2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आगोदर केंद्र सरकारच्या वतीने एक योजना आनली होती.तीच नाव पी एम विश्वकर्मा योजना असे होते.या योजनेच्या माध्यमातून बारा बलुतेदार आठरा आलुतेदार यांना काळानुसार आपल्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्याला व्यवसायासाठी सुरवातीला कमी व्याजदरात एक लाख रुपये देण्यात येणार असे सांगितले होते.Vishwakarma Yojana got the honorarium
तसेच प्रशिक्षण झाल्यावर प्रमाणपत्र आणि पाचशे रुपये प्रती दिवस प्रमाणे पैसे देण्यात येणार होते.पण जालना जिल्ह्यात 34 जनाचे प्रशिक्षण होऊन त्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही ना प्रशिक्षण कालावधीचे मानधन पण मिळाले नाही.यावर कशा पद्धतीने आवाज उठवला व कशा पद्धतीने प्रशिक्षणाचे पैसे मिळाले याबद्दल या पोस्ट मध्ये माहिती घेणार आहोत.माहिती आवडल्यास इतरांना जरुर पाठवा.
Vishwakarma Yojana got the honorarium
12 बोलुतेदार 18 आलुतेदार आणि हात कामगार यांना आधुनिक काळानुसार प्रशिक्षण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजना. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणली होती. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांना प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी कर्ज पण देण्यात येणार होते.Vishwakarma Yojana got the honorarium
परंतु बऱ्याच ठिकाणी या योजनेचा बोजवारा वाजला आहे. बऱ्याच ठिकाणी रजिस्ट्रेशन नाही, रजिस्ट्रेशन झाले तर प्रशिक्षण नाही, आणि प्रशिक्षण झाले तर मानधन मिळाले नाही, बँकेतून लोन भेटणे तर खूपच दूरची गोष्ट होती.
रजिस्ट्रेशन नंतर प्रशिक्षणाची प्रतिक्षा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कारागिरांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक होते यासाठी विविध कागदपत्रे जमा-जमा करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन पैसे देऊन करावे लागत होते. रजिस्ट्रेशन झाले तरीही रजिस्ट्रेशन झालेले प्रमाणपत्र बरेच जणांना मिळत नव्हते. ही या योजनेतील त्रुटी होती.Vishwakarma Yojana got the honorarium
त्यामुळे कारागिरांना वाटे की आपण जे रजिस्ट्रेशन केले ते वाया गेले आहे. बऱ्याच जणांचे रजिस्ट्रेशन झाले. त्यांना प्रमाणपत्र ही आले. परंतु प्रशिक्षणाला अजूनही मूहर्त लागलेला नाही. त्यामुळे या योजनेबद्दल कामगारांमध्ये कमालीची निराशा निर्माण झाली आहे. कारण याबद्दल आवाज उठवावे तर कोठे उठवावे? हा त्यांच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे.
प्रशिक्षणानंतर ना मानधन ना प्रमाणपत्र
विश्वकर्मा योजनेअंतर्गतजालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात सलून कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी 34 सलून कारागिरांनी ऑनलाइन नोंदणी केली. बराच कालावधी झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आले.विश्वकर्मा अंतर्गत मेन्स पार्लरचे प्रशिक्षण 34 लोकांनी घेतले. ते दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल पर्यंत प्रशिक्षण झाले. “शेवटी त्याचा पेपरच झाला नाही” त्यामुळे जवळपास आम्ही तीन महिने थांबलो.Vishwakarma Yojana got the honorarium
जिल्हाधिकारी यांना निवेदन
नंतर आम्ही आठ जुलैला जिल्हाधिकारी जालना या ठिकाणी निवेदन निवेदन दिल्यानंतर 16 जुलैला आमचे एक्झाम घेण्यात आली. आमच्या नंतरची बॅच झाली त्याला लगेच दुसऱ्या दिवशी पैसे पडत होती. आमच्या अशा लक्षात आलं की आपली बॅच होऊन दहा-बारा दिवस झाले आपल्याला कोणालाच पैसे आले नाही.Vishwakarma Yojana got the honorarium
माहितीचा अधिकार कायद्याचा आधार
आम्ही माहितीचा अधिकार टाकणार आहे असे विश्वकर्मा ऑफिसवरील सरांना आम्ही सांगितले व तो आम्ही तयारी केला. त्यांनी तो माहितीचा अधिकार वाचून आमचे दुसऱ्या दिवशी सगळ्यांना पैसे टाकणं सुरू केले.Vishwakarma Yojana got the honorarium
अखेर विश्वकर्मा योजनेच मानधन मिळाले
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील 34 सलून कारागिरांना प्रशिक्षण दिल्यानंतर ना मानधन मिळाले, ना प्रमाणपत्र. म्हणून त्या सलून चालकांनी नाभिक संघटना जी “नाभिक सेवा संघ या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री सुनील वर्पे” यांनी जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले .
या योजनेबद्दल घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तेवढेच न थांबता त्यांनी “माहिती अधिकाराचा” वापर करून आम्ही माहितीचा अधिकार टाकणार अशी तंबी ही दिली. तेव्हा संबंधित योजनेच्या अधिकाऱ्याने दुसऱ्याच्या दिवशी त्यांचे मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा केले.Vishwakarma Yojana got the honorarium
अप्रुल साठी पैशाची मागणी
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी अप्रुल चा मेसेज पाठवला जातो. परंतु तो मेसेज जर लवकर आला नाही तर तो लवकर येण्यासाठी बऱ्याच ठिकाणी काही अधिकाऱ्याकडून पैशाची मागणी केली जात आहे अशी ही काही प्रशिक्षणार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.Vishwakarma Yojana got the honorarium