Nabhik Samaj Calendar 2023 Publication
Nabhik Samaj Calendar 2023 Publication औरंगाबाद येथे नाभिक समाजाचा ऐतिहासिक मेळावा 16 जानेवारी 2023 रोजी संत सेना भवन औरंगाबाद येथे पार पडला.या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक वंचित बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा ॲड प्रकाश आंबेडकर हे होते.या ऐतिहासिक मेळाव्यात नाभिक समाजाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा ॲड प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर मागण्यांच्या उपस्थितीत पार पडला.नाभिक समाज दिनदर्शिका तयार करण्याचे काम मा.श्री.उत्तम झगडे यांनी केले.मा.श्री.उत्तम झगडे हे सामाजिक कार्यकर्ते असुन जिवा सेना विदर्भ अध्यक्ष असून वंचित बहुजन आघाडीचे वाशिम जिल्हा सचिव आहेत.
सत्तेत सहभागी व्हा ॲड प्रकाश आंबेडकर
नाभिक समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाल्यानंतर नाभिक समाजाला मार्गदर्शन करताना म्हणाले की “इथल्या प्रस्थापितांनी व्यवस्थाच अशी केली की खालचा व्यक्ती वरती जाऊ शकत नाही.काही कुटूंबांनी सत्तेची चावी आपल्या कडे ठेवली आहे.राजसत्ते मध्ये घराणेशाही निर्माण केली आहे.हि घराणेशाही मोडीत काढण्यासाठी वंचित बहुजन समाजाने सत्तेत सहभागी झाले पाहिजे.बहुजन समाजाला सत्तेत सहभागी होण्यासाठी घराणेशाही वाले तिकीट देत नाहीत म्हणून मी राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.वंचीत बहुजन आघाडी मध्ये महाराष्ट्रातील जे समाज कधीही राजकारणात सहभागी झाले नाही आशा समाजाला संधी देण्याचे काम करत आहे.त्यामुळे बहुजन समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी व्हावे”.Nabhik Samaj Calendar 2023 Publication.
नाभिकांचा इतिहास लिहिताना शाई संपली सयाजी झुंजार
नाभिक समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळ्यानंतर कोल्हापूर येथून खास उपस्थिती राहिलेले नाभिक समाजाचे नेते मा श्री सयाजी यांनी नाभिक समाजाला मार्गदर्शन करताना सांगितले की, ”नाभिक समाजाचाइतिहास खुप प्रेरणादायी आहे.जिवाची बाजी लावून स्वराज्याच रक्षण करणारे वीर नाभिक समाजाने दिले.इतिहास घडवला एकाने आणि इतिहास लिहिला दुसर्यांनी .Nabhik Samaj Calendar 2023 Publication नाभिक समाजाचा इतिहास लिहनारांनी नाभिक समाजाच्या महापुरुषांचा उल्लेख एकेरी केला आहे.यावरुन त्यांची मानसिकता लक्षात येते.छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवनार्या विराच उल्लेख जिवाजी ऐवजी जिवा आसा केला आहे.तर छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणार्या कृष्णा भास्कर याचा उल्लेख कृष्णाजी भास्कर आसा केला आहे.मग प्रश्न निर्माण होतो की नाभिक समाजाच्या विरांचा इतिहास लिहिताना पेनची शाई संपली होती का?”
नाभिकांचा जन्म नाभितून झाला नाही.श्री.सोमनाथ साळुंखे
नाभिक समाज दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यासाठी सांगली जिल्ह्यातील नाभिक समाजाचे नेते व पुणे मतदार संघाचे उमेदवार मा.श्री.सोमनाथ साळुंखे हे उपस्थित नाभिक समाजाला मार्गदर्शन करताना म्हणाले की ,” स्वातंत्र्य पुर्व काळात महात्मा जोतिबा फुले यांनी नाभिक समाजाचा मेळावा घेतला होता.त्या मेळाव्यात विधवांचे केस न कापण्याचा ऐतिहासिक ठराव संमत केला होता.आता आपल्याला आसेच दोन ठराव संमत करायचे आहेत.
1) महापुरुषांचा उल्लेख आदरपूर्वक करायचा.जिवा ऐवजी जिवाजी महाले आणि शिवा ऐवजी शिवाजी काशीद आसा आदरपूर्वक उल्लेख करायचा.
2) आम्हाला सांगितले जाते की नाभिकाची उत्पत्ती हि कोणाच्या तरी नाभितून झाली आणि आम्ही पण माण्य करतो.यापुढे कोणीही आसे मानु नका की आमची उत्तपती हि बेंबीतून झाली तर आमची उत्तपती हि सर्वसामान्या सारखी आईच्या पोटातूनच झाली तरीही आम्ही पराक्रमी आहोत.तरच या मेळाव्यातून काही तरी साध्य झाले आसे म्हणता येईल.आसे मार्गदर्शन सांगली येथून खास उपस्थिती राहिलेले श्री सोमनाथ साळुंखे यांनी सांगितले”..Nabhik Samaj Calendar 2023 Publication.
मेळाव्यासाठी सकल नाभिक समाज उपस्थित
- औरंगाबाद येथील नाभिक समाज मेळाव्याचे तीसरे वैशिष्ट्य म्हणजे नाभिक समाजाच्या विविध संघटनेतील विविध पदाधिकारी उस्फुर्त पणे उपस्थित राहिले होते. या मेळाव्याचे अध्यक्ष माननीय एडवोकेट सोपानराव शेजवळ हे होते, प्रमुख मार्गदर्शक माननीय गोविंद दळवी हे होते, तर उद्घाटक म्हणून सोमनाथ साळुंखे यांची उपस्थिती होती.Nabhik Samaj Calendar 2023 Publication.
- प्रमुख पाहुणे-
मा श्रावण भातखडे नगरसेवक नगरपरिषद बार्शीटाकळी जिल्हा अकोला. मा हरिहर पळसकर सामाजिक कार्यकर्ते अकोट. मा सयाजीराव झुंजार नेते नाभिक समाज कोल्हापूर.Nabhik Samaj Calendar 2023 Publication. - प्रमुख उपस्थिती– मा वसंतराव जाधव, माननीय विष्णू वखरे, मा. सतीश जयकर, मा शिवनाथ लिंगायत, मा नानासाहेब पंडित, राजकुमार गाजरे, नवनाथ घोडके,मा रत्नाकर वर्पे, मनोज जाधव, सुशील बोर्डे, रत्नाकर पंडित, माधव भाले, मा शिवाजी पंडित, मा तुकाराम स्वीकार, वत्सलाताई पुंडलिक राऊत, मा शिवाजी लिंगायत, मा दत्तू बोर्डे, मा शंकरराव गायकवाड, ज्ञानेश्वर तारे, दिलीप बोर्डे, मा अण्णासाहेब बोरुडे.
- संयोजक-
मा.श्री.सचिन गायकवाड,मा.श्री निलेश (बंटी) बोर्डे.आयोजक समिती औरंगाबाद शहर व ग्रामीण - सुत्रसंचलन
मा.श्री.साहेबराव शेळके व सुरेश बोर्डे यांनी केले.Nabhik Samaj Calendar 2023 Publication.