेर येईल.Sayings of Sant Sena Maharaj
विष प्यायल्यास मरण ओढवते, परंतु अमृतसेवन केले तर अमरत्व प्राप्त होते. कुसंगती व सत्संगती यामध्ये हा भेद आहे. सेनाजी म्हणतात, माझे हे बोल चित्तात नीट साठवा, कारण वेदान्तामध्येही हीच शिकवण दिलेली आहे.
संत सेना महाराज यांच्या बद्दल अधिक माहिती साठी
अभंग क्रमांक वीस
आपण धर्मभ्रष्ट दुजियासी करी |
छिनाली तो चोरी उनाड तो ||१||
तामस वृत्तीचा सात्त्विकासि छळी |
मातेची टवाळी करीतसे ||२||
खाऊ नये ते खाय पाहू नये ते पाहे |
जाऊ नये तेथे जाय निर्लज्ज तो ||३||
सेना म्हणे जन्मा आला हा अधम |
शून्य रामनाम नरकीं गेला ||४||
भावार्थ:- तामसी वृत्तीचा दुराचारी माणूस स्वतः तर धर्मभ्रष्ट असतोच, पण आपल्या संसर्गाने इतरांसही अधर्मी बनवितो. छिनाली, चोरी, उनाडपणा वगैरे दुर्गुणांनी तो परिपूर्ण असतो.Sayings of Sant Sena Maharaj
त्याचप्रमाणे तो सात्विक लोकांचा छळ करतो आणि स्वतःच्या मातेची देखील टवाळी करायला मागेपुढे पाहत नाही. असा निर्लज्ज, धर्मभ्रष्ट खाऊ नये ते खातो, पाहू नये ते पाहतो आणि जाऊ नये अशा ठिकाणी जातो. सेनाजी सांगतात, अशा अधम माणसाचा जन्म व्यर्थ आहे आणि त्याच्या मुखी चुकूनही रामनाम येत नसल्यामुळे मरणोपरान्त तो नरकातच जातो.
अभंग क्रमांक ऐकेवीस
तुज ऐसे वाटे देह व्यर्थ जावा |
द्यूतकर्म खेळाया सारी पाट ||१||
मग नाही नाम निजल्या जागीं राम |
जन्मोनि अधम दु:ख पावे ||२||
दासीगमनीं धीट विषयीं लंपट |
जावया वाट अधोगती ||३||
नरका जावयासी धरशील चाड |
तरी निंदा गोड वैष्णवाची ||४||
सेना म्हणे नामाचे लावी का रे पिसें |
जन्मल्या सायासें व्यर्थ जासी ||५||
भावार्थ:- भोगविलासात आयुष्य दवडणाऱ्या चंगीभंगी माणसास उद्देशून सेनाजी म्हणतात- अरे अभाग्या, आपल्या महासायासाने लाभलेला देह वाया जावा असे तुला वाटत असावे म्हणूनच जुगार खेळण्यासाठी तू सारीपाट मांडून बसतोस. हा आधम जागतेपणी फुरसत काढून देवाचे नामस्मरण तर कधी करीत नाहीच, परंतु निजल्या जागी सुद्धा चुकून कधी रामनाम घेत नाही.Sayings of Sant Sena Maharaj
अशा तऱ्हेने बहुमोल जन्म मिळूनही हा अंती दुःख पावतो. असला विषयी, लंपट माणूस दासीशी सुद्ध स्वैराचार करण्याइतका बेशरम बनतो. आपल्या अशा पापाचरणाने तो अधोगतीला जाण्याची वाटच निर्माण करीत असतो. वैष्णवांची निंदा केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही, व यायोगे नरकास जाण्याचीच त्याला हौस असल्याचे दिसते.
अभंग क्रमांक बावीस
मान करावा खंडन |
दुर्जनाचा सुखें करून ||१||
लाथा हणुनी घाला दुरी |
निंदकासी झडकरी ||२||
त्याचा जाणावा विटाळ |
लोकां पिळीतो चांडाळ ||३||
त्याची संगती जयास |
सेना म्हणे नरकवास ||४||
भावार्थ:- दुष्ट माणसाची कसलीही गय न करता त्याचा सरळ सरळ अपमान करून घालवून द्यावे. निंदा, कुचाळक्या करणाऱ्या ताबडतोब लाथा हाणून दूर हाकलून द्यावे. जो दुष्ट चांडाळ लोकांची पिळवणूक करतो, त्याला अस्पर्श समजून त्याचा विटाळ मानावा.
अशांची जो संगत धरतो, त्याच्या कपाळी हमखास नरकवास आहे, असे सेनाजी बजावतात.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक तेवीस
करिता परउपकार |
त्याच्या पुण्या नाही पार ||१||
करिता परपीडा |
त्याच्या पाया नाही जोडा ||२||
आपुलें परावें समान |
दुजा चरफडे देखून ||३||
आवडे जगा जे काही |
तैसे पाही करावे ||४||
उघडा घात आणि हित |
सेना म्हणे असे निश्चित ||५||
भावार्थ:- सेनाजी म्हणतात- जो दुसऱ्यांवर परोपकार करतो, त्याच्या पुण्याला खरोखर पारावार नाही. जो दुसऱ्यांना पीडा देतो, त्याच्या पायात मात्र जोडासुद्धा शिल्लक राहत नाही.
एक आपल्यास व परक्यास समसमान लेखतो; ते आपण करावे.परपीडा व परोपकार यांत उघडउघड घात कशात आहे व हित कशात आहे, याची निश्चित जाणीव प्रत्येकाने ठेवावी.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक चोवीस
घरासि आले संत देखोनिया |
म्हणे यांसी खावया कोठुनि घालू ||१||
ऐसा हा निर्धारी दुष्ट दुराचारी |
जन्मोनिया झाला भूमी भारी ||२||
दासीचे आर्जव करोनि भोजन |
घाली, समाधान करी तीचे ||३||
आणि आवडीने करी तिची सेवा |
म्हणे सुख जीवा फार माझ्या ||४||
संतांनी पाणी मागता म्हणे काय |
मोडले की पाय जाय आणी ||५||
सेना म्हणे का रे गाढवा नेणसी |
कुंभीपाक वस्तीसी केला आहे ||६||
भावार्थ:-घरी संतजन आलेले पाहून घरधनी म्हणतो, आता यांना खायला कोठून घालू? असा हा दुष्ट, दुराचारी माणूस जन्माला येऊन निश्चित भूमीला भार झाला आहे. रखेलीची मात्र हा मनधरणी करून तिला स्वहस्ते भोजने घालतो.
तिचे नाना प्रकारचे समाधान करतो आणि मोठ्या आवडीने तिची सेवा करून म्हणतो, यातच माझ्या जीवाला अपार सुख मिळते. संतांनी नुसते पाणी मागितले तरी हा पापी म्हणतो, का हो, पाय मोडले की काय? जा, घेऊन या. हा दृष्टांत देऊन सेनाजी त्याला धिक्कार की अरे गाढवा, तुझ्या नशिबी कुंभीपाक नरकच राखून ठेवलेला आहे.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक पंचवीस
बैसोनि कीर्तनात |
गोष्टी सांगतो निश्चित ||१||
दुष्ट अधम तो खरा |
येथूनिया दूर करा ||२||
तमाखु ओढुनि सोडी धूर |
दुष्टबुद्धी दुराचार ||३||
पान खाय कीर्तनात |
रुधिर विटाळशीचे पीत ||४||
त्याची संगती जयास |
सेना म्हणे नर्कवास ||५||
भावार्थ:- सेनाजी कीर्तनात वावगे प्रकार करणाऱ्यांना दूषण देऊन म्हणतात- जो कीर्तनात बसून कीर्तन न ऐकता बिनघोरपणे गप्पागोष्टी करतो, तो खरा दुष्ट व अदम जाणवा. त्याला कीर्तनस्थळाबाहेर हाकलून द्यायला पाहिजे. जो कीर्तनात तंबाखू ओढून धूर सोडतो, तो दुष्टबुद्धी व दुराचारी होय.
जो कीर्तनात पान खाऊन चघळीत बसतो तो विटाळीशी बाईचे रक्त पिण्याचेच पातक करतो. अशा नराधमांशी जो स्नेह करतो, त्याला सुद्धा नरकवास चुकत नाही.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक सवीस
चोरी करुनिया बांधिले वाडे |
झाले ते उघडे नांदत नाही ||१||
वेश्या होऊनिया मिळविले धन |
असता अवगुण लया गेली ||२||
मदिरा जुगार करी परध्दार |
दारिद्र बेजार दुःख भोगी ||३||
सेना म्हणे त्रासून फिरती हो जनीं |
मग चक्रपाणी भजू पाहे ||४||
भावार्थ:- सेनाजी सांगतात- चोऱ्या करून त्या पैशांतून मोठमोठे वाडे बांधले तरी शेवटी ते उघडे आणि ओसाड पडतात. वेश्येने वाममार्गाने धन कमविले तरी अंगच्या अवगुणांनी अखेर त्या धनासहित ती स्वतःही लयास जाते. माणूस मद्यपान, जुगार किंवा परदारागमन अशा वाईट फंदात पडतो आणि परिणामी दारिद्र्याने बेजार होऊन दुःखयातना भोगतो. सारांश, पापाचे परिणाम दुराचार्याना भोगावेच लागतात.
त्या दुःखाने त्रस्त होऊन ते जगात वणवण फिरतात आणि मग कोठे त्यांना ईश्वरभजनाची आठवण होते.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक सत्तावीस
साध्वी रंगली रंगल्या संगती |
उतरली कांती, सुख नाही ||१||
दोन्ही कुळांचा केलासे नाश |
बांधियेला पाश नरका जाया ||२||
नाही केला विचार खेद वाढे मनीं |
जवळ न कोणी दुःख पावे ||३||
सेना म्हणे करा श्रवण कीर्तन |
शुद्ध अंतकरण होण्यालागी ||४||
भावार्थ:-संत सेनाजी महाराज म्हणतात एक पतिव्रता साध्वी कुमार्गाला लागून रंगेल संगती रंगून गेली. तिचे पतीव्रत्याचे तेज उतरून गेले. अध:पातानंतर पुन्हा म्हणून तिला सुख लाभले नाही. सासर माहेर अशा दोन्ही कुळाचा त्या पापिणीने सत्यानाश केला आणि स्वतःसाठी नरक गतीचा पास जोडून ठेवला. पापाच्या घडीला सुविचार केला नाही.Sayings of Sant Sena Maharaj
या गोष्टीचा अतोनात छेद व पश्चाताप तिच्या मनात दाटला. पण आता तिला धीर देण्याला कोणी जवळ येत नाही व ती कायमची दुःखग्रस्त होऊन बसली आहे. अशा पतीत स्त्रियांनी आपले अंतकरण शुद्ध होण्यासाठी सतत हरिनामाचे श्रवण कीर्तनात मग्न राहिले पाहिजे, तरच त्यांच्या उधाराची आशा आहे.
अभंग क्रमांक आठावीस
बापावरी उलटे अशुद्धाचे बीज |
बायोकोचे तेजें मूड झाला ||१||
न मानी कोणास जनाचे ते बोला |
वाटे तया मोल स्त्रीवचनी ||२||
नाकापेक्षा मोती झाला असे जड |
कळू आली रड जनांमध्ये ||३||
सेना म्हणे होता शरीराने क्षीण |
असतां अवगुण तोंड झोडी ||४||
भावार्थ:- बाईलवेड्या पुरुषाची दुर्गती वर्णन करताना सेना महाराज सांगतात – बायकोच्या तेजाने भारून जाऊन हा अशुद्ध बीजाचा बाइलबुद्धी पुरुष पुर्ता मूर्ख बनला आणि आपल्या जन्मदात्या पित्यावर उलटला. लोकांची हितकारी बोलणी त्यांनी झिडकावून दिली. कोणाचीही सलामसलच तो मानीनासा झाला. बायकोचा शब्द हाच काय तो त्यास बहुमोलाचा व शिरोधार्थ वाटू लागला.
शेवटी नाकापेक्षा मोती जड झाला. बायको शिरजोर होऊन त्याला बोटावर नाचू लागली व त्याचा छळ करू लागली. तो बायकोची थुंकी झेलणारा गुलाम बनला. त्याची ही रड लोकात कळून चुकली. बापडा आधीच शरीराने दुबळा होता ; बायकोला काबुत आणू शकत नाही. आता आपली अवगुण आठवण स्वतःची तोंड झोडीत पश्चात्ताप करीत बसला आहे.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक एकोंनतीस
विकल्पाने केले मूढ |
हाका श्वान म्हना हाड ||१||
ऐसियासी नका बोलू |
शहाणपण नका घालू ||२||
गाढवासी केला शृंगार |
उकिरड्याची लोळे खर ||३||
सेना म्हणे हा नपुंसक |
स्त्री तया न घाली भीक ||४||
भावार्थ:- पत्नी की मातापिता अशा संभ्रमात अडकून ज्याने आपली बुद्धी गहाण टाकली आहे व आई बापाकडे पाठ फिरवली आहे, आशाला आपण कुत्र्याला ज्याप्रमाणे हाड म्हणून हाकलतो त्याप्रमाणे दूर हाकलून द्या. अशा माणसाशी बोलणे व्यर्थ असल्यामुळे बोलूही नका आणि त्याला शहाणपण शिकवण्याच्या फंडात पडू नका. गाढवाला खूप सजवले तरी तो उकीरड्यावर जाऊन लोळत राहणार.
सेनाजी म्हणतात अशा पत्नीवर लंपट झालेला माणूस खरोखरच नपुसक असतो. त्याची स्त्री सुद्धा त्याची चव ओळखून त्याला भीक घालत नाही.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक तीस
उंच कुळामाजी वर्ततो चांडाळ |
आचार हा फोल मानीतसे ||१||
देवाचे नाम घेता न ऐके कानीं |
अभद्रवाणी हासतसे ||२||
गरीब- दुबळ्या बोले राग राग |
बकरीवरी वाघ धावतसे ||३||
सेना म्हणे त्याची माया ही चुकली |
बीज घेत खोली अभद्राचे ||४||
भावार्थ:-सेनाजी म्हणतात- श्रेष्ठ कुळामध्ये एखादा चांडाळही निपजतो व प्रतिष्ठेने वावरतो. पण तो धर्माचरण व्यर्थ मानीत असतो. कोणी देवाचे नाम घेतले तर ते कानांनी ऐकत देखील नाही. गलिच्छ वाणी उच्चारुन तुच्छतेने हसत राहातो.Sayings of Sant Sena Maharaj
गरीब, दुबळ्या लोकांना रागारागाने वेडेवाकडे बोलतो व बकरीवर वाघाने धावावे त्याप्रमाणे त्यांच्या अंगावर धावून जातो. ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार त्याला कधीच होत नाही आणि त्याच्या अंत:करणात अभद्रतेचे बीज खोलवर रुजत राहाते.
अभंग क्रमांक एकतीस
धर्म- उपदेशीं मागेल जो अर्धी |
तयाचिया प्रती भजू नये ||१||
थाटमाट करुनी लुबाडीत रांडा |
ऐसिया पाखंडा भुलू नये ||२||
मध्यस्थी घालुनी फसवी भाविकां |
लाभ नसे, धक्का बसतसे ||३||
सेना म्हणे धर्म करा अन्नपान |
भजा नारायण पुण्य होय ||४||
भावार्थ:- सेनाजींचा भाविकांप्रत हितबोध असा आहे- धर्माचा उपदेश करून जो द्रव्य अथवा रोख बिदागी मागतो अशा पुराणिकाचे ठायी भक्ती भाव धरु नये. शास्त्री पंडिताचा थाटमाट करुन भोळ्या बायबापड्यांना लुबाडतो अशाच्या पाखंडाला भुलू नये.
पैशाच्या आशेने देव आणि भक्त यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचे ढोंग करून भाविकांना फसवणारे अनेक मिळतात. त्यांच्या मध्यस्थीचा भाविकांना लाभ होत नाहीच, उलट निराशेचे धक्का बसतो. म्हणून केवळ अन्न, पाणी यांच्या रूपाने धर्म करावा आणि अंत:करणपूर्वक नारायणाची भक्ती करावी, यातच खरी पुण्यप्राप्ती आहे.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक बतीस
धर्माचे थोतांड करून भरी पोट |
भार्या मुले मठ मजा करी ||१||
पुराण सांगत नागावाणी डोले |
अविर्भाव फोल करीतसे ||२||
गळा माळा भस्म नेसे पीतांबर |
साधूचा आचार दाखवीतो ||३||
सेना म्हणे ऐशा दांभिका भजती |
दोघेही जाताती अधोगती ||४||
भावार्थ:- सेनाजी सांगतात- भोंदू साधू धर्माचे थोतांड माजवून त्या भांडवलावर पोट भरतो, स्वतःचा मठ स्थापन करून बायकामुलांसह त्यात राहून मौजमजा करतो, पुराण सांगतात तो नागासारखा डोलतो व पोकळ आविर्भाव करून लोकांना गुंगवतो, कपाळी भस्म, गळ्यात माळा आणि कमरेला पीतांबर लेवून आपले साधूचे आचरण असल्याचे तो भक्तजनांना भासवतो.
अशा ढोंगी दांभिकाला जे भजतात ते लोक व त्यांना ‘झुकानेवाला’ तो साधू असे दोन्हीही अधोगतीस जातात.Sayings of Sant Sena Maharaj
अभंग क्रमांक तेहतीस
करितो लबाड्या पोसी रांडा मुलें |
इतरांसी झोले देऊनिया ||१||
बोलू जाता सांगे ब्रह्मज्ञान गोष्टी |
अंतरीं कपटी बक जैसा ||२||
शास्त्रज्ञ चतुर वक्ता तो पंडित |
इतरां खंडित करीतसें ||३||
सेना म्हणे ऐसा सत्य माना खळ |
आहे तो चांडाळ विटाळ माना ||४||
भावार्थ:- स्वार्थी विद्वानाचे निरूपण सेनाजी असे करतात- नानाविध लबाड्या करून, अनेकांना हुलकावण्या देऊन मतलबी विद्वान पंडित आपली बायकामुले पोसतो. त्याच्याशी बोलताना तो मोठमोठ्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो.Sayings of Sant Sena Maharaj
परंतु अंतर्यामी मात्र तो बगळ्यासारखी कपटी वृत्ती ठेवतो. स्वतः शास्त्रनिपुण व चतुर वक्ता असल्यामुळे तो इतरांच्या आक्षेपांचे सहज निरसन व खंडन करतो. पण सत्य गोष्ट ही आहे की, असला स्वार्थसाधू विद्वान दुष्ट व चांडाळच असतो व सर्वांना त्याचा विटाळ मानायला पाहिजे.