नाभिक समाजाने संत सेना महाराज जयंती बांधवगड प्रमाणे साजरी करावी || Sant Sena Maharaj Jayanti

Sant Sena Maharaj Jayanti 2

वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंती संदर्भात फक्त महाराष्ट्रात मतभेद दिसून येतात.हे मतभेद दूर करण्यासाठी संत शिरोमणी सेनाजी महाराज जयंती.त्यांच्या जन्मठिकाणा प्रमाणे म्हणजे “विक्रम संवत १३५७, वैशाख कृष्ण १२” ला साजरी करावी.पण महाराष्ट्रात बहुतांश लोक “विक्रम संवत” दिनदर्शिका वापरत नाहीत.ते “शालिवाहन शके” दिनदर्शिका वापरतात.जे शालिवाहन शके दिनदर्शिका वापरतात त्यांनी “चैत्र कृष्ण १२” या तिथीला संत सेनाजी महाराज जयंती साजरी करावी.जेनेकरुन संपूर्ण देशात एकाच दिवशी संत शिरोमणी सेनाजी महाराज जयंती साजरी होईल.व नाभिक समाजाची एकता दिसून येईल. Sant Sena Maharaj Jayanti

Sant Sena Maharaj Jayanti 1

Sant Sena Maharaj Jayanti

नाभिक समाजाचे आराध्य दैवत तसेच वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंती संदर्भात नाभिक समाजात मतभिन्नता दिसून येते. हि मतभिन्नता दुर करण्यासाठी नाभिक समाज बांधवांनी संत शिरोमणी सेनाजी महाराज जयंती त्यांच्या जन्मगावी ज्या दिवशी साजरी होते त्याच दिवशी साजरी करावी असे आवाहन नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले  यांनी केले आहे.यामुळे संत सेनाजी महाराज जयंती संदर्भातील मतभिन्नता आपोआपच दुर होईल व नाभिक समाजाची एकता दिसून येईल. Sant Sena Maharaj Jayanti

Sant sena Mharaj Aabhang 3

संत सेना महाराज जन्मगाव बांधवगड

नाभिक समाजाचे आराध्य दैवत तसेच वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचा जन्म मध्य प्रदेशातील बांधवगड ( जिल्हा उमरीया) या ठिकाणी विक्रम संवत १३५७, वैशाख कृष्ण १३ या तिथीला झाल्याची नोंद विविध ग्रंथांत, पुस्तकात तसेच विविध महाराज मंडळींच्या तोंडून देखील उल्लेख असल्याचे पुरावे मिळतात.तसेच बांधवगड मध्यप्रदेश या ठिकाणी त्यांच्या वास्तव्याचे व त्यांनी ज्या राजाची सेवा केली.त्याचे पुरावे देखील मिळतात.
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंतीच्या पुराव्यानुसार बांधवगड मध्यप्रदेश येथे संत सेना महाराज जयंती साजरी पण होते. Sant Sena Maharaj Jayanti

Sant Sena Maharaj Abhangatha - Karma Yoga 4

जयंतीला विविध राज्यांतील समाज बांधव उपस्थित

संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जन्मठिकाणी, बांधवगड मध्यप्रदेश येथे विक्रम संवत दिनदर्शिकेनुसार वैशाख कृष्ण १२‌ला‌ जयंती मोठ्या उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.या जयंतीला देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध राज्यांतील नाभिक समाज बांधव उपस्थित असतात.विवीध राज्यातून उपस्थित राहणार्या समाज बांधवांची राहण्याची,जेवणाची, आंघोळीची तसेच बांधवगड जंगलात प्रवासाची मोफत सोय. “भारतीय सेन समाज” या संघटनेच्या माध्यमातून केली जाते.हि सोय सलग तीन दिवस केली जाते. Sant Sena Maharaj Jayanti

Sant sena Mharaj Aabhang 4

देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही

संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंतीच्या संदर्भात जी मतभिन्नता महाराष्ट्रात दिसून येते.ती मतभिन्नता दुर करण्यासाठी नाभिक समाज बांधवांनी एक वेळ संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जन्मठिकाणाला भेट आवश्यक द्यावी.म्हणजे संत शिरोमणी सेनाजी महाराज जयंती ची मतभिन्नता दुर होईल.असे आव्हान नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले यांनी केले आहे. Sant Sena Maharaj Jayanti

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top