हुतात्मा शाहिर लालाजी वाघमारे ||

Martyr Shahir Lalaji Waghmare 1

जयंती विशेष लेख
नमस्कार मी सुधिर भाऊ गाडेकर
संस्थापक अध्यक्ष हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे स्मारक समिती धामणगाव ( दू )

Martyr Shahir Lalaji Waghmare

आपल्या सगळ्यांना हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणुन हा लेख लिहीत आहे. हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांचा जन्म १९ मे १९१५ रोजी धामणगाव ( दु ) वैराग जवळ ता.बार्शी जि.सोलापुर येथे एका गरीब “नाभिक” कुंटुबात झाला होता.
भारतीय स्वातंञ्य संग्रामात अनेक विरांनी आपले बलिदान दिलेआहे त्यामुळेच आपला भारत देश गुलामगिरीच्या बंधनातुन मुक्त झाला.
१५ आॅगस्ट १९४७ ला भारत देश मुक्त झाला खरा पण जुनागढ,काश्मिर आणि हैद्राबाद ही संस्थाने  भारत देशात विलिन झाली नव्हती.

स्वामी रामानंद यांचा सहवास

अशावेळी स्वामी रामानंद यांच्या नेत्तुत्वाखाली हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला.कासिम रजवीच्या या रझाककारांच्या संस्थानात अनेकांवर रजाककारांनी अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली.

निजामाची जुलमी राजवट जनतेवर अन्याय अत्याचार करीत होती.या अन्याय अत्याचाराच्या बातम्या हैद्राबादच्या सरहद्दीवर असलेल्या सोलापुर, ऊस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यात पसरु लागल्या.जनतेने या विरुध्द लढा सुरु केला.Martyr Shahir Lalaji Waghmare 

Martyr Shahir Lalaji Waghmare 2

अशावेळी बार्शी तालुक्यातील काही स्वातंञ्य सैनीकांनी रामलिंगच्या डोंगरावर कॅम्प ऊघडला याचा मुख्य ऊद्देश म्हणजे निजाम सरकारच्या हद्दीतील पोलीस स्टेशनवर हल्ले करणे हद्दीतील व्यापार्याच्या धन्यधान्याची लुट करुन गरीब जनतेला वाटणे,पञके काढुन जनजागृतीचे कार्य करण्यासाठी राष्टीय पोवाडे राष्टीय गाणी गाऊन स्वाभिमान जागृत करणे आदी कार्य सुरु केले होते.

शाहिरीतून स्वातंत्र्याची जोत पेटवली

पहिला लढा ऊस्मानाबाद तालुक्यातील आळणी या गावी दिला गेला.दुसरा बार्शी आणि ऊस्मानाबादच्या सरहद्दीवर म्हणजेच वैराग जवळील धामणगाव येथे याच वेळी हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांना हौतात्म प्राप्त झाले.
शाहीर लालासाहेब यांच्या अंगी लहानपणा पासुनच देशभक्ती अगदी ठासुन भरली होती. हुतात्मा शाहीर लालासाहेब हे स्वत: हातात शाहीरी चा डफ घेऊन राष्ट भक्ती पर पोवाडे म्हणुन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करायचे.त्यांच्या पोवाड्यांना चांगली प्रसिध्दी मिळत होती.

हुतात्मा लालाजी वाघमारे यांच्या बद्दल माहितीसाठी खाली क्लिक करा
image2

हुतात्मा लालाजी वाघमारे

निजामशाहीचा जुलमी कारभार,भारतीय स्ञीयांवर होणारे अत्याचार, अन्यायाविरुध्द लोकांना मध्ये स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य शाहीर लालासाहेब वाघमारे हे आपल्या साथीदारांच्या संगतीने करत असत यांची कुणकुण निजामाच्या रजाकारांना लागली.

लालासाहेबांच्या पोवाड्यांनी जनता निजाम सरकार च्या विरोधात खवळुन ऊठु लागली.निजाम आणि रजाकारांच्या विरोधात लढण्यास तयार होऊ लागली.तेव्हा निजाम सरकार खडबडुन जागे झाले.Martyr Shahir Lalaji Waghmare 

लालाजीला पकडण्यासाठी पाचशे रुपये

त्यांनी लालासाहेबांना पकडण्यासाठी त्याकाळचे ५००/- रुपये बक्षीस जाहीर केले पण काहीच ऊपयोग होत नव्हता रातोरात पोवाड्याचा कार्यक्रम करुन लालासाहेब भुमिगत होत असत राजाकाराची सैनिक त्यांच्या मागावर होते त्यांना शोधत होते पण ते काही सापडत नव्हते.शेवटी ते फितुरीला बळी पडले.Martyr Shahir Lalaji Waghmare 

Martyr Shahir Lalaji Waghmare 3
एका जवळच्या मिञाने अग्रह केल्यामुळे शाहीर लालासाहेब त्यांच्या घरी जेवण करायला अाल्यानंतर त्यांना जेवण झाल्यावर पोवाडा म्हण्याचा अग्रह धरला.या वेळीच गुप्त संदेश रजाककारांना पाठविला आणि नेमक त्याच वेळी रजाकारांच्या सैनिकांचा छापा पडला.त्यांनी लालासाहेबांना अटक करुन निजाम हद्दीत काटी सावरगावला घेऊन गेले.

१४ जुन १९४८ च्या दै. लोकसेवा या वृत्तपञामध्ये लालासाहेब आपल्या हद्दीतुन गायब झाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते.
वस्तुत: रजाकारांनी आपल्या हद्दीत लालासाहेबांचा अमानुष छळ सुरु केला होता.शाहीर लालासाहेबांनी निजामांची जाहीर माफी मागावी आणि माफी मागुन परत निजामांच्या विरोधात कुठलेही कृत्य करु नये असे केले तर त्यांना सोडुन देण्यात येईल असे अश्वासन दिले.

मरेपर्यंत हार मानली नाही

माञ स्वाभिमानी शाहीर लालासाहेबांनी त्यास नकार दिला .लालासाहेबांनी ठामपणे सांगितले की मी मेलो तरी चालेल पण रजाककारांची माफी मागणार नाही.त्यामुळे रजाककार खुप चिडले त्यांनी लालासाहेबांना खुप ञास देण्यास सुरुवात केली.शरीरावर तलवारीचे वार करुन जखमी केले शरीरावर व पोटावर वार झाल्यामुळे लालासाहेब हे खुप तडफडत होते.

मराठवाडा मुक्ती संग्रामात नाभिक समाजाचे योगदान माहितीसाठी खाली क्लिक करा
image2
नाभिक समाजाचे योगदान

पण जाराही दया माया त्या जुलमी रजाककारानां वाटली नाही.ते वारंवार लालासाहेबांना माफी मागण्यास सांगत होते पण काहीही ऊपयोग होत नव्हता.Martyr Shahir Lalaji Waghmare 
शेवटी लालासाहेबांना रजाककारांनी जमीनीत गळ्यापर्यंत पुरले फक्त तोंड ऊघडे ठेवले अश्या अवस्थेतही लालासाहेब भारत माता की जय वंदे मातरम आदी घोषणा देतच होते.घोषणा देऊन घशाला कोरड पडली तेव्हा त्यांनी पाणी मागितले पण त्या निच वृत्तीच्या रजाककारांनी पाणी तर दिलेच नाही तर ऊलट त्यांच्या तोंडावर लघुशंका केल्या.शेवटी अश्या अवस्थेत लालासाहेबांना आपल्या भारत देशासाठी हौतात्म प्राप्त झाले.

धामणगाव येथे हुतात्मा स्मारक

हुतात्मा शाहीर लालासाहेबांची आठवण म्हणुन १९८२ साली त्यांच्या जन्मगावी धामणगाव वैरागजवळ ता.बार्शी जि.सोलापुर येथे तत्कालीन “मुख्यमंञी” बॅरीस्टर अंतुले साहेबांनी हुतात्मा स्मारक बांधले आहे.
दर वर्षी शासनाच्या वतीने हुतात्मा स्मारकामध्ये २६ जानेवारी प्रजास्ताक दिन,९ अाॅगस्ट क्रांती दिन,१५ अाॅगस्ट स्वातंञ्य दिन हे आपले राष्टीय ऊत्सव साजरे केले जातात. १७ सप्टेबंर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ही साजरा केला जातो.
               “नाभिक समाजाच्या” वतीने व धामणगाव ( दु ) ग्रामस्थ यांच्या वतीने दरवर्षी १९ मे ला त्यांची जयंती साजरी केली जाते.सन २०१२ ला हुतात्मा स्मारकाची अवस्था खुप वाईट झाली होती तत्कालीन पालकमंञी यांना नाभिक समाजाने या जयंती च्या कार्यक्रमाला ऊपस्थीत राहण्याचे निमंञण दिले होते त्यावेळी ते आले असता.

त्यांनी स्मारकाची दूरअवस्था पाहुन तात्काळ निधी ऊपलब्ध करुन दिला होता आता पण सोलापुर जिल्हा परीषदेच्या वतीने नाभिक सामाजाने मागणी केल्या प्रमाणे या हुतात्मा स्मारकाची डागडुजी व इतर सोयीसाठी निधी दिला आहे.Martyr Shahir Lalaji Waghmare 

या मध्ये स्मारकाची डागडुजी,हायमास्ट दिवा,सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज,पोव्लिंग ब्लाॅक,आतील फरशी,खिडक्या,पिओ पि ईत्यादी कामे झाली आहेत.अजुनही काही कामे बाकी आहेत.सध्या या स्मारकामध्ये हुतात्मा शाहीर लालासाहेबाचा अर्धाकृती पुतळा बसविण्याची मागणी आम्ही संघटनेने व नाभिक समाजाने
महाराष्टाचे मुख्यमंञी यांचे कडे केली आहे.

जरी न गातील भाट डफावर तुझं यशोगान

” जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,सफल जहाले तुझेच बालिदान “
“जय हिंद,वंदे मातरम,जय महाराष्ट”
जयंती :- १९ मे
स्मृती दिन :- १७ सप्टेबंर
कळावे आपलाच :- सुधिर भाऊ गाडेकर
संस्थापक अध्यक्ष :- हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे स्मारक समिती धामणगाव दु.मो.नं.9561987611

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top