वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी व नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या 723 व्या जयंती निमित्त महाराष्ट्रातून नाभिक समाज बांधव संत सेना महाराज जन्मस्थळ, बांधवगड (मध्यप्रदेश) ला जानार असून तेथे विविध 12 राज्यातील नाभिक समाज बांधव उपस्थित राहणार आहे .
तसेच मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ऐतिहासिक संत सेना महाराज स्मारकाचे भूमिपूजन करण्याची बातमी मध्यप्रदेश नाभिक समाजाच्या कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे. Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad
चला तर संत सेना महाराज जयंती निमित्त काढण्यात येनार्या ध्वजयात्रा बद्दल, बांधवगड बद्दल आणि तेथे होणाऱ्या कार्यक्रमा बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad संत सेना महाराज जयंती बांधवगड
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड येथे, विक्रम संवत 1357 , वैशाख कृष्ण 12 या तिथीला झाला असून ही तिथी यावर्षी 17 एप्रिल 2023 रोजी येत आहे.Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad
या दिवशी संत सेना महाराज जन्मस्थळ बांधवगड (मध्यप्रदेश) येथे विविध 12 राजकीय नाभिक बांधव उपस्थित राहणार असल्याचे ऑल इंडिया सेन जी महासंघ नयी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री राजेन्द्र सेन रज्जू यांनी सांगितले आहे. दरवर्षी बांधवगड येथे संत सेना महाराज जयंती साजरी करण्यासाठी शासनाच्या वतीने ठराविक निधी उमरिया जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिला जातो.
कोरोना आजारामुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेला संत सेना महाराज जयंती कार्यक्रम यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
महाराष्ट्रात संत सेना महाराज जयंती बांधवगड प्रमाणे चैत्र कृष्ण 12 ला
मध्यप्रदेश मध्ये जेव्हा वैशाख महिना असतो तेव्हा महाराष्ट्रात चैत्र महिना चालू असतो.17 एप्रिल रोजी बांधवगड मध्यप्रदेश येथे वैशाख कृष्ण 12 आहे तर महाराष्ट्रात 17 एप्रिल रोजी चैत्र कृष्ण 12 आहे. Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad
👆 मध्यप्रदेश व महाराष्ट्र दिनदर्शिका 2023 👆
संत सेना महाराज यांचा जन्म बांधवगड मध्यप्रदेश मध्ये झाला आहे .म्हणून ज्या दिवशी बांधवगड मध्यप्रदेश मध्ये संत सेना महाराज जयंती साजरी होते त्याच दिवशी संपूर्ण भारतात संत सेना महाराज जयंती साजरी होते.Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad
इतर राज्यात कोनती तिथी येते त्याला महत्त्व नसते जन्मस्थळी ज्या दिवशी जयंती साजरी होते त्याच दिवशी सर्वत्र साजरी होते म्हणून महाराष्ट्रात 17 एप्रिल 2023 या दिवशी चैत्र कृष्ण 12 ला संत सेना महाराज जयंती साजरी करावी असे सैनाचार्य आचलनानंदजी महाराज यांनी सांगितले.
संत सेना महाराज जयंती संदर्भात अधिक माहितीसाठी
आसेच उदाहरण महाराष्ट्रात जन्मलेल्या संत नामदेव महाराज यांच्या जयंती चे आहे ज्या दिवशी महाराष्ट्रात संत नामदेव महाराज जयंती साजरी होते त्याच दिवशी संपूर्ण भारतात नामदेव महाराज जयंती साजरी होते. तिकडे (उत्तर भारतात) महाराष्ट्रातील तिथी नसते.’Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad”
बांधवगड राष्ट्रीय उद्यान Bandhavgarh National park
बांधवगड या ठिकाणी संत सेना महाराज ज्या राजाची दाढी कटिंग करत होते त्या राजाचा राजवाडा होता.आता तो भग्न अवस्थेत असुन तो भाग आता मध्यप्रदेश सरकारने पांढर्या वाघांसाठी राखीव जंगल म्हणून जाहीर केले आहे.
भारतातील सर्वात जास्त पांढर्या वाघाची संख्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानात असुन तेथे विविध प्राणी पक्षी पहाण्यासाठी विविध राज्यांतून पर्यटक येत असतात.तेथे जाण्यासाठी आगोदर ऑनलाईन/ऑफलाईन नोंदणी करावी लागते.तेथील सुरक्षित जिप्सी च्या माध्यमातून सरक्षणासह बांधवगड जंगलात ठराविक वेळेत प्रवेश मिळतो.त्यासाठी परवानगी आवश्यक असते. बांधवगडवर Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad
- संत कबीर यांची समाधी
- संत सेना महाराज समाधी.
- भगवान विष्णू ची मुर्ती आहे.
कबीर पंथी संत कबीर जयंती निमित्त बांधवगड येथे कार्यक्रमाच आयोजन करत असतात.तसेच कृष्ण जन्माष्टमी निमित्त तेथे भगवान विष्णू च्या 63 फुट मुर्ती जवळ भाविक जात असतात.तर संत सेना महाराज जयंती निमित्त नाभिक समाजाच्या वतीने जयंती साजरी केली जाते.
मुख्यमंत्र्यांनी स्मारकासाठी निधी मंजूर
मध्यप्रदेश चे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध असलेले मा श्री शिवराज सिंह चौहान यांनी संत सेना महाराज यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर केला असुन अडिच एकर जमीन दिली असल्याचे त्यांनी खुद्द जाहीर केले आहे. Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad
अडिच एकर क्षेत्रावर फक्त संत सेना महाराज यांच्या स्मारका बरोबर गुरू रामानंदाचार्यांचे यांच्या बाराही शिष्याची स्मारक तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच तेथे लवकरच संत सेना महाराज चौकात मुर्ती स्थापना करण्यात येणार आहे.
संत सेना महाराज जयंती निमित्त भुमिपूजन
मध्यप्रदेश केश कला बोर्ड चे अध्यक्ष मा श्री नरेंद्र वर्मा आणि त्यांची टीम नुकतेच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना भेटले असुन संत सेना महाराज जयंती दिनी म्हणजे 17 एप्रिल 2023 रोजी संत सेना महाराज स्मारकाचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे.Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad
त्यामुळे यावर्षी विविध राज्यांतील नाभिक समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातुन संत सेना ध्वजयात्रा बांधवगड ला जात आहे.
ज्या बांधवांना संत सेना महाराज जयंती निमित्त बांधगड येथे यायचे आहे त्यांनी दोन महिने अगोदर रेल्वे तिकीट बुक करण्याचे आवाहन संत सेना ध्वजयात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.नागपूर , पुणे आणि मराठवाडा आशा तीन ठिकानावरुन 150 ध्वजयात्री जानार आहेत.
नाभिक वार्ता मासिकाचे बांधवगड येथे प्रकाशन
संत सेना महाराज जयंती निमित्त म्हणजे च 17 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातील नाभिक वार्ता मासिकाचे प्रकाशन बांधवगड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
नाभिक वार्ता मासिक- महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे माजी अध्यक्ष स्व.शशीकांतजी चव्हाण व माजी कार्यध्यक्ष स्व.वामनराव देसाई (आप्पा) यांचे योगदान महाराष्ट्रातील नाभिक समाज कधीही विसरणार नाही.
त्यांनीच चालू केलेलं “नाभिक वार्ता” हे मासिक पुढे पुन्हा चालू रहावे असे मा.दत्ताजी अनारसे,(प्रांत अध्यक्ष,महाराष्ट्र नाभिक महामंडळ)तसेच श्री रामदासजी पवार (प्रांत उपाध्यक्ष,महाराष्ट्र नाभिक महामंडळ) संपादक श्री सुनीलजी पोपळे,(संघटक प्रमुख,महाराष्ट्र नाभिक महामंडळ)यांच्या परिश्रमातून पुन्हा नाभिक समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी हे मासिक चालू करत आहेत.
त्या बद्दल धन्यवाद,पण मासिक असो किव्हा वर्तमान पत्र त्यात आपण आर्थिक सहकार्य महत्वाचे आहे,तरी आपण सर्व नाभिक समाज श्री संत सेनाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र मधील जवळपास ८० ते ९० समाजातील कार्य करणारे कार्यकर्ते जात आहेत.Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad
तसेच देशातील विविध राज्यातील प्रतिनिधी येणार आहेत त्यांच्या साक्षीने प्रकाशन सोहळा होणार आहे,तरी आपले पण योगदान या मासिकास हवे आहे.असे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णूजी वखरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातून संत सेना ध्वज यात्रा बांधवगड येथे
17 एप्रिल 2023 रोजी संत सेना महाराज जयंती निमित्त संत सेना महाराज जन्मस्थळी महाराष्ट्रातील तीन विभागातून म्हणजे
- मराठवाड्यातून -50 जन
- विदर्भातील -40 जन
- पश्चिम महाराष्ट्र पूणे -60 जन
महाराष्ट्रातून ध्वज घेऊन जानार आहेत.यात संत सेना महाराज जयंती निमित्त ज्यांना बांधवगड मध्यप्रदेश ला ट्रेन ने पुणे, मुंबई नाशिक औरंगाबाद येथून यायचे आहे त्यांनी कटणी किंवा उमरिया येथे उतरून बांधवगड ला 17 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता बांधवगड गेट वर उपस्थित राहावे. Sant Sena Maharaj jayanti Bandhavgad
जेनेकरुन सर्वांना एकाच वेळी एकत्र संत सेना महाराज समाधी स्थळापर्यंत जाता येईल.दर्शन घेता येईल.
जय संत सेना 🙏 धन्यवाद