नमस्कार मित्रांनो आज आपण किल्ले प्रतापगड येथील शुरवीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची साक्ष देनारा बुरुज म्हणजेच जिवाजी बुरुज याविषयी माहिती घेणार आहोत.तसेच जिवाजी बुरुज नाव कसे देण्यात आले, कोणी दिले याविषयी सविस्तर माहिती वाचनार आहेत. Jivaji Buruj at Pratapgad
Jivaji Buruj at Pratapgad प्रत्येक मावळ्यांचा सन्मान
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन करत असतांना ज्या ज्या मावळ्यांनी पराक्रम गाजवला त्या त्या मावळ्यांचा यथोचित सन्मान केला.
जे मावळे स्वराज्याच्या कामी आले त्यांना त्यांच्या कार्यानुसार इतिहासात अजरामर केले.
जसे तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देनारा तोरणा किल्ल्याला सिंहगड असे नाव दिले. “गड आला पण सिंह गेला” बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची ओळख म्हणून “घोडखिंडीचे पावनखिंड असे नाव देण्यात आले” त्याच प्रमाणे
प्रतापगडावरील जिवाजी बुरुज
प्रतापगडावर अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून इतिहासात अजरामर झालेले शुरवीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची साक्ष देनार्या टेहळणी बुरुजाकडे बघुन.Jivaji Buruj at Pratapgad
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाजी महाले यांच्या खांद्यावर हात ठेवून सर्वांसमक्ष सांगितले की याच बुरुजाच्या साक्षीने जिवाजी महाले यांनी आमचे प्राण रक्षीले.
म्हणून आज पासून या टेहळणी बुरुजाला “जिवाजी बुरुज” म्हणून संबोधावे . धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य ते जिवाजी महाले.
प्रतापगडावरील जिवाजी बुरुज
👇👇👇👇👇👇👇
इतिहास संशोधक श्री हरीश ससनकर
प्रतापगडावरील जिवाजी बुरुजाविषयी शिवप्रेमीना माहिती देताना चंद्रपूर चे इतिहास संशोधक,आभ्यासक श्री हरीश ससनकर सर Jivaji Buruj at Pratapgad