मित्रांनो माणसाच्या आयुष्यात आजार आणि अपघात कधी होईल सांगता येत नाही.आशावेळेची तरतूद करण्यासाठी प्रत्येकजण विमा काढत असतो. न चुकता विम्याचे हप्ते भरत असतो.Ayushman Bharat Yajana
परंतु शासनाच्या बऱ्याच योजना आशा आहेत की आपल्याला विमा हप्ता भरावा लागत नाही. तरीसुद्धा त्या विम्याचा उपयोग आपण गंभीर आजारात किंवा अपघातामध्ये करून घेऊ शकतो.
यासाठी आपल्याला एक रुपयाही विमा भरावा लागत नाही. व पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार घेता येतो. अशीच एक योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना होय. या योजनेबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊ.Ayushman Bharat Yajana
Ayushman Bharat Yajana
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2018 मध्ये झारखंड येथे भारतातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनेची घोषणा केली. या योजनेलाच आयुष्यमान भारत योजना किंवा पंतप्रधान जन आरोग्य योजना असेही म्हटले जाते.Ayushman Bharat Yajana
या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील सदस्यांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जातो. या योजनेबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. ही योजना कोणासाठी आहे, या योजनेसाठी कोण पात्र आहेत.
या योजनेचे कार्ड कसे उपलब्ध करायचे, ही योजना कोणकोणत्या आजारावर उपलब्ध आहे, या योजनेसाठी कोणकोणते हॉस्पिटल उपलब्ध आहेत, याबद्दल सविस्तर माहिती या पोस्टमध्ये घेणार आहोत.Ayushman Bharat Yajana
पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार
आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांला पाच लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य तपासणी, उपचार आणि मेडिकल मोफत उपलब्ध करून दिले जाते.
यामध्ये विविध गंभीर आजार व अपघातातील विविध शस्त्रक्रिया आशा जवळपास 1050 प्रकारचे आजार आणि शस्त्रक्रिया यांचा यात समावेश केला आहे.
रुग्णांना तपासणी चाचण्या फी, उपचार,ओषधी, शस्त्रक्रिया यासाठी एक रुपयाही द्यावा लागत नाही.Ayushman Bharat Yajana
रुग्नाला पाच लाख रुपयांपर्यंत सर्व सुविधा मोफत दिल्या जातात.
आयुष्यमान भारत योजना कोठे लागू आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये लागू केलेली आयुष्यमान भारत योजना ही 31 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात लागु करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतात सरकारी दवाखाने तसेच 13000 हजार पेक्षा जास्त खाजगी हॉस्पिटलमध्ये हि योजना लागू केली आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलची यादी जिल्हा रुग्णालयात तसेच इंटरनेटवर उपलब्ध आहे.Ayushman Bharat Yajana
आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र कोण आहेत?
आयुष्यमान भारत योजना किंवा पंतप्रधान जन आरोग्य योजना यासाठी पात्र कोण आहेत? ते पुढील प्रमाणे आहेत. सन 2011 च्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील सर्व लाभार्थी या योजनेमध्ये सहभागी होतात.
तसेच गरीब वंचित घटकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्य कर्मचारी तसेच केंद्रीय कर्मचारी सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे ऑनलाईन पद्धतीने पण तपासून शकता त्यासाठी पुढील संकेतस्थळाचा उपयोग करावा.
mere. pmjay.gov.in
या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक हेल्थ कार्ड काढावे लागले
आयुष्यमान भारत योजनेचं हेल्थ कार्ड
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आयुष्यमान भारत योजनेचे हेल्थ कार्ड असणे आवश्यक आहे. ह्या हेल्थ काढलाच आभा हेल्थ कार्ड असेही म्हटले जाते. हे हेल्थ कार्ड
1. सेतू सुविधा केंद्र
2.ग्रामपंचायत कार्यालय
3.सीएससी केंद्र तसेच
4. जिल्हा रुग्णालयांमध्ये
ऑनलाइन पद्धतीने सुद्धा काढता येते.
यासाठी एक रुपयाही खर्च येत नाही. आयुष्यमान भारत योजनेचे हेल्थ कार्ड हे मोफत काढल्या जाते. व पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केला जातो हे विशेष.Ayushman Bharat Yajana
हेल्थ कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे
आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा काढू शकता ऑनलाइन पद्धतीने कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील लिंक चा वापर करावा लागेलAyushman Bharat Yajana
mera.pmjay.gov.in या अधिकृत संकेतस्थळ जावे लागेल.
आयुष्यमान भारत योजना किंवा पंतप्रधान जन आरोग्य योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आभा नावाचे हेल्थ कार्ड काढावे लागते हे कार्ड काढण्यासाठी
1.आधार कार्ड आवश्यक आहे तसेच
2.आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे
3.राशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन
या माध्यमातूनही आभा(आयुष्यमान भारत योजना कार्ड) काढले जाते.Ayushman Bharat Yajana
आयुष्यमान भारत योजनेबद्दल अधीक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈