नाभिक सेवा संघाच्या शाखेची स्थापना
कोकाटे हातगाव-नाभिक समाजातील महापुरुषांचा गौरवशाली इतिहास तरुण पिढीला माहित व्हावा तसेच नाभिक समाजावर होणार्या आन्यायाला न्याय मिळावा यासाठी मागील आकरा वर्षांपासून समाजात कार्यरत असलेल्या “नाभिक सेवा संघ महाराष्ट्र” संघटनेच्या नवीन शाखेची स्थापना दिनांक Nabhik seva sangh Branch establishment 24/6/2025 मंगळवार रोजी कोकाटे हातगाव तालुका परतूर जी जालना येथे करण्यात आले.शाखेचे उद्घाटन नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख उपस्थिती म्हणून नाभिक सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस श्री सेनाजी काळे हे होते
नाभिक सेवा संघ को.हातगाव शाखेच्या अध्यक्षपदी -पवनराजे गोरे, उपाध्यक्ष – सुरज वाघमारे, सचिव -शुभम गोरे,सदस्य- शिवाजी गोरे, तर मार्गदर्शक – पोलिस पाटील श्री रामचंद्र वाघमारे व श्री विठ्ठल वाघमारे हे राहणार आहेत.Nabhik seva sangh Branch establishment
या सर्व नुतन पदाधिकारी यांच स्वागत नाभिक सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस श्री सेनाजी काळे यांनी केले. नाभिक सेवा संघ को. हातगाव शाखेच्या वतीने लवकरच गावात जिवाजी महाले चौकाची स्थापना करण्याचा ठराव घेण्यात आला.
यावेळी को हातगाव सह आजुबाजूच्या गावातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने होते. उपस्थित बांधवांचे आभार पोलिस पाटील रामचंद्र वाघमारे यांनी मानले.
Nabhik seva sangh Branch establishment
एकच लक्ष नाभिक उत्कर्ष