सलून दुकान जळून खाक || Burn down the saloon shop

Burn-down-the-saloon-shop-1

केलसुला – येथे सलून दुकान अगिच्या विळख्यात जळून खाक झाले.आग कशी लागली याचा शोध सेनगाव पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर संतोष तांबे करत आहेत.Burn down the saloon shop

Burn down the saloon shop

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसुला या ठिकाणी सलून व्यवसाय करणारे रामेश्वर क्षीरसागर यांचे बसस्टँड जवळ हेअर कटिंग सलून दुकान आहे.याच दुकानावर रामेश्वर क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांची उपजिवीका चालते.सोमवारी 18 मार्च रोजी रात्री 11:45 वाजता राहुल नेव्हल या मित्राचा फोन आला की तुमच्या सलून दुकानाला आग लागली आहे.Burn down the saloon shop

तेव्हा सलून चालक आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन दुकानाकडे गेले.तर सलून दुकानातून आगीचे लोळ बाहेर येत होते.तेव्हा सलून चालक रामेश्वर क्षीरसागर व कही मित्रांनी पाण्याच्या माध्यमातून दुकानाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत सलून दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा
image 2

click here

एक लाख वीस हजाराचे नुकसान

रामेश्वर शिरसागर यांच्या सलून दुकानाला आग लागल्यामुळे सलून दुकानचे फर्निचर संपूर्णपणे जळाले त्याचबरोबर दोन सलून च्या चेअर होत्या ज्या काही दिवसापूर्वीच नवीन खरेदी केल्या होत्या त्याचबरोबर बसण्यासाठी सोपा आरसे दुकानातील कॉस्मेटिक सामान सर्व आगीच्या विळख्यामध्ये जळून भस्मसात झाले होते असा एकूण खर्च एक लाख वीस हजारापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.Burn down the saloon shop

सलून चालक रामेश्वर शिरसागर यांच्या कुटुंबाची पूर्ण उपजीविका ही त्याच सलून दुकानावर अवलंबून होती त्यामुळे आता सलून दुकानच जळून गेल्यामुळे पुढचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आग लागली की लावली?

सलून चालक रामेश्वर क्षीरसागर हे अठरा तारखेला रात्री अकरा वाजेपर्यंत आपल्या सलून च्या दुकानात काम करत होते अकरा वाजता दुकान बंद करून घरी आल्यानंतर अवघ्या 45 मिनिटातच त्यांच्या दुकानाला आग लागल्याचे समजले. ही आग कशी लागली यासंदर्भात अजून काहीही शोध लागलेला नाही.Burn down the saloon shop

ही आग लावली की लागली हे पोलीस तपासामधून सिद्ध होणार आहे रामेश्वर क्षीरसागर यांचे एकमेव तिथे दुकान असून ते दुकान चांगले चालते आतापर्यंत कधीही असा प्रकार घडलेला नाही म्हणून नेमकी आग लागली का लावली हा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली

सलून चालक रामेश्वर शिरसागर यांनी सेनगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये आपल्या दुकानाला लागलेल्या आधीच्या संदर्भात योग्य तपास करावा यासाठी सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये रीतसरपणे तक्रार नोंद केली आहे या तक्रारीत रामेश्वर क्षीरसागर यांच्या दुकानांमधील फर्निचर पुढच्या सोपा आरसे कॉस्मेटिक सामान सर्व जळून खाक झाले आहे.Burn down the saloon shop

हे सर्व सामान जवळपास एक लाख वीस हजार पेक्षा जास्त किमतीचे आहे ही आग लावली की लागली या संदर्भात पोलिसांनी रीतसरपणे चौकशी करावी यासाठी सलून चालक रामेश्वर क्षीरसागर यांनी सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये रीतसर अर्ज तक्रार दाखल केली आहे ही तक्रार पोलीस स्टेशन सेनगाव चे इन्स्पेक्टर संतोष तांबे तपास करणार आहेत.

मदतीसाठी आवाहन

सलून चालक रामेश्वर शिरसागर यांच्या कुटुंबाची उपजीविका ही सलून दुकानावर अवलंबून होती परंतु तेच सलून दुकान आगीच्या विळख्यामध्ये जळून गेल्यामुळे आज त्यांच्यापुढे जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाला जमेल तसे आर्थिक सहकार्य करावे असे आव्हान सलून चालक रामेश्वर क्षीरसागर यांनी केले आहे त्याचबरोबर मदतीसाठी त्यांनी फोन पे नंबर सुद्धा दिलेला आहे.Burn down the saloon shop तो फोन पे नंबर पुढील प्रमाणे आहे 9158552696 या फोन पे नंबर वर दानसुरांनी मदत करावी असे आव्हान सलून चालक रामेश्वर क्षीरसागर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top