लोकसभा निवडणुकीच्या पुर्वसंध्येला (१२ मे २०२४ रोजी) बीड जिल्ह्यातील गंगामसला येथील सर्व सलून दुकानाची तोडफोड करण्यात आली .या गोष्टीचा निषेध म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी आपली सलून दुकान बंद ठेवली आहेत.
तर अज्ञात तोडफोड करणाऱ्या माथेफिरूला कठोर शिक्षा व्हावी म्हणून नाभिक समाजाच्या वतीने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रीतसरपणे तक्रार दाखल केली आहे.Salon shop vandalized in Beed district
Salon shop vandalized in Beed district
मागील सहा सात महिन्यांपासून बीड जिल्हा विविध कारणांनी चर्चेत असताना १२ मे च्या रात्री अज्ञात व्यक्तीने माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील सर्व सलून दुकानाची तोडफोड केली आहे.
फक्त तोडफोड करणाऱ्या आली असून चोरी करण्याचा त्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट झाले आहे.फक्त नुकसान करणे हाच उद्देश असल्याचे दिसून येत आहे.सदरील घटनेने पुन्हा जातिवाद होत असल्याचे स्पष्ट होत आहे.Salon shop vandalized in Beed district
गंगामसला येथील बसस्थानकावर एकूण चार सलून दुकान असून फक्त सलून दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे.इतर कोणत्याही दुकानाची तोडफोड करण्यात आली नाही. यावरून नाभिक समाजाला टार्गेट केल्याचे दिसून आले.
तोडफोडी मागे राजकारण?
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील सर्व सलून दुकानाची तोडफोड करण्यामागे राजकारण असल्याचे काही जणांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
अधीक माहितीसाठी खाली क्लिक करा
गंगामसला घटना
बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक असून ओबीसी नेत्या पंकजाताई मुंढे या या निवडणुकीत उभ्या आसून बीड जिल्ह्यातील नाभिक समाजाचे पंकजा मुंडे यांना जाहीर पाठिंबा आठ दिवसांपूर्वी दिला होता.तसे पत्र सोशल मीडियावर टाकण्यात आले होते.
त्यामुळे नाभिक समाज पंकजा मुंडे यांच्या व्यतिरिक्त इतर उमेदवारांना मतदान करनार नाही.या राजकीय द्वेषापाई अज्ञात माथेफिरूने सलून दुकानाची तोडफोड केल्याचे दिसून येते आहे.Salon shop vandalized in Beed district
काही दिवसांपूर्वी तुम्ही पंकजा मुंडे यांना मतदान न करता आमच्या उमेदवारांना मतदान करा म्हणून काही कार्यकर्त्यांनी सलून चालकांना दमदाटी केल्याचेही सांगितले जात आहे.
मा खासदार प्रितम मुंढे यांची भेट
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील सलून दुकानाची तोडफोड केल्याची बातमी वार्यासारखी संपूर्ण बीड जिल्ह्यात पसरली.ह्या घटनेची माहिती आमदार धनंजय मुंडे यांना माहीत होताच त्यांनी सलून चालकांची चौकशी केली.
तर माजी खासदार प्रितमताई मुंढे यांनी गंगामसला येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन सदरील घटनेची पाहणी केली.व तोडफोड करणारांना मोकळं सोडणार नाही.असे सांगितले.यावेळी चारही सलून चालक प्रदिप खटले, गजानन खटले, गणेश खटले, आणि अशोक खटले यांची भेट घेऊन धीर दिला.
बीड जिल्ह्यातील सर्व सलून बंद
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील सर्व सलून दुकानाची तोडफोड करण्यात आली.या गोष्टीचा नाभिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध म्हणून काल १३ मे रोजी संपुर्ण बीड जिल्ह्यातील संपूर्ण सलून दुकान बंद ठेवण्यात आली होती.
तसेच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तोडफोड करणार्या माथेफिरू विरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात आली.तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला.
व लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील असे आश्वासन दिले.सदरील घटना ही लोकशाही साठी घातक असून आशा घटना घडण लोकशाहीसाठी घातक आहेत.Salon shop vandalized in Beed district
पाठिंबा देने असंविधानीक
भारतात लोकशाही आहे.लोकशाहित सर्वांना मतदानाचा अधिकार आहे.मतदानाची पद्धत ही गुप्त आहे.तु कोणाला मतदान केले? असे कोणीही विचारु शकत नाही किंवा कोणाला जबरदस्ती करु शकत नाही.मतदान हे गुप्त ठेवले जाते.
मग नाभिक संघटनेने आमुक पक्षाला नाभिक समाजाचा जाहीर पाठिंबा देने कितपत योग्य आहे? हे संविधानाच्या विरोधात आहे.यामुळे वाद निर्माण होऊ शकतो व गरीब घटकांना याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.
नेमक हेच गंगामसला येथे घडले व नाभिक समाजाच्या सलून दुकानाची तोडफोड करण्यात आली.याला जबाबदार पाठिंबा देनारे पदाधिकारी आहेत असे मत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवी जाधव सवनेकरर यांनी व्यक्त केले.Salon shop vandalized in Beed district