शिवरक्षक जिवाजी महाले पुरस्काराने समाधान पवार सन्मानित || Shivrakshak Jivaji Mahale Award

Shivrakshak Jivaji Mahale Award 1

शिवरक्षक जिवाजी महाले पुरस्काराने समाधान पवार सन्मानित

नेवासा:छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडावर जीव वाचवून इतिहासात “होता जिवा म्हणून वाचला शिवा” या म्हणीने आजरामर झालेला शुरवीर मावळा जिवाजी महाले यांच्या नावाने दिला जाणारा “शिवरक्षक” पुरस्कार यावर्षी नेवासा जिल्हा अहिल्या नगर येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या समाधान सचिन पवार या विद्यार्थ्याला नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले आणि प्रदेश सरचिटणीस श्री सेनाजी काळे यांच्या हस्ते 30 डिसेंबर रोजी संत सेना महाराज मंदिर नेवासा येथे देण्यात आला. Shivrakshak Jivaji Mahale Award

Shivrakshak Jivaji Mahale Award

नेवासा येथील पोलिस कर्मचारी गणेश जाधव कर्तव्यावर असताना त्यांच्या पहिल्या मजल्यावर घरातील देवघराला सकाळी आकरा वाजता आग लागली.पत्नी पल्लवी जाधव स्नानगृहात आसतांनी हा प्रकार घडला.त्या स्नानगृहातून बाहेर आल्यानंतर धुर पहाताच घाबरुन गेल्या.पुर्ण घर धुराने भरून गेले होते. घरात आई आणि एक वर्षाचा मुलगा होता.आईच्या आरडाओरडमुळे शेजारील युवक जमा झाले.Shivrakshak Jivaji Mahale Award

त्यातील समाधान पवार नावाच्या युवकाने संरक्षक भिंतीवर चढून पहिल्या मजल्यावर असलेल्या पल्लवी आई जवळील एक वर्षाच्या मुलाला सुखरूप खाली उभे असलेल्या युवकाकडे सुपूर्द केले.घराच्या सर्व खिडक्या उघडून दिल्या त्यामुळे धुर कमी झाला. आग आटोक्यात आनली.घटनेची माहिती मिळताच पोलिस दलातील कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी पोहोचले.पण आई आणि मुलगा सुखरूप पहाताच सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी समाधान पवार या युवकाने जे धाडस दाखवले त्याबद्दल उपस्थित सर्वांनी त्याचे कौतुक केले.Shivrakshak Jivaji Mahale Award

Shivrakshak Jivaji Mahale Award 4

पोलिस दलाच्या वतीने सत्कार

पोलिस दलाच्या वतीने घटनेत मुलाला सुखरूप घेने व आग आटोक्यात आपल्याबद्दल‌ देवदुत ठरलेल्या समाधान पवार व अनंत नळकांडे या युवकाचा सत्कार करण्यात आला.पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दोन्ही युवकाचे विशेष अभिनंदन केले.

Shivrakshak Jivaji Mahale Award 3

शिवरक्षक पुरस्कार कोणाला दिला जातो?

छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू मावळा जिवाजी महाले यांच्या पराक्रमाचा गौरव म्हणून जी व्यक्ती आपल्या जीवाचा विचार न करता इतरांचा जीव वाचवते आशा व्यक्तींना दरवर्षी नाभिक सेवा संघाच्या वतीने “शिवरक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या आगोदर या व्यक्तींना मिळाला “शिवरक्षक” पुरस्कार.Shivrakshak Jivaji Mahale Award

•संपत सवने परभणी

परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संपत सवने यांनी आपल्या मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प केला.तसे रजिस्ट्रेशन पण केले.देहदानामुळे भविष्यात आकरा व्यक्तींचा जीव वाचू शकतो.देहदान उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार केला.आनेकांना देहदानासाठी प्रेरित केले.त्यामुळे श्री संपत सवने यांना नाभिक सेवा संघाच्या वतीने 2019 ला शिवरक्षक पुरस्काराने सन्मानित केले.Shivrakshak Jivaji Mahale Award

•प्रा. राजकूमार गाजरे छ. संभाजीनगर

छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची आठवण येणार्या पिढीला व्हावी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रालयात जिवाजी महाले यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यास शासनाला भाग पाडणारे प्रा राजकूमार गाजरे यांना सन २०२० साली नाभिक सेवा संघाच्या वतीने “शिवरक्षक” पुरस्काराने सन्मानित केले.Shivrakshak Jivaji Mahale Award

•समाजसेवा सुमित पंडित

शासकीय रुग्णालयाला वेळोवेळी रक्ताची गरज भासते ती गरज पुर्ण व्हावी म्हणून वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन हजारो रक्ताच्या बॅग शासकीय रुग्णालयाला देनारे छत्रपती संभाजीनगर येथील समाजसेवक श्री सुमित पंडित यांच्या कार्याची पावती म्हणून सन २०२१ मध्ये नाभिक सेवा संघाच्या वतीने “शिवरक्षक” पुरस्कार देण्यात आला होता.Shivrakshak Jivaji Mahale Award

•सुभाष चोपडे माजलगाव
भारतीय सैन्यात आपल्या आयुष्यातील चोवीस वर्षे सेवा देऊन भारतीय सिमेचे रक्षण करनारे भारतीय सैनिक सुभाष चोपडे माजलगाव जिल्हा बीड यांना सन२०२२ मध्ये “शिवरक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.Shivrakshak Jivaji Mahale Award

•राम खटले छत्रपती संभाजीनगर

कोरोना काळात लोक घरात असताना आपल्या जिवाची पर्वा न करता सतत दोन वर्षे शासकीय दवाखान्याना ऑक्सिजन चा पुरवठा करणारे ऑक्सिजन गाडीचे चालक राम खटले यांना सन २०२३ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाभिक सेवा संघाच्या वतीने “शिवरक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.Shivrakshak Jivaji Mahale Award

•विजय महाले जळगाव
विजय महाले यांनी नेत्रदानाचा संकल्प केला व तसा अर्ज पण भरुन दिला.नेत्रदानाचे महत्व ते वेळोवेळी सांगतात तसेच आपल्या मित्रांना नेत्रदानासाठी प्रवृत्त करत आसतात.त्याच्या कार्याची दखल म्हणून जिवाजी महाले जयंती ९/१०/२०२४ रोजी शिवरक्षक जिवाजी महाले पुरस्काराने नाभिक सेवा संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.Shivrakshak Jivaji Mahale Award
•संकलन:- श्री माधव भाले नाभिक सेवा संघ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र

महत्वाची सूचना

समाजात जे व्यक्ती, महिला एखाद्याचे प्राण,जीव वाचवण्याचे कार्य करतात तसेच जिवाजी महाले यांच्या कार्याचा गौरव म्हणून जिवाजी महाले यांच्या पुतळ्याची स्थापना करतात तसेच जिवाजी महाले यांच्या नावाने चौकाची स्थापना करतात आशा व्यक्तींना, संस्थाना किंवा संघटनांना नाभिक सेवा संघाच्या वतीने जिवाजी महाले जयंती दिनी शिवरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.Shivrakshak Jivaji Mahale Award

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top