नाभिक समाजातील बलुतेदारी बंद करून काम तिथे दाम पद्धत लागू करनारे व बलुतेदारीतून नाभिक समाजाची मुक्तता करनारे नाभिक समाज भूषण स्व हणमंतराव साळुंके यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा या लेखात घेण्यात आला आहे.माहिती आवडल्यास इतरांना जरुर शेअर करा. Nabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
Nabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
सहकार महर्षी समाजभूषण हणमंतराव साळुंखे (तात्यासाहेब) यांचे सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात अलौकिक असे महानकार्य आहे. “1 एप्रिल 1929″2 रोजी तात्यासाहेब यांचा जन्म” एका गरीब नाभिक कुटुंबात झाला लहानपणीच त्यांचे आई वडील वारल्याने (तात्यांना ) हालाखीच्या परिस्थितीत आपले प्राथमिक शिक्षण पुणे येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण शिवाजी कॉलेज सातारा येथे पूर्ण केले.Nabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
नंतर तात्यासाहेबांना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी रुजू होण्याची संधी मिळाली तात्यांनी सर्व शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष दिले गावातील लोकांना शाळचे महत्व पटवून दिले शिक्षणामुळे जीवनात कशाप्रकारे प्रगती होते हे उदाहरणे देऊन पटवून देऊ लागले त्यामुळे लोकांना शाळेविषयी आवड निर्माण झाली त्यांनी आपल्या सेवेत कधीही खंड पडू दिला नाही.
पण तात्या साहेबांच्या मनात काही वेगळेच होते त्यांना गोरगरीब -कष्टकरी -शेतकरी-कामगार तसेच समाजातील कष्टकरी बांधवांची देनिय अवस्था हलखिचे जीवन जगणे बघवत नव्हते त्यांची समाज उत्क्रांतीच्या दिशेने तळमळ होती तात्यांनी काही दिवस नोकरी केल्यानंतर स्वतःहून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.Nabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
तात्यांनी बलुतेदारी बंद केली
गाव खेड्यातील एक -दोन घर असलेला आपला नाभिक समाज पारंपरिक बलुतेदारी पद्धतीवरच दाढी -कटिंग चा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असे अल्पसंख्यांक असलेल्या नाभिक समाजाकडे ना सरकारचे लक्ष म्हणून सर्व सरकारी योजने पासून नाभिक समाज कोसो दूर राहिला होता वर्षासाठी दाढी- कटिंग व्यवसाय करून जे काही( ज्वारी धान्य) बलुतेदार पद्धतीने मिळेल ते निमुटपणे घेऊन गुजरात करत होता.Nabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
गावागावात एक -दोनच घर असल्याने अनेकांच्या दबावाखाली हलकीचे जीवन जगत होता. नाभिक समाज बांधवांचे जीवन शेतकऱ्याप्रमाणे निसर्गावरच अवलंबून होते. निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकरी -शेतमजूर बलुतेदारीच ( ज्वारी धान्य) देत नसत. पुढच्या वर्षी देऊ असं सांगत त्यामुळे कधी कधी समाजावर उपासमारची वेळ येत येत असे. तात्यांनी समाज बांधवांना एकत्र केले.
जिथे काम तेथेच दाम
या प्रकारें बलुतेदारी बंद करून समाजाच्या प्रगतीची दारे खुली केली. ज्या समाजामध्ये आपण जन्माला येतो त्या समाजाचे आपल्यावर ऋण असते. त्याचप्रमाणे च्या भूमीत आपण जन्म घेतो त्या भूमीचे देखील आपल्यावर ऋण असते. या भावनेतून तात्यांनी समाजासाठी संघटना स्थापन केली. तर गावासाठी हनुमान प्रसारक मंडळ विद्यालय तसेच हणमंतराव साळुंखे ग्रामीण बिगरशेती शेती सहकारी पतसंस्था स्थापन केली. हे विशेष होय. त्याचप्रमाणेNabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
भारतरत्न कर्पुरी ठाकूर महाराष्ट्र
समाजभूषण हणमंतराव साळुंखे( तात्यासाहेब )यांनी आपल्या निवडक सहकार्यांना सोबत घेऊन 1982 साली कोल्हापुरात नाभिक समाजाचे सर्वात मोठे अधिवेशन घेण्याच्या आयोजन केले. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे तात्कालीन मुख्यमंत्री “भारतरत्न कर्पुरी ठाकूर” यांना विशेष आमंत्रित केले यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रात नाभिक समाजाची संघटना असावी त्यामुळे नाभिक समाजाच्या मागण्यांच्या आवाज शासन दरबारी पोहोचेल म्हणून कोल्हापूर येथे “भारतरत्न करपुरी ठाकूर” यांच्या उपस्थितीत भारताच्या इतिहासातील नाभिक समाजाचा मेळावा घेतला.Nabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना
क्रांतीचे दुसरे पाऊल म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळ या संघटनेची स्थापना केली. (या अगोदर “महात्मा ज्योतिबा फुले” यांनी 11 एप्रिल 1827 रोजी नाभिक समाजाच पहिल्या संघटन करून स्त्री विधवा झाल्यानंतर केशव पण करण्यात येत असे त्या विरोधात नाभिक समाज बांधवांना संप करण्यात ज्योतिबा फुले यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला होता व संघटन उभ करण्यास मदत केली होती. तेव्हापासून स्त्री विधवा झाल्यानंतरही केशव पण करण्यात येत नाही. म्हणून नाभिक समाजाच्या संघटनेचे जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांची नोंद आहे.)Nabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
समाज भूषण हणमंतराव साळुंखे( तात्यासाहेब) यांनी नाभिक समाजासाठी आपल्या आयुष्यातील अनमोल असे 35 वर्ष मराठवाडा -विदर्भ- कोकण -पश्चिम महाराष्ट्र सह संपूर्ण महाराष्ट्र समाज बांधवांच्या भेटी -चर्चा भव्य परिषदा घेत . पिंजून काढला सर्व समाजाला संघटित करून प्रबोधन केले त्यापैकी मुंबई व शिर्डी येथील परिषदांची इतिहासाने देखील नोंद घेतली आहे.
अकरा लाख वापस केले.
नाभिक समाज भूषण हणमंतराव साळुंके यांच्या विषयी अधिक माहितीसाठी
2000 साली महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधवांनी सहकार महर्षी समाजभूषण हणमंतराव साळुंखे (तात्यासाहेब )यांना अकरा लाख रुपयांची देणगी शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. परंतु(तात्या साहेबांनी) त्यामध्ये स्वतःचे अकरा हजार रुपये रोख रक्कम टाकून परत ती रक्कम समाजासाठी वापस केली. त्या पैशातून पुणे येथे नाभिक समाज बांधवांच्या कार्यालयाची इमारत खरेदी केली.Nabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले त्या संताच्या ओवीप्रमाणे( तात्या साहेबांनी) आपले अनमोल जिवन समाजासाठी समर्पित. तात्या साहेबांनी तथागत गौतम बुद्धांच्या समतेचा विचार सर्व जनतेमध्ये पोहोचविला शिव- फुले -शाहू -आंबेडकर या महामानवांचे विचार देखील समाजामध्ये पेरून समाजाला क्रांतीच्या दिशेने मार्गक्रम केले. अशा सहकार महर्षी समाजभूषण( तात्यासाहेबांचे )विचार समाजापर्यंत पोहोचवणे हेच स्मृतिदिनी खऱ्या अर्थाने तात्या साहेबांना अभिवादन ठरेल विनम्र अभिवादन__ जिवश्री शंकर मुंजाजी सुरूशे डिग्रसकर
हनुमंतराव साळुंखे यांचा परिचय
स्वर्गीय समाजभूषण तात्या हनुमंतराव साळुंखे हे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी नाभिक समाजाच्या संघटनात्मक कार्याला दिशा दिली आणि समाजवादी विचारसरणीचा वारसा पुढे नेला.Nabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
- तात्यांचे शिक्षण पुण्यातील अनाथ विद्यार्थी वसतिगृहात झाले.
- या अनुभवामुळे त्यांच्यात समाजातील दुर्बल घटकांविषयी विशेष संवेदनशीलता निर्माण झाली.
- त्यांनी राष्ट्र सेवा दलात काम केले.
- यामुळे त्यांच्यावर एस. एम. जोशी, डॉ. राममनोहर लोहिया, साने गुरुजी यांसारख्या समाजवादी नेत्यांचा प्रभाव पडला.
- तात्यांनी महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
- १९८१ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कार्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ही संस्था नाभिक समाजाची मातृसंस्था मानली जाते.
- तात्यांना “समाजभूषण” हा किताब मिळाला.
- त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त पूर्णाकृती पुतळा आणि स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्यात आला.
- माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना गौरवोद्गार देताना म्हटले की, “तात्यांनी सामाजिक चळवळीचा इतिहास जिवंत ठेवला.”
तात्या हनुमंतराव साळुंखे यांनी समाजाला दिलेला संदेश असा होता की संघटन, शिक्षण आणि समाजवादी विचारसरणी यांद्वारे दुर्बल घटकांना न्याय मिळवून देता येतो. त्यांचे जीवन हे माझ्यासारख्या समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. तात्यांचे जीवन आपल्याला सांगते की कष्टातूनच खरे नेतृत्व घडते. अभावातून आलेली संवेदनशीलता आणि समाजहिताची आस्था यामुळे त्यांनी आयुष्यभर दबलेल्या वर्गासाठी आवाज उठवला. त्यांच्या स्मृतीदिनी आपण त्यांच्या आदर्शांना वंदन करून समाजसेवेची दिशा अधिक बळकट करूया.Nabhik Samaj Bhushan Hanmantrao Salunke
जीवन जाधव.





