संत सेना महाराज || publication of original image of rashtrasant sena maharaj in aurangabad sena maharaj was a great saint.

sant sena maharaj 1

 Sant Sena Maharaj  संत सेना महाराज यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड येथे विक्रम संवत 1357, वैशाख कृष्ण 12 ला झाला.(महाराष्ट्रात हि तिथी चैत्र कृष्ण 12 या दिवशी येते) संत सेना महाराज वारकरी संप्रदायातील थोर संत होते.त्यांनी जातीच्याच नव्हे तर प्रांताच्या सिमा ओलांडून वारकरी संप्रदायाची पताका संपूर्ण भारतात पोहचवली.संत सेना महाराज यांचे अभंग मराठी,हिंदी, पंजाबी आशा विविध भाषेत उपलब्ध आहेत.संपुर्ण भारतात संत सेना महाराज यांना मानणारा वर्ग आहे.

पाठ्यपुस्तकात संत सेना महाराज फोटोचा समावेश नाही  Sant Sena Maharaj

संत सेना महाराज यांच्या कार्याची ओळख बालवयापासून मुलांना माहीत व्हावी म्हणून नाभिक संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला जात होता.
याची दखल घेऊन महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने ‌इयत्ता पाचवी च्या मराठी पुस्तकांत ,पान क्र.८८ वर संत सेना महाराज यांच्या एका अभंगाचा समावेश केला आहे.जेनेकरुन बालवयापासून मुलांना संत सेना महाराज यांची ओळख होईल.Sant Sena Maharaj   

त्याच पानावर संत जनाबाई व संत नामदेव यांच्या अभंगाचा समावेश आहे व त्यांच्या अभंगासमोर त्यांच्या फोटो पण छापण्यात आला आहे.पण संत सेना महाराज यांच्या अभंगासमोर संत सेना महाराज यांचा फोटो छापण्यात आला नाही. Sant Sena Maharaj   
पाठ्यपुस्तकात संत सेना महाराज यांचा फोटो का छापण्यात आला नाही? याची विचारणा केली असता पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने कळवले की नाभिक समाज जो फोटो संत सेना महाराज यांचा म्हणून वापरतो तो फोटो शासनाकडे संत नामदेव महाराज यांच्या नावाने नोंद आहे.एकच फोटो दोन संतांच्या नावाने दाखवता येत नाही.म्हणून महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने पाठ्यपुस्तकात संत सेना महाराज यांच्या फोटो चा समावेश केला नाही. Sant Sena Maharaj   

sant sena maharaj in textbook

महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत सेना महाराजांचा समावेश

26 जानेवारी 2021ला दिल्ली येथील राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध राज्यांतील चित्ररथांचा समवेश करण्यात आला होता.या चित्ररथात महाराष्ट्र शासनाच्या वतीने “महाराष्ट्राची संत परंपरा “ दाखवणारा चित्ररथ सामील करण्यात आला होता.त्या चित्ररथात महाराष्ट्रातील विविध जाती धर्माच्या संतांचे देखावा असलेला चित्ररथ सामील करण्यात आला होता. Sant Sena Maharaj   

या चित्ररथाथ संत सेना महाराज यांचा समावेश करण्यात आला होता.त्या चित्ररथात सेना महाराज यांची जी मुर्ती बनवण्यात आली होती ती संत सेना महाराज जन्मस्थळी (बांधवगड मध्यप्रदेश) ची होती. Sant Sena Maharaj   
म्हणून संत सेना महाराज यांच्या जन्मस्थानी जो फोटो वाफरला जातो तोच फोटो सर्वत्र वापरण्याचे नाभिक सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेने ठरवले.व त्याच फोटो चा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला.

sant sena maharaj mh gov

शिख धर्माच्या ग्रंथात संत सेना महाराज अभंगाचा समावेश

शिख धर्माच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या “गुरू ग्रंथ साहीब” या ग्रंथामध्ये विविध संतासह संत सेना महाराज यांच्या एका अभंगाचा समावेश करण्यात आला आहे.वारकरी संप्रदायात जे थोर संत होऊन गेले त्यापैकी काही संतांच्याच अभंगाचा समावेश शीख धर्माच्या “गुरु ग्रंथ साहेब” या ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे. Sant Sena Maharaj   

image 2

गुरु ग्रंथ साहिब मधील अभंग पहाण्यासाठी खाली क्लिक करा 

1670467785029 2

यामध्ये मराठवाड्यातील संत नामदेव यांच्या अभंगाचा गुरुग्रंथ साहेब या ग्रंथांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर संत सेना महाराज यांच्या सुद्धा अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे. Sant Sena Maharaj   
गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये 665 क्रमांकाच्या पानावर 6 नंबरचा जो अभंग आहे, तो अभंग संत सेना महाराज यांचा आहे. हा अभंग आम्हाला पंजाब येथील संत सेना महाराज यांच्यावर संशोधन करणारे जस्वंदर सिंग काबरा यांनी मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे.

sant sena maharaj in gurugrantsahib

गुरु ग्रंथ साहेब मध्ये संत सेना महाराज 

खुद्द भगवंताने संत सेना महाराज यांचे रुप घेऊन राजाची दाढी केली

संत सेना महाराज हे आपला मूळ पारंपारिक व्यवसाय म्हणजेच दाढी कटिंग करणे हा करत होते. त्याचबरोबर त्यांना अध्यात्माची अत्यंत रुची होती. अध्यात्मिक वार्तालापत ते स्वतःला तसंच सर्व काही विसरून जात असत. एकदा त्यांच्याकडे काही संतमंडळी आली तेव्हा त्यांच्या आदर तिथे मध्ये राजाची दाढी कटिंग करण्याची ते विसरून गेले. Sant Sena Maharaj   

राजा चिडला आणि संत सेना महाराज यांना पकडून आणा त्यांना दंड करा आसा आदेश दिला. ही गोष्ट जशी भगवंताच्या लक्षात आली तेव्हा खुद भगवंताने संत सेना महाराजांचे रूप घेऊन वीरभद्र सिंग राजाची दाढी कटिंग केली.या प्रसंगावर संत जनाबाई यांनी खूप छान पद्धतीने अभंग रचना केली ती पुढील प्रमाणे आहे. Sant Sena Maharaj   

// सेना न्हावी भक्त भला,त्याने देव भुलविला//

sant sena maharaj original image

संत सेना महाराज मुळ प्रतिमेचे औरंगाबादमध्ये प्रकाशन

संत सेना महाराज यांची मूळ प्रतिमा सर्वांना माहीत व्हावी,तीच प्रतिमा सर्वत्र वापरात यावी, जनतेमध्ये संत नामदेव महाराज आणि संत सेना महाराज यांच्या प्रतिमेतील संभ्रम दूर व्हावा व संत सेना महाराज यांची जनतेला विशेष ओळख व्हावी यासाठी नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले यांनी स्वखर्चाने संत सेना महाराज यांच्या मुळ प्रतिमा तयार करून, जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त दिनांक 24 जानेवारी रोजी, औरंगाबाद येथील नाभिक समाजाच्या “संत सेना भवन” येथे संत सेना महाराज मुळ प्रतिमेचे प्रकाशन करण्यात आले.Sant Sena Maharaj   

यावेळी नाभिक समाजातील श्री विष्णू वखरे, श्री कचरुजी जाधव, श्री नवनाथ घोडके,मुंजाजी भाले यांच्या सह विविध संघटनेचे मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांना संत सेना महाराज यांच्या मूळ प्रतिमेचे मोफत वितरण करण्यात आले. संत सेना महाराज मूळ प्रतिमेचे प्रकाशन नाभिक सेवा संघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले हे उपस्थित होते. Sant Sena Maharaj   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top