वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती धर्माचे संत होऊन गेले.त्यांनी कधीही आपल्या जातीला/व्यवसायाला लपवून ठेवले नाही.तर आपल्या जातीच्या व्यवसायाचा आपल्या अभंगातून गौरवोद्गार केला आहे.
संत सेना महाराज यांनी नाभिकांना आपल्या व्यवसायाबद्दल काय उपदेश केला आहे? या बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. What did Sant Sena Maharaj preach to the Nabhik?
पहिल्या अभंगातून उपदेश
जे म्हणविती न्हावियांचे वंशी ||
तेणे पाळावे स्वधर्माशी ||१||
येर अवघे बटकिचे ||
नव्हे न्हावियाचे वंशिचे ||२||
शास्त्रें नेम नेमियला ||
सांडोनि अनाचार केला ||३||
जन्मलो ज्या वंशात ||
धंदा दोन प्रहर नेमस्त ||४||
सत्व पाळा रे स्वधर्माशी ||
सेना म्हणे आज्ञा ऐसी ||५||
भावार्थ:- संत सेनाजी महाराज आपल्या जातबांधवांशी उपदेश सांगतात की जे स्वतःला न्हावियाचे वंशिचे म्हनतात , त्यांनी स्वधर्म योग्य प्रकारे पाळावा. जे न्हावी जातिचा धर्म पाळत नाही.ते न्हावी वंशाचे नसून बटकिच्या पोटचे समजावे.शास्राने जो नेमधर्म आपनासाठी नेमून दिला आहे.
त्याचा त्याग केल्यास अनाचार केला असे समजावे. ज्या वंशात आपण जन्म घेतला. त्या वंशाचा व्यवसाय दोन प्रहर व्यवस्थितपणे केला पाहिजे. स्वधर्माचे सत्व निष्ठापूर्वक पाळा. अशी स्वधर्माची तुम्हाला आज्ञा आहे. व ती कधीही मोडू नका. असा उपदेश संत सेना महाराज यांनी वरील अभंगात केला आहे.What did Sant Sena Maharaj preach to the Nabhik?
दुसऱ्या अभंगातून उपदेश
न्हावीयांचे वंशी | जन्म दिला ऋषिकेशी ||
प्रतिपाळावे धर्माशी | व्यवहाराशी न सांडी ||१||
ऐका स्वधर्म-विचार | धंदा करी दोन प्रहर ||२||
सांगितले साचार | पुराणांतरी ऐसे हे ||२||
करोनिया स्नान | मुखी जपा नारायण |
मागुती पुन्हा जान | शिवू नये धोकटी ||३||
ऐसे जे का न मानिती | जातील नरकप्रती |
सकळ पुर्वज बुडविती | शास्त्रासंमति ऐसे हे ||४||
शिरी पाळावे आज्ञेसी | शरण जावे विठोबासी |
सेना म्हणे त्यासी | ह्रषीकेशी सांभाळी ||५||
भावार्थ:- ज्याला ईश्वराने नाव्हाच्या वंशात जन्म दिला आहे. त्याने आपल्या धर्माचे प्रतिपालन करावे. आणि आपला व्यवसाय कधी सोडू नये. न्हाव्याच्या धर्माचा विचार आता एका. दोन प्रहर धंदा करावा असे खरोखर पुराणांमध्ये सांगितले आहे.
नंतर स्नान करून तोंडाने नारायणाचा जप करावा. स्नानानंतर पुन्हा धोकटीला स्पर्श करू नये. याप्रमाणे जे आचरण करणार नाही, ते नरक प्राप्त जातील आणि आपल्या सर्व पूर्वजांना बुडवतील. अशी शास्त्राज्ञा सांगितली आहे.What did Sant Sena Maharaj preach to the Nabhik?
ही आज्ञा शिरोधार्थ म्हणून पाळावी आणि विठोबाला शरण जावे. सेनाजी अभिवचन देतात की असे जो करील ईश्वर त्याचा निश्चितच सांभाळ करीन.What did Sant Sena Maharaj preach to the Nabhik?
तिसर्या अभंगातून उपदेश
आम्ही वारिका वारिक |
करू हजामत बारीक ||१||
विवेक दर्पण आयना दावू |
वैराग्य चिमटा हालवू ||२||
उदक शांती डोई घोळू |
अहंकाराची शेंडी पिळू ||३||
भावार्थाच्या बगला झाडू |
काम क्रोधनखे काढू ||४||
चौवर्णा देऊनही हात |
सेना राहिला निवांत ||५||
भावार्थ:- नाभिकाच्या व्यवसायाच्या अनुषंगाने या अभंगात सेनाजींनी आत्मिक विकासाचे सुंदर रूपक प्रस्तुत केले आहे. ते म्हणतात,“ आम्ही जातीचे नावे आहोत. तुमची हजामत अगदी बारकाईने सुरेख करून देऊ. (अर्थात तुमच्या आत्म्याची मशागत व निगा काळजीपूर्वक करू).
विवेक जागृतीरुपी आरसा तुम्हाला दाखवून तुमच्या अंगी विवेक जागृत करू. वैराग्यरूपी चिमटा हलवुन तुमच्यात विरागीवृतीचा संचार घडवू. तुमची डोई व्यवस्थित घोळून (अर्थात तुमच्या विचारशक्तीला चांगली चालना देऊन) तुमच्या आजारी मनावर भावभक्तीच्या मंत्राचे पाणी शिंपडून उदकशांती करू.What did Sant Sena Maharaj preach to the Nabhik?
तुमची अहंकार रुपी ताट शेंडी पिळून अहंकार भावनेतून काढू. तुमच्या अज्ञानरूपी बगला झाडून भक्ती शास्त्राचा भावार्थ उघडा करू. तुमची काम क्रोधरुपी नक्की काढून टाकू. चहुवर्णाची (म्हणजेच सर्वांची) याप्रमाणे सेवा करीत राहिल्यानेच मी सेना न्हावी ,आता निरामयतेचा आनंद उपभोगीत आहे.What did Sant Sena Maharaj preach to the Nabhik?
अशा पद्धतीने संत सेना महाराज यांनी आपल्या अभंगातून आपल्या जातीच्या समाज बांधवांना उपदेश केला आहे