c
Sant Sena Maharaj Abhangatha Karma Yoga
जन्म देते वेळी लल्हाटीं लिहिले |
कर्तव्य दिधले पाप पुण्य ||१||
पापी असता दुःख दारिद्र पीडा |
श्वान सूकर किडा जन्मा जाय ||२||
पुनीत भाग्यवान थोर पशुपक्षी |
नारायणा रक्षी तयां जीवां ||३||
सेना म्हणे करा कर्तव्य सात्विक |
ब्रम्हांडनायक नित्य भजा ||४||
भावार्थ:- जीवजंतूंच्या जीवनातील फेरबदल आणि जन्ममृत्यूची स्थित्यंतरे याविषयी सेनाजींचा अभिप्राय असा आहे की, जीव जन्माला येतो त्याच वेळी त्याच्या कपाळी त्याच्या पूर्वसंचिताच्या रूपाने त्याचे विधिलिखित लिहून ठेवलेले असते व तद्नुसार कर्तव्य म्हणून पाप व पुण्य त्याच्या वाट्याला येते. पापाची बहुलता असेल तर त्या जिवाच्या नशिबी दुःख, गरीबी व यातना येतात आणि अखेर कुत्रा, डुक्कर, किडा अशा हीन योनींत तो जन्माला जातो. जे जीव पुण्यवान व भाग्यवान असतात त्यांना थोर पशुपक्ष्यांचे जन्म मिळतात आणि अशा जीवांचे नारायण रक्षण करतो. यास्तव प्रत्येकाने सात्विक कर्तव्यांचे आचरण करावे आणि ब्रम्हांडनायकाचे नित्य भजन करावे.Sant Sena Maharaj Abhangatha – Karma Yoga
अभंग क्रमांक दोन
खोटे नाटे कर्म करिता काय मिळे |
दुजियाचे जळे अंत:करण ||१||
दुजियाचा शाप होईल तो कोप |
बदले ते रुप दु:ख भोगी ||२||
मायबाप बंधू भगिनी ती आया |
म्हणती अपीशिया जळो तोंड ||३||
सेना म्हणे घेती पाळी हाय दगड |
मरता वेळ मूढ पस्ताविती||४||
बांधवगड येथील संत सेना महाराज जयंती पहाण्यासाठी
खाली क्लिक करा
भावार्थ:- सेनाजी म्हणतात खोटेनाटे पाप कर्म करणाऱ्या पातक्याला काय मिळते देव जाणे. पण त्याच्या पापकृत्यामुळे ज्याची हानी होते, त्यांचे अंतःकरण मात्र जळून राख होते. तो क्रोधाविष्ट होऊन खोटे कर्म करण्यास शाप देतो तेव्हा त्याच्या जीवनात प्रतिकूल बदल होऊन तो दुःख भोगतो. मायबाप, बंधू, भगिनी वगैरे त्या पातक्याचे स्वजन ‘जळो या अपेक्षित माणसाचे तोंड!’ तुम्ही त्यांचे वाभाडे काढतात. अशा तरहने हा मूर्ख स्वतःच्या हाताने स्वतःचा पायावर धोंडा मारून घेतो व मरते वेळी पश्चाताप पावतो.Sant Sena Maharaj Abhangatha – Karma Yoga
अभंग क्रमांक तीन
पहिली झाली पर |
तया पडला अंतर||१||
मूल झाला करता |
माया झाली पतीवृत्ता||२||
विसरली बोले दाट |
जगीं होता तो बोभाट||३||
सेना म्हणे कर्महीं |
हत्ते घडती अवगुण ||४||
भावार्थ:- पहिल्या बायकोला लाठडून, परकी मानुन दुसरी केली. साहजिकच पहिलीच्या व त्याच्या संबंधात मोठी फट पडली. कालांतराने पहिलीचा मूलगा घरात कर्ता बनला आणि त्यांची माया पतीवृत्ते म्हणून मिरवू लागली. पतीवृत्ताधर्म विसरली व नवरृयाला उलटून बोलू लागले. सेनाजी हा दृष्टांत देऊन म्हणतात, अशा प्रकारे कर्महिन माणसाच्या हातून प्रसाद घडतात व त्यांचे फळ बिचाराला भोगावे लागतात.Sant Sena Maharaj Abhangatha – Karma Yoga
अभंग क्रमांक चार
सौंदर्य उत्तम, दृष्ट आचरली |
दोन्ही कुळें मुकली, दू:ख पावे||१||
भर उमेदीचा उत्तरला जोम |
नाही येते काम सकाळीक ||२||
धर्मपोटी राहे डोळा आणी पाणी|
पाहे किलवाणी कसे होईल ||३||
सेना म्हणे करणी तैसेचि भोडावे|
तेथेच केशव दूर राहे||४||
बांधवगड येथील संत सेना महाराज जयंती पहाण्यासाठी
खाली क्लिक करा
भावार्थ- स्त्री सौंदर्यात सरस, पण दुष्ट आचरणाने (व्यभिचाराने) अधपतीत झाली. सासर माहेर अशी तिची दोन्ही कुळे तिला पारखी झाली आणि परी त्यागाचे दुःख तिच्या नशिबी आले. भर उमेदीचे तिचे वय असूनही तिचे अवसान खचून गेले. कारण सर्वांनीच तिला दूर लोटले कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. बिचारी अर्धपोटी उपाशी राहू लागली. डोळ्यात पाणी आणून ठेवीलवानेपणे. पाहू लागली व आपले कसे होईल या चिंतेने झुरू लागली. एका बदफैली तरुणीची ही कहाणी सांगून सेनाजी म्हणतात जशी करणी करावी तसे भोगावे वाईट कर्म करणाऱ्या पासून केशवही दूरच राहतो.Sant Sena Maharaj Abhangatha – Karma Yoga
अभंग क्रमांक पाच
कर्मचांडाळ कष्टकरी फार |
दुबळा आचार वागतसे||१||
न करिता काही पीडा येती घरासी |
धुसफूस शेजारी करिताती ||२||
एकामागे एक दुखी होता ती |
तळमळ चित्ती होत राहे ||३||
सेना म्हणे अविश्वास वाढला |
कर्म करा दयाळ दुःख जाय ||४||
भावार्थ- सेनाजी म्हणतात पापकर्मी माणूस पुष्कळ कष्ट आणि यातयात करतो. परंतु त्याची वागणूक खराब अथवा अयोग्य आचरणाने युक्त असते त्यामुळे त्याने प्रत्यक्ष काही न केले तरी त्याचा दुष्कर्म वीपाक म्हणून यातना त्याच्या पाठीशी लागतात. त्याचे शेजारी त्याच्याबद्दल धुसपुस करू लागतात. दुःखे लागोपाठ त्याच्यावर कोसळतात. त्याच्या मनाची तळमळ होत राहते. सेनाजी म्हणतात लोकांच्या अविश्वासामधून हे सर्व परिणाम उद्भवतात परंतु तुम्ही दयाळू पणाने लोकहिताची कर्म करू लागतात तर तुमचे दुःख दैन्य पार निघून जाते.Sant Sena Maharaj Abhangatha – Karma Yoga
संत सेना महाराज जयंती
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जन्म मध्येप्रदेशातील “बांधवगड” येथे झाला. त्यांच्या जन्माची नोंद त्यांच्या अभंगांमध्ये दिसून येते. संत सेना महाराज यांच्या जन्माची नोंद ही “हिंदू धर्माच्या विक्रम संवत” या दिनदर्शिका नुसार नोंद मिळते. विक्रम संवत या दिनदर्शिकेनुसार संत सेना महाराज यांचा जन्म “विक्रम संवत 1357, वैशाख कृष्ण 12″ या दिवशी झाला. अशी नोंद त्यांच्या अभंगांमधून मिळते. परंतु महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक “शालिवाहन शके” ही दिनदर्शिका वापरतात. त्यामुळे “शालिवाहन शके या दिनदर्कीनुसार संत सेना महाराज यांची जयंती दरवर्षी चैत्र कृष्ण 12″ या दिवशी येते. म्हणून महाराष्ट्रातील सर्व जनता ही संत सेना महाराज यांची जयंती दरवर्षी “चैत्र कृष्ण 12″ या दिवशी साजरी करते. “महाराष्ट्रातील चैत्र कृष्ण 12 म्हणजेच विक्रम संवतचे वैशा कृष्ण 12 होय”. Sant Sena Maharaj Abhangatha – Karma Yoga