मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा सांडुजी वाघ : Hutatma Sanduji Vagh

Hutatma Sanduji Vagh1

नमस्कार मित्रांनो आज आपण मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा सांडुजी वाघ यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याची माहिती घेणार आहोत.तुम्हाला हि माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा.Hutatma Sanduji Vagh

Hutatma Sanduji Vagh2

Hutatma Sanduji Vagh

मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.काहिची इतिहासाने दखल घेतली.तर काही इतिहासाच्या पुस्तकाच्या पानापर्यंत पोहचलेच नाहीत.म्हणून त्यांच बलिदान व्यर्थ गेले नाही.आशाच ज्ञात अज्ञात क्रांतिकारकामुळे मराठवाडा जुलमी निजामाच्या तावडीतून मुक्त झाला.आसाच एक तरुण तडफदार क्रांतिकारक म्हणजे हुतात्मा सांडुजी वाघ होय.Hutatma Sanduji Vagh

सांडुजी सखाराम वाघ यांचा जन्म 5‌ जुलै 1927 रोजी बोरगाव (अर्ज)ता फुलंब्री जिल्हा औरंगाबाद येथील नाभिक समाजाच्या माता लक्ष्मीबाई व पिता सखाराम संसार वेलीवर जन्मलेल्या सुपुत्राचे नाव सांडू ठेवण्यात आले. यावेळी मराठवाडा निजामाच्या अधिपत्याखाली होता.भारत देश इंग्रजा पासून स्वतंत्र झाला होता पण मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता.मराठवाड्यावर निजामाची राजवट होती.तो पाकिस्तान प्रमाणे स्वतंत्र राहु इच्छित होता.

Hutatma Sanduji Vagh4

साडुजी शिक्षणापासून वंचित

मराठवाड्यात निजामी राजवट होती.या राजवटीत जनतेला उर्दू भाषा शिकण्याची सक्ती केली होती.कोणताही कारभार उर्दू भाषेतून च केला जात होता.शाळा शिकायची असली तरी उर्दू भाषेतून शिक्षण घ्यावे लागत होते.उर्दु शिक्षण हे मुस्लिम समाजासाठी पुरक होते.त्या शिक्षणात निजामाच्या दिर्घ आयुष्यासाठी शाळेतून दररोज प्रार्थना घेतली जात असे.Hutatma Sanduji Vagh

जो निजाम भोळ्याभाबड्या जनतेवर अन्याय, अत्याचार करतो त्याचे आयुष्य आणि राजवट सुर्य,चंद्र असेपर्यंत राहो ही प्रार्थना सांडुजी वाघ यांच्या विचारांना पटनारी नव्हती.म्हणून सांडु वाघ यांनी शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला.यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहिले.

Hutatma Sanduji Vagh7

जनतेवर अतोनात अन्याय अत्याचार

जनतेने निजामाविरुद्ध उठाव करु नये.व स्वतंत्र भारतात सामील होऊ नये म्हणून निजाम राजवट जनतेवर अतोनात अन्याय अत्याचार करत होती .भोळी भाबडी जनता निमुटपणे सहण करत होती.पण सांडुजी वाघ यांना हे सहण होत नव्हते.हे अन्याय अत्याचार थाबले पाहिजे.नव्हे आपुन ते थांबवले पाहिजे.यासाठी सांडुजी वाघ यांनी आपल्या वयातील समविचारी तरुणांचा एक गट तयार केला.Hutatma Sanduji Vagh

या गटाचे नेतृत्व नाभिक समाजाचा तरणाबांड तरुण सांडुजी वाघ करत होता.कारण शरीर आणि मन वाघासारखे होते. या गटात काशिराम पाटील, बंडू खराट, स्वातंत्र्य सैनिक किसनराव वाघ,आशा अनेक तरुणांना सोबत घेऊन निजामी राजवट उलथून टाकण्यासाठी गणपती मंदिरात गुप्त बैठका घेऊ लागले.

Hutatma Sanduji Vagh3 1

 

साडुजींचे वैवाहिक जीवन

सांडू जसा जसा वाढू लागला तसा तसा त्याचा निजामाबद्दलचा द्वेष वाढत गेला. सांडूजींचे भटकते मन व समविचारी मित्रांचा गट पाहून सांडूजींचे वडील सखारामजी व आई लक्ष्मीबाई यांची चिंता वाढू लागली. मुलगा लग्न झाल्यावर संसारात गुरु फुटून जाईल अशी त्यांची धारणा होती. म्हणून वयाच्या 23 व्या वर्षी लग्न करण्याचा बेत करून सांडूजींचे द्रोपदाबाई बरोबर लग्न लावून देण्यात आले.Hutatma Sanduji Vagh

सांडूजींचे बलदंड शरीर ठेंगणा बांधा व डोक्यात निजाम विरुद्ध राग व मनात वाढणारे राष्ट्रप्रेम यामुळे अन्यायाची चीड निर्माण होऊन निजामी हस्तकाचे रजकाराचे गरीब जनतेवर व महिलावर होणारे अत्याचार अन्याय सांडूजींना उघड्या डोळ्यांनी पाहवत नव्हते.

अधिक माहितीसाठि येथे क्लिक करा
👉🏿 हुतात्मा सांडुजी वाघ 👈🏿

Hutatma Sanduji Vagh6

निजामाचे जनतेवर अन्याय

सांडूजींचे बलदंड शरीर ठेंगणा बांधा व डोक्यात निजामी सेना विरोधाचा राग, मनात वाढणारा राष्ट्रप्रेम यामुळे अन्यायाची चीड निर्माण होऊन. निजामी हस्तकाचे रजाकाराचे गरीब जनतेवर व महिलावर होणारे अत्याचार, अन्याय सांडूजींना उघड्या डोळ्यांनी पाहत नव्हते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नाभिक व्यवसाय करून वडिलांना हातभार लावत असताना.

मनाने मात्र अस्वस्थ बच्चन होते. पोटापाण्याचा व्यवसाय करीत राहण्यापेक्षा निजामाची जुलमी राजवट जुगारून देणे अधिक महत्त्वाचे आहे. असा ठाम निर्णय सांडूजींनी घेतला होता. समविचारी तरुणाचा एक गट त्यांनी निर्माण केला होता. काशीराम पाटील, किसनराव पाटील ,बंडू खरात, गोविंद खरात, किसनराव वाघ यांच्या सहकारी तरुणांना एकत्रित करून गावठी बंदुका तलवारी भाले आदी गावठी शस्त्रे त्यांनी जमवली होती.Hutatma Sanduji Vagh

त्या काळात रजाकार टोळकाधारीसारखे गावावर तुटून पडत होते. त्यांच्या जुलमी अत्याचाराच्या कथा त्या काळाच्या वृत्तपत्रातून ठळकपणे जळकू लागल्या होत्या. मराठवाड्यातील माता-भगिनींच्या शिलाईपर्यंतचे हात घालण्याचे मजल या रजाकार जुलमी राजवटीने केली गेली होती. यामुळे प्रत्येकाच्या मनात निजामाच्या सैन्याबद्दल आग धगधगत होती. स्थानिक स्थानिक बंधू भगिनींच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला होता. तरुणांच्या अंतकरणात निजामी राजवटी विरुद्ध वनवा धुमसत होता.

Hutatma Sanduji Vagh5

सांडू वाघ यांचे बलिदान

13 सप्टेंबर 1948 रोजी भारताने निजामी राजवटी वरुद्ध जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कारवाईला प्रारंभ केला. तेव्हा रजाकराचा जुलूम शिगेला पोहोचला होता. निजामी राजवटीची ती शेवटची तडफड होती. रजाकार दुष्ट पणे गावेचे गावे जाळून टाकू लागली होती .परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले होते.

अशातच दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामातील इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला गेला. तो क्षण म्हणजे नाभिक समाजाच्या व देशाच्या इतिहासात ती चित्त थरारक घटना म्हणजे “हुतात्मा सांडू वाघ यांचे बलिदान” होय. बोरगाव अर्ज परिसराला निजामी सैन्याने सळो-की- पळवून सोडले होते. त्या दिवशी सांडू वाघ व त्याचे सहकारी नांदखेडा तालुका बदनापूर जंगलात निजामी सैन्यावर तुटून पडले.Hutatma Sanduji Vagh

त्यावेळेस लढाईवर जातानी द्रोपदाबाईचा त्यांनी निरोप घेतला. व येणाऱ्या बाळाला तू सांभाळ असे सांगितले .त्यावेळेस द्रोपदाबाई सहा महिन्याच्या गर्भवती होत्या. सांडूजी आपल्या सहकार्यासह जंगलात निजामी सेनांकडून होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार शूरपणे करीत होते. अशातच सांडूच्या ठिकाणाचा पत्ता निजामी सैन्यांना फंद फितूर ने मिळून त्यांना “नादखेडा” जंगलामध्ये घेण्यात आली. त्यांचे सहकारी सांडूजी प्रतिकार करताना निजामी सैन्याकडून घेरले केले.

अधिक माहितीसाठि येथे क्लिक करा
👉🏿  हुतात्मा सांडुजी वाघ 👈🏿

Hutatma Sanduji Vagh8

सांडुजी चे शिर झाडावर टांगले

जंगलामध्ये सांडुजी प्रतिकार करताना निजामी सैन्याकडून घेरले गेले. सांडुजींना हाल हाल करून त्यांचा जंगलात शिरच्छेद करण्यात आला. या पाशवी अत्याचाराची परिसरात दहशत बसावी म्हणून त्यांचे देह धड उघड्यावर सोडून शीर घेऊन बोरगाव अर्ज येते शीर वेशी जवळच्या लिंबाच्या झाडाला टांगण्यात आली .

व देह जंगलात पडून असल्याने त्यांचे सहकारी येतील व त्यांनाही घेरल्या जाईल असा समज झाल्याने देहाच्या हाल हाल करून तसाच पडून ठेवण्यात आला होता. ही वार्ता त्यांच्या सहकाऱ्यांना लागली म्हणून सूर्यास्तापर्यंत दबा धरून बसलेल्या त्यांच्या मित्रांनी सूर्यास्तानंतर सांडुजींचा देह काटेरी फासावर टाकून अग्नी दहा देण्यात आला.Hutatma Sanduji Vagh

अग्नीच्या जलोटात पाहून रजाकरी सैन्य तिकडे सरसवले परंतु तोपर्यंत सहकार्य तेथून प्रसार झाले होते. 15 सप्टेंबर 1948 रोजी सांडूजींच्या बलिदानाचे वृत्त सर्वत्र पसरले हस्त संतोष निर्माण झाला त्याच्या बदल सर्वत्र चीड वाढत गेली.

अन मराठवाडा मुक्त झाला

सांडूजीच्या बलिदानाने सर्वत्र असंतोष निर्माण झाला होता. रजाकरा बद्दल चीड वाढत गेली होती. रझाकार सैन्याची अनेक ठिकाणी पिछेहाट होऊ लागली होती. निजामी राजवटीने आपली पीछेहाट पाहता “मराठवाडा मुक्त” करण्याचा निर्णय 16 सप्टेंबर रोजी भारत सरकारला कळवला. व 17 सप्टेंबर रोजी अनेक शूरवीरांच्या बलिदानानंतर मराठवाडा निजामाच्या जोकडातून मुक्त झाला.Hutatma Sanduji Vagh

त्यानंतर पुढे “द्रुपदाबाईंना” कन्यारत्न प्राप्त झाले त्यांचे नाव “कडूबाई” ठेवण्यात आले. पुढे कडूबाईचा विवाह पंडित कुटुंबात झाला. आज त्या वृद्धावस्थेत आहेत. प्रचंड बलिदान करणाऱ्या या कुटुंबाला दैना अवस्था जगावे लागते. व त्याच्या स्मारकाची दुरुस्त व्हावी ही गोष्ट राष्ट्रासाठी भूषण व नाही. नाभिक समाजाने देशाच्या स्वातंत्र्य यज्ञात केलेल्या आत्म बलिदान व शूर भूमिपुत्राची गाथा घराघरापर्यंत जायला हवी.आजच्या तरुण वर्गाने या बलिदान मागील गांभीर्य व शूरवीरांचे बलिदान समजून घेऊन स्वतःतील अस्मिता जागृत केली पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top