नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंतीची नोंद हिंदू धर्माच्या “विक्रम संवत” दिनदर्शिकेत मिळते. त्यामुळे महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधवांनी “विक्रम संवत” दिनदर्शिका वापरावी.जेनेकरुन संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंतीचा संभ्रम दूर होईल. The Vikram Samvat calendar
The Vikram Samvat calendar
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंती संदर्भात महाराष्ट्र खूप मोठा संभ्रम दिसून येतो. नाभिक समाजाच्या विविध संघटना वर्षात तीन वेळा संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची जयंती साजरी करतात.यामुळे संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची जयंती नेमकी कधी साजरी करावी या संदर्भात समाजामध्ये संभ्रम आहे.कारण कोणताही संत एकाच दिवशी जन्माला येत आसतो.
मग तीन वेळा जयंती का साजरी होते? नेमकी जयंती कधी साजरी करावी? याचा शोध घेण्यासाठी नाभिक सेवा संघाची टिम संत सेनाजी महाराज यांच्या जन्मठिकाणी (बांधवगड, मध्यप्रदेश)जाऊन तेथे अभ्यास करून जयंती बद्दल चा संभ्रम दूर केला.संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जन्मठिकाणी (बांधवगड , मध्यप्रदेश) “विक्रम संवत” दिनदर्शिकेनुसार संत सेनाजी महाराज जयंती साजरी होते. The Vikram Samvat calendar
त्याचदिवशी संपूर्ण देशात संत सेनाजी महाराज जयंती साजरी होते.त्याच दिवशी महाराष्ट्रात संत सेनाजी महाराज जयंती साजरी करण्याचे ठरले.मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्रात संत सेनाजी महाराज जयंती विक्रम संवत दिनदर्शिकेनुसार साजरी होते.
हिंदू धर्माच्या दोन दिनदर्शिका
भारतात विविध धर्मांच्या जशा वेगवेगळ्या दिनदर्शिका आहेत.तशाच हिंदू धर्माच्या दोन दिनदर्शिका आहेत.त्यापैकी
- शालिवाहन शके दिनदर्शिका
- विक्रम संवत दिनदर्शिका
शालिवाहन शके– शालिवाहन शके हि दिनदर्शिका महाराष्ट्रातील पैठण येथील शालिवाहन शके नावाच्या राजाने निर्माण केली.शालिवाहन शके दिनदर्शिका फक्त महाराष्ट्रा पुरती मर्यादित आहे. तर “विक्रम संवत” दिनदर्शिका संपूर्ण भारतात वापरली जाते. The Vikram Samvat calendar
शालिवाहन शके या दिनदर्शिकेचे नवीन वर्ष गुढीपाडव्याला चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी चालू होते.परंतू या दिनदर्शिकेनूसार संत सेनाजी महाराज यांच्या जन्माची नोंद नसून “विक्रम संवत” या राष्ट्रीय दिनदर्शिकेनूसार संत सेनाजी महाराज जन्माची नोंद सर्व ग्रंथात, पुस्तकात उपलब्ध आहे.
विक्रम संवत दिनदर्शिका
संपूर्ण भारतात वापरली जाणारी हि राष्ट्रीय दिनदर्शिका आहे.हि दिनदर्शिका सर्वात प्राचीन आणि सर्वमान्य आहे. या दिनदर्शिकेची निर्मिती “राजा विक्रमादित्य” यांनी केलेली आहे. संत सेनाजी महाराज यांच्या जयंतीचा उल्लेख याच दिनदर्शिकेनुसार सर्व ग्रंथात, पुस्तकात उपलब्ध आहे. तो उल्लेख पुढील प्रमाणे आढळतो.The Vikram Samvat calendar
“संत सेनाजी महाराज यांचा जन्म बांधवगड मध्यप्रदेश येथे विक्रम संवत 1357 वैशाख कृष्ण 12 आसा उल्लेख मिळतो” म्हणून महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधवांनी “विक्रम संवत दिनदर्शिका” वापरावी. व संत सेनाजी महाराज जयंतीचा संभ्रम दूर करावा. विक्रम संवत दिनदर्शिकेची सुरवात हि दिवाळी पाडव्याच्या दिवशी (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)होते.या दिवशी व्यापारी लोक नवीन खाते वही घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करतात.
एक देश, एक जयंती आणि एक फोटो
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशात विक्रम संवत दिनदर्शिकेनुसार साजरी होते.हिच विक्रम संवत दिनदर्शिका महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधवांनी वापरली तर संत सेनाजी महाराज जयंती चा संभ्रम दूर होईल.व संपूर्ण भारतात एकाच दिवशी साजरी होईल.हे नाभिक समाजातील ऐकतेचे प्रतिक असेल.म्हणजे एक देश, एक जयंती आणि संत सेनाजी महाराज यांचा सर्वत्र एकच फोटो असेल. The Vikram Samvat calendar
पंतप्रधानांकडून जयंतीच्या शुभेच्छा
भारताच्या इतिहासात प्रथमच एखाद्या पंतप्रधानाने संत सेनाजी महाराज जयंती निमित्त शूभेच्छा दिल्या ते पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय.यांनी संपूर्ण देशवासीयांना संत सेना महाराज जयंती निमित्त “विक्रम संवत दिनदर्शिकेनुसार” शुभेच्छा दिल्या होत्या. The Vikram Samvat calendar
विक्रम संवत दिनदर्शिका कोठे मिळेल
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंतीचा उल्लेख असलेली दिनदर्शिका म्हणजे “विक्रम संवत” हि दिनदर्शिका महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्या दुकानात धार्मिक पुस्तके उपलब्ध असतात तेथे “विक्रम संवत दिनदर्शिका” विक्रीसाठी उपलब्ध असते. काही जिल्ह्यात उपलब्ध नसल्यास फ्लिपकार्ट,ॲमेझॉन याठिकाणी ऑनलाइन उपलब्ध आहे. The Vikram Samvat calendar
कोठेच उपलब्ध न झाल्यास पर्याय
विक्रम संवत दिनदर्शिका महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी उपलब्ध नसली किंवा मिळालीच नाही तर काय करावे? यासाठी साधा उपाय आहे.तो म्हणजे तुमच्याकडे जी शालिवाहन शके ची दिनदर्शिका उपलब्ध आहे.त्या दिनदर्शिकेत “चैत्र कृष्ण 12 या तिथीला” संत सेनाजी महाराज जयंती ची खुन/ मार्किंग करुन ठेवावी. 2025 च्या कालनिर्णय, महालक्ष्मी या शालिवाहन शके दिनदर्शिकेत 25 एप्रिल रोजी.The Vikram Samvat calendar