संत सेना महाराज अभंगगाथा -प्रपंच परमार्थ || Sant sena Mharaj Aabhang

Sant sena Mharaj Aabhang 1

संत सेना महाराज यांनी विविध भाषेमध्ये अभंग लिहिलेले आहेत. त्यापैकी मराठी भाषेमध्ये 268 अभंग लिहिलेले आढळतात. मराठी भाषेतील अभंगांमध्ये “प्रपंच आणि परमार्थ” कशा पद्धतीने माणसाने करावा. या संदर्भात संत सेना महाराज यांनी 18 अभंग लिहिलेले आहेत. ते अठरा अभंग कोणते आहेत हे आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. Sant sena Mharaj Aabhang

Sant sena Mharaj Aabhang
अभंग क्रमांक एक

उतरलो पार |
संसारसिंधु हा दुस्तर ||१||
कृपा केली पांडुरंगे |
सर्व निवालीं आंगे ||२||
सुख संतोषा पडे मिठी |
आवडी पोटीं होती ते ||३||
उपाधी वेगळा |
सेना राहिला निराळा ||४||

भावार्थ:- सेनाजी पांडुरंग – कृपेचा हवाला देऊन कथन करतात – तरण्यास महाकठीण असा हा संसाररूपी सागर ओलांडून मी पैलतीरावर सुखरूप उतरलो आहे.Sant sena Mharaj Aabhang

Sant sena Mharaj Aabhang 1

पांडुरंगाने माझ्यावर कृपा केल्यामुळे माझी सर्व इंद्रिये आता शांत व निरामय झाली आहेत. जी आवड माझ्या हृदयात आहे ती सध्या झाल्याकारणाने सुख व समाधानाची मिठी माझ्याभोवती पडली आहे. बाह्य ऐहिक बंधनांच्या उपसर्गातून पूर्ण मुक्त होऊन मी आता जगापासून निराळा होऊन राहिलो आहे.

अभंग क्रमांक दोन

प्रापंचामाजी भार्या गुणवंत |

असता पातिव्रत्य धन्य येथे ||१||
पति हा उद्योगी परमार्थ आवडी |

भयता जोडी सुख वाढी ||२||

सद्बुद्धी नीति थाटिती संसार |
आचार विचार नांदे तेथे ||३||
सेना म्हणे ऐसे वागेल जो जगीं |
त्यासी पांडुरंगी सार्थकी तो ||४||
भावार्थ:- प्रपंचामध्ये पत्नी गुणवंत असून पतिव्रता असेल तर तो प्रपंच धन्य होय. पती उद्योगी असून त्याच्या ठायी परमार्थसाधनेची आवड असेल तर या दोघांच्या संयोगाने सुखात वाढच होईल.Sant sena Mharaj Aabhang

Sant sena Mharaj Aabhang 2

अशा कुटुंबात सद्बुद्धी व नीतिमत्ता यांचा निवास असतो व आचार व विचार तेथे नित्य नांदतात. सेनाजी म्हणतात, अशा प्रकारे जो जगात वागतो त्यास पांडुरंग प्राप्त होऊन त्याच्या जीवनाचे सार्थक होते.

अभंग क्रमांक तीन

जगासी पटेल बोलू जाता बोल |
न मानिती फोल असे बोला ||१||
कनक आणि कांता न जाऊ अधीन |
घालविन प्राण सत्य जाण ||२||
आईबाप वृद्ध बंधुते भगिनी |
प्रेमें आळवुनी वागा सत्य ||३||
सेना म्हणे नीती धर्म रक्षावया |
भजावे केशवा परिवारें ||४||

भावार्थ:- सेनाजींचा उपदेश असा आहे- बोलण्याचा प्रसंग आल्यावर आम्ही जगाला पटेल असेच बोल बोलू व लोक तुमचे शब्द फोल मानणार नाहीत असेच शब्द बोलावेत. सोने नाणे व पत्नी यांच्या अधीन आम्ही प्राण गेला तरी जाणार नाही.

संत सेना महाराज यांच्या बद्दल अधिक माहिती साठी 

image2

संत सेना महाराज

हे तुम्ही ध्रुवसत्य समजा. तुम्ही याच तत्वाचे आचरण करा आणि आपले वृद्ध मातापिता तसेच बंधुभगिनी यांच्याशी प्रेमादराने व सत्यतेने वागा. असे वागण्यातच नीतिमत्ता आणि धार्मिकता आहे. या नीतिधर्माचा सांभाळ करण्यासाठी समस्त कुटुंबाने केशवाला भजत जावे.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक चार

कुटुंब परिवारें असती भाग्यवान |

पूर्वसुकृत जाण नांदतसे ||१||
पुण्य हे संपता अवदशा शिरे |
होती ती मंथरें नाथ करी ||२||
आपसात भांडण करिती कल्लोळ |
आठवेना गोपाळ चिंता भारी ||३||
सेना म्हणे राहा कांता धन अलिप्त |
मन भगवंत कळों येई ||४||

भावार्थ:- सेनाजी सांगतात- ज्या कुटुंबांमध्ये पूर्वजन्मीचे पुण्य नांदत असते अशी कुटुंबे भाग्यवान असतात. परंतु हे पूर्वसंचित संपताच त्या कुटुंबांमध्ये अवदशा शिर्के आणि ती हळूहळू त्या कुटुंबाच्या सदभाग्याचा नाश करते मग ते कुटुंब जन्म करून फलक पडलो उडवतात त्या स्थितीत त्यांना गोपाळाची आठवण ही होत नाही.

व भारी चिंता त्यांच्या जीवनात दाखवून राहते या परिस्थितीवर मात करण्याच्या खूपच मार्ग आहे कनक व कांता यांच्यापासून अलिप्त रहा म्हणजे आपोआप तुमचे ध्यान भगवंताकडे वळून मला भगवंताचा अनुग्रह प्राप्त होईल.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक पाच

बाळपणीं अज्ञान खेळ खेळू वाटे |
आईबाप मोठे वळण देती ||१||
आई-बापां बुद्धी असता हे मूढ |
मग होय जोड तैसे वर्ते ||२||
नाही धड करता येत हा संसार |
ऋणी घरदार दुजियाचे ||३||
सेना म्हणे होतीं रंगीं तमरूप |
त्याचे आईबाप कृतघ्न ते ||४||

भावार्थ:- बालपणात मुले अज्ञानी असतात, त्यांना खेळ खेळण्याची मोठी हौस असते. त्यांना योग्य वळण देऊन शहाणे करण्याचे काम आईबापांचे असते. पण काही आईबाप स्वतः बुद्धिसंपन्न असूनही (मुलांवर चांगले संस्कार न केल्यामुळे) त्यांची मुले मूर्ख निघतात. मग मुलांना जसे वळण लागले असेल तसे ती मुले वागतात.Sant sena Mharaj Aabhang

Sant sena Mharaj Aabhang 3

त्यांना स्वतःचा संसार धडपणे करता येत नाही. कर्जबाजारी होऊन स्वतःचे घरदार त्यांना दुसऱ्याकडे गहाण टाकावे लागते. दुर्दैवाने अशी मुले तमोगुणात रंगून जातात. सेनाजी म्हणतात, मुलांविषयीचे आपले कर्तव्य न पाळणारे त्यांचे आईबापच खरे पाहता कृतघ्न असतात. (आईबाप मुलांना जसे घडवतील त्यानुसार मुलांचे भवितव्य बनते.)

अभंग क्रमांक सहा

संसारी जे सुख दुःखाची सामग्री |
हरीनाम अग्रीं जरी नसे ||१||
मायबाप बंधू भगिनी पुत्र भार्या |
शुद्ध नव्हे माया प्रेमभाव ||२||
कोणी नाही कोणाचे, जीव न दे जीवा |
संकटीं अवभावा रडताती ||३||
ज्याचे त्याने संसारीं करून घ्या स्वार्थ |
त्यात परमार्थ तोचि करा ||४||
सेना म्हणे नामें संसारी तरिले |
आपण उद्धरिले दुजियांसी ||५||

भावार्थ:- सेनाजी सांगतात- संसारात सुख म्हणून जे जे काही आपणांस भासते, त्याच्या अग्रभागी जर हरिनाम नसेल तर ते सुख म्हणजे निव्वळ दुःखाची सामग्रीच होय. आई, बाप, बंधू, भगिनी, आणि भार्या या सर्वांचा प्रेमभाव शुद्ध, सचोटीचा नसतो, तर निव्वळ मायावी व स्वार्थी असतो. या जगात कोणी कोणाचे नाही, जिवाला जीव देण्याची निष्ठो कोणाजवळ नाही.

संत सेना महाराज यांच्या बद्दल अधिक माहिती साठी 

image2

संत सेना महाराज

मात्र त्यांच्यावर संकट आले म्हणजे ढोंगीप्रेमाने तुमच्याकडे रडत येतात. म्हणून या संसारात ज्याने त्याने आपापला स्वार्थ साध्य करावा. मात्र स्वार्थ परमार्थाने भरलेला असावा. नामचिंतनाने जगात अनेक तरले आहेत व जे तरले त्यांनी नामबळाने इतर अनेकांचा उद्धार केला आहे.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक सात

पूर्वसुकृत चांगले |
त्याचा प्रपंच उजळे ||१||
पूर्वसुकृतासी कीड |
दुःख दारिद्र पीड ||२||
शरिरासी होती व्यंग |
फटकून वागे जग ||३||
सेना म्हणे सांगू किती |
वागा दैवी संपत्ती ||४||

भावार्थ:- सेनाजी म्हणतात– ज्याची पूर्वपुण्याई चांगली असेल, त्याचा प्रपंच उत्कर्ष पावतो. पूर्वजन्मीचे संचित जर किडलेले म्हणजे हीन व खराब असेल तर दुःख, दारिद्रय, पीडा अशा आपत्ती संसारात त्यांच्यावर ओढवतात.

त्यांच्या शरीरात व्याधी व्यंगे निर्माण होतात आणि सारे जग त्यांच्याशी फटकून वागते. फार काय सांगू, ही अरिष्टे टाळण्यासाठीच तुम्ही दैवी संपत्तीचे गुण प्राप्त करून घ्यावयास पाहिजेत.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक आठ

प्रपंचामाजी सुख मिळून पाहे |
करिता हाय हाय दुःख पावे ||१||
स्थावरजंगम धन मिळविले |
नाही संगे आले गणगोत ||२||
रोगपीडा दरिद्रय मानहानि होती |
भार्या मुले प्रीती सुटेचिना ||३||
सेना म्हणे ठेवा वचनीं विश्वास |
हरि भजा, पाश तोडील तो ||४||

भावार्थ:- प्रपंचामध्ये जो नर सुखाची अपेक्षा करतो, त्यास अंती दुःखच प्राप्त होऊन ‘हाय हाय’ करीत बसावे लागते. त्यांचे पुष्कळ स्थावर, जंगम धनसंपदा मिळविली तरी शेवटी अंतकाळी ती त्यांच्याबरोबर येत नाही, तसेच त्यांचे गणगोतही त्यांच्या संगती येत नाही. आयुष्यभर त्याला आजार, यातना, दरिद्रता, मानखंडना वगैरे आपत्ती सोसाव्या लागतात.

पण काही झाले तरी पत्नी व मुले यांच्यावरचे त्यांचे प्रेम कधी आटत नाही की सुटत नाही. सेनाजी म्हणतात, माझ्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा आणि हरीचे भजन करीत रहा; कारण की तुमचे सर्व भवपाश हरीच तोडू शकेल.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक नऊ

आवडे प्रपंच सुख वाटे मना |
ईश्वर भजना अंतर तो ||१||
मायबाप बंधू भगिनी ते जाया |
मुलें मुली माया सुख नाही ||२||
वेळ येता व्याधी छळी, अंत होय |
वाटेकरी न होय दूर राहे ||३||
सेना म्हणे प्रापंच भ्रमाचा भोपळा |
आत कडू पोकळा वरी चमक ||४||

भावार्थ:- माणसाला प्रपंच आवडतो. प्रपंचात मनाला सुख वाटते. परंतु प्रपंच म्हणजे ईश्वरभजनात विघ्नच होय. आई, बाप, बंधू, भगिनी, पत्नी, मुले, मुली यांच्या मायेत अजिबात खरे सुख नाही. आपली वेळ आली की व्याधी आपल्याला छळतात. शेवटी मरण ओढवते. पण या समयी कोणीही आपल्या दुःखात वाटेकरी होत नाही. सारे दूर राहतात.

Sant sena Mharaj Aabhang 4

म्हणून सेनाजींचे सांगणे आहे की, प्रपंच हा भ्रमाचा भोपळा आहे. तो भोपळ्याप्रमाणेच वरून चमकदार परंतु आतून पोकळ व कडू आहे.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक दहा

बहु आवडीचा संसार थाटला |
जमीन जुमला धनीक तो ||१||
सुस्वरुप ती भार्या गोजिरीं ती मुलें |
सुखाने खुलले अंत:राय ||२||
लब्ध प्रतिष्ठित सांगतसे गोष्टी |
आठविना पोटीं नारायणा ||३||
सेना म्हणे सुखदुःख हे वाढले |
मग आठवते काय करू ||४||

भावार्थ:- ह्याने अत्यंत आवडीचा असा आपला संसार थाटला. जमीन जुमला संपादन केला आणि तो धनवान बनला. सुंदर पत्नी, गोजिरवाणी मुले, धनदौलत असे सर्व काही प्राप्त झाल्याने सुखाने त्याचे अंत:करण फुलून गेले.

मग तो आढ्यतखोर बढाईच्या गोष्टी सांगू लागला. पण हे सर्व देणाऱ्या नारायणाची मात्र त्याला चुकूनही आठवण होईना. हा वृतांत सांगून सेनाजी म्हणतात, या खोट्या सुखाबरोबर दुःखही वाढेल व मग मात्र या अधमाला काय करावे हे सुचेना.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक आकरा

ऐका कलीचा प्रकार |
सासूवरी सून गुरगुर ||१||
मुलें न ऐकती वडिलांचे |
होतील दास बायकांचे ||२||
स्वधर्म होतील नष्ट |
दुःख दरिद्र भोगो कष्ट ||३||
सेना म्हणे होतील ऋणी |
सांगतील कर्मकहाणी ||४||

भावार्थ:- सेनाजी म्हणतात- कलियुगात काय अनिष्ट प्रकार घडतात ते सांगतो, ऐका. स्वतःच्या सासूवर सून गुरगुर करून शिरजोरी दाखवते. मुले बायकांच्या नादाने आई-वडिलांचे ऐकत नाही.Sant sena Mharaj Aabhang

संत सेना महाराज यांच्या बद्दल अधिक माहिती साठी 

image2

संत सेना महाराज

ते बायकांचे गुलाम होऊन बसतात. अशाने त्यांचा स्वधर्म नष्ट होऊन जाईल व त्यांना दुःख, दारिद्रय आणि कष्ट भोगावे लागतील. ते कर्जबाजारी होतील आणि शेवटी पश्चाताप पावून, आपली कर्मकहाणी सांगून हळहळत बसतील.

अभंग क्रमांक बारा

रजगुणी आशा बायकापोरें माझीं |
स्थावर संपत्ती मिठ्या मारी ||१||
पाहा तमगुण प्रसाद करवितो |
दुजिया दुःख देतो क्रूर सदा ||२||
सत्त्वगुण सदा निती विवेक वाढवी |
परमात्मा गोडी लावीतसे ||३||
सेना म्हणे धरा सत्संग हा बरा |
भवसागर तरा हरीनामें ||४||

भावार्थ:- रजोगुणी माणसाला एकाच आशेने ग्रासलेले असते की बायकापोरे माझी आहेत, स्थावर मालमत्ता व धनसंपत्ती माझी आहे. यांना कवटाळून तो जन्मभर जगतो. तमोगुण माणसाकरवी अपराध घडवितो. दुसऱ्यांना दुःख देणारा असा हा क्रूर तमोगुण आहे. सत्वगुण मात्र मनुष्याच्या अंगी मिती व विवेक यांची वाढ करवितो व परमात्म्याच्या ठायी गोडी निर्माण करतो.

यास्तव सेनाजी उपदेशितात, संतांचा संग धरणे हे फार उत्तम. कारण की यायोगे तुम्ही हरिनामाची कास धरून हा भवसागर पार कराल.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक तेरा

संसारींचे सुख आईबाप प्रेमळ |
बायका पोरंबाळं बंधू-भगिनी ||१||
सोयरे धायरे सन्मानिति जाण |
शृंगार पक्वान्न लोड गिरद्या ||२||
स्थावर जंगम धन माझे गाव |
करी हाव हाव सुखालागी ||३||
सेना म्हणे मोह भूलवितो एक |
हरीवीण सुख नाही कोठे ||४||

भावार्थ:- प्रेमळ आईबाप, बायका, पोरेबाळे, बंधू, भगिनी वगैरे सर्व अनुकूल असले म्हणजे माणूस संसारात सुख मानतो. सोयरे धायरे त्याचा सन्मान करतात. त्याचे घर शृंगारलेले असते. घरात लोड, गिरद्या वगैरे वैभव असते. पक्वान्नांची रेलचेल असते. माझी मालमत्ता, माझी धनसंपत्ती, माझे गाव असा ताठा त्याच्या अंगी वाढतो.

आणखी सुखसाधनांची हाव सुटून या खोट्या आणि नाशवंत सुखासाठी त्याची सतत धावपळ चालू राहते. सेनाजी म्हणतात, हा प्रापंचिक मोह महादुर्निवार आहे. पण हरीशिवाय खरे शाश्वत सुख तुम्हाला कोठेही मिळणार नाही.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक चौदा

आईबापां छळी दुष्ट बुद्धीचा |
भावा बहिणीचा छळ करी ||१||
कांतेचा अंकित वचन न मोडी |
शृंगार शालजोडी घेई तिला ||२||
सासू सासर्‍याचा मोठा करी आदर |
मेहुण्या नमस्कार मेहुणीसी ||३||
सेना म्हणे गाढव गाढवीमाघे धावे |
लाथ मारे स्वभावें निर्लज्ज तो ||४||

भावार्थ:- बाईलेचा दास बनलेला दुष्ट बुद्धीचा माणूस जन्मदात्या आई बापांचा छळ करतो, आपल्या बहिणी भावांवर जुलूम करतो. बायकोचा तर तो इतका गुलाम झालेला असतो की तिचे वचन कधी मोडीत नाही.

तिच्या शृंगारासाठी भरजरी शालजोड्या वगैरे सारे काही घेऊन देतो. सासूसासर्‍यांचा अतिशय आदरसत्कार करतो. मेव्हणा व मेहुणी यांना लवून नमस्कार घालतो. सेनाजी सांगतात, हा निर्लज्ज गाढव गाढवीमागेच घोटाळून धावत असतो व स्वभावत: इतरांवर लाथा झाडीत राहतो.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक पंधरा

ऋण काढूनिया करिल जो चैन |
स्थावर फुंकून रडत बैसे ||१||
जगीं हलकट दारिद्र भोगील |
दुःखे ते सोशीला अर्धपोटी ||२||
सोयरे धायरे बंधू ते धिक्कारी |
बायको गुरगुरी तोंड टाकी ||३||
सेना म्हणे मुलें म्हणती बाप खाष्ट | पैजाराने दुष्ट काढा त्याची ||४||
भावार्थ:- ऋण काढून चैन करणाऱ्याची कशी दुर्दशा होते ते सेनाजी वर्णन करून सांगताहेत – जो कर्ज काढून व स्वतःची मालमत्ता फुंकून चैन करील त्याला शेवटी पश्चातापाने शोक करीत बसावे लागेल. तो जगात हलकट ठरेल व त्याला दारिद्र्यात खितपत पडावे लागेल. निर्धनतेमुळे येणारे अनेक दु:खे अर्धपोटी राहून त्याला सोसणे भाग पडेल.

Sant sena Mharaj Aabhang 5

सोयरे धायरे, बंधू व निकटचे नातलग त्याचा धिक्कार करतील. बायको गुरगुरुन त्याला शिव्याशाप देईल‌. त्याची मुलेसुद्धा त्याचा अनादर करून म्हणतील, आमचा बाप अति खाष्ट आहे, त्याची पायातल्या खेटराने दृष्ट काढ पाहिजे.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक सोळा

घरची ती भार्या रंभेला लाजवी | दुजी ती गाढवी आनंदाते ||१||
निर्लज्ज सदा तो न मनी जगासी |
आईबाप बंधूंसी कठोर बोले ||२||
सोयरे धायरे विनविती पायां |
पतिव्रतेची माया रडत असे ||३||
सेना म्हणे पालनपोषण सुकरांसी |
सोडून पक्वान्नांसी नरक खाय||४||

भावार्थ:- घरची धर्मपत्नी रंभेला लाजवील इतकी स्वरूपवान असताना देखील विषयभोगाला लालचावलेला माणूस गाढवीसमान कुरूप असलेल्या रांडेकडे जाण्यात आनंद मानतो. हा बदफैली नेहमीच निलाजरीपणाने वागतो. तो जगाची पर्वा करीत नाही. आईबाप, बंधू वगैरे कठोर व उद्धट भाषा बोलतो.Sant sena Mharaj Aabhang

त्याचे सोयरे धायरे त्याला पाया पडून विनवितात, पतिव्रता भार्या घरात रडत बसते. सेनाजी म्हणतात, असा विषयांध नर बाहेरच्या डुकरांचे पालनपोषण करण्यातच धन्यता मानतो आणि पक्वान्ने टाकून नरकभक्षण करणाऱ्याचीच त्याला लालसा सुटते.

अभंग क्रमांक सतरा

विषयी जो धुंद भय लज्जा सांडी |
मायबापा थोडी लागतसे ||१||
सासू-सासरे आवडती भार्या |
आदरी सोयऱ्या पाया पडुनी ||२||
बळ धन गेले उतरले वय |
दारिद्र्य हाय हाय दुःख भोगी ||३||
सेना म्हणे होय कामाचा अंकित |
त्यामुळे अनंत दुरावला. ||४||

भावार्थ:- विषयोपभोगात जो धुंद झालेला असतो त्याला लाज, भय, वगैरे कशाचाच विवेक उरलेला नसतो. तो खुशाल आई-बाबांना दूरोत्तरे करतो. बायको सासू-सासरे हे त्याला फार प्रिय वाटतात. सोयऱ्यांच्या पाया पडून तो त्यांचा आदर करतो.

उतार वय होते तशी त्याच्या अंगातली ताकद जाते आणि त्याची धनसंपत्ती ही नष्ट होते. मग टदारिद्र्याच्या फेऱ्यात सापडून हाय हाय असा शोक करीत तो दुःख भोगतो. सेनाजी बजावतात अहो विलास भोगाचा गुलाम बनलेल्यामुळे अंतिम देवही त्याला दुरावतो.Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक आठरा

घेई शेरभर मिठाई |
बोलण्याची तरी चढाई ||१||
आचपेच करी थाटा |
लोकां दायी आहे मोठा ||२||
घरी प्रपंच दुबळा |
भार्या आहे हीन कळा ||३||
सेना म्हणे असे शौकी |
दुःखी इह परलोकी ||४||

भावार्थ:- एखादा शौकीन आणि मिजासखोर माणूस शेरभर मिठाई आणून लोकांना वाटतो व त्यांच्यापुढे आपली बढाई मारतो. वैभवाचा व थाटामाटाचा अविर्भाव दाखवून आपण फार मोठे असे लोकांना भासवतो.Sant sena Mharaj Aabhang

त्याच्या घरचा प्रपंच तर अगदी दुबळा व मोडका तोडका असतो गरिबीमुळे पत्नीच्या चेहऱ्यावर काही तेज राहिलेले नसते. सेनाजी सांगतात असे आंबट-शौकी लोक या जगात व परलोकी सुद्धा दुःखीच राहतात .Sant sena Mharaj Aabhang

अभंग क्रमांक एकोणीस

स्त्रीचे ऐकून बिघडवितो घर |
आई बापा विचार घेत नाही ||१||
एक रक्त भाऊ श्र्वान गुरुगुरी |
तोंडाची मोरी बोलतसे ||२||
वेगळा निघाया हाट धरीतसे |
झालासे बोभाट जगामाजी ||३||
सेना म्हणे घरचे पडले विभ्रमीं |
कष्ट हे हे राम उतरेल ||४||

भावार्थ:- बाईलवेडा पुरुष पत्नीचा अंकित होऊन सर्व घरदार बिघडवून टाकतो. कोणत्याही गोष्टीत आई बापाचा कधीच विचार घेत नाही. एका रक्ताचे सच्चे भाऊ घरात असून त्यांच्यावर कुत्र्यासारखी गुरगुर करून त्यांचा पानउतारा करतो. बायकोखेरीज घरातल्या सर्वांवर याच्या तोंडाची मोरी सारखी बोंबलत राहते.Sant sena Mharaj Aabhang

घरातून वेगळे निघण्याचा तो हट्ट करून बसतो. त्याच्या गैरवर वागणुकीचा जगभर बोभाटा होऊन जातो. सेनाजी म्हणतात त्याच्या आप मतलबी वृत्तीमुळे घरात घोर चिंता दाटते. या कष्टातून त्यांना तारण्यास केवळ रामच समर्थ आहे.Sant sena Mharaj Aabhang

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top