न्हावी समाजातील या शब्दावर आंध्रप्रदेश सरकारने आनली बंदी || The Andhra Pradesh government has banned this word in the barber community

The Andhra Pradesh government has banned this word in the barber community 1

दाढी-कटिंगचा सलून व्यवसाय करनार्या नाभिक समाजाला न्हावी,नाभिक,हजाम,वारीक,नाई,नापित,म्हाली आशा विविध नावाने ओळखले जाते.बर्याच वेळा समाजात वावरताना याच जातिवाचक नावाने बोलवले जाते.

बदलत्या काळानुसार हे शब्द अपमानजनक वाटू लागले.स्वाभिमान दुखावल्या जाऊ लागला.म्हणून या जातिवाचक शब्दांवर बंदी घालून कोणी उच्चार केल्यास त्यावर भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा कायदा आंध्रप्रदेश सरकारने केला.

असून त्या कायद्याबद्दल आज माहिती घेऊन हा कायदा महाराष्ट्रात कशा पद्धतीने लागू करता येईल यासाठी म्हत्वपुर्ण माहिती आज घेनार आहोत.The Andhra Pradesh government has banned this word in the barber community

The Andhra Pradesh government has banned this word in the barber community 1

विविध राज्यांत विविध नावांने ओळख

नाभिक समाजाला भारतातील विविध राज्यात विविध नावांने ओळखले जात असले तरी एकाच राज्यात न्हावी समाज विविध नावाने ओळखला जातो.या विविध नावामुळे शासकीय कामात खूप अडचणी निर्माण होतात.

जसे जात वैधता प्रमाणपत्रासाठी , शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात.तसेच सार्वजनिक ठिकाणी या समुदायाच्या व्यक्तिंना जातीच्या नावाने बोलवने, यामुळे या समुदायाचा आपमान होत असतो.

या समस्यावर उपाय म्हणून एकाच नावाने या जातीची ओळख निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्रातील विविध नाभिक संघटना अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.परंतु आजून यश मिळाले नाही.

पण आंध्रप्रदेश सरकारने 7 आगस्ट 2022 रोजी एक आदेश काढला असुन त्या आदेशानुसार आता आंध्रप्रदेश मध्ये न्हावी जातीला आता एकाच नावाने ओळखले जानार असून ते नाव कोणते आहे? आणि न्हावी जातीसंदर्भात इतर कोणत्या शब्दांवर बंदी आणली यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत.
आंध्रप्रदेश राज्यातील नाभिक समुदायाने आंध्रप्रदेश सरकारकडे पाठपुरावा करून राज्य सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले असून यापुढे आंध्रप्रदेश मध्ये एकाच नावाने नाभिक समाजाला ओळखले जाणार आहे.The Andhra Pradesh government has banned this word in the barber community

आंध्रप्रदेश मध्ये न्हावी जातीला या नावाने ओळखले जाते

महाराष्ट्रात जसे नाभिक समाजाला विविध नावाने ओळखले जाते तसच आंध्रप्रदेश मध्ये नाभिक समाजाला

  1.  नाई ब्राह्मण (Nayee Brahmin)
  2.  मांगली ( Mangali)
  3.  मंगलोदा (Mangaloda)
  4.  बओच्चू (Bohchu)
  5.  गोरीगेवाडा (Gorigevada)
  6.  कोंडामांगली (Kondamangali)

The Andhra Pradesh government has banned this word in the barber community 2

या नावाने आंध्रप्रदेश मध्ये नाभिक समाज ओळखला जातो. या पैकी अनेक शब्दावर आंध्रप्रदेश नाभिक समाजाचा आक्षेप होता.या सर्व नावा पैकी एकाच नावाने आंध्रप्रदेश मधील नाभिक समाज ओळखला जावा यासाठीThe Andhra Pradesh government has banned this word in the barber community

इतर मागासवर्गीय विभागास निवेदन दिले

आंध्रप्रदेश मध्ये नाभिक समाज एकाच नावाने ओळखला जावा यासाठी आंध्रप्रदेश नाभिक समाजाने “इतर मागासवर्गीय विकास विभागाला” Backward classes Welfare Department कडे आनेक वेळा निवेदन देऊन पाठपुरावा केला.

तेंव्हा इतर मागासवर्गीय विकास विभागाने आंध्रप्रदेश नाभिक समुदायाची मीटिंग घेऊन त्या मिटिंगमध्ये “नाई ब्राह्मण” या नावाने आंध्रप्रदेश मधील नाभिक समाज ओळखला जावा आसा ठराव दिनांक 21/2/2019 रोजी घेऊन आंध्रप्रदेश सरकारकडे पाठवला.

या शब्दावर सरकारने आनली बंदी

आंध्रप्रदेश मधील नाभिक समाज “नाई ब्राह्मण” या नावानेच ओळखला जावा यासाठी आंध्रप्रदेश मागासवर्गीय विकास विभागाने ठराव सरकारकडे पाठवला.व आंध्रप्रदेश मध्ये प्रचलित असलेल्या नाभिक समाजाच्या या शब्दावर बंदी घालावी असे सांगण्यात आले.ते शब्द पुढीलप्रमाणे आहेत.The Andhra Pradesh government has banned this word in the barber community

  •  मांगली ( Mangali)
  •  मंगलोदा (Mangaloda)
  •  बओच्चू (Bohchu)
  •  गोरीगेवाडा (Gorigevada)
  •  कोंडामांगली (Kondamangali

आंध्रप्रदेश सरकारने आदेश काढला GR 

आंध्रप्रदेश नाभिक समुदायाने व आंध्रप्रदेश मागासवर्गीय विकास विभागाने घेतलेल्या ठरावाचा विचार करून आंध्रप्रदेश सरकारने दिनांक 7/8/2022 रोजी एक शासननिर्णय GR जारी केला.

The Andhra Pradesh government has banned this word in the barber community GR

की आंध्रप्रदेश मधील नाभिक समाज हा या पुढे फक्त “नाई ब्राह्मण” या नावाने च ओळखला जाईल तसेच “नाई ब्राह्मण” याच नावाने जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.The Andhra Pradesh government has banned this word in the barber community

भारतीय दंड संहिता 1860 नुसार दंडात्मक कारवाई

आंध्रप्रदेश मध्ये नाभिक समाजाला

  1.  मांगली ( Mangali)
  2.  मंगलोदा (Mangaloda)
  3.  बओच्चू (Bohchu)
  4.  गोरीगेवाडा (Gorigevada)
  5.  कोंडामांगली (Kondamangali

या प्रचलित शब्द प्रयोग करून अपमानीत केले तर त्यावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.आसा आदेश जारी केला आहे.The Andhra Pradesh government has banned this word in the barber community

नाभिक समाजात आनंदाचे वातावरण

आंध्रप्रदेश सरकारने दिनांक 7/8/2022 रोजी जाहीर केलेल्या शासननिर्णया मुळे कितेक वर्षांपासून सुरू असलेल्या नाभिक समाजाच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आंध्रप्रदेश नाभिक समाजात आनंदाचे वातावरण आहे.आंध्रपदेश सरकारचे आभार मानले जात आहेत.

कर्नाटक सरकारनेही घेतला निर्णय

आंध्रप्रदेश सरकार प्रमाणे कर्नाटक सरकारने पण आदेश काढला असुन कर्नाटक राज्यात नाभिक समाजाला “न्हावी- हजाम” हा शब्द प्रयोग केल्यास संबंधित व्यक्तीवर “जातिवाचक शिवीगाळ” केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

karnatak government order by barber coumminity
              “न्हावी आणि हजाम” हे शब्द प्रचलित भाषेतून वगळण्यात यावेत. या पुढे कर्नाटकात नाभिक समाज हा “सविता समाज” (नाभिक समाजातील सविता ऋषी) या नावाने ओळखला जावा.व “सविता समाज” या नावाने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे आसा आदेश कर्नाटक मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.The Andhra Pradesh government has banned this word in the barber community

या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार असल्याचे संसदीय व्यवहार आणि कायदेमंत्री “टी.बी.जयचंद्र” यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात पण हा निर्णय घेण्यास भाग पाडू

महाराष्ट्रात पण नाभिक समाजाला अनेक प्रचलित असलेल्या जातीवाचक शब्दाने ( न्हावी,हजाम,वारिक,)संबोधून आपमाणीत केले जाते.यावर प्रतिबंध यावा आणि महाराष्ट्रात “नाभिक” या नावाने न्हावी समाज ओळखला जावा.

यासाठी मागील अनेक वर्षांपासून “नाभिक सेवा संघासह” अनेक नाभिक संघटना प्रयत्नशील आहेत.यावर महाराष्ट्र सरकार कधी निर्णय घेतं याची प्रतीक्षा महाराष्ट्र नाभिक समाजाला लागली आहे.The Andhra Pradesh government has banned this word in the barber community

मित्रांनो वरील माहिती आवडल्यास इतरांना जरूर शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top