स्वातंत्र्य पुर्व काळात नाभिक समाज महात्मा फुले यांच्या सोबत कसा खंबीरपणे उभा होता.याबद्दल या लेखात माहिती देण्यात आली आहे. Nabhik Samaj and Mahatma Phule
Nabhik Samaj and Mahatma Phule
नाभिक समाजाला सर्वप्रथम कोणी संघटीत केले? तर या प्रश्नाचे उत्तर महात्मा जोतिबा फुले यांनी सर्वप्रथम संघटीत केले.नाभिक समाजाला सोबत घेऊन “केसवपन” सारखी रानटी प्रथा महात्मा जोतिबा फुले यांनी बंद केली.सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्याचे कार्य महात्मा जोतिबा फुले यांनी केले यासाठी नाभिक समाज महात्मा फुले यांच्या सोबत खंबीरपणे उभा होता.याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
न्हाव्यांचा ऐतिहासिक संप
ब्राह्मण विधवांची नाना तऱ्हेने विटंबना अवहेलना आणि अघोरी छळ केला जात असे .त्याविरुद्ध महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विविध मार्गाने सामाजिक युद्ध छेढले. त्याचाच भाग म्हणून “केशवपन” प्रथेविरुद्ध “न्हाव्यांचा संप” घडवून आणला. ब्राह्मण विधवा स्त्रियांचे “केशवपन” करण्याची अघोरी प्रथा धर्मातून आली आहे, असे भासवले जाई.
त्यांची इच्छा नसताना त्यांना न्हाव्यापुढे बसावे लागत असे. पहिल्या केशवपनानंतर दर महिन्याला न्हाव्यासमोर बसण्याचा प्रसंग आलेला असायचा. मृत झालेल्या ब्राह्मण विधवेचे केशवपन केले जाई. हा सारा प्रकार अघोरी होता.Nabhik Samaj and Mahatma Phule
जिवंत व मृत भगिनींचे केस कापू नयेत ,यासाठी विनंतीपूर्वक प्रयत्न करण्याचे ठरले. त्यासाठी 23 मार्च 1890 रोजी पुण्यातील एल्फिन्स्टन विद्यालयाजवळच्या मैदानात “न्हाव्यांच्या परिषदेचे” आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत 500 नाभिक बंधुनी सहभाग घेतला. अध्यक्ष “सदोबा कृष्णाजी न्हावी” हे होते. केशवपनाची रानटी चाल बंद करण्यासाठी या परिषदेने संपाचा निर्णय घेतला.
अघोरी प्रथेविरुद्ध पुणे, मुंबईसह देशातील न्हाव्यांनी ऐतिहासिक संप केला. या संपाचे नेतृत्व दिनबंधूकार आणि भारतातील पहिले कामगार नेते “नारायण मेघाजी लोखंडे” यांनी केले. संपाच्या प्रेरणा “सावित्रीबाई फुले” यांच्याच होत्या. आणि त्यांनी या परिषदेत विचार प्रवर्तक भाषणे केले. यासाठी न्हावी समाजाच्या सत्यशोधकांनी ठिकठिकाणी परिषदा सभा घेऊन रानटी प्रथा बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे या प्रथेची चर्चा घडून आली.
लंडनच्या वृत्तपत्राने घेतली दखल
या न्हाव्यांच्या संपाचे वृत्त 9 एप्रिल 1890 च्या अंकात “लंडनच्या द टाइम्स” ने प्रसिद्ध केले. इंग्लंडमधील महिलांनी न्हाव्यांचे अभिनंदन केले. पुण्यातील या परिषदेपूर्वी केशवपनाच्या अमानवी प्रथेविरुद्ध समाजाचे प्रबोधन करणारी लेखमालिका “दिनबंधूं” मधून प्रसिद्ध झाली. त्यात या अमानवी प्रथेच्या रानटीपणाची चर्चा करण्यात आली.
मामा परमानंद यांनी ‘इंडियन इन्स्पेक्टर’ मधून 24 फेब्रुवारी 1890 च्या अंकातील लेखनाने केशवपन प्रथा बंदीच्या विचाराचे समर्थन केले. यासंदर्भात 30 नाभिक बंधूनी केशवपन प्रथेला विरोध करण्याचे आवाहन केले. अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या प्रथेला संपविण्याचे आव्हानात्मक कार्य “सावित्रीबाई फुले” यांच्या धाडसाने झाले.
यामुळे क्रूरप्रथेला थांबवण्यासाठी “न्हाव्यांनी ऐतिहासिक संप केला”. स्वतःचे उत्पन्न बुडत असताना वाईट प्रथा बंद करण्यासाठी न्हावी बांधवांनी केलेला संप इतिहासात वेगळा संप म्हणून नोंदवला गेला.Nabhik Samaj and Mahatma Phule
साभार: समग्र वाड्मय: सावित्रीबाई फुले, लेखक- डाॅ. प्रल्हाद लुलेकर
जो इतिहास वाचत नाही तो इतिहास घडवू शकत नाही
नाभिक समाजाने महात्मा जोतीराव फुले यांचे आवाहनाला प्रतिसाद देवून केशवपनाविरूद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्या ऐतिहासिक घटनेस 135 वर्षे पूर्ण झाले आहेत.त्या विषमतावादी काळात नाभिक समाजाने सत्यशोधकी भूमिका घेवून सत्यशोधक चळवळीत हिरीरीने भाग घेतला. परंतु काही अपवाद वगळता अनेकांना याची जाणीव देखील नाही.
अधीक माहितीसाठी
याचा गांभीर्याने विचार करेन परिवर्तनवादी सत्यशोधकी भूमिका घेणे काळाची गरज आहे. तरच आपल्या समूहाच्या सर्वागीण विकासास चालना मिळेल. पहा शक्य आहे का! कारण संविधानकर्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे इतिहास समजून घेत नाही, ते इतिहास निर्माण करू शकत नाही.Nabhik Samaj and Mahatma Phule




