नाभिक समाज अस्पृश्य नाही|| nabhik samaj is not untouchable

nabhik-samaj-is-not-untouchable 1

प्रा. लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी नाभिक समाजाला SC आरक्षण लागू करा म्हणून स्टेटमन दिले होते.त्यावर नाभिक आरक्षण परिषदेने विचार मंथन, चर्चा करून नाभिक समाजाला खरच SC आरक्षण मिळू शकते का? यावर विचार मंथन केले तेव्हा असे लक्षात आले की नाभिक समाज भारतात कोठेही अस्पृश्य नाही.त्यामुळे नाभिक समाजा SC मध्ये आरक्षण मिळू शकत नाही.हे सिद्ध झाले. nabhik samaj is not untouchable

nabhik samaj is not untouchable 2

nabhik samaj is not untouchable

नाभिक समाज हा सध्या OBC प्रवर्गात समावेश आहे.त्याला OBC आरक्षणाचा लाभ मिळतो. तरीही लक्ष्मण हाके यांनी नाभिक समाजाला SC आरक्षण मिळावे असे विधान केले होते.त्यामुळे नाभिक समाजात आरक्षणावरून संभ्रम निर्माण झाला होता.तो दुर करण्यासाठी नाभिक समाजाच्या वतीने दिनांक 11 आक्टोंबर 2025 रोजी तिर्थक्षेत्र शेगाव येथे “नाभिक आरक्षण परिषदेचे” आयोजन करण्यात आले होते.nabhik samaj is not untouchable

या परिषदेला महाराष्ट्रातील विविध विभागातून विचारवंत, कायदेतज्ज्ञ,आरक्षणावर ज्यांनी PHD केली असे डॉ संजयजी शेंडे यांची विशेष उपस्थिती होती.तसेच नाभिक समाजातील विविध संस्था, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत नाभिक आरक्षणावर सखोल चर्चा झाली, विचार मंथन झाले.चर्चा अंती पुढील ठराव समत करण्यात आला.

nabhik samaj is not untouchable 2

नाभिक समाजाचा इतर राज्यांत SC समावेश नाही

नाभिक समाजातील काही संघटना इतर राज्यांत नाभिक समाज SC आरक्षणात आहे असे सांगून महाराष्ट्रातही नाभिक समाजाला SC आरक्षण लागू करा म्हणून जिल्ह्याधीकारी यांना निवेदन देऊन SC आरक्षणाची मागणी करत होते.यामुळे नाभिक समाजात संभ्रम निर्माण झाला होता.की सध्या OBC आरक्षण वाचण्यासाठी लढायचे की SC आरक्षण मिळवण्यासाठी लढा उभा करायचा?nabhik samaj is not untouchable

हा संभ्रम दूर करण्यासाठी “नाभिक आरक्षण परिषदेचे” आयोजन करण्यात आले होते.या परिषदे आरक्षणाचे आभ्यासक डॉ संजयजी शेंडे यांनी सांगितले की इतर राज्यांत नाभिक समाज SC आहे म्हणून महाराष्ट्रात नाभिक समाजाला SC आर‌क्षण लागू करा म्हणने चुकीचे आहे. नाभिक समाजाला SC समावेशासाठी हा निकसच नाही. हि चुकीची मागणी आहे.

ज्या संस्था, संघटना आशी मागणी करत आहेत त्या संस्था संघटनानी आधी इतर राज्यांचा अभ्यास करावा.की कोणत्या राज्यात नाभिक समाज हा SC प्रवर्गात आहे? त्या राज्यातील पुरावे जमा करावेत.आणि नाभिक समाजाला SC आरक्षणासाठी हा निकष लागू होतो का ते तपासावे? मग मागणी करावी.असे आरक्षणाचे आभ्यासक डॉ संजयजी शेंडे यांनी सांगितले.

nabhik samaj is not untouchable 4

नाभिक समाज अस्पृश्य नाही

नाभिक समाजाला SC आरक्षणात समावेश करायचा असेल तर नाभिक समाज हा अस्पृश्य असला पाहिजे.SC आरक्षणात त्याच जातीचा समावेश होतो ज्या जातिला इतर जात समुह अस्पृश्य समजतात. अस्पृश्य म्हणजे काय? हे पुढील निकषावरुन लक्षात येईल.nabhik samaj is not untouchable

  1. जो जात समुह इतर समाजापासून दूर म्हणजे गावकुसाबाहेर राहतो.
  2.  ज्या जातसमुहाला सार्वजनिक पानवट्यावर पाणी भरण्यासाठी बंदी असते.
  3. ज्या जातसमुहाला सार्वजनिक मंदिरात प्रवेश बंदी असते.त्याला अस्पृश्य समजतात.
  4. अस्पृश्यतेमुळे सामाजिक मागासलेपण येते
  5. अस्पृश्यतेमुळे आर्थिक मागासलेपण आलेलं असेल.
  6. अस्पृश्यतेमुळे राजकीय मागासलेपण आलेलं असेल आशा जातसमुहाला अस्पृश्य समजतात.

वरील पैकी कोणतेही निकष नाभिक समाजाला लागू पडत नाहीत.म्हणून नाभिक समाजाचा SC प्रवर्गात समावेश होऊ शकत नाही.नाभिक समाज भारतात कोठेही अस्पृश्य नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top