मित्रांनो शिर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल असेल पण हि गोष्ट सत्य आहे.गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून चक्क नाभिक समाजातील सलून चालक निवडणूकीला उमेदवारी अर्ज भरला असून त्या उमेदवाराविषयी आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.ती पुढीलप्रमाणे आहे.Saloon driver to contest Lok Sabha elections
Saloon driver to contest Loksabha elections
मित्रांनो काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती.ती केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांची होती.त्या म्हणाल्या होत्या की, “मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही कारण माझ्या कडे पैसे नाहीत”. असेच विधान काही वर्षांपूर्वी समाजसेवक “अण्णा हजारे” यांनी पण केलं होतं. यावरून एक गोष्ट लक्षात येते की लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पैसा लागतो.Saloon driver to contest Lok Sabha elections
असे असते तर राज्यघटनेत तसं नमूद केले असते.पण तसी नोंद कोठेही नाही. उलट ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते राष्ट्रपती निवडणूकीत भारताचा कोणताही नागरिक सहभाग घेऊ शकतो.याच प्रमाणे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीत नाभिक समाजाचे सलून चालक बेनिरामजी फुलबांधे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आणि प्रचार पण चालू केला आहे.
लोकसभा उमेदवार सलून चालक
गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या निवडणुकीच्या रिंगणात 18 उमेदवार उतरले आहेत. यात उद्योगपती पासून डॉक्टर, वकील, सेवानिवृत्त कर्मचारी आधीचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात एक “नाभिक सलून चालक” मैदानात उतरला आहे. तोही आपले भाग्य आजमावत आहे.Saloon driver to contest Lok Sabha elections
लोकसभा मतदानासाठी आता जेमतेम बारा दिवसाचा कालावधी उरला आहे. त्यामळे उमेदवारांनी आता आपल्या प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे. मात्र दोन जिल्ह्याच्या समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघातील कित्येक मतदारांना निवडणुकीच्या रिंगणात नेमकं कोण कोण उतरला आहेत याबाबतच माहिती नसते.
यापैकी एक म्हणजे “बेनीराम रामचंद्र फुलबांदे” हे गोंदिया तालुक्यातील झरी गावातील “सलून व्यावसायिक” आहेत. “बेनीराम रामचंद्र फुलबांदे” हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. कोट्यावधीची संपत्ती असलेल्या उमेदवाराच्या विरोधात आता नाभिक समाजातील सलून चालक फुलबांधे उतरल्याने ते या निवडणुकीतील आकर्षक ठरले आहे.Saloon driver to contest Lok Sabha elections
18 उमेदवारांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील फक्त उमेदवार रिंगणात असून त्यात फुलबांधे यांचा समावेश आहे. यामुळे आशाता मतदार राजा त्यांच्यावर किती प्रसन्न होतो हे येणारा काळच दाखविणार आहे.
निवडणूक लढवण्याचे कारण
बेनीराम रामचंद्र फुल बांदे हे बारा बलुतेदारांपैकी एक असून सर्वसाधारण कुटुंबात जन्म झाल्याने उदरनिर्वाह व काटकसरीचे जीवन ते अनुभवतात त्यामुळे तळागळातील अशा विविध घटकांच्या भावना फक्त आणि फक्त फुलबांधे हेच समजू शकतात उमेदवार जे इंजिनियर डॉक्टर हे फक्त आणि फक्त आर्थिक उत्पन्न वाढीसाठी फक्त पंधरा दिवस सोंग घेऊन, समाजसेवेचे नाटक करतात व पाच वर्षे कमिशन वर लक्ष केंद्रित करतात. हे जनता जनार्दन झालो नाही म्हणून नाभिक सलून चालक बेनीराम रामचंद्र फुल बांदे यावर्षी लोकसभा निवडणूक लढवणार आहे.Saloon driver to contest Lok Sabha elections
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा
खासदारकी मिळाली तर
बेनीराम रामचंद्र फुल बांदे यांनी अपक्ष म्हणून गोंदिया भंडारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जर ते ही निवडणूक लढले तर काय करतील याबद्दल त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो पुढील प्रमाणे आहे
- देशाला व राज्याला कोट्यावधीच्या कर्जातून मुक्त करण्यासाठी मी खासदार मानधन, सर्व भत्ते, सर्व आरामदायी सुविधा व पेन्शनचा त्याग करेन. व मानधन शासनाकडे जमा करणार. फक्त निस्वार्थ समाजसेवेसाठी, क्षेत्राच्या विकासाची निधी आणून खासदारकीचा सदुपयोग करणार.
- ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी लढा देऊन प्रस्ताव मंजुरीस प्रयत्न करणार. ओबीसी सह एससी, एसटी मायनॉरिटी जातीचे आरक्षण वाचविण्यासाठी विधेयक आणणार.
- प्रत्येक कामगाराला केंद्र शासनाच्या श्रमिक कामगारात समावेश करून योजनेचे कवच देण्यासाठी प्रयत्न करणार.
- सलून व ब्युटी पार्लर तसेच पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदाराचाही समावेश श्रमिक कामगारात समावेश करून योजना पुरतीसाठी प्रयत्न करणार.Saloon driver to contest Lok Sabha elections
- शेतकऱ्यांना मोफत वीज देणार शेतकऱ्यांना शेतात गोडाऊन उभारणी करून देणार मागील त्याला बोरवेल योजना आणण्यासाठी प्रयत्न करणार.
- शेतकऱ्याच्या मालाची खरेदी गाव पातळीवरच स्वयंसेवक नेमून खरेदी केंद्रात व्हावी यासाठी प्रयत्न करणार.
- गाव तेथे ग्रंथालय सचिवालय उपकेंद्र दवाखाना उद्यान क्रीडांगण व्यायामशाळा समुपदेशन केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करणार.
- 100% अनुदानावर मागील त्याला पशुधन योजना लागू व्हावी शासकीय गाव पातळीवरील दुध डेअरी संकलन केंद्र पशुदावाखाना व्हावा यासाठी प्रयत्न करणार.
- ग्रामपंचायत द्वारे सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणार.
- शंभर व्यक्तीसाठी एक अशा सेविका सीआरपी रोजगार सेवक व 1000 व्यक्तीवर पर्यवेक्षक नियुक्त पदनिर्मितीसाठी प्रयत्न करणार.
- केंद्र शासनाचा बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी प्रयत्न करणार.
अशा पद्धतीचा विस कलमी जाहीरनामा सलून चालक बेनीराम फुलबांधे यांनी जाहीर केला आहे.
निवडणूक चिन्ह फलंदाज
गोंदिया भंडारा लोकसभा उमेदवार बेनीराम रामचंद्र फुल बांदे या सलून चालकाचे अपक्ष निवडणूक चिन्ह हे फलंदाज हे असून या चिन्हावर मतदान करण्याचे आव्हान सलून चालक बेनीराम फुलबांधे यांनी केले आहे.Saloon driver to contest Lok Sabha elections
बेनिराम फुलबांदे यांच्या कडे 50 हजार रोख रक्कम
लोकसभा उमेदवार बेनीराम रामचंद्र फुल बांदे यांनी सुद्धा निवडणूक अधिकाऱ्याला आपल्याकडील संपत्तीचे विवरण प्रतिज्ञापत्रांमध्ये दिले आहे त्यानुसार त्यांच्याकडे 50 हजार रुपये रोख असून त्यांच्या पत्नीकडे 25 हजार रुपये आहेत बँकेतील दोन खात्यात 90 हजार रुपये रोख असून पत्नीच्या खात्यात वीस हजार रुपये आहेत.Saloon driver to contest Lok Sabha elections
त्यांच्याकडे एक लाख आठ हजार रुपये किमतीची दुचाकी तर पत्नीकडे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोने आहे याशिवाय पाच लाख रुपये किमतीचे झिरो पॉईंट वीस एकर शेत जमीन तसेच चार लाख रुपये किमतीचे घर आहे असे वैयक्तिक मालमत्तेचे विवरण निवडणूक अधिकारी यांना फुलबांधे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी
गोंदिया भंडारा लोकसभेतील अपक्ष उमेदवार बेनीराम रामचंद्र फुल बांदे यांनी आपल्या झरी गावात ग्रामपंचायतची निवडणूक जिंकलेली असून ते जरी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे तसेच ते अपंग असून आपला पारंपारिक व्यवसाय सलून व्यवसाय सुद्धा ते करतात.Saloon driver to contest Lok Sabha elections
विविध संघटना समाजाचा पाठिंबा
गोंदिया भंडारा लोकसभेतील अपक्ष उमेदवार बेनीराम रामचंद्र फुलबांधे यांना भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून तसेच विविध समाजातील घटकांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे तसेच त्यांच्या प्रचारासाठी ते अहोरात्र झटत आहेत आता पाहूया की करोडपती उद्योगपती डॉक्टर इंजिनिअर सेवानिवृत्त अधिकारी यांच्यामध्ये एका सलून चालकाला आपले भविष्य आजमावण्यास जनता सहकार्य करती का आणि फलंदाज या चिन्हावर निवडणूक जिंकतात का हे पाहण्याची संबंध जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.Saloon driver to contest Lok Sabha elections