गुरुग्रंथ साहिब मध्ये संत सेना महाराजांचा अभंग || Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib

Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib 2

शीख धर्माच्या “गुरुग्रंथसाहीब” या ग्रंथामध्ये संत नामदेव महाराज यांच्या अभंगाचा समावेश आहे हे आपल्याला माहीत आहे.पण याच ग्रंथात इतर संताबरोबर “संत सेना महाराज” यांच्या अभंगाचा समावेश आहे.हे बर्याच जनांना माहित नाही.

आज आपण संत सेना महाराज यांच्या याच “अभंगाची” माहिती घेणार आहोत जो शिख धर्माच्या “गुरुग्रथसाहीब” मध्ये समावेश आहे. Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib

Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib 2
 

Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib

मित्रांनो प्रत्येक धर्मियांचे आप आपले ग्रंथ आहेत.त्या ग्रंथातील नियमाप्रमाणे,तत्वाप्रमाणे तो समुदाय आचरण करत आसतात.पण शिख धर्मीयांचा एकमेव आसा ग्रंथ आहे.ज्यात इतर धर्मांच्या, इतर समाजाच्या, इतर जातींच्या संतांच्या अभंगाचा समावेश आहे.

तो ग्रंथ म्हणजे “गुरुग्रंथ साहिब” हा होय.या ग्रंथामध्ये मराठवाड्यातील ‌“संत नामदेव महाराज” यांच्या 46 अभंगाचा समावेश आहे.हि बाब खरोखरच अभिमानाची आहे. संत नामदेव महाराज यांच्या अभंगाचा शिख धर्माच्या ग्रंथात समावेश आहे हे आपल्याला माहीत आहे.

पण याच ग्रंथात “संत सेना महाराज” यांच्या अभंगाचा समावेश आहे हे बर्याच जनांना माहित नाही.याच अभंगाची माहिती या पोस्ट मध्ये आपण घेणार आहोत.Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib

विविध भाषेत संत सेना महाराज यांचे अभंग

संत सेना महाराज यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला असता संत सेना महाराज यांनी “मराठी, हिंदी,मारवाडी, राजस्थानी आणि पंजाबी” भाषेत अभंग रचना केलेली दिसून येत. Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib 

             “सैन विचार सागर” नावाचा पंजाबी भाषेत एक ग्रंथ पण संत सेना महाराज यांनी लिहलेला आहे .तो पंजाब मधील अमृतसर येथील गुरुद्वारात असल्याचे पंजाब येथील “सैन खोज पत्रिकेचे” संपादक जसवंतसिंह खांम्रा यांनी सांगितले.

एवढेंच नव्हे तर गुरुग्रंथ साहिब ग्रंथातील अभंगाच्या पानाची pdf सुध्दा त्यांनी आम्हाला पाठवली आहे. ती pdf खास आपल्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.या ग्रंथाचे पंजाब मधील गुरुद्वारात दररोज पठण, पारायण केले जाते.

गुरुग्रंथ साहिब या ग्रंथातील संत सेना महाराज यांचा अभंगाची pdf पहाण्यासाठी येथे क्लिक करा

image 2

अभंग pdf संत सेना महाराज

संत सेना महाराज यांचे सर्वात मोठं मंदिर पंजाब येथे

संत सेना महाराज यांना माननारा वर्ग दक्षिण भारताप्रमाणेच उत्तर भारतात पण दिसून येतो.प्रतेक राज्यात संत सेना महाराज यांची मंदिरे, धर्मशाळा,भवन, वस्तीगृह बांधलेली आहेत.पण भारतातील सर्वात मोठे मंदिर पंजाब येथील जालंदर येथील सोहेल या ठिकाणी दिसून येते.

तेथे दररोज संत सेना महाराज यांच्या “सैन विचार सागर” या ग्रंथाचे पारायण केले जाते.भारतातील सर्वात मोठं संत सेना महाराज यांचे मंदिर पंजाबम मध्ये असून त्याचा फोटो पुढीलप्रमाणे आहे.Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib
       👇👇👇👇👇👇👇👇

Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib  1

संत नामदेवानंतर संत सेना महाराज

वारकरी संप्रदायात संत नामदेव महाराज यांच्या नंतर संपूर्ण भारतात वारकरी संप्रदायाची शिकवण पोहचवण्याचे कार्य संत सेना महाराज यांनी केले. पण यांच्या कार्याची दखल इतिहासकारांनी घेतली नाही.Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib

संत सेना महाराज यांच्या एका अभंगाचा समावेश शिख धर्माच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहे.तो अभंग कोणता आहे.हे आपण आज पहानार आहोत. तो अभंग खालील प्रमाणे आहे.
👇👇👇👇👇👇👇

धुप दीप घ्रित साजि आरती ||
वारने जाउ कमलापती ||१||
मंगला हरी मंगला ||
नित मंगलु राजा रामराई को ||२||
ऊतमु दीअरा निरमल बाती ||
तुंही निरंजन कमलापती ||3||
रामा भगति रामान्नदु जाने ||
पूरन परमान्नंदु बखानै ||४||
मदन मुरती भै तारि गोबिंदे ||
सैनु भणै भजु परमान्नदे || ५||

गुरुग्रंथ साहिब पन्ना ६९५

शिख धर्माच्या गुरुग्रंथ साहिब ग्रंथातील अभंगाचा

   अर्थ समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा
image 2

click here

1 thought on “गुरुग्रंथ साहिब मध्ये संत सेना महाराजांचा अभंग || Abhang of Sant Sena Maharaj in Guru Granth Sahib”

  1. We marathi peoples are proud to sant namdev maharaj…..having the great anand sahib granth ! We as writer thakful to combination of maraths & sikh are same on devbhakti !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top