भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे नाभिक समाजाच्या मेळाव्याच्या आयोजनासाठी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला याबद्दल या पोस्ट मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.Nabhik society meeting
भारतरत्न कर्पुरी ठाकूर
बिहार चे दोन वेळा मुख्यमंत्री झालेले तथा 2024 साली त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेले जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) येथे नाभिक समाजाची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.Nabhik society meeting
या बैठकिला मा.खासदार डॉ भागवतजी कराड साहेब (मा केंद्रीय अर्थमंत्री) व छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी महापौर श्री बापू घडामोडे यांची विशेष उपस्थिती होती.या बैठकीला नाभिक समाजाच्या विविध संघटनेच्या मुख्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यात महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक सेवा संघ महाराष्ट्र, अखिल भारतीय जिवा सेना, नारायणी सेना, नाभिक विकास मंडळ, संत सेना शिक्षण प्रसारक मंडळ इत्यादी संघटनेचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.Nabhik society meeting
जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम
जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (सन 2024-25) संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .यात बिहार येथे भारताचे उपराष्ट्रपती मा श्री जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत “कर्पुरी ग्राम” कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मगावी भव्य दिव्य आसा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती होती.या कार्यक्रमाला संपूर्ण देशातून विशेष मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
तसेच हैदराबाद येथील गुंटूर येथेही जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.Nabhik society meeting
आता महाराष्ट्रात पण पावसाळ्यानंतर भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 5 जुलै 2025 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आले ते पुढीलप्रमाणे आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे महामेळावा
भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथेही महामेळाव्याच आयोजन करण्यात येणार आहे.यासंबधी नुकतीच बैठक पार पडली.या बैठकीत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कर्पुरी ठाकूर जन्मशताब्दी वर्षानिमित्त महामेळावा यशस्वी करून दाखवायचा आहे.या महामेळाव्या निमित्त पुढीलप्रमाणे रुपरेषा ठरवली.Nabhik society meeting
कर्पुरी ठाकूर यांचे चिरंजीव रामनाथ ठाकूर यांची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर येथे कर्पुरी ठाकूर जन्मशताब्दी वर्षानिमित्त महामेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचे चिरंजीव मा श्री रामनाथ ठाकूर जे सध्या केंद्रीय राज्य कृषीमंत्री आहेत.त्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.मा श्री रामनाथ ठाकूर यांना महामेळाव्यासाठी घेऊन येण्याची जबाबदारी खुद्द मा खासदार भागवत कराड यांनी घेतली आहे.त्यांचे आणि रामनाथ ठाकूर यांचे घनिष्ठ संबंध आहेत असे खासदार भागवत कराड यांनी सांगितले.दिल्ली येथे आम्ही दोघे आजुबाजुला च राहत असल्याचेही खासदार भागवत कराड यांनी सांगितले.
तसेच या मेळाव्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पण प्रमुख उपस्थिती राहतील याची ग्वाही खासदार भागवत कराड यांनी सांगितले.तसेच जे जे भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या विचारांशी सहमत आहेत त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.असेही मा खासदार भागवत कराड यांनी सांगितले.Nabhik society meeting
कर्पुरी ठाकूर चौकाची, पुतळ्याची स्थापना होणार
छत्रपती संभाजीनगर येथे कर्पुरी ठाकूर जन्मशताब्दी वर्षानिमित्त महामेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्याची आठवण म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील एखाद्या गार्डना किंवा चौकाला भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचे नाव देण्यात येणार असल्याचे मा खासदार भागवत कराड यांनी सांगितले.
एवढेच नव्हे तर एखाद्या गार्डनमध्ये भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याची तयारी पण करु असे मा खासदार भागवत कराड यांनी सांगितले.यासाठी नाभिक समाजाच्या मान्यवरांना एखादे गार्डन निवडण्याचे काम खासदार भागवत कराड यांनी सांगितले.चौकाची,गार्डनला नाव देण्याची किंवा पुर्णाकृती पुतळ्याची तयारी करण्याचे काम माजी महापौर बापू घडामोडे यांच्या मार्फत करण्याचे ठरले.Nabhik society meeting
भागवत कराड म्हणाले की छत्रपती संभाजीनगर येथील 80% पुतळ्याचे काम मी महापौर असताना झाल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या नावाने चौक असावा असे मत अमोदकर साहेबांनी व्यक्त केले होते.
केशशिल्पी आणि विश्वकर्मा संबंधित अडचणी दूर करणार
भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महामेळावा आयोजित करण्याच्या बैठकीत श्री संतोष बोराडे यांनी केशशिल्पी व विश्वकर्मा योजनेतील अनेक अडचणींमुळे नाभिक समाजाला लाभ होत नसल्याचे सांगितले तेव्हा मा खासदार भागवत कराड म्हणाले की,“केशशिल्पी कर्जासाठी नाभिक समाजाची गॅरंटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी.यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करुन चर्चा करतो. व केशशिल्पी कर्ज योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी जातीने लक्ष घाततो.असेही खासदार भागवत कराड यांनी सांगितले.Nabhik society meeting