नाभिक सेवा संघाचे विरोधी पक्षनेते मा श्री अंबादास दानवेव खासदार बंडू जाधव यांना निवेदन Investigate Nilima’s death through CID
Investigate Nilima’s death through CID
ओमळी ता चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील नाभिक समाजाची 24 वर्षीय तरुणी नीलिमा चव्हाण हि 29 जुलै रोजी दापोलीहुन आपल्या गावी ओमळी येथे येत असताना बेपत्ता झाली होती.1 ऑगस्ट रोजी तीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी भेटला.तिचा मृत्यू ही हत्या असल्याचे तीचे नातेवाईक सांगत आहेत.तर पोलिस यंत्रणा निलिमाचा मृत्यू हि आत्महत्या असल्याचे दाखवत आहेत.
निलिमाच्या मृत्यूची सखोल तपासणी व्हावी यासाठी तीचे प्रकरण सी आय डी मार्फत तपासणी करावी.व ज्यांनी कोणी तीची हत्या केली किंवा तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले त्याचा तपास करुन कठोर कारवाई करावी.यासाठी आज दिनांक 14/8/2023 रोजी मंठा जिल्हा जालना येथे विरोधी पक्षनेते मा श्री अंबादास दानवे आले असता.Investigate Nilima’s death through CID
नाभिक सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री गणेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भेटले.व त्यांना निवेदन दिले.यावेळी परभणी जिल्हाचे खासदार बंडू जाधव हे पण उपस्थित होते.यावेळी नाभिक सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री गणेश वाघमारे, सचिव भरत शिंदे, विष्णू राजकवर सह आदी समाज बांधवांची उपस्थित होती
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील स्टेट बँकेमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय नाभिक समाजाची तरुणी नीलिमा सुधाकर चव्हाण हिचा काल दाभोळ समुद्रकिनारी मृतदेह सापडला. मृतदेहाकडे पाहून तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आलेली आहे.
असे स्पष्ट दिसत आहे.निलीमाच्या हत्येची सखोल चौकशी करावी. यासाठी निलीमाचे नातेवाईक आणि रत्नागिरी नाभिक समाज आक्रमक झाला असून 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.तर नेमकं नीलिमा सुधाकर चव्हाण हिच्यासोबत काय झालं? यासंदर्भात आज माहिती घेऊ.Investigate Nilima’s death through CID
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
👉🏿👉🏿 निलिमा चव्हाण 👈🏿👈🏿
निलीमा स्टेट बँकेत कर्मचारी
नाभिक समाजाची 24 वर्षीय निलीमा सुधाकर चव्हाण हि सहा महिन्यांपूर्वी दापोली येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कंत्राटी पद्धतीने लिपिक पदावर कार्यरत होती.ती दापोली येथे राहायला होती.महिण्याच्या दुसर्या, चौथ्या शनिवारी सुट्टी असल्याने ती आपल्या गावी ओमळी ता चिपळूण येथे जात असे.29 जुलै शनिवार रोजी मोहरम सुट्टी असल्याने तिने मी गावी येणार असल्याचे आई वडीलांना सांगितले.
पण वेळ होऊनही ती गावी आली नाही.तसेच तीचा मोबाईल पण बंद सांगत होता.म्हणुन तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.पण पोलिसांनी तेवढं गांभीर्याने घेतले नाही.गांभिर्याने लक्ष घातले असते तर तिच्या मोबाईल लोकेशन वरुन तीचा ठाव ठिकाणा लागला असता.व तीचा जीव वाचला असता असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.Investigate Nilima’s death through CID
निलीमाच्या मृतदेहाची विटंबना
एक ऑगस्ट रोजी दाभोळी खाडीच्या समुद्रकिनारा एका महिलेचा मृतदेह दापोली पोलिसांना मिळाला.निलीमाच्या नातेवाईकांच्या तक्रारी नुसार त्यांना मृतदेहाची ओळख तपासणीसाठी शवविच्छेदन केंद्रात बोलवण्यात आले.तो मृतदेह निलीमाचा असल्याचे नातेवाईक व मैत्रनीच्या सांगण्यावरून सिद्ध झाले.पण निलीमाच्या मृतदेहाच्या डोक्यावरील,भुवयावरील केस काढल्याचे दिसून आले.तसेच तीचे डोळे बाहेर पडले होते.Investigate Nilima’s death through CID
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
👉🏿👉🏿 निलिमा चव्हाण 👈🏿👈🏿
निलीमाची हत्याच झाली
जी मुलगी फोन करून मी घरी येत आहे.आसे आपल्या नातेवाईकांना सांगते.ती अचानक आत्महत्या कशी करेल? हा प्रश्न निलीमाच्या नातेवाईकांनी केला आहे.निलीमाच्या मृतदेहाकडे पाहून तिने आत्महत्या केली आसे जानवत नाही.
तीची हत्या करण्यात आली आहे.तीची योग्य चौकशी झाली पाहिजे.यासाठी निलीमाच्या नातेवाईकांनी आणि रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज बांधवांनी पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे.चौकशी करून आरोपींला तात्काळ अटक झाली पाहिजे.Investigate Nilima’s death through CID
आसे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचे नाभिक समाजाच्या वतीने सांगण्यात आले. तेंव्हा उपविभागीय अधिकारी मुणगेकर यांनी समाजाच्या भावना लक्षात घेऊन सखोल चौकशी करून आरोपींला तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्यावरच नातेवाईक आणि नाभिक समाजाच्या वतीने निलीमावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
15 ऑगस्ट ला काळीपट्टी बांधून निषेध
खेड पोलिसांनी तात्काळ दखल घेतली असती तर व निलीमाच्या मोबाईल चे लोकेशन टिपलं असत तर माझ्या बहिणीचा जीव वाचला असता असे निलीमाच्या भावाने सांगितले.
आताही पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी रत्नागिरी नाभिक समाजाच्या वतीने स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्रात नाभिक समाज हाताला,दंडाला,खिशाला काळी पट्टी बांधून सरकारचा, पोलिस तपास यंत्रणेचा निषेध करनार आहे.Investigate Nilima’s death through CID
स्थनिक आमदारांचे सहकार्य
दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांना संबंधित घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिस प्रशासनाला सूचना देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सुचना दिली.तर निलीमा चव्हाण चिपळूण मतदार संघातील असल्याने आमदार शेखर निकम यांनी सर्व नाभिक समाज बांधवांना धीर देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी वेळेत करण्याची सुचना पोलिसांना दिली.Investigate Nilima’s death through CID
संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाज अस्वस्थ
निलीमा चव्हाण हिच्या हत्येची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात वार्यासारखी पसरली असून महाराष्ट्रातील नाभिक समाज निलीमाच्या दुःखात सहभागी असून.निलीमाच्या हत्येची सखोल चौकशी करावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोकशाही मार्गाने आंदोलन करुन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे.Investigate Nilima’s death through CID