“जो समाज इतिहास वाचत नाही,तो समाज उज्वल भविष्य घडवू शकत नाही”. या म्हणीप्रमाणे नाभिक समाज आपला प्रेरणादायी,स्पुर्तिदायी इतिहास विसरला आहे.त्यामुळे तो अन्याय, अत्याचार आणि अपमान याच्या विरोधात आवाज उठवण्याऐवजी निमुटपणे सहन करत आहे. हे कोठेतरी थांबलं पाहिजे.अन्यायाविरुध्द पेटून उठला पाहिजे.यासाठी त्याला त्याच्या पुर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून दिली पाहिजे. यासाठी इतिहासाचे लेखन झाले पाहिजे.ते लिखाण प्रत्यकापर्यंत पोहच पाहिजे. the barber community history
the barber community history
“अन्याय करनारापेक्षा अन्याय सहन करनारा जास्त दोषी असतो” त्याप्रमाणे अन्याय सहन करनारा नाभिक समाज जास्त दोषी आहे. कारण आजकाल कोणीही उठतो आणि आपल्या भाषणात, चारचौघात नाभिक समाजाच्या व्यवसायाचा, व्यक्तीचा अपमान करतो.नुकतच आमदार जयंत पाटील यांनी भर विधानसभेत केलेलं वक्तव्य म्हणजे , “पोलिस काय हजामती करतात काय?” आसा प्रश्न विधानसभा अध्यक्ष यांना केला.या विधानावरून आमदार मोहदयाचा सलून व्यवसायाकडे पहाण्याचा दृष्टीकोन किती खालचा आहे? हे स्पष्ट होते. तर एका सभेत सातार्याचे नरेंद्र जाधव भरसभेत म्हणतात, “हा गृहमंत्री आहे की न्हावी?” आशा वाचाळविरांच्या तोंडाला कायमच लॉक लावायच सोडून नाभिक समाज निमुटपणे अन्याय सहन करत आहे.the barber community history
सलून चालकावर हल्ला
माझी दाढी आगोदर का करत नाही?आसे म्हणून नांदेड जिल्हात एका सलून चालकाच्या तोंडावर ब्लेडने वार केला जातो. उधारीचे पैसे मागितले म्हणून जळगाव जिल्ह्यात न्हावी बांधवांच्या डोक्यात वीट मारुन जीव घेतला जातो.आणि साधी केसही होत नाही? यावरून एक गोष्ट लक्षात येते की,“अन्याय करणार्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोशी आसतो” छत्रपती शिवाजी महाराजांवर धोक्याने वार करनाराचा क्षणात हात छाटनार्या जिवाजी महाले यांचा इतिहास आज नाभिक समाज विसरलेला दिसतो.the barber community history
इतर राज्यांत नाभिकांची स्थिती
आपल्या बाजूला असलेल्या “कर्नाटक राज्यात” आशी अवस्था नाही तर तेथील राज्य सरकारने नाभिक समाजासाठी स्वतंत्र कायदा केला आहे.जर एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी न्हावी/ हजाम आसा शब्द प्रयोग केला तर (तो कोणिही आसो) त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. कर्नाटक राज्यात न्हावी समाजाला सविता ऋषीच्या नावाने ”सविता समाज” म्हणून ओळखले जाते. तर “आंध्र प्रदेश” सरकारने पण 2022 ला आशाच प्रकारचा कायदा बनवला आहे. त्याप्रमाणे आंध्र प्रदेशात न्हावी समाजाला “ब्राह्मण नाई” असे संबोधले जाते. the barber community history
भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करनारे नाभिक
जगजेता सिकंदर जेव्हा भारतावर आक्रमकण करण्यासाठी,भारताला आपल्या वर्चस्वाखाली घेण्यासाठी चालून आला तेव्हा नाभिक कुळात जन्माला आलेल्या चंद्रगुप्त मौर्य यांनी त्याला रिकाम्या हाताने परत पाठवले.सिकंदरचे जगजेता होण्याचं स्वप्न धुळीस मिळविले. इतिहासाच्या पानांवर चंद्रगुप्त मौर्य यांनी आपला पराक्रमी इतिहास स्वर्ण अक्षरांनी लिहला. the barber community history
- शहिद भाई कोतवाल
दिडशे वर्ष भारतावर राज्य करणार्या इंग्रजांना भारत देश सोडून जान्यास भाग पाडनारे, त्यांच्या अन्याय, अत्याचाराला आपल्या लेखनीतून आणि बंदुकितून सडेतोड उत्तर देनारे, त्यांच्या क्रांती कार्याची दखल इंग्लंड पर्यंत पोहचल्याने इंग्लडवरुन विशेष अधिकार्यांना बोलवून शहिद भाई कोतवाल यांच्या वर बेछुटपणे गोळिबार करून भारत मातेच्या कुशीत वीर मरण पावलेले शहिद भाई कोतवाल हेही नाभिक समाजातील होते. the barber community history
- जिवाजी महाले, शिवाजी काशीद
छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरुन सुखरूप सुटका करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे नरवीर शिवाजी काशीद नाभिक समाजाचे होते.तसेच प्रतापगडावर अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून “होता जिवा म्हणून वाचला शिवा” या म्हणिने इतिहासात अजरामर झालेले जिवाजी महाले नाभिक समाजाचे होते.यांचा पराक्रम नाभिक समाज विसरत आहे.
- नाभिक समाजातील हुतात्मे
या देशावर इंग्रजां बरोबरच इतर परकियांची सत्ता होती.त्यापैकी एक म्हणजे निजामशाही.यांच्या काळात तर अन्याय, अत्याचार याची सिमा ओलांडली होती.आशा या निजामशाहीला उलथून टाकण्यासाठी नाभिक समाजाचे एक नव्हे दोन नव्हे तर तीन तीन क्रांतिकारक या नाभिक समाजाने दिले.त्याची नावं पुढीलप्रमाणे आहेत १) हुतात्मा सांडुजी वाघ तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर.२) हुतात्मा लालाजी वाघमारे, धामणगाव जिल्हा सोलापूर ३) हुतात्मा मोरेश्वर न्हावी जिल्हा रायगड.यांचापराक्रम आज नाभिक समाज विसरला वाटते.म्हणून अन्याय सहन करत आहे. the barber community history
- चक्रवर्ती सम्राट अशोक
भारत देशाच्या तिरंग्यावर असलेलं अशोक चक्र आणि रुपयांवर असलेल्या चार वाघांची मुद्राचे निर्माते चक्रवर्ती *सम्राट अशोक* हेही नाभिक कुळातील होते.याचे पुरावे इतिहासात पहावयास मिळतात.
- शिख धर्मात नाभिकांचे योगदान
शिख धर्मात गुरू गोविंदसिंग यांनी देशासाठी पाच शिर,डोके मागीतली तेव्हा सर्वप्रथम समोर आलेला वीर म्हणजे नाभिक समाजाचा साहिब सिंह हा आहे. यांच्या सोबत आजून चार वीर समोर आले.या पाच विरांना शिख धर्मात पंच प्यारे म्हणून ओळखले जातात.आजही शिख धर्माच्या धार्मिक उत्सवात त्यांची मिरवणूक काढली जाते.पुजा केली जाते. या पंचप्यार्यांच्या जिवावर संपूर्ण जगात शिख धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला.लाखो अनुयायी शिख धर्माचे पालन करतात.आणि या मातृभुमिचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात.the barber community history
याच शिख धर्माच्या “गुरुग्रंथ साहिब” या पवीत्र मानल्या जाणाऱ्या ग्रंथात इतर संतांच्या अभंगा बरोबर नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या अभंगाचा समावेश आहे.हि नाभिक समाजासाठी अभिमानाची, गौरवाची बाब आहे. जेवढे हिंदू धर्मीय संत सेना महाराज यांना मानतात तेवढेच शिख धर्मिय पण संत सेना महाराज यांना मानतात.पंजाबमध्ये जालंदर येथे संत सेना महाराज यांचे खुप मोठे मंदिर शिख समुदायांनी निर्माण केले आहे. तेथे दररोज आरती, भजन संध्या नित्यनेमाने केली जाते.हि नाभिक समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
- बौद्ध धर्मातील नाभिक
जगाला शांतीचा संदेश देणाऱे , “जगाला यूध्द नव्हे तर बुध्द हवे” आशी शिकवण देणारे तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर बुध्द धर्माची धुरा व्यवस्थीत पणे सांभाळणारे,बुध्द धर्माच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगात करणारे, भंते उपली हे नाभिक समाजाचे होते.त्यानी बौध्द धर्म स्वीकारला आणि बुद्ध धर्माच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार केला.आज जो बुध्द धर्म जो जीवंत आहे तो केवळ भंते उपली यांच्यामुळेच संपूर्ण जगात जीवंत आहे. भंते उपली हे नाभिक समाजातीलच होते.the barber community history
श्री माधव भाले
संस्थापक अध्यक्ष
नाभिक सेवा संघ महाराष्ट्र







