संत सेना महाराज अभंगगाथा-हितोपदेश || Sant Sena Aabhang Hitopdesh

Sant Sena Maharaj Abhangatha - Karma Yoga 3

संत सेना महाराज यांनी विविध भाषेमध्ये अभंग लिहिलेले आहेत. त्यापैकी मराठी भाषेमध्ये 268 अभंग लिहिलेले आढळतात. मराठी भाषेतील अभंगांमध्ये “हितोपदेश” कशा पद्धतीने माणसाने करावा. या संदर्भात संत सेना महाराज यांनी 20 अभंग लिहिलेले आहेत. ते वीस अभंग कोणते आहेत हे आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. Sant Sena Aabhang Hitopdesh

 Sant Sena Aabhang Hitopdesh
अभंग क्रमांक एक

मानिसी देहाचा भरवसा |
केला जाईल न कळे कैसा ||१||
सार्थक करा हो काही |
जेणें हरी जोडे पाही ||२||
धनसंपत्ति नाही |
ही तो राहिलची ठायीं ||३||
शरण रिघा पंढरिराया |
सेना न्हावी लागे पाया ||४||

भावार्थ:- सेनाजी सांगतात- तुम्ही या नरदेहाचा अभिमान धरता व भरवसा मानता. परंतु चौर्याऐंशी योनींतून एकदाच मिळणाऱ्या या नरदेहाचा कसा काय विश्वास धरावा काही कळत नाही.

म्हणून ज्यायोगे हरी जोडला जाईल असे या नरदेहाचे काही सार्थक करा. धनसंपत्ती तुमच्या कामाला येणार नाही; ही तर एक जागच्या जागीच राहणारी आहे. तुमच्या पाया पडून मी विनवितो की नरजन्म सार्थकी लावायचा असेल तर पंढरीनाथाला शरण जा.Sant Sena Aabhang Hitopdesh

Sant Sena Aabhang Hitopdesh 2

अभंग क्रमांक दोन

व्यर्थ कासयासि नावें |
उगेचि घोकुनी मरावे ||१||
एका विठ्ठलावाचून |
आणिक नाही बा साधन ||२||
वेदशास्त्र जाणीतले |
व्यर्थ अभिमानें मेले ||३||
झाली पुराण उत्पत्ती |
मग अभिमानें फुंदती ||४||
ऐसे व्यर्थचि शीणले |
सेना म्हणे वाया गेले ||५||

भावार्थ:- निष्कारण वेगवेगळी नावे घोकून कशासाठी उगीच मरमर करावी? एका विठ्ठलावाचून मुक्तीचे दुसरे काहीही साधन नाही. शास्त्री, पंडित वेदशास्त्राचा अभ्यास करून व्यर्थ अभिमानाने मरून गेले. कितीएक पुराणात व्युत्पत्त्या धुंडाळून, मग अभिमानाने उसासे टाकीत बसतात. अशा तऱ्हेने सेनाजींच्या मते हे विद्वान लोक व्यर्थ शिणले आणि वाया गेले आहेत.Sant Sena Aabhang Hitopdesh

संत सेना महाराज यांच्या बद्दल अधिक माहिती साठी 

image2
संत सेना महाराज

अभंग क्रमांक तीन

हरीच्या चिंतनीं |
व्हा रे सावध धरा मनीं ||१||
स्वहित विचारावें |
आपुले सार्थक करावे ||२||
उपमन्यू आणि धुरू |
स्मरणें तरले निर्धारु ||३||
प्रल्हाद तोही तरला |
स्मरता नरहरी पावला ||४||
सेना म्हणे छंद |
हृदयीं भरला गोविंद ||५||

भावार्थ:- सेनाजी भाविकांना उपदेश करतात- तुम्ही सदोदित सावध राहून हरीचे चिंतन करा आणि त्याला अखंड मनात धरा. कारण यातच तुमचे कल्याण आहे. स्वहिताचा नीटपणे विचार करून आपल्या जन्माचे तुम्ही सार्थक करा.

मी खात्रीपूर्वक सांगतो की हरीच्या स्मरणांनेच उपमन्यूचा उद्धार होऊन त्याला क्षीरसागरात अक्षय स्थान मिळाले, तसेच ध्रुवही तरून आढळपद पावला. प्रल्हादाने अखंड स्तवन केल्यामुळे त्याला हरी नरसिंह रूपात पावला आणि प्रल्हादाचा उद्धार झाला. हाच हरिचिंतनाचा छंद मला लागल्याकारणाने माझ्या हृदयात गोविंद भरून राहिला आहे.Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक चार

हित व्हावे मनासी |
दवडा दंभ मानसीं ||१||
सुलभ्य लाभ येईल हाता |
शरण जावे पंढरिनाथा ||२||
चित्तशुद्धी करा |
न देई तुजियासी थारा ||३||
हेचि शस्त्र निर्वाणीचे |
सेना म्हणे धरा साचे ||४||

भावार्थ:- सेनाजी म्हणतात- आपले कल्याण व्हावे असे जर मनःपूर्वक वाटत असेल, तर मनातला ढोंगीपणा टाकून द्या आणि पंढरीनाथाला शरण जा. त्यायोगे सुलभ असा लाभ तुमच्या हाती येईल.

दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला मनात थारा देऊ नका व स्वतःचे चित्त शुद्ध करा. हेच तुमचे अंतिम शस्त्र अर्थात साधन आहे आणि त्याचा योग्य उपयोग तुम्ही करा.Sant Sena Aabhang Hitopdesh

Sant sena Mharaj Aabhang 2

अभंग क्रमांक पाच

कशासाठी करिता खटपट |
तपतीर्थ व्रतें आचार ||१||
न लगे शोधावे गिरी कानन |
भावें रिघा विठ्ठला शरण ||२||
विभांडक शृंगी तपस्वी आगळा |
क्षण न लागता रंभेने नागविला ||३||
जाणोनि सेना निवांत बैसला |
केशवराजा शरण रिघाला ||४||

भावार्थ:- तपश्चर्य, तीर्थयात्रा, वृताचरण वगैरे खटपटी तुम्ही कशासाठी करीत आहात? परमेश्वर- प्राप्तीस्तव पर्वत, अरण्य इत्यादी शोधण्याची काही गरज नसते. तुम्ही श्रद्धा, भक्तिपूर्वक विठ्ठलास शरण रिघा म्हणजे झाले.

तपस्व्यांचे तपही अनेकदा निष्कळ होऊन जाते. विभांडक शृंगी ऋषी असामान्य तपस्वी होता, परंतु रंभेने त्याला मोहित करून क्षणार्धात त्याचे तापभंग केले. म्हणून सेनाजी सांगतात, मी पंढरीनाथाला शरण जाऊन निवांत बसलो आहे.Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक सहा

धना कोणा कामा आले |
पहा विचारून भले ||१||
ऐसे सकाळ जाणती |
कळोनिया आंधळे होती ||२||
स्त्रिया पुत्र बंधू पाही |
त्यांचा तुझा संबंधु नाही ||३||
सखा पांडुरंगविण |
सेना म्हणे दुजा कोण ||४||

भावार्थ:- सेनाजी म्हणतात- धनसंपत्ती कोणाच्या कामाला आली आहे काय याचा जरा नीट विचार करून पहा. धनाचा मोह व्यर्थ आहे हे तर सर्वच जाणून आहेत. पण कळून लोक आंधळे होतात याला काय म्हणावे?

स्त्रिया, पुत्र, बंधु व इतर सर्व आप्त यांचा व तुमचा खरे पाहता काहीसुद्धा संबंध नाही. कारण तुमच्या जीवनाचे सार्थक यांपैकी कोणीच करू शकत नाही. एका पांडुरंगाशिवाय तुमचा जिवलग सखा दुसरा कोणीही नाही.Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक सात

सिद्ध ब्रह्मज्ञान बोलता नोहे वाचे |
शांतवन क्रोधाचे झाले नाही ||१||
पाल्हाळ लटिका करणे तो काय |
शरण पंढरीराया गेला नाही ||२||
जंव नाही गेली अज्ञानाची भ्रांती |
जंव नाही विरक्ती बाणली अंगीं ||३||
जिवाची तळमळ राहिली सकळ |
मग ब्रह्मज्ञान कळे सेना म्हणे ||४|

भावार्थ:- ब्रह्मज्ञान केव्हा प्राप्त होते याचे गमक सेनाजी सांगत आहेत- ब्रह्मज्ञानाची सिद्धी हे काही वाचेने बोलून दाखवण्याचे काम नव्हे, अर्थात तोंडाचे काम नव्हे. जोपर्यंत अंतरीची क्रोधभावना समूळ नष्ट झाली नाही तोपर्यंत ब्राह्मज्ञान गवसत नाही. उगाच पाल्हाळ करून फार काय सांगावे?

जोवर माणूस पंढरीनाथ विठ्ठलास सर्वभावे करून शरण गेला नाही, जोवर अज्ञानापोटी उद्भवलेला भ्रम नाहीसा झाला नाही आणि जोवर अंगी विरक्ती बाणली नाही, तोवर ब्रह्मज्ञानाची गोष्ट करणे व्यर्थ आहे. वरील चार गोष्टी साध्य झाल्या तरच जिवाची सर्व तळमळ लोप पावते आणि मग ब्रह्मज्ञान प्राप्त होते.Sant Sena Aabhang Hitopdesh

Sant sena Mharaj Aabhang 3

अभंग क्रमांक आठ

माझा केला अंगिकार |
काय जाणे मी पामर ||१||
देव दीनांचा दयाळा |
शरणागत पाळी लळा ||२||
प्रल्हादाकारण |
प्रगटला नारायण ||३||
मीराबाईसाठी |
केवढी केली आटाआटी ||४||
शरण रिघा पंढरिराया |
सेना न्हावी लागे पायां ||५||

भावार्थ:- सेनाजी लीनतेने सांगतात- अहो, मी अजाण पामर असूनसुद्धा देवाने माझा स्वीकार केला. देव दीनांचा दयाळू असून शरणागतांन सहजगत्या आपला लळा लावतो. प्रल्हादाला वाचविण्यासाठी नारायण प्रत्यक्ष प्रगट झाला.

मीराबाईंने विषाचा प्याला प्राशन केला, पण तिचे रक्षण करण्यासाठी त्याने केवढे सायास केले! म्हणून तुमच्या पाया पडून मी विनवितो की तुम्ही पंढरीनाथाला शरण जा; तोच तुम्हाला उद्धरील.Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक नऊ

चिंतन चित्ताला |
लावी मनाच्या मनाला ||१||
उन्मनी सुखात |
पांडुरंग भेटी देत ||२||
ऐसा आहे श्रेष्ठाचार |
वेदशास्त्राचा निर्धार ||३||
कवटाळूनी पोटीं |
सेना म्हणे सांगू गोष्टी ||४||

भावार्थ:- सेनाजी म्हणतात- मनाच्या मनामध्ये तू आपल्या चित्ताला पांडुरंगाच्या चिंतनात एकाग्र करावे. या अपूर्व विरागी अवस्थेच्या सुखात पांडुरंग साक्षात दर्शन देतो, असा श्रेष्ठ आचार असल्याचा निर्वाळा वेदशास्त्र देत आहे. पांडुरंगाला कवटाळून आलिंगन देऊन आपण आपले मनोगत त्याच्यापुढे व्यक्त करू अशी इच्छा सेनाजी प्रदर्शित करतात.Sant Sena Aabhang Hitopdesh

Sant Sena Aabhang Hitopdesh 6

अभंग क्रमांक दहा

नको चिंता करू दिलगीर मानसीं |
राहता उपवासी दुःखामुळे ||१||
सकळ जिवांना सांभाळी श्रीहरी |
तुज करिल दुरी म्हणो नको ||२||
पशुपक्षी वनचरें किडा मुंगी |
तयांलागी हरी पोसवी तो ||३||
सेना म्हणे नका विसरू केशवा |
राजहंस जीवा मोती पुरवी ||४||

भावार्थ:- सेनाजी सांगतात- उपाशी राहण्याच्या दुःखामुळे मनात उदास होऊन चिंता करू नकोस. श्रीहरी सर्व प्राणिमात्रांना सांभाळीत आहे, तर तुला एकट्याला तो दूर लोटील अशी शंका मनात धरू नकोस.

पशु,पक्षी, वन, किडे, मुंग्या इत्यादी समस्त जिवांचे पोषण हरीत करीत असतो. राजहंसला मोत्यांचा चारा लागतो, म्हणून राजहंसाच्या जीवितरक्षणार्थ तो मोत्यांचा पुरवठा करतो. अशा या केशवाला तुम्ही कधीही विसरू नका.Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक अकरा

काळ घालील उडी |
मग कैसी तोडाल बेडी ||१||
यम पुसेल जबाब |
मग काय मारती बोंब ||२||
मग सोडविना कोणी |
दूत झोडिती ओढोनी ||३||
सेना म्हणे विसरला देव |
नाही करणार तुझी कीव ||४||

भावार्थ:- सेनाजी अधर्माचरणी प्राण्यास पृच्छ करतात- अरे अभाग्या, मृत्यू अचानक तुझ्यावर उडी घालील तेव्हा त्याची बेडी तू कशी काय तोडशील? यमराज तुला तुझ्या पापपुण्याचा जाब विचारील, त्याच्यापुढे काय बोंब मारशील?

मग तुला सोडवायला कोणी येणार नाही. यमराजाचे दूत तुला खेचून झोडपतील व यातना देतील. तू देवाला विसरलास, त्यामुळे देवही तुझी कीव करणार नाही.Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक बारा

बुडताहे दिसे सांगतो ऐका |
जन्मोनिया फुका जाल लया ||१||
हरि हरि भजा नका सोडू भाव |
पुढे आहे भेव काळाचे ते ||२||
करा हरिभक्ती येईल ती कामा |
नेईल घन:शामा स्वर्गामाजी ||३||
मकरापासूनी गजा सोडवीले |
स्मरता विठ्ठले कृपा झाली ||४||
सेना म्हणे नरदेह बहुजन्में |
संसाराच्या भ्रमें भुलू नये ||५||

भावार्थ:- सेनाजी मुमुक्षू जनांस हितबोध करताहेत- हे भक्तजनांनो, तुम्ही भवसागरात बुडून गटांगळ्या खात आहात, म्हणून सांगतो ते ऐकून घ्या. नाही तर नरजन्म प्राप्त होऊन ही फुकट लयाला जाल. ‘हरी हरी’ असे भजन सदा सर्वकाळ करीत जा. कारण पुढे काळाचे भय तुमच्यापुढे उभे आहे.Sant Sena Aabhang Hitopdesh

हरिभक्ती कराल तर तीच तुमच्या कामाला येईल. तुम्ही श्रद्धा ठेवून हरिभक्ति केल्यास हरी निश्चयाने तुम्हाला वैकुंठास नेईल. गजेन्द्रमोक्षाची कथा तुम्हाला ठाऊक आहे. मगरीने गजेन्द्राचा पाय गिळला तेव्हा विठ्ठलास स्मरताच त्याची सुटका होऊन त्याला मोक्ष मिळाला. अनेक जन्मांनंतर हा नरदेह तुम्हाला लाभला आहे, तरी संसाराच्या भ्रमात पडू आपले इतिकर्तव्य विसरू नका.

अभंग क्रमांक तेरा

विनंती ही माझी भजा रे विठ्ठला |
नरदेह लाभला म्हणवूनी ||१||
प्रपंच भवचक्र तुटेल बंधन |
नीती सद्गूण वाढवावा ||२||
आचरी विचरी धर्मानुसरूनी |
ऐसी वेदवाणी सांगताहे ||३||
सेना म्हणे करा श्रावण कीर्तन |
राम नारायण जोडी करा ||४||

भावार्थ:- सेनाजी भाविकांना विनंती करतात- तुम्हास दुर्लभ असा नरदेह लाभला आहे, म्हणून विठ्ठलाचे अखंड भजन करीत जा. यायोगे तुमचे प्रपंच- भवचक्राचे बंधन तुटून जाईल. नीतिमत्ता व सद्गुण यांची वाढ करावी, तसेच धर्मास अनुसरून तुमची चालचलणूक आणि आचरण असावी, अशी वेदांची शिकवण आहे. म्हणून नित्य श्रावण- कीर्तनाचा परिपाठ ठेवा आणि राम-नारायणांची प्राप्ती करून घ्या.Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक चौदा

असुरी संपत्ती व दैवी संपत्ती |
पुराणीं सागती तैसे वागा ||१||
असुरी संपत्ती करील ते नाश |
कुबुद्धी ही पा लावी तुम्हा ||२||
दैवीक संपत्ती आचरता श्रेष्ठ |
सांगतो स्पष्ट उत्तम तो ||३||
सेना म्हणे त्यासी नारायण जोडे |
संसारीं पवाडे कीर्तिवान ||४||

भावार्थ:- सेनाजी म्हणतात- माणसाच्या कर्मानुसार अथवा पूर्वसंचिताप्रमाणे त्याला दैवी वा असुरी संपत्तीचा लाभ होतो. या संपत्तीच्या संदर्भात पुराणान्तरी सांगितले तसे वागावे.Sant Sena Aabhang Hitopdesh

असुरी संपत्ती तुमचा विनाश करील आणि तुमची कुबुद्धीही तुम्हाला जखडून टाकील. दैवी संपत्तीच्या गुणांचे आचरण करणारा पुरुष श्रेष्ठ व उत्तम होय असे मी स्पष्ट सांगतो. त्यालाच नारायण प्राप्त होतो, जगात त्याचेच पोवाडे गायले जातात आणि तोच कीर्तिमान ठरतो.Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक पंधरा

पापाचे मूळ अधर्म अज्ञान |
प्रमाद अवगुन वाढेल तो ||१||
करील विनाश दुःख वाढवील |
अंति बा जाईल नर्कवासा ||२||
पुण्याचे मूळ सदबुद्धी व ज्ञान |
बोलता वचन सत्य वाटे ||३||
सेना माने त्याचा कैवारी गोविंद |
संसारी आनंद हरिभक्ती ||४||

भावार्थ:- पापाचे मूळ अधर्माचरणात व अज्ञानात आहे. पापामुळे अपराध व दुर्गुण वाढीस लागतात .पापी माणसावर सतत दुःख उडवेल आणि त्याचा विनाश होऊन मृत्यूनंतर त्यास नरकवास घडेल. या उलट पुण्याच्या मुळाशी सद्बुद्धी व ज्ञान यांचे अधिष्ठान असते. पुण्यवंत माणूस सहज एखादा शब्द बोलला तरी तो सत्य असल्याची प्रचिती येते.

सेनाजी म्हणतात पुण्यवंताचा रक्षण करता गोविंद असतो. व हरिभक्तीच्या रूपाने त्याच्या संसारात आनंदी आनंद नांदत असतो.Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक सोळा

सिंहस्थ पर्वणी जाय तीर्थक्षेत्रा |

पिंडदान पिंतरा क्षौर करी‌||१||
म्हणती उधारीले माझे मायबाप |
गंगास्नाने पाप गेले गेले ||२||
पाप पुण्यबीज कर्तव्याचे मूळ |
भजता गोपाळ पाप जाय ||३||
सेना म्हणे तीर्थक्षेत्राचा आचार |
हरी विना उदार नाही नाही ||४||

भावार्थ:- सिंहस्थ पर्वणी आली की लोक तीर्थक्षेत्रे जातात, पीतरांना पिंडदान करतात. तसेच क्षौर करतात या क्रिया संपन्न झाल्यावर ते समाधानाने उद्गारतात गंगास्नान केल्याने माझे पाप धुवून गेले. पिंडदान केल्याने माझे मायबाप उतरून गेले. पाप पुण्याचे बीज व कर्तव्याचे मूळ कशात आहे याची त्यांना भूल पडते .

गोपाळाला भजण्यानेच पाप नष्ट होते. हे ते बापडे विसरतात. सेनाजी म्हणतात तीर्थक्षेत्राचा आचार व्यर्थ होय, हरी वाचून उद्धार होत नाही .Sant Sena Aabhang Hitopdesh

Sant sena Mharaj Aabhang 4

अभंग क्रमांक सतरा

थोर पुण्य होता लाभे कल्पवृक्ष |
कामधेनु वश होई ||१||
नागमणी अमृत लाभे चिंतामणी |
ऋध्दिसिद्धी पाणी वाहे सदा ||२||
राज्यपद परिस लाभे सुवर्णभूमी|
जनता हुकमी दास होय ||३||
सेना म्हणे पुण्यबळ हे लाधले |
नाही संगे आले हरी विन ||४||

भावार्थ:- सेनाजी सांगतात माणसाजवळ प्रचंड पुण्याच्या संचय झाल्यास त्याला कल्पवृक्षाचा लाभ होतो. जो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. कामधेनू त्याला वश होऊन त्यांनी वांछिलेली एकूण एक वस्तू त्याच्यापुढे हजर करते. बहुमूल्य रत्न जडलेले नागमणी त्याला प्राप्त होते. कायमचे चिरंजीवित्व देणारे अमृत त्याला लाभते. वाटेल ती इच्छा पुरी करणारा चिंतामणी त्याला मिळतो.

लक्ष्मी आणि अनिमा महिमा आधी अष्ट सिद्धी त्याच्या घरी सदा पाणी वाहतात. त्याला राजपद, लोखंडाचे सोने करणारा परिस तसेच सुवर्णभूमी इत्यादी सर्व काही उपलब्ध होते. जनता त्याच्या आज्ञेची गुलाम बनते. असे हे पुण्याचे अपार बळ माणसाजवळ हरी कृपेविना येत नाही आणि टिकतही नाही .Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक आठरा

येता मृत्यू त्रिदोष होय |
बंधू बहीण भावजय |
भार्या मुले रडत राहे |
करीती उपाय वाचवाया ||१||
शरीर शीतल, वाचा बसली |
डोळे उपडे नजर थिजली |
क्रमाक्रमे नाड बंद झाली |
आहे धुगधुगी ,अशा मोठी ||२||
प्रेता धरुनी कवटाळे |
त्याचे गुण गाती लीले |
घ्या पाहून म्हणती डोळे |
उचलीती न सोडी आशा ||३||
म्हणे करून घ्यावी सेवा |
व्हा दूर, कल्लोळ झाला ||४||
उचलून ठेवती ताटकी |
जाणार नाही, बांधिती पाटी |
दोन्ही पायाचे बांधा आंगठी |
प्रेत हा शृंगाल केला ||५||
चार खांदेकरी जमले |
पाणी देणारासी उभे केले ||
म्हणे उचला, राम राम बोले |
झाला आक्रोश ,लावा घरात ||६||
नेले पाण्याच्या किनारी |
रचिली चिता ठेवले वरी |
द्या पाणी, तर्पण करी |
लावी अग्नी जाळावया ||७||
प्रथम केस जळाले |

चर्म कारपुन पाणी आटले |
मांस शिजवून गदगदले |
हात पाय जळून गेले ||८||
अग्नि भडकला, जाळी हडका |
कवटी फुटली बसला धक्का |
गेले जवळून, मिळाले राखा |
द्या पाणी मारा बोंब ||९||
सेना म्हणे आशा सोडिती|
सोडून परत घरा येती |
दुःखदृष्टी तेही पाहती |

तरी हरी भजन न मूड ||१०||

भावार्थ:- या कवणात सेनाजी मरणाचे, मृत्यूशोकाचे व अंत्य संस्काराचे यथासांग वर्णन केले आहे. अंतकाळी त्रिदोष होतो. बंधू, भगिनी, भावजया, पत्नी, मुले इत्यादी सर्वजण आकांत करतात. रोग्याला वाचवण्याचे उपाय करतात. पण शरीर थंड होऊन लागते, वाचा बसते. डोळे खोल जातात, नजर थिजून जाते, क्रमाक्रमाने नाडी बंद होते.Sant Sena Aabhang Hitopdesh

तरी सभोवतालचे म्हणतात अजून धुगधुगी आहे. आशा मोठी हटेल असते. मृत्यू होऊन शरीर प्रेत बनले तरी संबंधी या प्रेताला धरून कवटाळतात त्याच्या गुणलीला गातात. घरच्यांचे डोळे म्हणतात, शेवटचे पाहून घ्या. प्रेत जागेवरून हलवताना सुद्धा आशा सुटत नाही.

शेवटी सेवा करून घेण्यासाठी लोक पुढे होतात. स्नानपान करा, मला वाटलावा, पायांची पूजा करा, तीर्थ घ्या असे विधी चालतात. अखेर दूर व्हा म्हणतात. घरच्यांमध्ये हलकळो उडतो. प्रेत ताटावर उचलून ठेवतात.Sant Sena Aabhang Hitopdesh

प्रेत घसरून बाहेर पडू नये म्हणून पाठीस घट्ट बांधतात. दोन्ही पायात अंगठे बांधतात, अशा तऱ्हेने प्रेताचा शृंगार झाल्यावर चार खांदे खरे जमतात, प्रेतात पाणी देनारास उभे करतात, उचला म्हणतात. राम बोलो, जय राम असा घोष सुरू होतो. त्याबरोबर घरात आक्रोश सुरू होतो. “बाया माणसना घरात लावा” असे लोक म्हणतात.Sant Sena Aabhang Hitopdesh

प्रेत नदीकिनारी नेऊन चिता रचून आग्णी देतात. मुखी पाणी देऊन प्रेत दहनार्थ अग्नी लावतात. प्रथम केस जळतात, मग त्वचा करपून देहातले पाणी आटते. मास शिजून गदगते व हात पाय जळून जातात. अग्नी भडकतो व हाडांना जाळतो. कवठे फुटतात धक्का बसतो. सर्व काही जवळून राखेला मिळते. शेवटी पाणी देऊन लोक बोंब मारतात. अशा पूर्णपणे सोडून घराला परत येतात. हे मूड लोक दुःखदृष्टीने सर्व प्रकार पाहतात. परंतु दुःख मुक्त होण्यासाठी हरीला मात्र भजत नाहीत .

अभंग क्रमांक एकोणीस

घुमती या जागी अंगी दैवत खेळे |
मरती का मुले वाचवेना ||१||
चेटूक मेटूक साधन मंतर |

दावीती प्रकार वाढवूनीया ||२||
आंधळे हे जण विसरती केशवा |
शेंद्रराचे देवा आळवीती ||३||
सेना म्हणे हरी जगाचा नायक |
कर्तव्य सुखदुःख देई काढी ||४||

भावार्थ:- अंगामध्ये देव खेळवणारे आपल्या शरीरात देवाचा संचार असल्याचे भासून एका जागी बेभान घुमत राहतात.चेटुक मेटुक जंतरमंतर इत्यादी अनेक भोंदूपणाचे प्रकार ते वाढवून दाखवतात.Sant Sena Aabhang Hitopdesh

परंतु मृत्युमुखी पडणारी बालके काही त्यांना वाचवीता येत नाही. या फसव्या लोकांवर विश्वास ठेवणारे आंधळे लोक केशवाला विसरून शेंदाराच्या देवाला आळवीत बसतात. सेनाजी सांगतात जगाचा नायक व करता धरता श्रीहरी आहे तोच तुमचे कर्तव्य आणि सुखदुःख देतो अथवा काढून घेतो. आपला भरीभार त्याच्यावरच तुम्ही टाकावा.Sant Sena Aabhang Hitopdesh

अभंग क्रमांक वीस

येऊनी गर्भासी मेलो उपवासी |
नाही सखी ऐसी भेटली कोणी ||१||
देह जाणा अनित्य करावे स्वहित |
मोहापासून निश्चित सोडवील ||२||
न होय अनारिसा पाळी तोंडींच्या घासा |
सोडवीता ऐसा परी देखों‌||३||
वाटलो मी पणे धनमान काही |
सेना म्हणे नाही लाभ अलाभ ||४||

भावार्थ:- सेनाजी स्वहिताचे चिंतन करताना सांगतात मी गर्भावासी झाल्यापासून उपाशी मेल्यासारखा झालो आहे. का कि या जन्मात काही तथ्य असल्याचे जाणवत नाही. आणि या गुढ बंदीवासातून सोडवून करणारी कोणी मार्गदर्शन सखी भेटली नाही. हा देह क्षणभुंगुर असून आपले स्वहित करावे अशी मनाची धारणा आहे.Sant Sena Aabhang Hitopdesh

परंतु या ध्यास लपेटलेल्या मायेच्या मोहातून निश्चितपणे सोडविल असा कोणीच त्राता आढळत नाही. या जाळ्यापासून मी वेगळा होऊन शकत नाही. आगदीक पने तोंडी पडेल तो घास गळित आयुष्य कठीत आहे. पण सोडविणारा दृष्टीपथात येत नाही. अहंकार बुद्धिमाने धन, मानप्रतिष्ठा वगैरे काही मिळविण असे वाटले होते.

पण त्यांपासून फायदावाद तोटा काडी मात्र झाला नाही असे प्रत्ययास आले आहे.Sant Sena Aabhang Hitopdesh

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top