Nabhik Samaj Melava Aurangabad
Nabhik Samaj Melava नमस्कार मित्रांनो दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी, औरंगाबाद येथे नाभिक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला दोन हजार पेक्षा जास्त नाभिक समाज बांधवांची उपस्थिती होती. या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून मा . ॲड .प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष)हे होते. Nabhik Samaj Melava
नाभिक समाजाला ॲड .प्रकाश आंबेडकर यांनी काय कानमंत्र दिला? काय मार्गदर्शन केले? याबद्दल या पोस्टमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. या मेळाव्याला सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, वाशिम, बीड, जालना सह औरंगाबाद येथील नाभिक समाज बांधवांची विशेष उपस्थिती होती. या मेळाव्यात नाभिक समाजाला मार्गदर्शन करताना ॲड .प्रकाश आंबेडकर म्हणाले की . Nabhik Samaj Melava
आपल्या कडील व्यवसायाचे मार्केटिंग करता आले पाहिजे
बलुतेदारापैकी एक असलेला समाज म्हणजे नाभिक समाज होय या समाजाकडे परंपरेचा जो व्यवसाय आहे दाढी कटिंग करण्याचा त्यात तो एकदम पारंगत आहे. तसेच तो शस्त्र चालवण्यात सुद्धा एकदम पारंगत आहे.त्याच्या कडे कला आहे कौशल्य आहे.पण काळानुसार तो आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करत नाही म्हणून तो मागे आहे. Nabhik Samaj Melava
आज ज्या लोकांकडे कला नाही, कौशल्य नाही अशी लोक पैशाच्या जोरावर , मार्केटिंग करून आलेतेदार, बलुतेदार यांच्या व्यवसायात घुसखोरी करत आहेत.त्यामुळे बलुतेदाराच्या हातुन त्यांचा व्यवसाय जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावर उपाय म्हणून नाभिक समाजाने काळानुसार बदलले पाहिजे.आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करुन ग्राहकांपर्यंत पोहोचता आले पाहिजे तरच नाभिकांचा व्यवसाय त्यांच्या हाती राहिल. Nabhik Samaj Melava
जिवाजी महाले यांनी आपल्या कडील शस्त्राचे लग्नाच्या वरातीत दाखवलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची निवड केली.
आता पेनाच राज्य चालते त्यामुळे शिक्षण घ्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तलवारी चे राज्य चालत होते.पेशवाईच्या काळात तलवारी काढून घेऊन पारंपारिक व्यवसाय आमच्या माथी मारला.तो आजही चालू आहे पण सध्या पेनाच राज्य चालु आहे.त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे.पण सध्या शिक्षणाचे खाजगीकरण चालू केले आहे.शिक्षण महाग केले आहे.यामुळे अनेकजण शिक्षणापासून वंचित राहत आहेत. “Nabhik Samaj Melava”
राज्य सरकारने अर्थसंकल्पाल शिक्षणासाठी दहा हजार कोटी ची तरतूद केली तर कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही.पण सरकारची तशी माणसिकताच नाही.हे बहुजनांनी लक्षात घ्यावे.
नाभिक समाजाने सत्तेत सहभागी व्हावे
समाजात बदल घडवायचा असेल तर शिक्षण घेतले पाहिजे नाहीतर सत्तेत सहभागी झाले सत्तेत सहभागी झाल्याशिवाय समाजाचे प्रश्न मिटणार नाहीत. समाजाचे प्रश्न सोडवणारे होण्यासाठी सत्तेत सहभाग असणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, प्रत्येक निवडणुकीत नाभिक समाजाने सहभाग घेतला पाहिजे. Nabhik Samaj Melava
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी बलुतेदारांपैकी एक असलेल्या नाभिक समाजाला ग्रामपंचायत पासून ते विधानसभेपर्यंत सर्व निवडणुकीमध्ये स्थान दिले आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार म्हणून सांगलीचे सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. अकोला येथील श्रावण भातखडे यांना सुकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच विविध ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषद मध्ये महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीने नाभिक समाजाला उमेदवारी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे नाभिक समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे.
घराणेशाही मोडीत काढून लोकशाही मजबूत केली पाहिजे
लोकशाहीमध्ये सत्तेत सर्वांचा सहभाग असतो. परंतु महाराष्ट्रात घराणेशाहीने लोकशाही खिळखिळी केली आहे. इतरांना सत्तेत वाटा भेटू नये म्हणून घरेनेशही मजबूत केली जात आहे. हे लोकशाहीसाठी बाधक आहे. यासाठी वंचित बहुजन समाजाने सत्तेत सहभागी झाले पाहिजे तरच घराणेशाही मोडीत निघेल. Nabhik Samaj Melava
घराणेशाही मधून निवडून गेलेला व्यक्ती वंचित घटकाची प्रगती करत नाही. तर तो आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीसाठी काम करतो. राज सत्तेमध्ये भ्रष्टाचार करतो. ही गोष्ट लोकशाहीसाठी बाधक आहे. त्यामुळे वंचित घटकांनी सत्तेत सहभाग घ्यावा. वंचित घटकाच्या पाठीमागे वंचित समाजाने भक्कमपणे उभे राहावे. तरच घराणेशाही संपुष्टात येईल.
वंचित बहुजन समाजाने वंचित बहुजन पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे. कारण वंचित बहुजन पक्ष हाच एकमेव असा पक्ष आहे. की या पक्षाने बलुतेदार आलूतेदार यांना सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वंचित समाजाने वंचित बहुजन पक्षाच्या सोबत भक्कमपणे उभे राहावे असे एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती
या मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह कोल्हापूरचे सयाजी झुंजार, सांगलीचे सोमनाथ साळुंखे, जालन्याचे सेनाजी काळे, अकोल्याचे श्रावण भातखडे, वाशिमचे हरिहर पळसकर, औरंगाबादचे वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नाभिक समाजातील विविध संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते. याबरोबरच सकल नाभिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.