सध्या नाभिक समाजात आरक्षणावरून जो (SC की OBC) संभ्रम निर्माण झाला आहे.तो मिटविण्यासाठी व नाभिक समाजाची आरक्षणासंदर्भात निर्णायक,ठाम एकच भुमिका ठरवण्यासाठी.शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिनांक 11 आक्टोंबर 2025 रोजी नाभिक आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेला महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातून, जिल्ह्यातून नाभिक समाज बांधव उपस्थित राहणार आहे.Organization of Nabhik reservation conference at Shegaon
Organization of Nabhik reservation conference at Shegaon
सध्या नाभिक समाजातील काही नेते नाभिक समाजाला SC (अनुसूचित जाती) मध्ये समावेश करावा म्हणून सरकारकडे मागणी करत आहेत.तर काही नेते OBC आरक्षण वाचण्यासाठी मोर्चे, आंदोलन, उपोषण करत आहेत.यामुळे नाभिक समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.तो संभ्रम दूर करण्यासाठी आणि नाभिक समाजाची आरक्षणासंदर्भात एकच भुमिका घेण्यासाठी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे “नाभिक आरक्षण परिषदेचे” आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेला आरक्षण संदर्भात अभ्यास असलेले कायदेतज्ज्ञ, विचारवंत,अभ्यासु व्यक्ती, लेखक, तसेच नाभिक समाजातील विविध संस्था,संघटनेचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या परिषदेला जास्तीत जास्त नाभिक समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.Organization of Nabhik reservation conference at Shegaon
खालिल विषयावर विचार मंथन होणा
- नाभिक समाज खरंच इतर राज्यांत SC (अनुसूचित जाती) मध्ये समावेश आहे का?
- नाभिक समाजाचा SC (अनुसूचित जातीत) समावेश होऊ शकतो का ?Organization of Nabhik reservation conference at Shegaon
- नाभिक समाजाला SC प्रवर्ग आपल्यात समावेश करुन घेण्यास तयार आहे का?
- नाभिक समाजाला ॲट्रासिटी कायदा लागू होईल का?
- 1985 च्या GR ची सत्यता काय आहे?
- रोहीनी आयोगामुळे नाभिक आणि OBC च कल्याण होईल का?
- OBC आरक्षणाचा लाभ नाभिक समाजाला होणार का?
- OBC आरक्षण खरंच संपुष्टात आले आहे का?
- नाभिक समाजाने SC आरक्षणासाठी लढा उभा करावा की पुर्णविराम द्यावा?Organization of Nabhik reservation conference at Shegaon
- नाभिक समाजाने OBC आरक्षण वाचण्यासाठी रस्त्यावर उतरावे का?
या आणि अशा अनेक मुद्यांवर कायदेतज्ज्ञ, विचारवंत, अभ्यासक,लेखक, तसेच नाभिक समाजातील संस्था, संघटनेचे पदाधिकारी यावर ठाम निर्णय घेणार आहेत.व त्याप्रमाणे नाभिक समाजाची पुढील दिशा ठरणार आहे. यासाठी तिर्थक्षेत्र शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिनांक 11 आक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला जास्तीत जास्त नाभिक समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.Organization of Nabhik reservation conference at Shegaon
नाभिक आरक्षण परिषदेची रुपरेषा
आरक्षण विचार तथा सामाजीक विकास परिषद 2025 तिर्थक्षेत्र शेगांव जि. बुलढाणा
- दिनांक 11.10.2025 वार शनिवार
- सकाळी 9.40 वाजता पासुन
- स्थळ – संत गजानन महाराज नगरी शेगांवOrganization of Nabhik reservation conference at Shegaon
- परिषदेचे अध्यक्ष – मा. संजीवकुमार हणमंतराव (तात्या ) साळुंके
- प्रमुख उपस्थीती – मा. डॉ.संजयजी शेंडे PHD भारतीय संविधान व sc st obc यांचे अभ्यासक
- जाहीर आभार व सत्कार – मा. सचिनदादा परब ” रिंगण विशेषांक “
आपले सर्वांचे स्वागत आहे.
परिषदेची रचना
- प्रेरणा – राष्ट्रसंत सेनाजी महाराज, भारतरत्न गुलझारीलालजी नंदा, भारतरत्न कर्पुरीजी ठाकू
- ध्येय – समाजाचे आरक्षण संबंधी धोरण व समाज विकासाची भूमीका ठरवणे.Organization of Nabhik reservation conference at Shegaon
- उदेश – आरक्षणसंबंधी जागृती करणे. विकासात्मक विचार व बाबींवर चर्चा करून उपाययोजना करणे.
- सहभाग -सकल नाभीक समाज
सर्व संस्था व संघटनांचे प्रतिनिधी
समाजातील तज्ञ, विचारवंत,लेखक, पत्रकार, अधिकारी – पदाधिकारी, डॉक्टरेट प्राध्यापक तथा अॅडव्होकेट मंडळी
समाजभुषण व समाजरतन पुरस्कार प्राप्त मंडळी
- परिषदेचे स्वरूप –
पहिले सत्र 10.00 ते 2.00Organization of Nabhik reservation conference at Shegaon - विषय क्र.01.
आरक्षणाचा ईतीहास. आरक्षणाची कलमवार संवैधानीक मांडणी. तसेच
आरक्षण व जातीनिहाय जनगणना यांचा परस्पर संबंध. - विषय क्र. 02
* रोहीणी आयोगानुसार आरक्षण विभाजनाचे फायदे तोटे व संभाव्य धोके
* खाजगीकरणां मध्ये आरक्षणाची स्थीती.Organization of Nabhik reservation conference at Shegaon
विषयानुसार तज्ञाकडुन विचार मांडणी झाल्यावर – प्रश्नोत्तरे- संवाद – निष्कर्ष+
आरक्षण धोरणाची निश्चीती करणे.
( sc मध्ये आरक्षण मागणी करणे, OBC मध्ये राहुन 9+9+9 % आरक्षण विभाजनासाठी प्रयत्न करणे, दबावगट तयार करणे यावर अंतीम निर्णय घेणे. )
- सत्र दुसरे 3.00 ते 6.00Organization of Nabhik reservation conference at Shegaon
- विषय क्र. 03.
सामाजीक – शैक्षणीक – आर्थिक व राजकीय विकासाचे मॉडेल समाजासमोर मांडणे.
प्रश्नोत्तरे, चर्चा, संवाद, निष्कर्ष. - विषय क्र. 04
विविध शासकीय योजना, आरोग्यविषयक सुविधा, शैक्षणीक योजना – शिष्यवृत्ती इ. समाजाला मिळवुन देणारी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे.
चर्चा, प्रश्नोतरे, संवाद, निष्कर्षOrganization of Nabhik reservation conference at Shegaon
सामाजीक विकासाचा Action plan ठरवणे व उपाययोजना निश्चीत करने एकंदरीत समाजाचे आरक्षण व सा. विकासाचे धोरण निश्चीत करणे.
विषयाला धरून कार्याचे व कर्तृत्वान व्यक्ती संस्थ यांचे प्रासंगीक स्वरूपात सम्मान / सत्कार करणे.
समाजामध्ये काम करणाऱ्या विविध
संस्था व संघटनाच्या कार्याची माहिती आढावा घेऊन अभिनंदन करणे सन्मान करणे.
घ्यावयाची काळजी –Organization of Nabhik reservation conference at Shegaon
यामधुन कोणतीही नविन संघटना तयार होणार नाही.
गैरसमज पसरवणाऱ्या व्यक्तींपासुन सावध रहा.
सुचना –
परिषदेमध्ये प्रातिनिधीक लोकशाही असेल याचा अर्थ एखादया संस्थेचे / संघटनेचे मत हे प्रतिनिधीदारे मांडण्यात यावे.
प्रत्यक्ष कृती व कार्य असणाऱ्यां पदाधिकारी यांना प्राधान्य असेल
“वॉटसअप विर ” यांनी दुर रहावे.
त्यांनी या भानगडीत पडु नये.Organization of Nabhik reservation conference at Shegaon
स्वतःचे चॅनेल, न्युजपेपरवाल्यांना प्राधान्य आहे स्वागत आहे.
परिषदेचे स्थळ शेगांव हे श्रध्दास्थान आहे शिवाय प्रवासाचे दृष्टीने, निवास – भोजन व्यवस्था तसेच सभा हॉल व व्यवस्था यांचे दृष्टीने योग्य असल्याने निवडलेले आहे.
कृपया – फक्त सहलीसाठी येणाऱ्यांनी सभेमध्ये उशीरा येऊन बेशिस्त वर्तन करू नये, मध्ये मध्ये येऊन फोटोसेशन करू नये.
परीषदेच्या यशस्वीतेनंतर सर्वांना फोटोसेशनची संधी असेल.
परिषदेची कोणतीही फी नाही आपआपला प्रवासखर्च भोजनखर्च स्वतः करायचा आहे.Organization of Nabhik reservation conference at Shegaon
आयोजक मंडळी चहा, नाश्ता, साऊंड सिस्टम, चेअर व सतरंजी, हार फुले, पाणी कॅन यांचा खर्च करतील.
ज्यांचेकडे प्रवासखर्चा पुरते पैसे नसतील त्यांनी आपल्या संस्था व संघटनेच्या मदतीने यावे.
किंवा Admin ला फोन करावाOrganization of Nabhik reservation conference at Shegaon
स्वयंशिस्त व स्वयंप्रेरणा आणि समाजाची तळमळ हे तुमचे आमचे नाते जपु या.
आयोजक मंडळीच्या वतीने….. ……





