भारतीय स्वातंत्र्य लढा असो मराठवाडा मुक्ती संग्राम असो, जंगल सत्याग्रह असो की परकीयांना देशातून परतून लावण्याचे कार्य असो या सर्व कार्यात नाभिक समाजातील महापुरुषांचे खूप मोठे योगदान आहे.यापैकी मराठवाडा मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देनारे हुतात्मा शाहिर लालाजी वाघमारे यांच्या बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
Hutatma Shahir Lalaji Waghmare
हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन इंग्रजांच्या तावडीतून भारत देश स्वतंत्र केला. पण काश्मीर,जुनागड आणि हैदराबाद हे प्रांत अजूनही भारतात सामील झाले नव्हते. अशावेळी “स्वामी रामानंद” यांच्या नेतृत्वाखाली “हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा” सुरू झाला.Hutatma Shahir Lalaji Waghmare.
“कासीम रजवीच्या” नेतृत्वाखाली संस्थानातील अनेकांवर “रजाकारांनी” अत्याचाराला सुरुवात केली. निजामाची जुलमी राजवट हिंदू जनतेवर अत्याचार करत होती. त्यांच्या बातम्या हैदराबादच्या सरहद्दीवर असलेल्या सोलापूर उस्मानाबाद नांदेड जिल्ह्यात पसरु लागल्या. जनतेने याविरुद्ध अनेक ठिकाणाहून निजामाला विरोध लढा सुरू केला.Hutatma Shahir Lalaji Waghmare.
अशावेळी बार्शी तालुक्यातील काही नेत्यांनी रामलिंगच्या डोंगरावर कॅम्प उघडला होता. याचा मुख्य उद्देश म्हणजे निजाम सरकारच्या हद्दीतील पोलीस स्टेशनवर हल्ले करणे, हद्दीतील व्यापाऱ्यांच्या धनधान्याची लूट करणे, गरिबांना धान्य वाटप करणे, पत्रके काढणे, जनजागृती कार्य करणे, राष्ट्रीय पोवाडे, राष्ट्रीय गाणे गाऊन स्वाभिमान जागृत करणे अधिकारी सुरू केले होते.
पहिला लढा उस्मानाबाद तालुक्यातील आळणी या गावी दिला गेला. दुसरा बार्शी आणि उस्मानाबादच्या सहरादीवर लढला गेला. त्यावेळी वैराग जवळील “धामणगाव” येथील “शाहीर लाला वाघमारे” यांना हौतात्म्य प्राप्त झाले.Hutatma Shahir Lalaji Waghmare.
पोवाड्यातून जनजागृतीचे कार्य
शाहीर लालाजी वाघमारे हे स्वतः हातात डफ घेऊन राष्ट्रीय पोवाडे म्हणून जनजागृती करत होते. त्यांच्या पोवाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. निजामशाहीचा जुलमी कारभार, भारतीय स्त्रियावर होणारे अत्याचार, अन्यायाविरुद्ध वीर रसयुक्त पोवाड्यातून लोकांचा स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य शाहीर लालाजी वाघमारे आपल्या छोट्याशा पथकामार्फत करत असत.Hutatma Shahir Lalaji Waghmare.
हळूहळू ही वार्ता निजामाच्या रजाकराच्या कानी गेली. शाहीर लालाजी पोवाड्यांनी जनता खळबळून उठू लागली. निजाम आणि रजाकराविरुद्ध लढण्यास तयार होऊ लागली. तेव्हा निजाम सरकार खडबडून जागी झाले. त्यांनी शाहीर लालाजी वाघमारेना पकडण्यासाठी त्याकाळी पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पण बरेच दिवस लालाजी सापडत नव्हते.
रातोरात कार्यक्रम करून शाहीर भूमिगत होत असत. कार्यक्रम अचानक ठरत आणि कार्यक्रम संपल्यावर लालाजी भूमिगत होत असत. रजाकराची माणसे त्यांच्या मागावर होती. त्यांना शोधत होती.Hutatma Shahir Lalaji Waghmare.
शेवटी फितुरीने लालाजींचा घात केला
एका जवळच्या नातेवाईकाच्या आग्रहाने लालाजींच्या पोवाडा चा कार्यक्रम ठरविला. पाहुण्यांनी शाहीरला शाहीर आल्यावर जेवणाचा कार्यक्रम आखला. आणि जेवण होईपर्यंत गुप्त संदेश रजाकडाकडे पाठवला. कार्यक्रम भारतीय हद्दीत सुरू होणार होता. पण कार्यक्रमाच्या पूर्वीच रजाकरांनी धाड पडली आणि त्यांनी कपटाने धरून लालाजी वाघमारे यांना निजाम हद्दीत नेऊन घेऊन गेले.Hutatma Shahir Lalaji Waghmare.
14 जून 1948 च्या दैनिक लोकसेवा, सोलापूर मध्ये शाहीर लालासाहेब वाघमारे हे गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. रजाकरांनी त्यांना आपल्या निजाम मुलाखात घेऊन जाऊन त्यांचा छळ करायला सुरुवात केली होती. शाहीर लालाजी वाघमारे यांनी जाहीर माफी मागवी. अशी माफी मागितली तरच त्यांना सोडून देण्याचे रजाकरांनी आश्वासन दिले.Hutatma Shahir Lalaji Waghmare.
पण स्वाभिमानी शाहिरांनी त्यांना नकार दिला. शाहीर वाघमारे यांनी ठामपणे सांगितले “मेलो तरी बेहतर पण रजा कराची माफी मागणार नाही” तेव्हा त्यांच्या छळाला सुरुवात केली. अनेक प्रकार प्रकारे त्यांचा छळ होऊ लागला. पोटावर झालेल्या मोठ्या जखमामुळे लाला तडफडत होते पण रजाकरांना त्यांची दया आली नाही इतक्या जखमा होऊनही देखील लाला मरत नाही म्हणून रजाकार चिडून म्हणायचे.
अब भी साला मरता नहीं
शेवटी रजाकरांनी शाहीर लालांना जमिनीत गळ्यापर्यंत पुरले. फक्त तोंड जमिनीवर उघडे ठेवले. अशा अवस्थेतील लाला “भारत माता की जय” “वंदे मातरम” आशा घोषणा देतच होते. घोषणा देऊन घशाला कोरड पडली. तेव्हा त्यांनी पाणी मागितले. पाणी तर दिले नाहीतच.
उलट त्यांच्या तोंडावर रजाकरांनी लघुशंका केली. अशा गळ्यापर्यंत उरलेल्या अवस्थेत “शाहीर लाला वाघमारे” यांना धामणगाव वैराग जवळ हौतात्म्य प्राप्त झाले.Hutatma Shahir Lalaji Waghmare.
अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈
धामनगाव येथे हुतात्मा स्मारक
हुतात्मा शाहीर लालाजी वाघमारे यांची आठवण म्हणून सोलापूर जिल्ह्यातील हुतात्मा स्मारक धामणगाव येथे बांधण्यात आले आहे. महाराष्ट्र जनसंपर्क कार्यालयाने “दिव्यत्वाची जेथे प्रचिती” या पुस्तकात शाहीर लाला वाघमारे यांची संबंध माहिती संग्रहित केली आहे.Hutatma Shahir Lalaji Waghmare.
धामणगावच्या हुतात्मा स्मारकाला वंदन करण्यासाठी सरकारी अधिकारी 9 ऑगस्ट 1981 पासून जातात शाहीर लालाजी वाघमारे “अविवाहित” होते. आजही त्यांचे नातेवाईक, मंडळी धामणगाव बार्शी येथे मोठ्या कष्टाने जीवन कंठीत आहे. पुण्यस्मृतीला अभिवादन करून म्हणूया…
“जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल झाले रे तुझेच हे रे तुझेच बलिदान”
हुतात्मा शाहीर लालाजी वाघमारे यांची जयंती 19 मे 1915 हौतात्म्य 17 सप्टेंबर 1948