व्यसनाबद्दल संत सेना महाराज यांचा उपदेश || Sant Sena Maharajs Sermon on Addiction

Sant Sena Maharaj's Sermon on Addiction

संत सेना महाराज यांनी ईशचिंतन, विठ्ठलवर्णन,संतसमागम, नामसंकीर्तन हितोपदेश,नीतिबोध आशा विविध विषयांबरोबरच व्यसनाधीनता यावर ही अभंग रचना केली आहे.यात व्यसनाचे दुष्परिणामाचे वर्णन केले आहे.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

कोणते व्यसन करावं? आणि कोणत व्यसन करु नये? या याबद्दल संत सेना महाराज यांनी आपल्या अभंगात विनवणी करून सांगितले आहे.आज आपण त्या बद्दल माहिती घेणार आहोत.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

Sant Sena Maharajs Sermon on Addiction1

Sant Sena Maharajs Sermon on Addiction

  संत सेनाजी म्हणतात

नका सेवू अफू नका पिऊ दारु |
गांज्याच्या धूरे नाश होय ||१||
या व्यसनापाई बुडाले हे किती |
रांडापोरें मरती ना खावया ||२||
शरिराशी भंग मान गेले धन |
पाहती किलवानें जनामध्ये ||३||
सेना म्हणे सांगतो धरा अंत:करणीं |
करितो विनवणी तुम्हालाही ||४||

भावार्थ-संत सेना महाराज संसारी जनास विनवणी करून म्हणतात- मी काय सांगतो ते नीट अंतकरणात साठवून ठेवा. अफूचे सेवन करू नका. दारू पिऊ नका. गांजाचा धूर सोडू नका. या दूरूव्यसनानी तुमचा नाश होईल.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

या व्यसनाच्या नादी लागून असंख्य लोकांची धुळधाम झाली आहे. त्यांची बायको फोरे खायला न मिळाल्यामुळे उपासमार होऊन मरत आहेत. त्यांचे शरीर दुर्बळ होते. मानहानी होते व जवळच्या धनाचा चुराडा होतो.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

असे अपयशी लोक केवीलवाने पणे समाजात मान खाली घालून वावरतात. म्हणून या व्यसनापासून दूर राहा अशी कळकळीची विनंती वरील अभंगात संत सेना महाराज यांनी केली आहे.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

व्यसन म्हणजे नर्कवास

संत सेना महाराज म्हणतात
तमाखु ओढुनि सोडी धुर |
दुष्ट बुध्दी दुराचार ||१||
पान खाय किर्तनात |
रुधीर विटाळशींचे पीत ||२||
त्याची संगती जयास |
सेना म्हणे नर्कवास ||३||

भावार्थ-संत सेना महाराज इतर ठिकाणी अतिशय संयमी वाटणारा हा संतकवी व्यसनाधीनतेवर आघात करताना एकदम आक्रमक होताना दिसतो. “अधमाचे तोंड फोडण्याची” भाषा करणाऱ्या संत तुकारामांची या ठिकाणी आठवण व्हावी इतकी आक्रमकता सेनाजिंच्या या अभंगातून आलेली दिसते. याचे कारण या अभंगातील संताप दुहेरी स्तराचा आहे.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

एक तर व्यसनाच्या आहारी जाणे आणि दुसरे म्हणजे अशी नशा करून ज्या ठिकाणी हरिश्चंद्र चाललेले आहे. अशा हरिनाम संकीर्तन उपस्थित राहणे. पान तंबाखू खाऊन कीर्तनात येणारा माणूस विटाळशी बाईचे रुधीर प्राशन करतो आहे.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

अशी सणसणीत चपराग संत सेना महाराजांनी लावलेली आहे. अशा दुराचारी दुष्ट व्यसनी माणसापासून दूर राहण्याचा सल्ला सेनाजी देतात. अशा समाजविघातक आधम वृतीच्या माणसांमुळे अवघा समाज बिघडतो. त्यामुळे त्याच्यापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरते असे सेनाजी महाराज सांगतात.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

संत सेना महाराज अधिक माहितीसाठी

image 2

👉 येथे क्लिक करा 👈

आचरनाविषयी सेनाजी म्हणतात

तुज ऐंसे वाटे देह व्यर्थ जावा |
द्युतकर्म खेळावा सारी ||१||
मग नाही नाम निजल्या जागा राम |
जन्मोनि अधम दु:ख पावे ||२||
दासिगमणी धीट विषयी लंपट |
जावया वाट अधोगती ||३||
नर्का जावयाची धरशील चाड |
तरी निंदा गोड वैष्णवाची ||४||

भावार्थ-संत सेनाजी म्हणतात, ज्यांना आपल्या संसाराचे मातेरे करायचे आहे. मौल्यवान देह खर्च घालवायचा आहे. अशा लोकांनी धूतकर्मचा सारीपाट पाठ मांडावा. असे सेना महाराज उपवासाने म्हणतात.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

सेनानी आपल्या अभंगातून लोकांना केवळ परमार्थिक उद्देश केला नाही. तर लोकांच्या आचरणाविषयीही ते किती दक्ष होते. ते त्यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेवर केलेल्या मार्मिक भाषेतून प्रत्ययास येते.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि पत दोन्हीही नष्ट होते. संसाराची राख रांगोळी होते. शरीराचे हाल होतात आणि व्यक्तीबरोबर कुटुंबाची ही वातहात होते. संसारात दुःख दारिद्र्य येऊन माणसाची बेअब्रू होते.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

आणि व्यक्तीबरोबर कुटुंबाची व पर्यायाने समाजाची ही अधोगती वेगाने होते. त्यामुळे सामान्य संसारिक माणसाने व्यसनापासून चार हात दूर राहावे. असे संत सेना महाराज या अभंगात सांगतात.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

हरिनामाचे व्यसन करा

संत सेना महाराज म्हणतात. तुम्हाला व्यसन करायचे झाले तर ते परमेश्वराच्या नामस्मरणाची करावे, हरी चिंतनाचे करावे, भगवंताच्या गुण गौरवाचे करावे, संगती करायची तर ती संत सजनाची करावी.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

संत महात्म्याची करावी. आणि सोजल सातवीकाची करावी. त्यामुळे आपल्या व आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल. असा अतिशय मौलिक उपदेश संत सेना महाराजांनी वरील अभंगात दिलेला आहे.Sant Sena Maharajs Sermon on Addiction

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top