संत सेना महाराज यांच्या जयंतीच्या तारखेवरुन सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू असुन यात नाभिक समाजाच्या विविध संघटनेतील पदाधिकारी, वारकरी संस्था आणि भागवताचार्य ह.भ.प.मंडळीनीही आप आपले मत व्यक्त केले आहे. 8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
संंत सेना महाराज यांची जयंती पुर्वापार चालत आलेल्या तिथीनुसार चालू असताना तारखेनुसार 8 मार्च ला का साजरी करावी? आसा प्रश्न वारकरी संप्रदाय व नाभिक समाजाच्या वतीने 8 मार्च रोजी जयंती साजरी करा म्हणनार्या संघटनेला केला जात आहे.
आशा परिस्थितीत “नाभिक परिवार” टिमने मागील तीन चार वर्षात संत सेना महाराज जयंती कधी साजरी झाली? याचा ऑनलाईन सर्वे केला असता,नाभिक समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने बांधवगड प्रमाणे येणार्या तिथीला संत सेना महाराज जयंती साजरी केल्याचे दिसून आले.
यासाठी नाभिक समाजाच्या संस्था, संघटना,मंडळे,संघ, सेना,आसोशियन,पक्ष, विविध 30 गटांचा अभ्यास केला असता त्यांनी संत सेना महाराज जयंती बांधगड प्रमाणे तिथीला साजरी केली असल्याचे दिसून आले.8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
त्या संस्था, संघटना,मंडळे, सेना,पक्ष कोणकोणते आहेत? याबद्दल माहिती घेनार आहोत.तसेच विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे, वारकरी संस्थेचे, भागवताचार्य, यांनी व्यक्त केलेली मते पहानार आहोत.
2022 ला बांधवगड प्रमाणे संत सेना महाराज जयंती साजरी करनार्या नाभिक संघटना/ मंडळ,संस्था आणि गट
जयंती चैत्र कृष्ण 12 (27 एप्रिल 2022) महाराष्ट्र
- नाभिक सेवा संघ महाराष्ट्र
- नाभिक टायगर सेना महाराष्ट्र
- नाभिक युवा शक्ती महाराष्ट्र
- नाभिक सेना महाराष्ट्र
- नाभिक विकास मंडळ
- नाभिक आधार फाउंडेशन
- नाभिक विद्यार्थी सेना-बीड
- नाभिक आरक्षण समिती महाराष्ट्र
- नाभिक एकता मंच-वर्धा
- नाभिक एकता महासंघ
- नाभिक युवा मंच-भंडारा
- नाभिक युवा मंच-भोकरदण
- महाराष्ट्र नाभिक महामंडळ
- महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पण संघ
- राष्ट्रीय नाभिक संघटना
- राष्ट्रीय शिवरक्षक जिवाजी सेना
- राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ
- सलुन पार्लर असोसिएशन महाराष्ट्र
- न्यु सलुन पार्लर असोसिएशन महाराष्ट्र
- बारा बलुतेदार महासंघ जालना
- युवा जिवा सेना-वाशिम
- वीर जिवाजी संघटना-सातारा
- नाभिक वधु वर मंडळ- विदर्भ
- सकल नाभिक समाज महाराष्ट्र
- नंदुरबार नाभिक महिला मंडळ
- राष्ट्रीय जनसेवा पक्ष
- संत सेना पायी दिंडी सोहळा- औरंगाबाद
- श्री संत सेना महाराज प्रतिष्ठान -चांदुर बाजार
महाराष्ट्रातील नाभिक समाजात अस्तित्वात असलेल्या 30 गटापैकी 28 गटांनी संत सेना महाराज जयंती बांधवगड प्रमाणे तिथीला साजरी केल्याचे दिसून आले.
यावरुन एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्रातील नाभिक समाजाला 8 मार्च मान्य नाही तर पुर्वापार चालत आलेल्या तिथीनुसार संत सेना महाराज जयंती साजरी होते हे सिद्ध झाले.8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
संत सेना महाराज वारकरी सेवा संस्था छत्रपती संभाजीनगर,संस्थेचे मत
संत सेना महाराज जयंती तिथीनुसारच साजरी का करावी? कारण आमच्या वाडवडिलांपासून संत सेना महाराज पुण्यतिथी तिथीनुसार श्रावण वद्य द्वादशीला आपन साजरी करतो.
यात कोणतेही दुमत नाही.म्हनुन संत सेना महाराज जयंती बांधगड प्रमाणे तिथीनुसार तारखेला (17 एप्रिल 2023 रोजी)साजरी करावी.दुसरे असे की पाच सात वर्षांत जन्माला आलेल्या संघटना समाजाला शिकवायला निघाल्या कि समाजाने तारखे प्रमाणे साजरी करावी.
म्हणून, यांना समाजाचे प्रगतीची चिंता असेल तर अनेक मार्ग आहेत परंतु यांना त्यांच्याशी काही देणे घेणे नाही फक्त दरवर्षी संत सेना महाराज यांचे भांडवल करायचे एवढेच काम दिसून येते.8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
संत आणि महापुरुष यातील फरक ज्यांना कळत नाही ते समाजाचा व सेना महाराज यांचा इतिहास बदलायला निघाले. नाभिक समाज बांधव गेल्या पन्नास ते शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून पिढीजात परंपरेने तिथीनुसार पुण्यतिथीला अन्नदान करतात भजन कीर्तन करतात हे या लोकांना माहीत नाही का? माहित जर नसेल तर हे समाजाचे नाहीच असे समाजावे लागेल.
एका ही संतांची पुण्यतिथी किंवा जन्म उत्सव तारखे प्रमाणे साजरा होत नाही तर त्या तिथीनुसारच साज-या केल्या जातात. आम्हाला हसू येते जास्तीत जास्त संघटनांचे एकमत आहे कि परंपरे नुसार तिथीवर संतांचे उत्सव साजरे व्हावे.
परंतु एकमेव एक संघटना अशी आहे कि ती दरवर्षी काहीतरी पत्रक टाकून समाजात तेढ निर्माण करत आहे. नाभिक समाज सुज्ञ आहे त्यामुळे महाराजांची जयंती व पुण्यतिथी कधी करायची हे समाजाला शिकवायची गरज नाही असे आमचे मत आहे.
प्रत्येक समाज बांधव आप आपल्या परिने गावोगावी किंवा घरी पुण्यतिथी तिथीनुसार साजरी करतात. हे सांगण्याची गरज नाही. संत सेना महाराज वारकरी सेवा संस्था ही संघटना नसून संत सेना महाराज यांची वारकरी परंपरा व त्यांचे कार्य आठवणीत ठेवण्याचे कार्य करणारी संस्था आहे.
त्यामुळे या संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येते की दोन पाच वर्षांत जन्माला आलेल्या संघटनांनी कृपया संत सेना महाराज यांचें भांडवल करून महाराजांचे चरित्र मलीन करण्याचे प्रयत्न करु नये.
तुम्ही जर खरच नाभीक समाजाचे हित पहाणा-या संघटना असतील तर हा विषय इथेच थांबवून पिढीजात परंपरेने चालू असलेल्या तिथीनुसार जयंती व पुण्यतिथी साजरी करावी. नावासाठी समाजाचे व महाराजांचे भांडवल बनवू नये.
तसेच पुण्यतिथी आणि स्मृतिदिन यातील फरक व संत आणि क्रांतिकारी यातील फरक काय आहे हे काही संघटनांना जाणकारांकडून समजून घेणे गरजेचे आहे. संत सेना महाराज वारकरी सेवा संस्था, छत्रपती संभाजीनगर.8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
ह भ प भागवताचार्य दिलीप महाराज झगडे यांच संत सेना महाराज जयंती संदर्भात विचार पहाण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈 👈
राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे मा श्री संजय पंडित यांचे मत
श्री संत सेनाजी महाराज जयंती संभ्रम आणि वास्तव :- ✍प्राचीन काळापासून म्हणजेच इसवीसनाच्याही पूर्वीपासून आपल्या देशात “तिथी” हेच हिंदू कालगणनेचे एक परिमाण होते.
म्हणूनच आजही देशभर आपल्या दैवतांच्या,संत महंतांच्या जयंती अथवा पुण्यतिथी तिथी नुसार साजऱ्या केल्या जातात. या कालमापणात सरासरी एका चांद्रमासात ३० तिथी येतात.8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
अमावास्यान्त म्हणजेच अमावस्या नंतरच्या पद्धतीप्रमाणे शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होय. आणि पौर्णिमे नंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष होय.
अशा या दोन पक्षांचा (पंधरवड्यांचा) एक मास (महिना) होतो. शुक्ल पक्षाला शुद्धपक्ष आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष असेही म्हणतात. उत्तर भारतात पौर्णिमान्त महिन्यातला कृष्णपक्ष आधी येतो आणि मग शुक्लपक्ष येतो म्हणून त्यांच्या आणि आपल्या तिथित पंधरा दिवसांचा फरक आहे पण दोन्ही पद्धतीत शुक्ल पक्ष एकाच काळात असतात.
या दोन्ही पक्षांतील फरकामुळे उत्तर भारतीय पंचांगातील तिथी आणि आमच्या पांचांगातील तिथी यात पंधरा दिवसाचा फरक आढळतो.
थोडक्यात सांगायचे झाल्यास यावर्षीची श्री संत सेना महाराज जयंती मध्य प्रदेश पांचांगा प्रमाणे वैशाख कृष्ण द्वादशी ही तिथी आहे, तर आपल्या राज्यातील पंचांगा प्रमाणे तिथी चैत्र कृष्ण द्वादशी ही आहे.दोन्ही तिथी एकच असून मराठी महिना जरी वेगळा असला तरी इग्रजी कॅलेंडर मधील तारीख मात्र १७ एप्रिल हीच आहे.
देशात सर्वत्र याच १७ एप्रिलला श्री.संत सैनाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना आपल्याकडे संभ्रम का आहे,याचे कारण मात्र कळत नाही.
आपलेच काही बांधव आणि संघटना ८ एप्रिल हीच खरी सेना महाराज जयंतीची तारीख असा दावा करताना दिसत आहेत. मी स्वतः मध्यप्रदेशातील अगदी बांधवगड या महाराजांच्या जन्म स्थानापासून इतरही राज्यात संपर्क केला असता मला ८ मार्च या तारखीची कुठंही पुष्टी मिळाली नाही.
पुरातन काळापासून ते आज पर्यंत देवी देवतांच्या आणि थोर संत महंतांच्या जयंती अथवा पुण्यतिथी हिंदू पंचांगातील तिथी प्रमाणे साजरे करण्यास विशेष महत्व सांगण्यात आले आहे.
बांधवांनो,आजही जनमानसात आपला समाज सर्वात हुशार गणला जातो, जर सगळीकडून १७ एप्रिल याच तारखेला असणाऱ्या तिथी बद्दल सांगण्यात येत आहे तर माझी आपल्या नाभिक समाजातील तमाम कार्यकर्त्यांना आणि संघटनांना नम्र विनंती आहे की,आपण डोळस भक्तीने आपल्या आरध्याच्या जयंती बाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
सर्व संघटनांनी आणि मान्यवर समाज कार्यकर्त्यांनी एकविचाराने निर्णय घेऊन निदान या वर्षापासून तरी सेना महाराजांची जयंती एकाचं दिवशी म्हणजेच १७ एप्रिल रोजी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा आणि इतर समाजाला आमच्या नाभिक समाजाच्या एकतेचे आणि योग्यतेचे दर्शन घडवावे ही एकमेव अपेक्षा.8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
धन्यवाद जय श्री संत सेना महाराज आपलाच,संजय पंडित.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष मा श्री संपत सवने यांच मत
🌹 जय संतसेना 🌹ज्यांना राष्ट्र संतसेना महाराज यांची जयंती तिथी प्रमाणे साजरा करायची नसेल त्यांनी आपल्या पुर्वज्यांचे पित्र व जयंती अशीच तारिख काढुन साजरी करावी . त्यांना कोणताही अधिकार नाही घरी एक व बाहेर दुसरे करण्याचा
महाराजांचा जन्म बांधवगड मध्यप्रदेश येथे झालेला आहे हे जर सर्वांना मान्य आहे. तर मग त्या ठिकाणी ज्या दिवशी साजरी करण्यात येते त्याच दिवशी आपल्या ईकड साजरी करावी लागेल ती तिथी 17 एप्रिल 2023 रोजी येते
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समकालीन संत सेना महाराज होते व त्यांनी मध्यप्रदेश. महाराष्ट्र. गुजरात. पंजाब. हरयाणा अशा राज्यात जाऊन भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन समाज प्रबोधन केले. अशा ह्या महान संतांच्या जयंती व पुण्यतिथी मध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला नाही व करुही नये .8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
आपल्याही समाजात अनेक किर्तनकार महाराज व संतवांडमयसी निगडीत अनेक जन आहेत त्यांचा सल्ला घ्यावा समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत त्यासाठी संघटनांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे. संतांच्या तारखा बदलण्यात वेळ वाया घालवू नये
आपल्या एखाद्या नेत्याची जयंती सांगा ती आपण सर्वजण मिळून ती तारखेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर करु पण संतांची जयंती व पुण्यतिथी तिथी प्रमाणे राहुद्या
आपला संपत सवने जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ परभणी
नुकतेच बांधवगड ला जाऊन आलेले मा श्री विष्णूजी वखरे यांचे मत
सारे तिरथ बारबार,बांधवगड एक बार(नाभिक समाजासाठी)
खर म्हणजे संतांना, राजकीय नेते व महापुरुष यांना जाती मध्ये वाटून घेऊ नये हा विचार माझा पण आहे व आहेच. श्री संत सेनाजी महाराज यांचा जन्म ज्या बांधवगड मध्ये झाला त्या ठिकाणी आपण जाऊन त्या पावन भूमीचे दर्शनासाठी आम्ही गेली ३/४ वर्ष चर्चा/प्लॅंनिग करत होतो तसेच ईतर काहीशी चर्चा करत होतो त्यांनी त्यांच्या परीने बरीच फेक माहिती दिली होती.
प्रत्यक्ष आम्ही जाऊन आलोत व आमचा अनुभव मीडियाच्या माध्यमातून सांगितला व आवाहन केले “चलो बांधवगड” तिथी प्रमाणे १७ एप्रिल २०२३ ला आपण जयंती प्रथम तेथे साजरी करूयात व त्या नंतर पुढील वर्षी बांधवगड प्रमाणे महाराष्ट्र मध्ये पण साजरी करूयात.
पण वाद घालत नाही तो नाभिक कसला त्यात ही लगेच स्पर्धा चालू झाली,कोणीतरी तारखा जाहीर केल्या,नेते,संघटना यांची नावे टाकून,पण आता पर्यंत ज्यांची नावे टाकली ते “बांधवगड” येथे गेलेच नाही हे १००% खरं आहे.8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
पण महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सरचिटणीस श्री दिलीपजी अनर्थे यांच्या सह श्री सुनीलजी पोपळे,श्री विष्णुजी वखरे, श्री सुधाकरजी आहेर व श्री बाबासाहेब जगताप हे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आले.
व त्यांनी खरी परिस्थिती महाराष्ट्र मधील नाभिक समाजा समोर व्हाट्सप च्या माध्यमातून/फेसबुक च्या माध्यमातून समोर आणली. बांधवगड येथे १७ एप्रिल २०२३ रोजी श्री संत सेनाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे.
त्या प्रमाणे महाराष्ट्र मध्ये पण त्यांची जयंती साजरी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
महाराष्ट्र मध्ये श्री संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी होत आहे त्याच प्रमाणे जयंती उत्सव पण साजरा व्हायला हवा हीच सर्व नाभिक समाज बांधवांसाठी विनम्र आवाहन.
श्री संत सेनाजी महाराज जयंती ही तिथी प्रमाणे(बांधवगड) १७ एप्रिल २०१७ रोजी येत आहे त्या प्रमाणे साजरी करावी.
बांधवगड संदर्भात विष्णू जी वखरे यांचे विचार पहाण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
विष्णु वखरे
महाराष्ट्र नाभिक महामंडळ,विभागीय अध्यक्ष,मराठवाडा विभाग.मो.९४२३४५४६८३
मा श्री कल्याण दळे साहेबांचे मत , जाहीर खुलासा
जाहीर खुलासा मी कल्याण हरीश्चंद्र दळे प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई जाहिर खुलासा करतो की, दिनांक २७/०२/२०२३ रोजी सोशल मिडीया —-व्हाट्स एप ग्रुप तसेच फेसबुकच्या माध्यमातुन कोणीतरी खोडसाळ वृत्ती असलेल्या व्यक्तीने माझ्या नावाने एक पोस्ट टाकुन त्यामध्ये स्पष्ट लिहीले की संत सेना महाराज यांची जयंती बांधवगड प्रमाणे म्हणजेच १७ एप्रील २०२३ रोजी साजरी करावी वास्तविक दृष्ट्या या बाबत मी कोणासोबतही अशा प्रकारची चर्चा केलेली नाही.
संत सेना महाराज जयंती संदर्भाबाबत काही लोकांसोबत संवाद साधला असतांना त्यांना स्पष्ट शब्दात सांगीतले की अभ्यासु, तज्ञ व विचारवंतासोबत चर्चा करुन तारखे बाबत लेखी पुरावा मिळत असल्यास निर्णय घेता येईल.8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
मध्यप्रदेशचे पंचांग आणी महाराष्ट्राचे पंचांग यात फरक आहे त्यांचा वैशाख महिणा आपल्या अगोदर सुरु होतो तेव्हा पुराव्या अभावी संत सेना महाराज जयंती साजरी करणे संयुक्तीक ठरणार नाही.
सबब ज्याणे कोणी खोडसाळ पणाकरुन माझे नावाने पोस्ट टाकली असेल त्याचे विरुद्ध सायबर गुन्ह्याची नोंद केली जाईल आणि या गुन्ह्याला तो स्वतः वैयक्तीक जबाबदार राहिल.
माझी नाभिक समाजातील प्रत्येक बांधवास विनंती आहे की, संत सेनाजी महाराज यांच्या जयंती कोणत्या तारखेला व्हावी याबाबत खुलासा करण्यासाठी इतिहासकार, संशोधक, लेखक तथा तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच समाजातील विविध संघटनेला विश्वासात घेऊन एक समिति तयार करण्यात येत आहे.
या समिति मधे समाजाच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लोकांचा समावेश राहिल. या समितीच्या माध्यमातून अभ्यास पूर्वक व पुरावे सादर केल्या नंतर जी तारीख दिल्या जाईल.
त्या तारखेचा खुलासा केंद्र व राज्य शासनाकडे सुद्धा केला जाईल. केंद्र व राज्य शासनाकड़ून तारीख निच्छित करून जाहिर केल्या नंतर त्याच तारखे नुसार जयंती साजरी करण्यात येईल अशे आपणास आश्वासन देतो.8th March Invalid, Bandhavgad same birth anniversary
आपलाच –
कल्याण हरिश्चंद्र दळे
अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई.
अखिल भारतीय जिवा सेना फक्त 8 मार्च रोजी संत सेना महाराज जयंती साजरी करा म्हणून आव्हान करत आहे पण 8 मार्च चा कोणताही पुरावा नाभिक समाजासमोर मांडत नाही.
नाभिक सेवा संघाने मात्र 8 मार्च संत सेना महाराज जयंती चा खुलासा करावा असे पत्र जाहीर केले आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇
मा श्री माधव भाले यांचा जाहीर खुलासा, जाहीर खुलासा
मी माधव भाले, नाभिक सेवा संघ महाराष्ट्र, संस्थापक अध्यक्ष, जिवाजी महाले चौक, छत्रपती संभाजीनगर.जाहिर खुलासा करतो की दिनांक २७/०२/२०२३ रोजी सोशल मीडियावर व्हाट्सअप, फेसबुकवर मा श्री कल्याण दळे साहेबांच्या परवानगी विना १७ एप्रिल २०२३ रोजी बांधवगड प्रमाणे संत सेना महाराज जयंती साजरी करावी अशी मी पोस्ट व्हायरल केली.
🎯 पोस्ट टाकण्याचा उद्देश
♦ मागील चार पाच वर्षांपासून महाराष्ट्रा संत सेना महाराज जयंती आणि पुण्यतिथी वरुन जो गोंधळ चालु आहे तो कोठेतरी थांबला पाहिजे
♦ संत सेना महाराज जयंती पुण्यतिथी वर राज्यपातळीवर बैठक घेऊन निर्णय झाला पाहिजे व त्या निर्णयाने संत सेना महाराज जयंती पुण्यतिथी साजरी झाली पाहिजे हा उद्देश होता
🎯 दळे साहेबांचीच पोस्ट का?
संत सेना महाराज जयंती पुण्यतिथी या महत्वाच्या विषयावर , राज्यपातळीवर फक्त मा श्री कल्याण दळे साहेबाच समिती नेमु शकतात,निर्णय घेऊ शकतात हे मला माहीत होते.त्यांनी बैठक लवकरात लवकर लाऊन हा गोंधळ संपवावा म्हणून म्हणून मी पोस्ट व्हायरल केली
🎯 पोस्ट टाकण्याचा उद्देश सफल
काल काल्यान दळे साहेबांची पोस्ट वाचली आणि समजलं की मा श्री कल्याण दळे साहेबांनी संत सेना महाराज जयंती संदर्भात अभ्यासु,तज्ञ,विचारवंतांची , विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक समिती तयार करून ती समीती निर्णय घेईल.हे वाचले आणि मी पोस्ट केल्याचे समाधान झाले.
♦ हा तिसरा गुन्हा
- मला आनंद आहे की मा श्री कल्याण दळे साहेब माझ्यावर गुन्हा दाखल करणार आहेत कारण
- या आगोदर दळे साहेबांच्या आदेशाने औरंगाबाद -नगर रास्तारोको त वाळुज MIDC पोलिस ठाण्यात एक आणि
- जिल्हाधिकारी कार्यालयात केस फेकण्याचा दुसरा गुन्हा आधीच दाखल आहे
आपलाच-
माधव भाले
संस्थापक अध्यक्ष
नाभिक सेवा संघ महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर
ह.भ.प.अजीत महाराज खंडागळे
तुमच्या या विचारांवर आमचा आक्षेप नाही पण…
तुमचे विचार तुकोबारायांच्या नावावर खपवावे लागतात याचेच फार दु:ख वाटते.या विचारातच दम नाही,असे स्वतः स वाटल्याने कदाचित तुकोबांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचे धारिष्ट्य तुम्ही दाखवले आहे.तुकोबांची गाथा वाचली असेल तर त्यात हा अभंग नाही,हे आपल्या लक्षात येवू शकते
तुकोबांचे अभंग चोरणारा सालोमालो तुकोबांच्या चरित्रात येतो,तसा तुकोबांच्या नावावर आपले काव्य खपवणारा दुसरा सालोमालो जन्माला येऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच !!
ह.भ.प.अजीत महाराज खंडागळे