27 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने विधानसभेत अर्थसंकल्प मांडला.या अर्थसंकल्पात नाभिक समाजाच्या दोन मागण्याचा उल्लेख केला. पण यांना निधी जाहीर केला नाही. त्यामुळे जुण्याच मागण्याची नव्याने घोषणा करुन नाभिक समाजाची सरकार दिशाभूल करत आहे.असे नाभिक समाज म्हणतो.ते कस? या बद्दल या पोस्ट मध्ये आपण माहिती घेणार आहोत.Rain of announcements on nabhik samaj in the budget Read More 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला.त्या अर्थसंकल्पात नाभिक समाजाच्या जुण्याच मागण्याची नव्याने घोषणा केली.पण या मागणीसाठी आर्थिक तरतूद केली नाही.त्यामुळे ह्या घोषणा फक्त घोषणाच राहणार का? आसा प्रश्न नाभिक समाजाकडून विचारला जात आहे.Rain of announcements on nabhik samaj in the budget कारण कोणत्याही मागणीला जोपर्यंत निधी मंजूर केला जात नाही तोपर्यंत ती केवळ घोषणाच राहते.तसच काही नाभिक समाजाच्या संदर्भात झाले आहे.ज्या मागण्याची घोषणा केली त्या जुण्याच आहेत.त्यामुळे “जुण्या कढीला उतू आनण्याच” काम या सरकारनं केले आहे.आस नाभिक समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे. 27 फेब्रुवारी च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी नाभिक समाजाच्या ज्या दोन मागण्याचा उल्लेख केला त्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. वरील दोन मागण्याचा उल्लेख 27 फेब्रुवारी च्या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला.या बद्दल नाभिक समाजाच्या प्रतिनिधींचे मत घेतलं आसता त्यांनी सांगितले की या मागण्याची या आगोदर कित्येकवेळा घोषणा झाली आहे.Rain of announcements on nabhik samaj in the budget पण आर्थिक तरतूद न केल्याने यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यावेळी अर्थसंकल्प घोषणा करण्याऐवजी यासाठी निधी जाहीर करने अपेक्षित होते.पण तसे काही झाले नाही.त्यामुळे निधीसाठी पुन्हा पुढील अधिवेशनाची वाट पाहायची का? आसा प्रश्न नाभिक समाजाच्या वतीने विचारला जात आहे. संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ ची घोषणा पहाण्यासाठी खाली क्लिक करा नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सन 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “केशशिल्पी महामंडळ” स्थापन करण्यात येणार म्हणून तसा GR पण काढला होता. व या केशशिल्पी महामंडळावर नागपूर चे नाभिक समाजाचे मा श्री सुधीर (बंडू) राऊत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात येईल असे पत्र पण काढले होते.Rain of announcements on nabhik samaj in the budget हा GR पत्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या म्हणजे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काढले होते.त्यामुळे यावर कोणतीही कारवाई झाली नाही.नंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आधी हे “केशशिल्पी महामंडळ” कार्यान्वित करतील असे वाटले पण तसे झाले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी पार पडल्या तरीही नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण केलेल “केशशिल्पी महामंडळ” कार्यान्वित केले नाही. आता 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा तीच खेळी सरकार नाभिक समाजासोबत खेळत आहे.आसे चित्र दिसत आहे.या घोषणेचा फायदा फक्त नाभिक समाजाचे मत घेण्यासाठी करत आहे. जिवाजी महाले स्मारकासाठी घोषणा पहाण्यासाठी खाली क्लिक करा 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नाभिक समाजाच्या दोन मागण्याचा समावेश केला त्यापैकी दुसरी मागणी म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देऊन तेथे जिवाजी महाले यांच भव्य स्मारक उभारणार.हि घोषणा केली.पण या स्मारकासाठी खर्च किती येणार? त्यासाठी आर्थिक तरतूद कशी करणार? स्मारकासाठी निधी किती लागणार? या बद्दल कोणतीही स्पष्टता सांगितली नाही. प्रतापगड येथे जिवाजी महाले स्मारक उभारणार हे 2005 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ठराव केला होता.त्यासाठी पावने तीन कोटी निधी मंजूर केला होता.पण आता 2024 चालू आहे आजून साधे भुमिपुजन पण झाले नाही.Rain of announcements on nabhik samaj in the budget हि मोठी शोकांतिका आहे.जिवाजी महाले स्मारकांची जुणीच मागणी आहे.यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी जिवाजी महाले स्मारकासाठी निधीची तरतूद करुन कामाचे भूमिपूजन करणे अपेक्षित होते.पण तसे काही झाले नाही.फक्त जुण्याच मागण्याची नव्याने घोषणा करून पुन्हा निधीसाठी नाभिक समाजाला पाठपुरावा करावा लागणार असे दिसते. का पुन्हा दुसऱ्या अर्थसंकल्पाची वाट पहावी लागणार? आसा नाभिक समाजाकडून प्रश्न निर्माण केला आहे. 27 फेब्रुवारी च्या अर्थसंकल्पात ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत.त्या घोषणाची अंमलबजावणी करण्याअगोदर एसटी बस वर भरपूर जाहिराती चिटकवण्यात आल्या आहेत. एसटी बस च्या उजव्या, डाव्या, पाठीमागे सर्वत्र जाहिरात चिटकवण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर वर्तमानपत्रे, टिव्हीवर जोरदार जाहिरात चालू आहे.Rain of announcements on nabhik samaj in the budget यावरून एक गोष्ट लक्षात येते की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या जाहिराती चा सरकारला फायदा होईल.या जाहिराती वर जो खर्च सरकार करत आहे.तोच पैसा गोरगरिबांना तरुणांना रोजगार निर्मितीसाठी दिला असता तर याच तरुणांनी सरकारची जाहिरात फुकट केली असती.पण तसे होताना दिसत नाही. या जाहिराती वर सरकार करोडो रुपय खर्च करत आहे. 2012 ला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शहिद भाई कोतवाल यांच्या स्मारकासाठी, चित्रपटासाठी आणि गौरवग्रंथासाठी दिड कोटी चा निधी देण्यात येईल अशी घोषणा 2012 च्या अर्थसंकल्पात केली होती.आता 2024 चालू आहे आतापर्यंत ना निधी मिळाला,ना स्मारकाचे काम झाले,ना चित्रपट निर्मिती केली फक्त घोषणा केली आजून काहिही काम झाले नाही.Rain of announcements on nabhik samaj in the budget यामुळे 27 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पात ज्या घोषणा करण्यात आली आहे ती प्रत्यक्षात येईपर्यंत नाभिक समाजाचा या सरकरवर विश्वास नाही.नसता. “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” असं म्हणावे लागेल.Rain of announcements on nabhik samaj in the budget
जुण्याच मागण्याची नव्याने घोषणा
संत सेनाजी केशशिल्पी महामंडळ
प्रतापगडाच्या पायथ्याशी जिवाजी महाले स्मारक
घोषणांच्या जाहिरातीचा भाडिमार
2012 च्या अर्थसंकल्पातील दिड कोटीच काय झाले?
अर्थसंकल्पात नाभिक समाजावर घोषणाचा पाऊस || Rain of announcements on nabhik samaj in the budget
27 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने विधानसभेत अर्थसंकल्प मांडला.या अर्थसंकल्पात नाभिक समाजाच्या दोन मागण्याचा उल्लेख केला. पण यांना निधी जाहीर केला नाही. त्यामुळे जुण्याच मागण्याची नव्याने घोषणा करुन नाभिक समाजाची सरकार दिशाभूल करत आहे.असे नाभिक समाज म्हणतो.ते कस? या बद्दल या पोस्ट मध्ये आपण माहिती घेणार आहोत.Rain of announcements on nabhik samaj in the budget Read More