जागतिक महिला दिनानिमित्त तीन महिलांचा प्रेरणादायी जीवनप्रवास || Inspiring life journey of three women on International Women’s Day

Inspiring life journey of three women on International Women's Day  1

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही नाभिक समाजातील आशा तीन महिलांची सत्य माहीत वाचकांपर्यंत घेऊन आलो आहोत.ज्यांनी कठीण परिस्थितीतवर मात करून हजारो महिलासमोर आदर्श निर्माण केला आहे.
एक महिला लग्नानंतर एका मुलीच्या जन्मानंतर स्पर्धा परीक्षा देऊन न्यायाधीश पदी विराजमान झाली आहे. दुसरी महिला पतीच्या निधनानंतर पतीचा दाढी कटींग चा व्यवसाय करुन चार मुलींचे लग्न केलेली आहे. Inspiring life journey of three women on International Women’s Day 

तर तीसरी महिला एक दिवस आपला पती आजारातून (ब्रेन डेड) बरा होईल व आणि मी आदर्श शिक्षका झालेली पाहिल या आशेवर मागील चार वर्षांपासून हिंमतीने जीवन जगत आहे.
या तीनही महिलांची सत्य कहाणी इतर महिलांना प्रेरणादायी ठरत असून या तीनही महिलांची सत्य माहीत आजच्या पोस्ट मध्ये सविस्तर पहानार आहोत.

Inspiring life journey of three women on International Women’s Day

या तीन महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

  1.  न्यायाधीश – आरतीताई गायकवाड
  2.  आदर्श शिक्षका – सौ सोनाली वाघमारे
  3.  पुरुषांची दाढी कटिंग करनार्या शांताबाई
    चला तर मित्रांनो या तीन महिलांची महिती पुढीलप्रमाणे

Inspiring life journey of three women on International Women's Day  2

न्यायाधीश आरतीताई गायकवाड नांदेड

मुलींच लग्न झाले की तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात.सासू,सासरे,पती ,मूल तीचे जीवन चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित होते.आशा परिस्थितीत नांदेड ची एक कन्या शिक्षणाचे महत्त्व जाणून लग्नानंतर एक मुलगी झाल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करते.

एक दोन वेळा अपयश आले तरी खचून न जाता ती जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करते आणि 2020 मध्ये MPSC च्या माध्यमातून न्यायाधीश पदासाठी घेण्यात येणारी परिक्षा देते आणि त्या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करून न्यायाधीश होते. Inspiring life journey of three women on International Women’s Day 

हे उच्च शिक्षण घेऊन लग्नानंतर घरीच बसनार्या महिलांसाठी‌ निश्चितच प्रेरणादायी बाब आहे.

image 2
न्यायाधीश आरतीताई गायकवाड यांना पहाण्यासाठी ऐकण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Inspiring life journey of three women on International Women's Day  3

आपला पती आजारातून बरा होईल या आशेवर जीवन जगनारी आदर्श शिक्षका सौ.सोनाली वाघमारे

सध्याच्या काळात सर्व काही ठीक असतांना पतीला सोडणार्या अनेक स्त्रिया आपन समाजात पहात असतो.पण मागील चार वर्षांपासून ब्रेन स्ट्रोक ने व्हेंटिलेटरवर पडून असलेला ( फक्त श्वास चालू) आसलेला आपला पती एक दिवस बरा होईल.Inspiring life journey of three women on International Women’s Day 

त्यांचे स्वप्न (शिक्षीका होण्यच) मी पुर्ण केले हे अभिमानाने सांगेल या आशेवर मागील चार वर्षांपासून शिक्षीका म्हणून ज्ञान दान करण्याचे काम करनार्या अहमदनगर जिल्ह्यातील सौ सोनाली विशाल वाघमारे होय.

ज्ञानदानाचे कार्य करत असतात कामाची पावती म्हणून सन 2022 मध्ये आदर्श शिक्षका पुरस्काराने सन्मानित केलेल्या सौ सोनाली विशाल वाघमारे या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.Inspiring life journey of three women on International Women’s Day

                                                                            image 2    

एक आदर्श शिक्षका ते आदर्श पत्नी म्हणून आपली भूमिका पार पाडणारी सौ सोनाली विशाल वाघमारे यांना पहाण्यासाठी ऐकण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Inspiring life journey of three women on International Women's Day  4

पुरुषांची दाढी कटिंग करनार्या शांताबाई

शांताबाई श्रीपती यादव हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील छोट्या गावातील नाव सध्या संपूर्ण भारतात गाजतय. “भारतातील पहिली नाभिक सलून व्यवसाय करनारी पहिली महिला” म्हणून यांची नोंद झाली आहे.
शांताबाई चे पती श्रीपती यादव हे सलून व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.निधनानंतर शांताबाईवर चार मुलींची जबाबदारी पडली. नातेवाईक दूर गेले.घरी शेतीबाडी नाही.

गावात रोजंदारीवर रोज काम नाही.चार मुलींना कसं जगवायच या विचाराने आत्महत्या करण्याचा विचार येत होते.पण आपुन आत्महत्या करून चार मुलींना वार्यावर सोडून योग्य नव्हते . म्हणून मिळेल ते काम करायच ठरल पण गावखेड्यात विधवेला कोणी काम देईना.

घरात अन्नाचा दानाही शिल्लक राहिला नव्हता घरात होते ती पतीची सलून सामानाची “धोपटी” .तेवढ्यात एक लहान मुलगा घरात आला आणि म्हणाला ,“मले कटींग करायची” त्या मुलाला माहित नव्हतं की कटींग करनारा जग सोडून गेला आहे.

तेव्हा शांताबाई ने विचार केला की का आपण आपल्या पतीचा सलून व्यवसाय करु नये? गावात केस कापण्यासाठी कोणीही नव्हते.ती जागा भरुन काढण्यासाठी शांताबाई तयार झाल्या.Inspiring life journey of three women on International Women’s Day 

  • खेडेगावात क्रांतिला/ परिवर्तनाला सुरवात
    शांताबाई च्या या निर्णयामुळे पुरुषांची मक्तेदारी असलेला सलून व्यवसायात महिलेच आगमण करनारी भारतातील पहिली घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडत होती.याच तिळमात्र शंका शांताबाई ला नव्हती.
    आता शांताबाई लहान मुलांबरोबर मोठ्यांच्या दाढी कटिंग करु लागल्या.चाढीच पाच रुपये शांताबाईला मिळू लागले.दिवसात चार पाच दाढी कटींग केल्या की पन्नास रुपये मिळायचे.कुटुंबाची पोटाची चिंता मिटली होती.
    शांताबाई ने दाढी कटिंग करून नुसत कुटुंबच चालवल नाही तर आपल्या पदरात असलेल्या चार मुलींचे लग्न पण स्वतः च्या हिमतीवर करून दाखवले आहेत.
  • माणसापेक्षा म्हशीचे पैसे जास्त
    शांताबाईला दाढी केली तर पाच रुपये मिळायचे पण एखादी म्हैश भादरायला मिळाली तर पन्नास रुपये मिळायचे.त्यामूळे दिवसाची कमई एका म्हशीत व्हायची.म्हणुन शांताबाई म्हैशीला भादरण्याची वाट जास्त पहात असत.
  • अनेक पुरस्कारांनी सन्मानित
    पुरुषांची दाढी कटिंग करणार्या शांताबाई ची कहाणी वार्यासारखी पसरली तेव्हा अनेक संस्थांनी शांताबाई ला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं.अनेक न्युज चॅनलवर मुलखती आल्या.शांताबाई ब्रेकिंग न्यूज बनल्या.
    परंतु शांताबाई ला पुरस्कारापेक्षा आपण आपल्या पतीच्या माघारी चारही मुलींचे लग्न केले याचा जास्त अभिमान आहे.Inspiring life journey of three women on International Women’s Day 

image 2

पुरुषांची दाढी कटिंग करणार्या शांताबाईला पहाण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈

मित्रांनो वरील तीनही महिलांची सत्य कहाणी आवडल्यास इतरांना शेअर जरुर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top