छत्रपती संभाजीनगर येथे निर्माण होत असलेल्या संत सेना महाराज मंदिरासाठी बांधवगड मध्यप्रदेश येथील पवित्र ठिकाणची माती गर्भगृहात टाकण्यासाठी श्री माधव भाले यांनी उपलब्ध करून दिली आहे.या बद्दल या पोस्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे.हि माहिती आवडल्यास इतरांना जरुर पाठवा.Soil of Bandhavgarh for Sant Sena Temple
Soil of Bandhavgarh for Sant Sena Temple
छत्रपती संभाजीनगर येथील N-12 , संत सेना भवन सिडको येथे संत सेना महाराज मंदिर निर्माण कार्य चालू झाले आहे. या मंदिरासाठी नाभिक समाज बांधवांनी एका दिवसात दहा लाख रुपये जमा करुन एक आदर्श निर्माण केला आहे.
बांधवगड ची माती संत सेना महाराज मंदिरासाठी अधीक माहितीसाठी खाली क्लिक करा
एक मुठ माती संत सेना मंदिरासाठी
बर्याच वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे संत सेना महाराज मंदिर असावे असी नाभिक बांधवांची इच्छा होती.ती इच्छा संत सेना शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून पुर्ण होत आहे.Soil of Bandhavgarh for Sant Sena Temple
याच संत सेना शिक्षण प्रसारक मंडळाने संत सेना महाराज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली.व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. तेव्हा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ह भ प प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते संत सेना महाराज मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.संत सेना महाराज मंदिर कामाला प्रत्यक्ष सुरवात हि रामनवमीच्या दिवशी करण्यात आली.
बांधवगडची च माती का?
छत्रपती संभाजीनगर येथे निर्माण होत असलेल्या संत सेना महाराज मंदिराच्या गर्भगृहात टाकण्यासाठी बांधवगडची च माती का?Soil of Bandhavgarh for Sant Sena Temple
या प्रश्नाचे उत्तर देताना संत सेना महाराज चरित्र अभ्यासक श्री माधव भाले यांनी सांगितले की, ” संत सेना महाराज यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला” ते ठिकाण मध्यप्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील “बांधवगड” हे ठिकाण आहे. हे ठिकाण नाभिक समाजासाठी तिर्थक्षेत्रा सारखे आहे.
संत सेना महाराज जन्मस्थान बांधवगड बद्दल अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा
बांधवगड मध्यप्रदेश
या ठिकाणी संपूर्ण भारतातील नाभिक समाज संत सेना महाराज जयंती दिनी एकत्र येतो व नतमस्तक होतो.हे ठिकाण नाभिक समाज बांधवांसाठी पवित्र स्थान आहे,प्रेरणास्थाण आहे.
पण याठिकाणी वर्षातुन एकदा च जाता येते.कारण हे ठिकाण भारत सरकारने पांढऱ्या वाघांसाठी आरक्षित केले आहे.तेथे वर्षंभर जाता येत नाही.पण तेथे जे पावित्र्य आहे,तेथे जी आस्था आहे तेच पावित्र्य, आस्था आणि जागृत पणा छत्रपती संभाजीनगर येथे निर्माण होत असलेल्या संत सेना महाराज मंदिरात निर्माण व्हावी.
”यासाठी बांधवगड (जन्मस्थान) ची पवित्र माती संत सेना महाराज मंदिराच्या गर्भगृहात टाकण्यासाठी आनली आहे.” असे श्री माधव भाले यांनी सांगितले. आणि त्यांनी घेतलेला निर्णय संत सेना महाराज मंदिर समितीला मान्य आहे.Soil of Bandhavgarh for Sant Sena Temple
कोणी कळस, कोणी मुर्ती तर कोणी घंटा दिला
छत्रपती संभाजीनगर येथे निर्माण होत असलेल्या संत सेना महाराज मंदिरासाठी काही बांधवांनी मंदिराचा कळस देऊ केला,तर कोणी संत सेना महाराज मुर्ती देऊ केली.
तर काही बांधवांनी संत सेना महाराज मंदिरासाठी पितळाचा घंटा देऊ केला, काहींनी रेती, सिमेंट, लोखंड देऊ केले तसे श्री माधव भाले यांनी मंदिराच्या पावित्र्यासाठी, मंदिरात जागृत पणा येण्यासाठी संत सेना महाराज जन्मस्थान असलेल्या बांधवगड मध्यप्रदेश येथील पवित्र माती देण्याचा निर्णय घेतला.व त्याप्रमाणे ते घेऊन आले आहेत.
संत सेना महाराज जन्मस्थानी कधी जावं याबद्दल अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा
बांधवगड ला कधी जावं
संत सेना महाराज यांच्या 724 व्या जयंती निमित्त श्री माधव भाले हे बांधवगड मध्यप्रदेश येथे संत सेना ध्वज यात्रा घेऊन जात असतात यावर्षी ते 5 मे रोजी (चैत्र कृष्ण 12) गेले होते.Soil of Bandhavgarh for Sant Sena Temple
व तेथून विधीवत तांब्याच्या कळसात माती घेऊन आले आहेत.याठी माधव भाले मागील दोन वर्षांपासून “एक मुठ माती संत सेना मंदिरासाठी” हा उपक्रम राबवित आहेत.व त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
प्रत्येकाने बांधवगड ला भेट द्यावी
नाभिक समाजाचे तसेच वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सेना महाराज यांचे जन्मस्थान म्हणजे बांधवगड होय.या पवित्र ठिकाणी प्रत्येक नाभिक बांधवांनी आयुष्यात येऊन एकदा तरी भेट दिली पाहिजे.
आणि भेट देण्याचा योग दिवस म्हणजे संत सेना महाराज जयंतीचा दिवस होय.तो दिवस म्हणजे (विक्रम संवत नुसार वैशाख कृष्ण 12) हा आहे.या दिवशी मध्यप्रदेश सरकारच्या वतीने मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते.Soil of Bandhavgarh for Sant Sena Temple
(एरवी तेथे जाण्यासाठी प्रती व्यक्ती 1700 रुपये लागतात) राहण्याची,जेवनाची व झोपण्याची सर्व व्यवस्था तेथे केलेली असते. म्हणून प्रत्येकाने एक वेळा संत सेना महाराज जन्मस्थान असलेला बांधवगड या पवित्र ठिकाणी भेट दिली पाहिजे.