नाभिक समाज भावना दुखावण्याऱ्या लोकम्हणी,चालीरीती आणि बोलीभाषेचा आधार घेऊन अपशब्द बोलणाऱ्या वर जरब बसण्यासाठी कायदेशीर कारवाईची तरतूद होण्यासाठी कायद्याची आवश्यकता.राज्यपाल यांना पत्राद्वारे विनंती. law for the barber community in Maharashtra
law for the barber community in Maharashtra
गावगाड्यात बाराबलुतेदारांमध्ये सर्वात शांतताप्रिय असणारा समाज म्हणजे नाभिक समाज “छत्रपती शिवाजी महाराजांच्या” काळापासून हा समाज प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, विश्वासू म्हणून ओळखला जातो.
आपल्या उदरनिर्वाहासाठी वंशपरंपरागत “केशकर्तनाचा” व्यवसाय करताना त्याने कुणाशीही द्वेषभावना मनामध्ये ठेवून गैरवर्तन केले नाही. त्याच्या कडे येणाऱ्या सर्व समाजघटकांना कोणताही भेदभाव न करता समानतेची वागणूक दिली.
अशा इमानदार समाजाबद्दल कधी “लोकम्हणीचा” आधार घेत तर कधी जातीयतेच्या अहंकाराने तर कधी शिव्यांच्या स्वरूपात तर कधी हिन भावनेतून तर कधी अनावधानाने अपशब्दाचा वापर केला जातोय ही खेदाची बाब आहे. law for the barber community in Maharashtra
लोकप्रतिनिधी कडून सर्वात जास्त अपशब्द
गावगाड्यात ही परिस्थिती नित्याचीच परंतु संविधानीक पद असलेल्या लोकप्रतिनिधींनी कधी राजकारणाचा भाग म्हणून तर कधी आपल्या राजकीय द्वेषभावनेतून सार्वजनिक ठिकाणी जाहीर वक्तव्य करून नाभिक समाजाच्या भावना दुखावण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत.
नाभिक समाजाची टिंगल/अपशब्द कसे बंद करायची यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
नाभिक समाजाची टिंगल बंद
ही बाब निंदनीय तर आहेच शिवाय लोकशाहीच्या संविधानीक मूल्यांची अवहेलना सुद्धा आहे.गेल्या काही दिवसांपासून यात वाढ झाली असून मोठ्या पदावर असलेल्या लोकप्रतिनिधी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी “नाभिक समाजाबद्दल” अपशब्द काढून नंतर दिलगिरी व्यक्त केली आहे. law for the barber community in Maharashtra
ग्रामपंचायत पासून मुख्यमंत्र्या पर्यंत अपशब्द वापरतात
यात राज्याचे तात्कालीन “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,विजय शिवतारे, भास्कर जाधव, गुलाबराव पाटील आणि आता पंचायत राज मंत्री कपिल पाटील“ यांनी नाभिक समाजाच्या व्यवसायाबद्दल चुकीचे वक्तव्य करून तमाम नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. law for the barber community in Maharashtra
एखाद्या जातिव्यवसायाबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे संविधानीक पद भुषवणाऱ्या व्यक्तींना अशोभनीय असून पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना संविधानीक मूल्यांची जोपासना करण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी हे असे वागणे संविधानाचे अवमूल्य आहे.
कायद्यासमोर सर्व समान तरीही अपशब्द
संविधानाने सर्व भारतीयांना समान नागरी दर्जा बहाल केला आहे.कोणत्याही भेदभावा शिवाय जगण्याचा आपला उदरनिर्वाह करण्याचा अधिकार दिला आहे. law for the barber community in Maharashtra
परंतु लोकप्रतिनिधींनीच जर आमच्या समाज भावनेबद्दल कधी राजकारणाचा भाग म्हणून तर कधी आपल्या राजकीय द्वेषभावनेतून सार्वजनिक ठिकाणी अपशब्द वापरून जाहीर वक्तव्य केले तर गावगाड्यातील सर्वसामान्यांना एकप्रकारे मुभा मिळण्यासारखे आहे.
म्हणून याला कुठेतरी जरब बसवण्यासाठी प्रतिबंध घालण्यासाठी कायदेशीर कारवाईची तरतूद आणि त्यासाठी कायद्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.याबाबत नाभिक समाज भावना लक्षात घेऊन मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांनी सकारात्मक विचार करावा यासाठी त्यांना ईमेलद्वारे विनंती करण्यात आली आहे.
मनोज कोरडे
अध्यक्ष – क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारक समिती, उल्हासनगर
कर्नाटकात राज्यात न्हावी, हजाम शब्दावर बंदी
महाराष्ट्राच्या बाजूला असलेल्या कर्नाटक राज्यामध्ये नाभिक समाजाला स्वाभिमानाने जगता यावे. सार्वजनिक ठिकाणी त्याला अपमानित करता येऊ नये. यासाठी “यदियुरपा हे मुख्यमंत्री” असताना त्यांनी एक कायदा संमत केला आहे. law for the barber community in Maharashtra
या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी किंवा कोठेही एखाद्या नाभिक बांधवांना नाव्ही ,हजाम असा जातीवाचक शब्दप्रयोग केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केल्या जाते. कर्नाटक राज्यामध्ये न्हावी समाजाला “सविता समाज” म्हणून मान्यता मिळालेली आहे.
तेथील नावी समाजाच्या कागदपत्रावर, शासकीय नोंदीवर फक्त आणि फक्त “सविता समाज” म्हणूनच नोंद केली जाते.
आंध्रप्रदेश मध्ये ही न्हावी,हजाम म्हटल्यावर गुन्हा
महाराष्ट्राला लागून असलेल्या आंध्र प्रदेश सरकारने सुद्धा नाभिक समाजाचा विचार करून नाभिक समाजासाठी 2022 मध्ये एक कायदा संमत केला त्या कायद्यानुसार नाभिक समाजाबद्दल जे काही शब्दप्रयोग आहेत त्या शब्दावर बंदी घालण्यात आलेले आहे. law for the barber community in Maharashtra
आणि फक्त “नाव्ही ब्राह्मण” या शब्दाचा वापर इथून पुढे सर्व कागदपत्र, प्रमाणपत्र, सरकारी नोंद या ठिकाणी केला जात आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा कायदा व्हावा यासाठी अनेक संघटना मागील अनेक दिवसापासून पाठपुरावा करत आहेत
श्री माधव भाले
संस्थापक अध्यक्ष
नाभिक सेवा संघ महाराष्ट्र