महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाभिक समाजासाठी “संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाच्या” माध्यमातून केशशिल्पी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे .या योजनेचा लाभ नाभिक समाजाने घ्यावा असे आवाहन नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.Nabhik Samaj Loan Scheme
Nabhik Samaj Loan Scheme
नाभिक समाजाच्या सार्वांगीन विकासासाठी महाराष्ट्र सरकारने “संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाच्या” माध्यमातून विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत. या योजनेचे फॉर्म चे वाटप प्रत्येक जिल्ह्यातील “समाज कल्याण विभागात” सुरू झाले आहे. “थेट कर्ज योजनेच्या” माध्यमातून सलून चालकांना एक लाख रुपये बिनव्याजी चार वर्षांच्या परतफेडीवर उपलब्ध आहे. थेट कर्ज योजनेचा फॉर्म प्राप्त करण्यासाठी सलून चालकांनी आधार कार्ड आणि जातीच प्रमाणपत्र सादर करुन अर्ज प्राप्त करावा. Nabhik Samaj Loan Scheme
केशशिल्पी कर्ज योजनेबद्दल अधीक माहितीसाठी
खाली क्लिक करा
या योजनेचा अर्ज कोठे मिळेल?
संत सेनाजी महाराज केशशिल्पी कर्ज योजनेचा फॉर्म/अर्ज कोठे मिळेल हा बर्याच जनांना प्रश्न पडलेला असतो.तर या कर्ज योजनेचा फॉर्म/अर्ज हा प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागात (ओबीसी आर्थिक विकास महामंडळात) दहा रुपये देऊन मिळतो.मिळालेला फॉर्म व्यवस्थीत भरून परत त्याच कार्यालयात जमा करावा लागतो. Nabhik Samaj Loan Scheme
फॉर्म सोबत सादर करावयाची कागदपत्रे
संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील
- आधार कार्ड, पॅनकार्ड, दोन फोटो
- जातीच प्रमाणपत्र, वयाचा पुरावा TC
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र एक लाखाच्या आत
- सक्षम अधिकाऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र
- कुटुंबाचे रेशनकार्ड, शिधापत्रिका
- अर्जदाराचा सिबील स्कोर (500)
- आधार संलग्न बॅंक पासबुक झेरॉक्स Nabhik Samaj Loan Scheme
- व्यवसायाचे कोटेशन (दरपत्रक)
- व्यवसायाचे ना हरकत प्रमाणपत्र
- शॉप ॲक्ट लायसन्स/ उद्यम आधार
- व्यवसायाच्या अनुषंगाने इतर कागदपत्रे
- कर्ज मंजुरी नंतर दोन जामीनदार
- दोन सरकारी नौकरदाराचे हमीपत्र
- शेतजमिनीच्या 7/12 वर हमीपत्र
वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन “संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या” माध्यमातून “थेट कर्ज योजनेचा” लाभ घ्यावा. असे आवाहन नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष –श्री माधव भाले यांनी केले आहे. Nabhik Samaj Loan Scheme
केशशिल्पी कर्ज योजनेबद्दल अधीक माहितीसाठी
खाली क्लिक करा
महामंडळाचे कार्यक्षेत्र 36 जिल्ह्यात
महाराष्ट्र शासन,शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या दिनांक 25 सप्टेंबर,1998 रोजीच्या शासन निर्णयान्वये 23 एप्रिल,1999 रोजी (कंपनी अधिनियम 1956) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून कंपनी कायदा अन्वये नोंदणी करण्यात आली आहे.Nabhik Samaj Loan Scheme
संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक 5 जानेवारी,2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक 19/02/2024 रोजी (कंपनी अधिनियम 2013) नाभिक समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपणी म्हणून करण्यात आली आहे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र सर्व 36 जिल्हे असे आहे.