नाभिक समाजातील गोविंद दळवी संपूर्ण माहिती : Govind Dalvi Complete Information

Govind Dalvi Complete Information 1

“कैची – वस्तरा” व्यवस्थेची “हजामत” करनारा गोविंद दळवी

बहुजन समाजाची शान आणि आम्हा सर्वांचा अभिमान असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व ॲड. “गोविंद दळवी” यांना काळ्या कोटमध्ये पाहिल्यावर मला जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करता येत नाही. आज सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो. मला त्यांना या ड्रेस कोड अनेक दिवसांपासून पाहण्याची इच्छा होती. Govind Dalvi Complete Information

ती आज त्यांच्या सदिच्छा भेटीने पुर्ण झाली. दळवी सरांचे कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व वाखाणण्याजोगे आहे.आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दळवी सरांना वंचित आघाडीच्या यशोरथात स्वतः च्या बरोबर बसून घेतले आणि बहुजन समाजाला एका तडफदार व्यक्तीमत्त्वाची ओळख करून दिली. तसेच सरांनी सुद्धा आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या अमोघ वक्तृत्वाने बहुजन समाजातील लोकांची मने जिंकून घेतली.

आणि स्वतःला सिद्ध करून दाखवले.बघता बघता अगदी कमी कालावधीत बहुजन समाजात त्यांची ओळख निर्माण झाली. परंतु एवढ्यावर थांबणारे दळवी सर कसले? बहुजन समाजातील प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला कायद्याचा हात धरावा लागेल हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी एल.एल.बी.पदवी पुर्ण करुन एके दिवशी काळा घालून कोर्टात हजर झाले.Govind Dalvi Complete Information

हा दिवस म्हणजे सरांच्या जीवनाला कलाटणी देणारा दिवस ठरला. त्यांनी हा निर्णय सहजासहजी घेतला नाही. खुप विचार करून निर्णय घेतला. आजपर्यंत यशाचं शिखर गाठण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि समाजातील हितचिंतक मानसाकडुन झालेला त्रास तसेच आपल्या समाजावर उच्चवर्णीय लोकांकडुन होणारे हल्ले या सर्व गोष्टींचा विचार करून सरांनी हा निर्णय घेतला आहे.

Govind Dalvi Complete Information 2

त्यांना या ड्रेस कोड मध्ये पाहून मला खुप आनंद झाला. मी खुप भारावून गेलो.त्यांना त्यांच्या जीवनाच्या नवीन इनिंग साठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सरांनी बोलताना सांगितले की, समाजाच्या कोणत्याही समस्या असतील तर त्या सोडवणे हे माझे आद्य कर्तव्य राहील. खरोखरच दळवी सरांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व तेजोमय होवो.

Govind Dalvi Complete Information

दिवस,१४ एप्रिल २०१८… वेळ, दुपारची असेल कोणती तरी… सोलापुरातील बैठका, सभा संपवून बाळासाहेबांना तातडीने अकोल्याकडे निघायचं होतं… बाळासाहेबांची वाट पहात हेलिकॉप्टर सोलापुरच्या ‘त्या’ हेलिपॅडवर उभं होतंय. तिकडे निघायच्या ठिकाणावर बाळासाहेबांनी एका कार्यकर्त्याच्या कानात ‘हळूच’ काही तरी सांगितलं…Govind Dalvi Complete Information

अन एकच शोधाशोध सुरू झाली…. गोविंद दळवीला शोधा?… जो-तो गोविंद दळवीला शोधू लागला?… प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता… साहेबांनी गोविंद दळवीला का शोधायला सांगितलं?… अखेर आजूबाजूला कुठं तरी गोविंद दळवी सापडला… अन त्याला साहेबांसमोर नेण्यात आलं… गोविंदलाही कळत नव्हतं.

त्यालाही एकच प्रश्न पडला होता… साहेबांनी आपल्याला का बोलावलं असेल?. ‘तो‘ काहीसा घाबरा-घुबरा होतच साहेबांजवळ आला. साहेब त्याला म्हणालेत, “गोविंद!”चल गाडीत बस. आपल्याला ‘हेलिपॅड’ कडे निघायचे आहे. आपण हेलिकॉप्टरने अकोल्याला जातो आहे.

गोविंद दळवी यांचे भाषण ऐकण्यासाठी खाली क्लिक कर

👉🏿 गोविंद दळवी 👈🏿

प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत

गोविंदला काहीच कळत नव्हते. गोविंदला एरव्ही बसशिवायचा प्रवासच माहित नव्हता. आज थेट हेलिकॉप्टरची ‘सफारी’ घडणार होती. अन तीही थेट बाळासाहेब आंबेडकरांसोबत… त्याला जगण्याचं बळ देणाऱ्या त्याच्या बाबासाहेब आंबेडकर या ‘वैचारिक बापा’च्या रक्ताच्या आणि विचारांचा वारसा सांगणाऱ्या नातवासोबत… गोविंदला काहीच सुचत नव्हतं…Govind Dalvi Complete Information

तो काहीसा भांबावलेल्या अवस्थेतच बाळासाहेबांच्या गाडीत बसला… गाडी अत्यंत वेगाने ‘हेलिपॅड‘कडे निघाली… इकडे बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकाच गोष्टीचं कुतूहल अन चर्चा होती… नांदेडच्या कुणी तरी गोविंद दळवी नावाच्या सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्याला आज बाळासाहेबांनी आपल्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसवलं.

हेलिकॉप्टर मधील प्रवास

इकडे हेलिकॉप्टरनं सोलापूरच्या हेलिपॅडवरून अकोल्याकडे ‘झेप’ घेतली. परंतू, गोविंदचं भांबावलेपण अजुनही संपलेलं नव्हतं… तितक्यात “बाळासाहेबांनी” त्याला अगदी सहजपणे म्हटलं, “काय रे गोविंद!, कसं सुरू आहे तुझं काम?. गावाकडे घरचे कसे आहेत?. ‘घरी कोण-कोण असतं?”. तुझं घर कसं चालतं?.Govind Dalvi Complete Information

उदरनिर्वाहासाठी काय काम करतो?… एव्हढा मोठा नेता बापाच्या मायेनं एव्हढ्या आपुलकीनं आपल्याबद्दल विचारतो हे ऐकूनच त्याला गलबलून आलं… हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर ‘हवेत’ हा आपल्या कार्यकर्त्याचं जमिनीवरचं वास्तव जाणून घेणारा नेता पाहून गोविंदचे डोळे डबडबलेत. त्यानं सर्व कौटूंबिक ‘वास्तव’ बाळासाहेबांना सांगितलं.

त्यानंतर पक्षसंघटना, पक्षबांधणी, भविष्यात वंचितांच्या चळवळीच्या वाटचालीवरही दोघांची चर्चा रंगत गेली. तितक्यात अकोला आलं. अकोल्याच्या शिवणी विमानतळावर हेलिकॉप्टर ‘लँड‘ झालं. आतापर्यंत चळवळीबद्दल बाळासाहेबांसोबत ‘हवेत’ झालेल्या चर्चेला आता गोविंदला ‘जमिनी‘वर प्रत्यक्षात उतरवायचं होतं.Govind Dalvi Complete Information

अन बाळासाहेब नावाच्या परिसाच्या स्पर्शानं आपल्यातील कार्यकर्त्याचं अन संवेदनेचं सोनं करायचं अशी शपथच त्यानं जणू त्या दिवशी आपल्या मनाशी घेतली. त्याला बाळासाहेबांनी अकोल्यातून निरोप दिला. अन त्यानं तिथून थेट अकोल्याचं बस स्टँड गाठलं. अन नांदेडकडे जाणारी बस पकडली.

अगदी तासभरापुर्वी हेलिकॉप्टरमध्ये ‘आकाशा’त असलेला गोविंद तासाभरानंतर बसने नांदेडकडे निघाला होता. परंतू, त्याला ना हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचा माज होता, ना बसमध्ये बसल्याची खंत… त्याच्यात बसमधून नांदेडGovind Dalvi Complete Informationकडे निघतांना फक्त एक मोठं समाधान होतं… ते समाधान होतं ‘बाळासाहेब‘ नावाचा राजकारणातला नवा ‘प्रकाश’ गवसल्याचं.

याच ‘प्रकाशवाटे‘तून वंचितांसाठी नवा ‘राज’मार्ग शोधण्याचा निश्चय त्यानं मनोमन केला होताय. बाळासाहेबांनी राजकारणाच्या गावकुसाबाहेर असलेल्या न्हावी समाजातील “गोविंद दळवीला” दिलेली ही दुसरी संधी… याआधीची पहिली संधी मिळाली होती ती नांदेडच्या सभेत वक्ता म्हणून बोलण्याची…

नांदेडच्या सभेतील भाषण

गोविंद दळवी… नांदेड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातला न्हावी समाजातील वैचारिक युवक कार्यकर्ता… गोविंदनं बालपणापासून गरिबीचे चटके सोसलेले. लोकांच्या शेतात मजूर म्हणून ढोर-मेहनत केलेली. कळत्या वयापासून आपला पिढीजात व्यवसाय करीत कैची-कंगव्याशी मैत्री केली. सलुनचं दुकान टाकायची परिस्थिती नसल्यानं कधी पोत्यावर बसून कटींग-दाढी करायची.

तर कधी ‘धोपटी‘ घेऊन घरोघरी जावून हजामती करायच्या. दोन दशकांपुर्वी ग्रामीण भागात न्हाव्याला फारसं आदराचं स्थान नसायचं. त्याही परिस्थितीत गोविंदमधला कार्यकर्ता, संवेदनशील माणूस घडत होता. त्याला घडवलं ते पुस्तकांनी… कटींग-दाढी करतांना ग्राहक नसले की तो पुस्तकं वाचायचा.Govind Dalvi Complete Information

पुस्तकातून त्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज भेटलेत. याच महापुरूषांनी त्याची वैचारिक जडण-घडण केली. यातूनच तो २००७ पासून सामाजिक चळवळीत ओढला गेला. अन २०१८ मध्ये त्याचा संबंध प्रकाश आंबेडकरांच्या चळवळीशी आला.

तो प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय चळवळ आणि मांडणीनं झपाटून गेला. तो आंबेडकरांच्या प्रत्येक सभेत, आंदोलनात हिरीरीनं सहभागी होवू लागला. अन त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडला तो नांदेडच्या ‘त्या’ सभेत… १७ जानेवारी २०१८… नांदेडमधील नवा मोंढा मैदान लोकांच्या गर्दीनं अगदी फुलून गेलं होतं.

या सभेला प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी संबोधित करणार होते… अन तितक्यात व्यासपीठावरून भाषणासाठी ‘गोविंद दळवी’ हे नाव पुकारण्यात आलं… भाषणासाठी आयोजकांनी दिलेला वेळ होता फक्त सात मिनिटांचा… गोविंद ‘त्या’ विराट जनसमुदायापुढे उभे राहिलेत… अन त्यानंतर गच्च भरून आलेलं.Govind Dalvi Complete Information

आभाळ बरसावं तसं गोविंदची वाणी बरसत होती. लोकांच्या टाळ्यांनी अक्षरश: मैदानाचं आकाश दणाणून गेलं. सात मिनिटांचे वीस मिनिट झाले तरी लोकं त्यांना ‘माईक’ सोडू देत नव्हते. गोविंदनं आज सर्वार्थानं मैदान जिंकलं होतं… ‘माईक‘कडे जातांना ‘तो’ गोविंद दळवी होता. मात्र, ‘माईक’ सोडून परत येतांना तो प्रकाश आंबेडकरांच्या चळवळीची ‘मुलूखमैदान तोफ’ झालेला होता.

गोविंद दळवींची ओळख प्रकाश आंबेडकरांच्या चळवळीत एक आक्रमक, अभ्यासु आणि शिस्तबद्ध वकृत्वशैलीचा वक्ता म्हणून झाली होती. बाळासाहेब आंबेडकर यांनी गोविंद दळवी यांच्यातील कर्मठ, कृतीशील आणि निष्ठावान कार्यकर्ता ओळखला होता. तो आता सभा गाजवायला लागला होता. ही मुलूख मैदानी तोफ पुढे पक्षाच्या मुंबईतील शिवाजी पार्कवरील जाहीर सभेपासून महाराष्ट्राच्या गल्ली-बोळातील सभेत निनादू लागली.

वंचित मध्ये राज्य प्रवक्ते

यानंतर गोविंद दळवींची नोंद राज्यातील वंचित बहूजन आघाडीच्या नेत्यांमध्ये गणली जावू लागली. पुढे त्यांना वंचित बहूजन आघाडीचं प्रवक्तेपद दिलं गेलं. सभेतील प्रेक्षकांचा कल, आवाजातील आणि विचारातील स्पष्टता, विषयाचे सखोल ज्ञान, अचुक मांडणी, परिस्थितीची टायमिंग आणि शब्दांवर असलेली पकड या सर्व गुणांमुळे गोविंद दळवीची भाषण गाजत गेली.Govind Dalvi Complete Information

यामुळे लोकसभा निवडणुक प्रचारात स्टार प्रचारक म्हणून दुसरी नियुक्ती झाली. या निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रचारसभांचा राज्यभरात धुरळा उडवला. पक्षाचा त्यांच्यावरचा विश्वास वाढत गेला. त्यांना पुढे पक्षाचं राज्याचं महासचिवपद बहाल केलं गेलं. अन पुढे पक्षात अतिशय महत्वाच्या असलेल्या उपाध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागली.

हा संपुर्ण सन्मान होता त्यांच्यातील निष्ठेचा, समर्पणाचा अन चळवळीवरच्या श्रद्धेचा… आज वंचित बहूजन आघाडी या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून गोविंद दळवींचं काम अतिशय उत्तमपणे सुरू आहे.

नाभिक समाजातील वकील साहेब

एरव्ही पत्रकार म्हणून राजकीय व्यक्तींवर लिहिण्याचं मी कटाक्षानं अन कायम टाळतो. कारण, राजकीय व्यक्तीमत्वांवर समाजात अनेक मत-मतांतरं असू शकतात. मला त्यात फारसं स्वारस्य नसतं. मात्र, मला गोविंद दळवी या कार्यकर्त्याचा प्रवास फार आश्वासक वाटतो. कारण, तो राजकारणाच्या अन राजकीय नेत्यांच्या कोणत्याच प्रचलित व्याख्येत बसत नाही.

एरव्ही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर फारशा दखलपात्र नसलेल्या ‘न्हावी’ या वंचित समाजातून ते आले आहेत. त्यातही नेतेपदाची ओळख मिळेपर्यंत ते आपली ‘धोपटी’ घेत घरोघरी हजामती करायचं काम करायचे. आजही चळवळ सांभाळून ते त्यांचा व्यवसायही सांभाळत त्यांनी वकीलीचं शिक्षण पुर्ण केलंय.Govind Dalvi Complete Information

कधीकाळी “कैची-कंगव्यानं” लोकांची हजामत करणारा गोविंद आता ‘वकीलसाहेब’ म्हणून व्यवस्थेतील असंवेदनशीलतेची हजामत करतोय. कधीकाळी न्हावी, वारीक, म्हाली म्हणून आवाज देणारी माणसं ॲड. गोविंद यांना ‘वकीलसाहेब’ म्हणून आदरानं हाक मारतात. ही ओळख त्यांना दिलीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाच्या प्रेरणेनं. अन हिच प्रेरणा घेत ते आज बाबासाहेबांच्या नातवाच्या वंचितांच्या चळवळीसाठी स्वत: झटतो आहे.

संघर्षमय जीवन प्रवास

घरची परिस्थिती, पैसै नसतांना वक्ता, नेता अशी ओळख मिळाल्याचे अलिकडच्या राजकारणात फार कमी उदाहरणं आहेत. त्यामूळे राजकारणाच्या वाळवंटात ‘गोविंद दळवी’ यांचं नेतेपदाच्या रांगेत येणं आश्वासकतेची ‘हिरवळ’ आहे. माझा त्यांचा राजकीय विचार, त्यांची मतं यासोबत काहीही संबंध नाही. मात्र, जो संबंध आहे तो संवेदनेचा…Govind Dalvi Complete Information

सर्वसामान्य तरूणही राजकारणात येऊन यशस्वी होऊ शकतात या नव्या उमेदीच्या नव्या पालवीचा. आज याच लढवय्या अन सर्वार्थाने वंचितांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे… गोविंददादा!, सर्वार्थाने खुप-खुप मोठे व्हा, वंचितांचा आवाज बनत तुमच्या विचारांची तोफ अशीच चौफेर धडाडू द्या… वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top