इतर राज्यांप्रमाणे नाभिक समाजाने संत सेना महाराज यांचा मुळ फोटो वाफरावा.सध्या नाभिक समाज वाफरत असलेला संत सेना महाराज फोटो हा संत नामदेव महाराज यांचा आहे. संत सेना महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या फोटोत साम्य दिसत नाही. The original photo of Sant Sena Maharaj
बर्याच वेळा दोन्ही फोटोत संभ्रम निर्माण होतो.नाभिक समाजाच्या संत सेना महाराजांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी नाभिक समाजाने संत सेना महाराज यांचा मुळ फोटो वाफरात आनावा.जो संत सेना महाराज यांच्या जन्मस्थानी बांधवगड मध्य प्रदेश मध्ये वाफरला जातो. The original photo of Sant Sena Maharaj
The original photo of Sant Sena Maharaj
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या ठिकाणी अनेक जाती-धर्माचे संत होऊन गेले. त्या सर्व संतांची एक विशिष्ट ओळख आहे. परंतु “महाराष्ट्रात संत सेना महाराजांचा जो फोटो वापरला जातो तो 99% हा संत नामदेव महाराज यांचा आहे” तरी महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधवांनी आपल्या संताची, आपल्या समाजाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी संत सेना महाराज यांच्या जन्मस्थानी म्हणजेच “बांधवगड येथे जो फोटो वापरला जातो तोच फोटो वापरात आणावा” अशी विचारधारा नाभिक समाजातून पुढे येत आहे.
नाभिक समाजात विविध नाभिक संघटनाचा उदय होण्याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी संत सेना महाराजांचा मूळ फोटो म्हणजेच बांधवगड या ठिकाणी जो वापरला जातो तोच वापरात होता. परंतु संघटनेच्या उदयानंतर विविध संघटनेने संत सेना महाराजांचे विविध फोटो निर्माण केले. त्यामुळे नेमके संत सेना महाराजांचा फोटो कोणता? हा नाभिक समाजात संभ्रम निर्माण झालेला आहे.
तो संभ्रम दूर करायचा असेल तर नाभिक समाजाने “संत सेना महाराजांच्या जन्मस्थळी (बांधवगड मध्यप्रदेश)” मध्ये जो फोटो वापरला जातो. तोच फोटो वापरावा जेणेकरून संपूर्ण देशात एकच “संत सेना महाराजांचा” फोटो वापरला जाईल.The original photo of Sant Sena Maharaj
संत सेना की संत नामदेव संभ्रम
नाभिक समाजाच्या वतीने जेव्हा संत सेना महाराज जयंती किंवा पुण्यतिथी ला मिरवणूक काढण्यात येते तेव्हा बरेच जण संभ्रमात असतात की हे संत सेना महाराज आहेत की संत नामदेव महाराज आहेत.The original photo of Sant Sena Maharaj
कारण संत नामदेवाची प्रतिमा आणि संत सेना महाराजाची प्रतिमा ही 99% सारखीच आहे त्यामुळे दोन्ही संता बद्दल संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम दूर करायचा असेल तर नाभिक समाजाने संत सेना महाराजाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी संत सेना महाराजांच्या जन्मस्थळी जो फोटो वापरला जातो तो फोटो वापरात आणावा.
महाराष्ट्र शासनाने मुळ फोटो वापरला
2021 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धव ठाकरे असताना 26 जानेवारी निमित्त दिल्ली येथे महाराष्ट्राची संत परंपरा या चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते.The original photo of Sant Sena Maharaj
महाराष्ट्राची संत परंपरा या चित्ररथामध्ये संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत कान्होपात्रा संत सेना महाराज आशा विविध संतांची देखावे निर्माण केले होते आणि तो चित्ररथ 26 जानेवारी 2021 रोजी दिल्ली येथील परेडवर दाखवण्यात आला होता या चित्ररथामध्ये संत सेना महाराजांचा जो फोटो/मुर्ती वापरण्यात आला होता .तो फोटो हा बांधवगडच्या फोटोशी मिळता जुळता होता.
महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये संत सेना महाराज यांचा मुळ फोटो वापरला तो व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
बांधवगड ही संत सेना महाराजांची जन्मभूमी आहे या ठिकाणी जो फोटो वापरला जातो तोच इतर राज्यातही वापरला जातो म्हणून नाभिक समाजाने सुद्धा इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये संत सेना महाराजांचा मूळ फोटो वापरावा असे आव्हान करण्यात येत आहे.
एक देश एक फोटो एक जयंती
नाभिक समाजाचे आराध्य दैवत “संत शिरोमणी सेनाजी महाराज” यांना मानणारा वर्ग हा संपूर्ण देशामध्ये आढळून येतो. बऱ्याच राज्यांमध्ये संत सेना महाराजांचा मूळ फोटोज वापरला जातो. जो की त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच बांधवगड मध्य प्रदेश येथे वापरला जातो. तोच इतर राज्यातील वापरला जातो.The original photo of Sant Sena Maharaj
तोच फोटो महाराष्ट्रातही वापरल्या जावा यासाठी मागील दहा वर्षापासून “नाभिक सेवा संघ महाराष्ट्र” प्रयत्न करत आहे. तसेच “संत सेना महाराजांची जयंती” सुद्धा संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरी व्हावी. यासाठी सुद्धा “नाभिक सेवा संघ” मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहे. बांधवगडला ज्या दिवशी संत सेना महाराज जयंती साजरी केली जाते.
त्याच दिवशी विविध राज्याबरोबर महाराष्ट्रातही जयंती साजरी व्हावी म्हणून नाभिक सेवा संघ प्रयत्न करत आहे. संत सेना महाराज यांचा संपूर्ण देशात एकच फोटो वापरला तर हे नाभिक समाजाची अस्मिता निर्माण होईल आणि संपूर्ण देशातील नाभिक समाज हा संत सेना महाराज यांच्या बॅनरखाली एकत्र येईल यात स्थळ मात्र ही शंका नाही.
त्याचबरोबर संपूर्ण देशात संत सेना महाराजांचा एकच फोटो वापरला तर संपूर्ण देशातील नाभिक समाज हा संत सेना महाराजांच्या नावाने एकत्र येऊ शकतो हे परत एकदा सिद्ध होईल . म्हणून नाभिक सेवा संघाने मागील दहा वर्षापासून एक लाईन वापरली आहे.
एक देश एक फोटो एकच जयंती सध्या या नियमाप्रमाणे भारतातील 17 ते 18 राज्यांमध्ये संत सेना महाराजांचा एकच फोटो वापरला जातो एकाच दिवशी संत सेना महाराज जयंती साजरी केल्या जाते त्यामुळे संपूर्ण देशातील नाभिक समाज हा एक आहे एकता आहे ही दिसून येते.
विविध जिल्ह्यांत मुळ फोटो चे प्रकाशन
संत सेना महाराज यांच्या मूळ फोटोचे प्रकाशन विविध जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )येथे सुद्धा संत सेना महाराज यांच्या मूळ फोटोचे प्रकाशन, जननायक करपुर ठाकूर यांच्या जयंतीदिनी करण्यात आले होते.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने पुणे येथे प्रकाशना करण्यात आले होते. त्याचबरोबर जालना, ठाणे, नाशिक, परभणी , नांदेड अशा विविध जिल्ह्यांमध्ये संत सेना महाराज यांच्या मूळ प्रतिमेचे प्रकाशन करण्यात आले होते. तरीही यापुढेही नाभिक समाजाने संत सेना महाराज यांचा मूळ फोटो वापरात आणावा असे नाभिक समाजाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.The original photo of Sant Sena Maharaj