कर्पुरी ठाकुर जयंती || Best CM Karpuri Thakur Jayanti

jannayak karpuri thakur 1

Karpuri Thakur Jayanti

नमस्कार मित्रांनो जननायक कर्पुरी ठाकूर यांची 24 जानेवारी 2023 रोजी 99 वी जयंती आहे. त्या निमित्त त्यांच्या जीवन कार्याची माहिती घेणार आहोत.एका गरीब नाभिक कुटुंबातील मुलगा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुख्यमंत्री पदापर्यंत कसा पोहोचला याचा संघर्षमय जीवन प्रवास पहाणार आहोत.

दहावीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक

Best CM Karpuri Thakur Jayantiज्या काळात दहावी पर्यंत शिक्षण घेणं दुरापास्त होते, त्या काळात इयत्ता दहावी मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने पास होणारा विद्यार्थी म्हणजे कर्पुरी ठाकुर होय.आपला मुलगा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने व पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी कर्पुरी ठाकुर यांचे वडील कर्पुरी यांना घेऊन एका जमीनदाराकडे जातात.तेंव्हा जमीनदार म्हणतो की दहावीत पहिला नंबर आला चांगली गोष्ट आहे “चल माझे पाय दाब” त्यावेळी दहावी प्रथम क्रमांक आलेल्या कर्पुरी ठाकूर यांची मनस्थिती काय झाली असेल याचा विचार न केलेलाच बरे. पुढे हाच विद्यार्थी त्या राज्याचा एक वेळा नव्हे तर दोन वेळा मुख्यमंत्री कसा झाला हे आपण पुढे पाहणार आहोत.

राजकीय जीवनास सुरवात

शालेय शिक्षणात हुशार असलेले कर्पूर ठाकूर शालेय जीवनापासूनच राजकारणात सहभाग घेत होते. 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी सहभाग घेतला होता. आणि अवघ्या 22 व्या वर्षी तुरुंगवास पण भोगला होता. पुढे 1952 ला इलेक्शन मध्ये कर्पूर ठाकूर यांनी सहभाग घेतला आणि थेट ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी मागे फिरून पाहिले नाही पुढे ते दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. कॉर्पुरी ठाकूर यांनी जवळपास 40 वर्ष राजकारणामध्ये व्यतीत केले. परंतु ते 40 वर्षात एकही निवडणूक हरले नाहीत हेही एक विशेष. Best CM Karpuri Thakur Jayanti

jannayak karpuri thakur 2
jannayak karpuri thakur 3
संपूर्ण जीवन गरीब शोषीत वर्गाच्या भल्यासाठी अर्पण

कर्पुरी ठाकूर यांचा राजकीय प्रवास हा पैसा आणि प्रसिद्धीसाठी नव्हता तर समाजातील वंचित, शोषित,गरीब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी होता. त्यामुळे तेथील मागासवर्गीय समाज हा संपूर्णपणे करपुरी ठाकूर यांच्या सोबत होता. “Best CM Karpuri Thakur Jayanti” त्यांच्या चाळीस वर्षातील राजकारणात ती एकदाही आमदारकीची निवडणूक हरले नाहीत. दोन वेळच्या मुख्यमंत्री कार्यकाळात कर्पूरी ठाकूर यांनी जे कार्य केलं त्या कार्याची पावती म्हणून आज कर्पूरी ठाकूर यांना “जननायक” म्हणून संबोधले जाते.

ऐतिहासिक निर्णय घेणारा मुख्यमंत्री Karpuri Thakur Jayanti

कर्पूर ठाकूर मुख्यमंत्री असताना पुढील ऐतिहासिक निर्णय घेऊन वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले.

  1. मंडल आयोगाच्या आगोदर मागासवर्गीय समाजाला 27% आरक्षण नौकरीत, राजकारणात आणि शिक्षणात लागू करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे कर्पुरी ठाकुर होय. Best CM Karpuri Thakur Jayanti
  2. इयत्ता आठवी पर्यंत सर्व घटकांना मोफत व सक्तीचे शिक्षण करनारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे कर्पुरी ठाकुर होय.
  3. सहा एकर जमीन आसनार्या शेतकरयांना करमाफी करनारे मुख्यमंत्री म्हणजे कर्पुरी ठाकुर होय.
  4. सर्वसामान्याना शिक्षण घेता यावे म्हणून इंग्रजी ची सक्ती ऐच्छिक करनारे मुख्यमंत्री म्हणुन त्यांची ओळख आहे.

जाती तोडो समाज जोडो

जाती जातीतील भिंती तोडून एक संघ समाज जोडा. हा नारा करपुरी ठाकूर यांनी आम जनतेला सर्वात प्रथम दिला यावर मनुस्मृती रुपी जातीयवादी ग्रंथावर विश्वास ठेवणाऱ्या मनुवादी लोकांनी करपुरी ठाकूर यासारख्या महापुरुषावर नेहमीप्रमाणे जातीयवादी चिखलफेक केली. या पद्धतीने नारीबाजी करून इतरांना संपविण्याचा धुडगूळ या देशात कुठे ना कुठे चालूच असतो. ते वर्ण वर्चस्ववादी म्हणून लागले “कर पुरी कर पुरा, छोड गद्दी ,ले वस्तरा” म्हणजे कर्पुरी ठाकूर परत जा आणि वस्तरा घेऊन हजामती करा. कर्पुरी ठाकूर हे जातीने नाभिक असल्यामुळे जातीय भ्रष्टाचाराने माजलेले ते हिंदू धर्मीय लोक कर्पुरीनां त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने अवमान करीत होते. तेव्हा करपुरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री होते. कनिष्ठ जातीतील माणूस उच्च पदावर बसलेला या मंडळींना कधी खपत नाही. अशावेळी या लोकांनी जातीयवादी भूतकाळ चालू होतात. छोट्या छोट्या समाजाचे वैगुण्य दाखवून व त्या समाजाला खिंडीत गाठून संपविण्याचे उच्चवर्णीय प्रवर्तिला सर्व समाजाने संघटितपणे विरोध केला पाहिजे. आणि अशा काळसरपाला ठेचण्याचे काम आजच्या तरुणांनी केले पाहिजे. यासाठी जाती जातीतील भिंती तोडून एक संघ समाज निर्माण झाला पाहिजे असा नारा कर्पूर ठाकूर यांनी दिला. Best CM Karpuri Thakur Jayanti

मुख्यमंत्री असताना आपमाणीत केले

कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा जातीवादी उच्च वर्णीय लोक त्यांना अपमानित करण्याची संधी सोडत नव्हते. करपुरी ठाकूर यांनी जे निर्णय घेतले होते त्यांना ते विरोध करत होते. कर्पुरी ठाकूर यांच्या वडिलांना जातीयवादी शिवा देऊन अपमानित केले जात होते. एवढेच काय तर खुद्द कर्पुरी ठाकूर यांना सुद्धा विविध जातीय उखाणे लावून अपमानित करण्याचे काम उच्चवर्णीय लोक करत होते. Best CM Karpuri Thakur Jayanti परंतु कर्पुरी ठाकूर यांनी त्या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करून आपल्या हातात असलेल्या मुख्यमंत्री पदाचा वापर समाजातील वंचित घटकासाठी करण्याचा सपाटा चालूच ठेवला होता.

इमानदारी कर्पुरी ठाकूर यांच्या नसा नसात

कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री पदावर असताना मुख्यमंत्री पदाचा वापर वैयक्तिक कारणासाठी कधीच त्यांनी केला नाही दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती स्वतःसाठी घर सुद्धा बांधू शकला नाही यावरून त्यांची इमानदारी लक्षात येते.
माझा मुलगा मेला तरी चालेल पण सरकारी पैशाने इलाज करनार नाही असा निर्धार करनारे कर्पुरी ठाकूर होय.
मुख्यमंत्री असताना आपल्या मुलीच्या लग्नासाठी सायकल रिक्षाने जाणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून करपुरी ठाकूर यांचे नाव घेतल्या जाते. अशा या महान जननायकाचा मृत्यू 17 फेब्रुवारी 1988 रोजी झाला. Best CM Karpuri Thakur Jayanti

जननायक कर्पुरी ठाकुर यांच्या पश्चात

  • कर्पुरी ठाकूर यांच्या कार्यकाळात त्यांनी जे वंचित शोषित घटकासाठी काम केलं, त्यामुळे त्यांना जननायक ही पदवी देण्यात आली.
  • कर्पुरी ठाकूर यांच्या मृत्यूनंतर 1991 ला भारतीय डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ 100 रुपये चे तिकीट अनावरण केले
  • बक्सर मधील लॉ कॉलेजला जननायक करपुर ठाकूर विधी महाविद्यालय असे नाव देण्यात आले. Best CM Karpuri Thakur Jayanti
  • मधेपुर येथील मेडिकल कॉलेजला जर नायक करपुर ठाकूर मेडिकल कॉलेज असे नामाकरण करण्यात आले.
  • भारतीय रेल्वे विभागाद्वारे दरभंगा आणि अमृतसर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला जननायक करपुरी एक्सप्रेस असे नाव देण्यात आले.
  • बिहारमध्ये विविध स्टेडियमला महाविद्यालयाला संग्रहालयाला रुग्णालयाला करपुरी ठाकूर यांचे नाव देण्यात आले सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिहार
  • विधानसभेच्या समोर जननायक करपुरी ठाकूर यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top