Jivaji mahale Parakram नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध मावळ्यांपैकी शूरवीर जिवाजी महाले या मावळ्या बद्दल आणि त्यांच्या पराक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत . तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतरांना जरूर शेअर करा. Jivaji mahale Parakram
या पोस्ट मध्ये आपण खालील माहिती घेणार आहोत
- जिवाजी महाले यांच्या विषयी
- प्रतापगडावरील पराक्रम
- “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी “ हि म्हण कशी पडली?
- शिवप्रताप दिन का साजरा केला जातो?
- प्रतापगडावरील जिवाजी बुरुज .
- जिवाजी महाले नेमके कोण होते?
- प्रतापगड येथील जिवाजी महाले स्मारक.
तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतरांना जरूर शेअर करा.
जिवाजी महाले यांच्या विषयी माहिती
छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक शूरवीर जिवाजी महाले यांचा जन्म गाव कोंडवली, तालुका वाई ,जिल्हा सातारा येथे नऊ ऑक्टोबर 1935 रोजी नाभिक समाजाच्या कुटूंबात झाला.Jivaji mahale Parakram
शूरवीर जिवाजी महाले हे पैलवान होते तसेच तलवारबाजी ,घोडेसवारी, निशानेबाजी गुप्तहेरी याबरोबरच ते दांडपट्टा चालवण्यात एवढे तरबेज होते की पंधरा फुटावरील शत्रूची गर्दन उडून क्षणात पुन्हा आपल्या जागेवर हजर होत असत. Jivaji mahale Parakram
दांडपट्ट्यामुळे ते आपल्या परिसरात चांगलेच औपरिचित झाले होते.एकदा वाई परिसरात रस्त्यावरुन लग्नाची वरात जात होती.या वरातीत जिवाजी महाले दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक दाखवत असताना व लोक प्रचंड दाद देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची नजर जिवाजी महाले यांच्या वर पडली.
हा भविष्यात स्वराज्यासाठी कामी येईल म्हणून महाराजांनी सोबत येतो का विचारले व घेऊन गेले.
प्रतापगडावरील पराक्रमामुळे अजरामर
प्रतापगडावर अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर गुपचूप वार करणार्या सय्यद बंडा चा हात वरचेवर कलम करून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचून स्वराज्यावरील संकट स्वतःवर घेणारे शूरवीर जिवाजी महाले इतिहासात “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” या महणीने आजरामर झाले. हा पराक्रम ज्या गडावर झाला त्या गडाला प्रतापगड असे नाव देण्यात आले.
शिवप्रताप दिन का साजरा करतात?
प्रतापगडावर अफजलखानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या दिवशी भेट झाली तो दिवस म्हणजे 10 नोव्हेंबर 1659. याच दिवशी प्रतापगडावर अफजलखानाचा वध झाला. अफजल खानाच्या वधामुळे स्वराज्यावरील खूप मोठे संकट टळले होते. Jivaji mahale Parakram
अफजलखानाचा वध आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा ज्या दिवशी घडला त्या दिवसाला शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा चालू झाली. शिवप्रताप दिन दरवर्षी दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो .
याच दिवशी शूरवीर जिवाजी महाले यांना पराक्रम करून इतिहासामध्ये अजरामर असे स्थान मिळाले. त्यांची कीर्ती “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” या म्हणीने अजरामर झाले.
प्रतापगडावरील जिवाजी बुरुज
अफजलखानाच्या वधानंतर ज्या ज्या मावळ्यांनी पराक्रम गाजवला होता . त्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य ते मानसन्मान देऊन त्यांना सन्मानित केले. पण जिवाजी महाले यांना महाराजांनी काहीच दिले नव्हते. तेव्हा महाराज जिवाजी महाले यांच्या खांद्यावर हात ठेवून सर्वांना उद्देशून पश्चिमेकडील टेहळणी बुरुजाकडे हात रोखून म्हणाले प्रतापगडाच्या या पश्चिम बुरुजाखालील तळावरच आम्ही खानाचा पराभव केला. याच बुरुजाच्या साक्षीने जिवाने आमचे प्राण वाचवले. म्हणून आज पासून या बुरुजाचे नाव टेहळणी बुरुज नसून जीवा महाला बुरुज असे समजण्यात यावे. आणि तेव्हापासून प्रतापगडावरील सर्वात उंच असलेला टेहळणी बुरुज जेथे आज भगवा झेंडा फडकतो. त्या बुरुजाला जीवाची बुरुज असे नाव देण्यात आले.
जिवाजी महाले कोण होते?
मित्रांनो प्रतापगडावरील पराक्रमावर अनेक पोवाडे,गाणे निघाले. चित्रपट निघाले. त्या पोवाड्यामध्ये जिवाजी महाले चा उल्लेख कधी जीवा डोंबाऱ्याचा तर कधी जिवा महाराचा असा उल्लेख आढळतो. परंतु इतिहासामध्ये कोठेही जिवाजी महाले हे डोंबारी समाजाचे किंवा महार समाजाचे म्हणून उल्लेख आढळत नाही. तसे पुरावे ही मिळत नाही तर इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक श्री हरीश ससनकर यांनी जिवाजी महाले नेमके कोणत्या समाजाचे? यावर संशोधन केले तेव्हा जिवाजी महाले हे फक्त आणि फक्त नाव्ही समाजाचे असल्याचे दिसून आले. तसेच जिवाजी महाले यांचे वंशज आजही सातारा जिल्ह्यामध्ये असल्याचे दिसून आले. यामुळे जिवाजी महाले हे फक्त न्हावी समाजाचे होते यावरून हे स्पष्ट झाले आहे.
जिवाजी महाले स्मारक प्रलंबित
प्रतापगड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तसेच नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व जिवाजी महाले यांची अतुलनीय कामगिरी समजावी म्हणून नाभिक समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे प्रतापगडावर जिवाजी महाले स्मारक व्हावे ही मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी जिवाजी महाले स्मारकाचा ठराव 2004 साली मंजूर केला. तसेच स्मारकाचे स्ट्रक्चर तयार केले. स्मारकासाठी निधी ठरवण्यात आला . परंतु आज 17 वर्ष उलटून गेले तरी प्रतापगडावर जिवाजी महाले स्मारकाचे साधे भूमिपूजनही झालेले नाही. जिवाजी महाले स्मारकाचे काम प्रलंबित असून ते तात्काळ चालू करावे अशी शिवप्रेमीची तसेच नाभिक समाजाची मागणी शासनाकडे वारंवार केली जात आहे. तरीही शासन या मागणीकडे दुर्लक्ष करून जिवाजी महाले स्मारक स्मारकाचे काम प्रलंबित ठेवले आहे.