ओबीसी समाजातील नाभिक ,भोई, वडार व कैकाडी समाजाला स्मशान भूमी साठी जागा उपलब्ध करून दिली.आमदार नमिता मुंदडा यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले. Space provided for cemetery to Nabhik Samaj
Space provided for cemetery to Nabhik Samaj
अंबाजोगाई – आ.नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे ओबीसी घटकांतील भोई,वडार, “नाभिक” व कैकाडी समाजाला स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून काल 5 डिसेंबर गुरुवार रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून तसा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.आ.नमिता मुंदडा यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. Space provided for cemetery to Nabhik Samaj
आमदार नमिता मुंदडा अंबेजोगाई
थोडक्यात माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी समाजातील बारा बलुतेदार व अठरा अलूतेदार घटकांच्या अनेक मागण्यांबाबत आमदार नमिता मुंदडा यांना निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती.सदरील मागण्यांबाबत आ.नमिता मुंदडा यांनी शासन दरबारी पाठपुरावा करीत दिलेले आश्वासन पूर्ण केले.काल दिनांक 5/12/2024 रोजी निवासी बीड उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या आदेशावरून भोई, वडार,“नाभिक” व कैकाडी समाजाला स्मशान भूमीसाठी जागा निर्गमित करून देण्याचे आदेश देण्यात आले आहे.Space provided for cemetery to Nabhik Samaj
भोई समाजाला सर्वे नंबर 621/3 मधील 15 गुंटे, वडार समाजाला सर्वे नंबर 621/2 ,मधील 20 गुंटे,“नाभिक समाजास” सर्वे नंबर 622/2 मधील 22 गुंटे, कैकाडी समाजास सर्वे नंबर 621/2 मधील 15 गुंटे जागा निर्गमित करण्यात आली आहे.
वरील नाभिक समाजासाठी “दीपक सुरवसे” यांनी शासनाकडे मागणी केली होती तर भोई, वडार व कैकाडी समाजास स्मशान भूमी साठी आ.नमिता मुंदडा यांनी स्वतःच पाठपुरावा करून दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने आ.मुंदडा यांचे भोई समाजातील पञकार बालाजी खैरमौडे, बालाजी चांदण भुजंगे,सुशांत खैरमोडे,श्रावण गवते, आदींनी अभिनंदन केले आहे.Space provided for cemetery to Nabhik Samaj