नाभिक समाजाची बलुतेदारीतून मुक्तता करण्यासाठी “काम तेथे दाम” ही पद्धत चालू करुन बलुतेदारी बंद करनारे समाजभूषण हणमंतराव साळुंखे यांच्या कार्याची माहिती आज आपण घेणार आहोत.
Samajbhushan Hanmantrao Salunkhe
एक एप्रिल रोजी समाजभूषण हणमंतराव साळुंखे यांची 94 व्या जयंती निमित्त त्यांनी केलेल्या प्रेरणादायी कार्याची ओळख नवीन पिढीला व्हावी. Samajbhushan Hanmantrao Salunkhe
त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून समाजाने वाटचाल करुन आपला व आपल्या समाजाचा विकास साधावा यासाठी ही खास माहिती देत आहोत.
विखुरलेल्या नाभिक समाजाला एकसंघ
गावागणीस एक दोन घरे असलेला नाभिक समाज परंपरेने दाढी कटिंग चा व्यवसाय करुन बलुतेदारीवर आपली गुजराण करत होता.अल्पसंख्यांक असलेल्या नाभिक समाजाकडे ना सरकारचे लक्ष होते, ना सरकरी योजनांच्या लाभापासून कोसो दूर होता.
वर्षभर दाढी कटिंग चा व्यवसाय करायचा आणि बलुतेदारीत जे काही (गोंडर) मिळे ते निमुटपणे घेऊन गुजरान करत होता.गावात एक दोन च घरे असल्याने अनेकांच्या दबावाखाली जीवन जगत होता.Samajbhushan Hanmantrao Salunkhe
शेतकर्याप्रमाणे यांचेही जीवन निसर्गावर अवलंबून होते.निसर्गाने साथ दिली तर शेतकरी, शेतमजूर बलुत देत असत नसता पुढच्या वर्षी म्हणून सांगत असत.आस बेभरवशाच जीवन खेड्यापाड्यात राहणारा नाभिक समाज जगत होता.या समाजाला एकसंघ करण्यासाठी सातारा जिल्ह्यात एका समाजसुधारकाने जन्म घेतला.
अधिक माहितीसाठी येथे
👉 क्लिक करा 👈
“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती..”
“जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविती परोपकारी” या संत वचनाप्रमाणे समाजभूषण हनुमंतराव साळुंखे (तात्या) यांनी आपले सारे आयुष्य समाजाच्या सेवेसाठी वाहिले होते .1 एप्रिल 1929 रोजी एका नाभिक गरीब कुटुंबात तात्यांचा जन्म झाला.
त्यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले, लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. अनाथ विद्यार्थीगृह पुणे, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे “कमवा व शिका” या योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले.
पण अंगात काहीतरी नवीन व वेगळे करण्याची तळमळ या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या मुख्याध्यापक नोकरीचा राजीनामा दिला.Samajbhushan Hanmantrao Salunkhe
हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना
माझ्या गावातील मुले शिकली पाहिजेत. सर्व सामान्यांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणप्रेमी नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने 1959 समाजभूषण हनुमंतराव साळुंखे यांनी “हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना” केली.
सुरवातीला छोट रोपट पण त्यांचे संवर्धन करुन त्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर केले.आज अखेर या विद्यालयात ७०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथून शिकून गेलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत.
तात्यांनी आपल्या घराकडे लक्ष न देता “गाव आणि शाळा हेच माझे कुटुंब”आहे.आशा शब्दातून पहिले गावाचा विकासाला महत्व दिले.Samajbhushan Hanmantrao Salunkhe
हणुमान नागरी पतसंस्था स्थापन
आपल्या भागातील शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणसाची सावकारी पाशातून मुक्तता व्हावी.त्याला आपल्या जमिनी,घरे विकण्याची वेळ येऊ नये.त्यांना गरजा भागविण्यासाठी अल्पदराने कर्ज मिळावे.Samajbhushan Hanmantrao Salunkhe
या विचाराने समाजभुषन हणमंतराव साळुंखे (तात्यांनी)यांनी 1986 साली कलेढोण येथे “हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची” स्थापना केली.या संस्थेचे 18 वर्षे अध्यक्ष म्हणून तात्यांनी काम पाहिले.आजही या पतसंस्थेचे कार्य प्रगतीपथावर आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना
आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचे आपल्यावर ऋण असते. आणि ते आपण फेडले पाहिजे. याचप्रमाणे समाजभूषण हनुमंत साळुंखे यांनी आणि सहकार्यांनी 1982 साली कोल्हापूर येथे नाभिक समाजाचे मोठ्या अधिवेशन आयोजित केले होते.
या अधिवेशनाला बिहारचे तत्कालीन “मुख्यमंत्री जननायक करपुर ठाकूर” हे विशेष आमंत्रित होते यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रात एक नाभिक समाजाचा संघटना असावं आणि त्या संघटनाच्या माध्यमातून नाभिक समाजाच्या आवाज हा शासन दरबारी पोहोचला पाहिजे.
म्हणून 1982 साली कोल्हापूर येथे कर्पूर ठाकूर यांच्या उपस्थितीत “महाराष्ट्र नाभिक महामंडळ” या नाभिक समाजाच्या संघटनेची स्थापना करण्यात आली.
समाज भूषण हनुमंतराव साळुंखे यांनी नाभिक समाजासाठी 35 वर्ष मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्ये भव्य परिषदा आयोजित करून नाभिक समाजाला संघटित केले.Samajbhushan Hanmantrao Salunkhe
त्यापैकी मुंबई शिर्डी येथील परिषदा अति भव्य होत्या त्या 2000 साली महाराष्ट्रातील नाभिक समाजाने अकरा लाखाची थैली तात्यांना देऊन सन्मानित केले.
परंतु तात्यांनी त्यात स्वतःचे अकरा हजार एकशे अकरा रुपये टाकून परत ती थैली नाभिक समाजासाठी वापस केली आणि त्या पैशातून पुणे येथे नाभिक समाजाच्या कार्यालयाची इमारत खरेदी केली.
बलुतेदारीतून समाजाची मुक्तता
दाढी कटिंग चा सलून व्यवसाय केल्यानंतर सलून चालकांना वर्षाकाठी मोबदला म्हणून “बलुत” दिलं जायचं हे “बलुत” अत्यंत दुय्यम प्रतीचे(गोंडर )असे.
गावात एक किंवा दोनच नावेचे घर असल्यामुळे त्यांच्यावर दबाव असे, निमुटपणे दिलेलं धान्य त्यांना स्वीकारावा लागत होतं. बऱ्याच वेळा दुष्काळ पाऊस कमी पडला तर शेतकऱ्याला उत्पन्न झालं नाही तर नाव्ही दादाला सुद्धा “बलुतं” तो दिल जात नसे.
म्हणजेच सलून चा व्यवसाय हा त्याकाळी निसर्गावर अवलंबून होता. या दृष्ट चक्रातून नाभिक समाजाला मुक्त करायची असेल तर त्याला “बलुतेदारीतून” बाहेर केलं पाहिजे.Samajbhushan Hanmantrao Salunkhe
यासाठी समाजभुषन हनुमंतराव साळुंखे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनी एक ठराव घेतला. आणि “काम तेथे दाम” ही पद्धत अवलंबून बलुतेदारीला कायमचा रामराम ठोकला.