पाठ्यपुस्तकात संत सेना महाराज यांच्या या अभंगाचा समावेश || Including this Abhanga of Sant Sena Maharaj in the textbook

Including this Abhanga of Sant Sena Maharaj in the textbook 1

संत सेना महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या अभंगांचा अभ्यास करत असताना. त्यांचा एक अभंग महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने, इयत्ता पाचवी च्या मराठी पुस्तकात समावेश केल्याचे आढळून आले.तो अभंग कोणता आहे? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.Including this Abhanga of Sant Sena Maharaj in the textbook

Including this Abhanga of Sant Sena Maharaj in the textbook 2

भारतरत्न भीमसेन जोशींनी गायला

 संत सेना महाराज यांचा जन्म बांधवगड मध्यप्रदेश येथे हिंदी भाषिक भागात झाला असला तरी त्यांनी मराठी भाषेत खुपच छान अभंग रचना करून वारकरी संप्रदायाची शिकवण दिली आहे.

संत सेना महाराज यांचा एक अभंग भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला आहे.त्या अभंगांमध्ये पंढरपूरचा महिमा वर्णन केला आहे.तो अभंग पुढीलप्रमाणे आहे.Including this Abhanga of Sant Sena Maharaj in the textbook

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ||
आनंदें केशवा भेटताची ||१||
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनीं ||
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ||२||
ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ||
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे ||३||
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ||
ऐसा वेणुनांदी काला दावा ||४||
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ||
ऐसे पहाता निर्धार नाही कोठे ||५||
सेना म्हणे खूण सांगितली संती ||
या परती विश्रांती नाही जीवा ||६||

वरील अभंग पहाण्यासाठी

image 2
👉 येथे क्लिक करा 👈

पाठ्यपुस्तकात या अभंगाचा समावेश

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने, इयत्ता पाचवी च्या मराठी पुस्तकात पान क्र 88 वर, संत सेना महाराज यांच्या एका अभंगाचा समावेश केला आहे.तो अभंग खालील प्रमाणे आहे.Including this Abhanga of Sant Sena Maharaj in the textbook

धन कोणा कामा आले ||
पहा विचारुन भले ||१||
ऐसे सकळ जानती ||
कळोनिया आंधळे होती ||२||
स्त्रिया पुत्र बंधु पाही ||
त्याचा तुझा संबंधु नाही ||३||
सखा पांडुरंगावीन ||
सेना म्हणे दुजा कोण ||४||

Including this Abhanga of Sant Sena Maharaj in the textbook 1

या अभंगाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. “सेनाजी म्हणतात धनसंपत्ती कोणाच्या कामाला आली आहे? काय याचा जरा नीट विचार करून पहा. धनाचा मोह व्यर्थ आहे. हे तर सर्वजण जाणून आहेत.

                  पण कळून सवरून लोक आंधळे होतात. याला काय म्हणावे? स्त्रिया, पुत्र, बंधू व इतर सर्व आप्त यांचा व तुमचा खरे पाहता काहीही संबंध नाही. कारण तुमच्या जीवनाचे सार्थक यापैकी कोणीच करू शकत नाही. एका पांडुरंगा शिवाय तुमच्या जिवलग सखा दुसरा कोणीही नाही.”Including this Abhanga of Sant Sena Maharaj in the textbook

वरील अभंग पहाण्यासाठी

image 2
👉 येथे क्लिक करा 👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top