संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळ कर्ज योजना || Hairdresser Loan Scheme

Hairdresser Loan Scheme 1

Hairdresser Loan Scheme

संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक 05 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी (कंपनी अधिनियम 2013) नाभिक समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उप कंपनी म्हणून स्थापना करण्यात आली आहे या महामंडळाचे कार्यक्षेत्र सर्व 36 जिल्हे आहेत.Hairdresser Loan Scheme 

Hairdresser Loan Scheme 12

केसशिल्पी कर्ज योजनेचा उद्दीष्टे

राज्यातील नाभिक समाजाच्या कल्याण व विकासासाठी कामे करणे, त्यांना अल्पवयास दराने स्वयं रोजगारा करिता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसूली करणे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे, त्यांना व्यवसायासाठी साहित्य आणि सामग्री पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे, त्यांच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे व योजना साठी अहवाल तयार करणे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धरतीवर शासनाने मंजूरी दिलेल्या योजना राबविणे.Hairdresser Loan Scheme 

Hairdresser Loan Scheme 2

केसशिल्पी कर्ज योजना आवाहन

देशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नोकर्यांची मागणी आणि उपलब्धता यात मोठी दरी निर्माण झाली आहे. राज्यात सुशिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचा संपत्ती म्हणून उपयोग करून घेणे आवश्यक आहे. व्यक्ती, कुटुंब व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., या महामंडळाची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे नाभिक समाजाकरिता संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची स्थापना केली आहे.Hairdresser Loan Scheme

महामंडळाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीपर्यंत राबविल्या जातात. उपलब्ध मनुष्यबळ व निधी लक्षात घेऊन आजपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याचा महामंडळाने प्रयत्न केला आहे.
राज्यातील इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजाची लोकसंख्या विचारात घेता ज्या लाभार्थ्यांनी महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी कर्जाची नियमित वसुली देवून परतफेड करावी. जेणेकरून सदर वसूल रक्कमेतून समाजातील इतर गरजू व होतकरू पात्र इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील व्यक्तींना महामंडळाच्या योजना अंतर्गत कर्ज वितरित करणे शक्य होईल, करिता सर्व लाभार्थींनी कर्जाची नियमित परतफेड करून महामंडळास व समाजास सहकार्य करावे.Hairdresser Loan Scheme 

Hairdresser Loan Scheme 9

रु १.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना

  1. अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे.
  2. अर्जदाराची सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा.
  3. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरिता रु १.०० लक्ष
  4. लाभार्थींचा सहभाग निरंक राहील.
  5. नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रु २०८५/- खेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे.४% व्याजदर आकारण्यात येईल.Hairdresser Loan Scheme 

Hairdresser Loan Scheme 6

कर्ज योजनेचा फॉर्म कोठे मिळेल ? 

संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळाचा कर्जाचा फॉर्म कुठे मिळतो? हे बऱ्याच जणांना माहीत नसते तर या कर्जाचा फॉर्म प्रत्येक जिल्ह्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग म्हणजेच ओबीसी आर्थिक विकास महामंडळामध्ये मिळतो. या कर्ज योजनेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे समाज कल्याण ऑफिस असते. त्या ऑफिसमध्ये हा फॉर्म मिळतो.Hairdresser Loan Scheme 

Hairdresser Loan Scheme 5

अर्जदार लाभार्थींची अर्हता/पात्रता

  1. लाभार्थी इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजाचा असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  2. तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  3. बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजने करिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु १,००,०००/- पेक्षा कमी असावे.Hairdresser Loan Scheme 
  4. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
  5. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
  6. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

Hairdresser Loan Scheme 9

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशील

  1. उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने अर्जदार प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या प्रति.
  2. जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो.
  3. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.
  4. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/ जन्मतारखेचा दाखला.Hairdresser Loan Scheme 
  5. २ जामीनदारांची हमीपत्र अथवा गहाणखत
  6. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र.
  7. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने/ लायसन्स.
  8. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दर पत्रक.
  9. महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार इतर कागदपत्रांचा तपशील.
  10. अर्जदाराने मूळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रति जोडाव्यात.

Hairdresser Loan Scheme 10

कर्जासाठी दोन जामिनावर आवश्यक

संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाच्या माध्यमातून सलून व्यवसायासाठी एक लाख रुपये थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आठ म्हणजे दोन जामीनदार लागणार आहेत त्यापैकी

  1. सरकारी दोन नौकरदाराची हमीपत्र किंवाHairdresser Loan Scheme 
  2. शेतकऱ्याच हमीपत्र (7/12)

Hairdresser Loan Scheme 3 Hairdresser Loan Scheme 4

केसशिल्पी कर्ज योजनेच कार्यक्षेत्र 36 जिल्ह्यात

संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळाचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये आहे ते कार्यक्षेत्र पुढील प्रमाणे आहे.Hairdresser Loan Scheme 

संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाचा GR पहाण्यासाठी खाली क्लिक करा

image 2

https://nabhikparivar.com/wp-content/uploads/2024/09/Hairdresser-Loan-Scheme-14-gr.pdf 1

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top