Aadhar Card New Updates / आधार कार्ड संबंधित महत्वाची माहिती

Aadhar-card-new-update

आधार कार्ड हे भारत सरकारच्या वतीने भारतीय नागरिकांसाठी महत्वाचे ओळखपत्र आहे.आधार कार्ड मध्ये 12 अंकी लोकसंख्याकिंक नंबर असुन बायोमेट्रिक डाटा आसतो. शासकिय कामासाठी, शासकीय लाभासाठी तसेच व्यक्तीगत कामासाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे.
आधार कार्ड मध्ये नाव , पत्ता, मोबाईल नंबर, फोटो बदलण्यासाठी आता जास्त धावपळ करण्याची गरज नाही. Aadhar Card New Updates ते तुम्ही स्वतः सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) किंवा जवळच्या आधार नोंदणी कार्यालयात जाऊन सहज बदलु शकता. ते कशा पद्धतीने बदलायचे याबद्दल या पोस्टमध्ये स्टेप बाय स्टेप माहिती देण्यात आली आहे.

आधार कार्डासाठी आवश्यक कागदपत्रे Aadhar Card New Updates

भारतीय नागरिकांचे विशिष्ट ओळख पत्र म्हणून आधारकार्ड ला विशेष महत्त्व आहे.हे आधार कार्ड काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात,ते कोठे काढले जाते याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. ते पुढील प्रमाणे आहेत.

  • ओळखीचा पुरावा
  • रहिवासी पुरावा
  • जन्माचा पुरावा

वरील सर्व कागदपत्रे जवळच्या आधार नोंदणी कार्यालयात घेऊन गेल्यानंतर तेथे एक आधार नोंदणी चा फॉर्म दिला जातो किंवा UIDAI या वेबसाईटवरुन डाउनलोड करुन तो मुळ कागदपत्रासह कार्यालयात जमा केला जातो.

जवळच्या नावनोंदणी कार्यालयात मुळ कागदपत्रे घेऊन गेल्यानंतर तेथील नोंदणी अधिकारी मुळ कागदपत्रांचे स्कॅनिंग(जन्माचा पुरावा, रहिवासी पुरावा,ओळखीचा पुरावा)करून मुळ कागदपत्रे तुम्हाला वापस देतील.
मुळ कागदपत्रे सबमिट केल्यानंतर नोंदणी अधिकारी लाभार्थ्यांचे हाताचे ठसे व बुबळाचे छायाचित्रे बायोमेट्रिक पद्धतीने सबमिट करतील.व लाभार्थ्यांचा फोटो काढतील. Aadhar Card New Updates
आधार नोंदणी अधिकारी एक पोचपावती देतील ज्यावर 14 अंकी नावनोंदणी क्रमांक तसेच 14 अंकी नोंदणी तारीख आणि नोंदणीची वेळ समाविष्ट असलेली पावती देतील.या पार्वतीच्या आधारे भविष्यात तुम्ही कोठुनही आधार कार्ड डाउनलोड करु शकता.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किती पैसे लागतात?

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पुढील प्रक्रियासाठी पुढीलप्रमाणे शुल्क आकारले जाते.

  1. अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट – मोफत
  2. लोकसंख्या अद्यतन (कोणत्याही प्रकारचे) – रु. 50/- (जीएसटीसह)
  3. बायोमेट्रिक अपडेट – रु. 100/- (जीएसटीसह)
  4.  डेमोग्राफिक अपडेटसह बायोमेट्रिक रु. 100/- (करांसह)
  5. A4 शीटवर आधार डाउनलोड आणि कलर प्रिंट-आउट – प्रत्येक आधार रु. 30/- (जीएसटीसह)

आधार नोंदणीला भेट देत असल्यास केंद्र, रहिवासी हे लक्षात ठेवू शकतात की आधार नोंदणी/सुधारणा/अपडेट फॉर्मसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. एकाच घटनेवर एकापेक्षा जास्त फील्ड अपडेट करणे हे एक अपडेट मानले जाते. हे शुल्क कोणत्याही लागू करांसहित आहेत. रहिवासी करू शकतात UIDAI वेबसाइटवरून किंवा ASK वर उपलब्ध असलेल्या ‘कॅश काउंटर’वर ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करताना ऑनलाइन पेमेंट.तुम्ही url वर UIDAI मंजूर फी संरचना देखील शोधू शकताUIDAI फी संरचना.” Aadhar Card New Updates

aadhar-card-change-name-addreds-and-photo

आधार कार्ड अपडेट केल्यानंतर ऑनलाईन डाउनलोड करता येते का?

आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तुम्ही साधारणतः एक महिन्यानंतर uidai.gov.in या वेबसाईटच्या my aadhar माध्यमातून तुम्ही तुमचे आधार कार्ड भारतात कोठुनही डाउनलोड करु शकता. Aadhar Card New Updates
तुम्ही तुमचे ई-आधार ऑनलाइन डाउनलोड करू शकता. uidai.gov.in वेबसाइटवरील ‘माझे आधार’ टॅबच्या ‘आधार मिळवा’ विभागांतर्गत “आधार डाउनलोड करा” वर क्लिक करून तुम्ही तुमचा ई-आधार डाउनलोड करू शकता. तुम्ही myaadhaar.uidai.gov.in वरून देखील डाउनलोड करू शकता .

  • आधार कार्ड मध्ये जन्म तारीख (DOB) बदलता येते का?
    आधार कार्ड मध्ये जन्म तारीख चुकीची छापली गेल्यास किंवा संपूर्ण (तारीख/महिना/वर्षे) तारखेचा उल्लेख न आल्यास तुम्ही तुमच्या आधार कार्ड मधील जन्म तारीख जन्मांचे योग्य पुरावे आधार नोंदणी कार्यालयात जमा करून, आधार कार्ड अपडेट करु शकता.पण जन्म तारीख एकदाच बदलता येते.वारंवार बदलल्यास ती अवैध मानली जाते. Aadhar Card New Updates
  • आधार कार्ड हरवल्यास कसे प्राप्त करावे?
    बर्याच जनांचा एक प्रश्न असतो की आधार कार्ड हरवल्यास ते परत कसे मिळवावे तर याचे उत्तर आहे की तुम्ही जवळच्या आधार नोंदणी कार्यालयात जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधार ला लिंक असेल तर लवकरात लवकर तेच आधार कार्ड डाउनलोड करु शकता.पण बर्याच जनांच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसतो तरीही तुम्ही आधार नोंदणी कार्यालयात, तुम्ही आधार नोंदणी क्रमांक सांगुन तुमचे आधार कार्ड डाउनलोड करु शकता.
आधार कार्डावरील फोटो कसा बदलावा?

तुमच्या आधार कार्डावरील फोटो बरोबर निघाला नसेल किंवा तो लाहानपनी काढलेला असेल तर तो बदलने आवश्यक असते.तो कशा पद्धतीने बदलावा? त्याला पुढील स्टेप आमलात आना. Aadhar Card New Updates

स्टेप 1– तुमच्या जवळच्या आधार नोंदणी कार्यालयाला भेट द्या किंवा जवळच्या आधार सेवा नोंदणी कार्यालयाला भेट द्या.

स्टेप 2- UIDAI या अधीकृत वेबसाईट वरून आधार अपडेट फॉर्म डाऊनलोड करा.

स्टेप 3- डाऊनलोड केलेला फॉर्म काळजीपूर्वक भरा.

स्टेप 4- तुम्ही काळजीपूर्वक भरलेला फॉर्म नोंदणी अधिकारी यांच्या कडे सबमिट करा. आणि तुमचे बायोमेट्रिक पद्धतीने हाताच्या बोटाचे ठसे आणि बुबळाचे छायाचित्राचा तपसील द्या.

स्टेप 5- नोंदणी अधिकारी आता तुमचा फोटो घेईल. Aadhar Card New Updates

स्टेप 6– तुमचे सर्व तपशील मंजूर करण्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक्स द्यावे लागतील.

स्टेप 7- तुमची आधार नोंदणी पुर्ण करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये भरावे लागतील.

स्टेप 8- आधार नोंदणी फी भरल्यानंतर तुम्हाला एक पोच पावती URN दिली जाईल.

स्टेप 9- आठ दिवसांनी पोच पावती च्या माध्यमातून तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करु शकता. Aadhar Card New Updates

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top