महाराष्ट्राला का हवे आहेत कर्पुरी ठाकूर? ||Why Maharashtra needs Karpuri Thakur?

Why Maharashtra needs Karpuri Thakur?1

नुकताच भारत सरकारने कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात येणार असे जाहीर केले. आणि कर्पुरी ठाकूर एकदम प्रकाश झोतात आले.कर्पुरी ठाकूर यांनी नेमक काय केले?‌ त्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता एक गोष्ट लक्षात आली की आज घडीला महाराष्ट्राला कर्पुरी ठाकूर यांची नितांत आवश्यकता आहे.हेच या ठिकाणी स्पष्ट केले आहे.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

Table of Contents

Why Maharashtra needs Karpuri Thakur?

आपल्या बहुजन समाजाचा ‘अवतार’ कल्पनेवर केवळ विश्वास असतो असे नाही तर, ‘तो’ आल्याशिवाय आपला उद्धार होणारच नाही, असा ठाम विश्वास असतो. त्यालाच जोडून आणखी एक आग्रह त्यांचा असतो, ‘हा अवतार शेजारच्या घरीच जन्मला पाहिजे, आपल्या घरात ती कटकट नको!’ हे अवतार दोन प्रकारचे असतात.

एक धार्मिक व दुसरा सामाजिक! धार्मिक अवतार हे शासक-शोषक जाती-वर्गांनी आपल्या हितासाठी कल्पनेतून पैदा केलेले असतात व शासित-शोषित जात-वर्गांवर लादलेले असतात. काही धार्मिक अवतार इतिहास-पुराण काळातील क्रांतिकारक महापुरूषांवर धर्माचा शेंदूर फासून निर्माण केलेले असतात. सामाजिक अवतार हे शासित-शोषित जनतेच्या विद्रोहातून निर्माण होतात.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

धार्मिक अवतार येतात आणी जादूची कांडी फिरवून जनतेचे दुःख-शोषण नष्ट करण्याचा चमत्कार करतात. अर्थात या भाकडकथाच असतात. मात्र समाजिक अवतार खराखूरा इतिहास घडवतात. शोषित-दुःखी जनतेला संघटित करून त्यांचा विद्रोह विधायक मार्गावर आणतात. “अन्याय निवारण्यासाठी समाजव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणण्याची आवश्यकता सांगतात. त्यासाठी लागणारे तत्वज्ञान व कार्यक्रम ते देतात. म्हणून त्यांना अवतार न म्हणता महापुरूष वा महात्मा म्हटले जाते.”

Why Maharashtra needs Karpuri Thakur?2

जननायक कर्पुरी ठाकूर

सेच एक महापुरूष उत्तर भारतात जन्म घेतात व आपल्या कार्यकर्तृत्वातून जातीव्यवस्था नष्ट करणारे कार्यक्रम राबवितात. त्या महापुरूषाचे नाव आहे- जननायक कर्पूरी ठाकूर! नाभिक-सेन या अत्यंत नगण्य लोकसंख्या असलेल्या मायक्रो जातीत जन्मलेले कर्पूरी ठाकूर खरेखूरे जननायक होते. ज्या बिहारमध्ये ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार जातींच्या सशस्त्र दरवडेखोरांच्या सेना (टोळ्या) होत्या. Why Maharashtra needs Karpuri Thakur?

त्या बिहारमधील कमालीचे शोषण होत असलेल्या दलित-ओबीसी जनतेचे मसिहा होते कर्पूरी ठाकूर! सतत आठ वर्षे विरोधी पक्षनेतेपद, एक वेळा उपमुख्यमंत्री व दोनवेळा मुख्यमंत्री आणी आता मरणोत्तर भारतरत्न, अशा उच्चपदांवर असलेल्या व भारताच्या सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविलेल्या कर्पूरी ठाकूरांची लोकप्रियता किती व कशी होती याची कल्पना येते.

आता महाराष्ट्र फुले- शाहू- आंबेडकरांचा नाही

आज मी या जननायक कर्पूरी ठाकूरांवर का लिहीतो आहे? असे काय असाधारण कार्य केले होते या महापुरूषाने? आताच्या तरूण पिढीला हे सांगण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे, कारण आजचा महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र राहीलेला नसून तो सत्तरीतल्या बिहारप्रमाणे हिंसाचारी, विध्वंसक व खूनी जमीनदार-वतनदारांचा महाराष्ट्र झालेला आहे. सत्तरीतल्या बिहार राज्याला ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार जातींच्या हिंसाचारापासून व नर-संहारापासून मुक्त करण्याची क्रांती जननायक कर्पूरी ठाकूरांनी केली आहे.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

ब्राह्मण-क्षत्रिय-मराठ्यांच्या हिंसक व खूनी कारवायांपासून महाराष्ट्राला मुक्त करायचे असेल तर आपल्याला जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या मार्गानेच जावे लागेल! आणी म्हणून मी म्हणतो, ‘‘आज महाराष्ट्राला हवे आहेत, एक नवे कर्पूरी ठाकूर’’

Why Maharashtra needs Karpuri Thakur?3

दलित ओबीसीतील विचारवंत

उत्तर भारतातील हिंदी राज्यांमध्ये त्यागमूर्ती आर. एल. चंदापूरी व शहिद बाबू जगदेव प्रसाद या महत्तम ओबीसी नेत्यांनी पन्नाशी-साठीच्या काळात दलित-ओबीसी आंदोलन उभे केले. या आंदोलनातून ललईसिंह यादव, रामस्वरूप वर्मा, कर्पूरी ठाकूर, राम नरेश यादव, अनुपलाल मंडल, बी. पी. मंडल, राम अवधेश सिंह, रामविलास पास्वान, भोला पास्वान असे असंख्य सामाजिक-राजकीय नेते व विचारवंत नेते दलित-ओबीसी जातीतून निर्माण झालेत. त्या काळी ओबीसी चळवळीने उच्चांक गाठला होता.

त्याचा परिणाम देशाचा मुख्य सत्ताधारी असलेल्या कॉंग्रेस पक्षावर पडणे स्वाभाविक होते. उत्तर भारतातील राज्यांमध्ये पहिले बिगर-कॉंग्रेसी सरकार बिहारमध्ये 1967 साली स्थापन झाले, त्यात कर्पूरी ठाकूर उपमुख्यमंत्री होते. नंतर 1970 साली ते बिहारचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत. 1970 पर्यंत कॉंग्रेसतर्फे ब्राह्मण-भुमिहार व ठाकूर-राजपूत या जातीतूनच मुख्यमंत्री दिले जात होते.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

मात्र 1971 साली कॉंग्रेसने प्रथमच बिहारमध्ये ओबीसी मुख्यमंत्री दिला. केवळ ओबीसी चळवळीच्या दबावापोटी कॉंग्रेसला ओबीसी मुख्यमंत्री द्यावा लागला. दरोगा प्रसाद रॉय कॉंग्रेसचे पहिले ओबीसी मुख्यमंत्री झाले.

ओबीसी चळवळ संपवण्यासाठी ओबीसी मुख्यमंत्री

ओबीसी समाजाचे भले करण्यासाठी कॉंग्रेसने ओबीसी नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले, असा गैरसमज करून घेऊ नका. ओबीसी चळवळ दडपून टाकण्यासाठी, नष्ट करण्यासाठी ओबीसी मुख्यमंत्री बनवला गेला होता, हे लगेच सिद्ध झाले. मुख्यमंत्री झाल्यावर दरोगा प्रसाद रॉय यांनी दलित विधायक मुंगेरीलाल (पास्वान) यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी कमिशन नेमले.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

या ओबीसी कमिशनने ओबीसी जातींसाठी 26 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली. दरोगा प्रसाद हे ओबीसी चळवळ नष्ट करण्याऐवजी ओबीसी आरक्षण लागू करीत आहेत, हे लक्षात येताच कॉंग्रेसमधील ब्राह्मण-क्षत्रिय-जमीनदार जातींच्या आमदारांनी दरोगा प्रसाद यांचे सरकार खाली खेचले. अर्थात या उच्चजातीय पक्ष-द्रोहाला तत्कालीन कॉंग्रेस नेत्या इंदिरा गांधींचा पाठींबा होताच! असे प्रकार गुजराथ, महाराष्ट्रातही झालेले आहेत. महाराष्ट्रात दलित+ओबीसी नेत्यांना खाली खेचण्यासाठी सर्वपक्षीय मराठा-ब्राह्मण नेते एकत्र येतांना आपण अनेकवेळा पाहिलेले आहे. यावर मी अनेक वेळा लिहीले आहे.

Why Maharashtra needs Karpuri Thakur?4

मुंगेरीलाल के सपने

ओबीसी आरक्षणाची बदनामी करण्यासाठी व त्याची टिंगल-टवाळी करण्यासाठी ‘‘मुंगेरीलाल के सपने’’ हा वाक्प्रचार रूढ करण्यात आला. त्यावर ब्राह्मण साहित्यिकांनी कांदबरी लिहीली व नंतर टि.व्ही. सिरियलही काढली गेली. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाही विरोधात जे देशव्यापी आंदोलन झाले, त्यात तत्कालीन राज्यस्तरीय ओबीसी नेते ‘‘राष्ट्रीय नेते’’ म्हणून पुढे आलेत.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

आणीबाणीविरोधी आंदोलन यशस्वी होण्याचे एकमेव कारण म्हणजे या ओबीसी नेत्यांनी जयप्रकाशप्रणित ‘संपूर्ण क्रांतीचा नारा’ देऊन हे आंदोलन शेवटपर्यंत लढलेत. “इतर कम्युनिस्ट पक्ष व जनसंघ पक्षाच्या नेत्यांनी इंदिरा गांधींची माफी मागून सुटका करून घेतली. मात्र ओबीसी नेत्यांनी जेलमधूनच 1977 ची लोकसभा निवडणूक लढवली व जिंकलीसुद्धा!”

कर्पुरी ठाकूर यांच्या बद्दल माहितीसाठी

image2

1670467785029 2

कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री

या राष्ट्रीय नेत्यांमध्ये एक मोठे नाव पुढे आले- ते कर्पूरी ठाकूर यांचे! 1977 साली लोकसभा सदस्य झाल्यानंतर काही महिन्यांनी अनेक राज्यांसोबत बिहारच्या विधान सभा निवडणूक झाली. त्यात मुख्यमंत्री पदासाठी कर्पूरी ठाकूर यांच्या नावासाठी आग्रह सुरू झाला.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

228 आमदारांपैकी 144 म्हणजे तीन-चतुर्थांश आमदारांचा पाठींबा मिळवीत कर्पूरी ठाकूर दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झालेत, यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात यायला हवी! ”त्यावेळी आमदार देवेंद्र प्रसाद यादव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन कर्पूरी ठाकूर यांच्यासाठी विधानसभेची जागा रिकामी करून दिली. या पोटनिवडणूकीत कर्पूरी जी 65000 मतांच्या फरकाने म्हणजे प्रचंड मतांनी निवडूण आलेत.”

Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur 5

कर्पुरी ठाकूर फार्मुला

दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होताच जननायक कर्पूरी ठाकूर यांनी मुंगेरीलाल कमिशनच्या शिफारशी लागू केल्यात. ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार उच्चजातीयांनी टिंगल-टवाळी करुन हिणविलेले ‘‘मुंगेरीलाल के सपने’’ कर्पूरीजींनी खरे करून दाखविले. ज्या पद्धतीने हे आरक्षण लागू करण्यात आले, त्या पद्धतीला ‘‘कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला’’ असे म्हणतात. देश पातळीवर हा ‘कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला’ गाजला व अजरामर झाला.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

हा कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय, तो कसा अमलात आणला गेला व त्याचे काय परिणाम झालेत, हे आता आपण लेखाच्या उत्तरार्धात पाहू या! तसेच महाराष्ट्रात कोण नेता कर्पूरी ठाकूरांचा ”अवतार” धारण करू शकतो, हे या लेखाचे शीर्षकीय रहस्य उलगडण्याचा प्रयत्न लेखाच्या उत्तरार्धात करु या!

महाराष्ट्राचे कर्पूरी ठाकूर: कल्याणराव दळे!

जयप्रकाश नारायण हे समाजवादी पक्षाचे नेते असले तरी व जनता पक्षाचे जन्मदाते असले तरी ते एकूणच जातीय आधारवरच्या आरक्षणाचे विरोधक होते. आर्थिक आधारवरच आरक्षण दिले पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. परंतू राम मनोहर लोहिया व त्यागमूर्ती चंदापूरी यांच्या युतीतून व शहिद बाबू जगदेव प्रसाद यांच्या आक्रमक आंदोलनातून जी ओबीसी चळवळ परमसीमेला पोहोचलेली होती.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

व त्यातून अनुपलाल मंडल, राम अवधेश सिंह, कर्पूरी ठाकूर यांच्यासारखे असंख्य ओबीसी नेते आक्रमक बनून काम करीत होते. या असंख्य ओबीसी नेत्यांच्या दबावापोटी समाजवादी पक्षात व नंतर जनता पक्षात जातीय आरक्षणाच्या विरोधात बोलण्याची फारशी कुणी हिम्मत करीत नव्हते. अर्थात राम मनोहर लोहियांच्या

Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur 6

‘‘पिछडा पावे सौ मे साठ…!’’

राम मनोहर लोहिया यांच्या या घोषणेने फार मोठा दरारा निर्माण केलेला होताच! त्यामुळे उत्तर भारतातील समाजवादी ओबीसी नेत्यांना मिळालेले ते एक फार मोठे नैतिक बळ होते.याच नैतिक बळावर 1977 साली जननायक कर्पुरी ठाकूर यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होताच मुंगेरीलाल कमिशनच्या शिफारशीप्रमाणे 26 टक्के आरक्षण लागू करण्याचे धाडस केले.

मात्र ठाकूरसाहेब जमीनी नेते (Mass Leader) असल्याने ते संभाव्य व्यावहारिक अडचणी जाणून होते.“दलित+आदिवासी आरक्षणाला नाईलाजाने मान्य करून घेणार्‍या ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार जाती ओबीसींच्या आरक्षणाला कडाडून विरोध करतील व प्रसंगी आपले सरकारही पाडायला कमी करणार नाहीत,” याची पुरेपूर कल्पना त्यांना होती.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

म्हणून त्यांनी यातून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. या मध्यम मार्गालाच ‘‘कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला’’ असे म्हणतात. मुंगेरीलाल कमिशनच्या शिफारशीतील ओबीसींच्या 26 टक्के आरक्षणामधून सहा टक्के आरक्षण काढून घेतले व ते ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार जातींना देण्यात आले. कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला प्रमाणे आरक्षणाची वाटणी पुढीलप्रमाणे झाली-

  • (कम) पिछडा वर्ग म्हणजे Large OBC castes. (LBC) 12 टक्के
  • अतिपिछडा म्हणजे (Most Backward castes. (MBC) (Micro OBC).. 08 टक्के
  • सर्वजातीय महिलांना आरक्षण दिले…… 03 टक्के
  • उच्चजातीय आर्थिक दुर्बल घटक यांना दिले (EBWs) 03 टक्के

अश्लील भाषेत शिवीगाळ

वरीलप्रमाणे उच्चजातीयांना त्यांचा हिस्सा देऊनही ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार जातींनी राज्यात हैदोस घालायला सुरूवात केली. सर्वत्र जातीय दंगलींचे भयभीत वातावरण निर्माण करण्यात आले. “स्वपक्षातील उच्चजातीय ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार आमदारांनी पाठींबा काढून घेतला व मुख्यमंत्रीपदासाठी राम सुंदर दास या दलित आमदारांचे नाव पुढे करण्यात आले. राम सुंदर दास हे उच्चजातीयांचे बाहुले असल्याने त्यांनी मुख्यमंत्री होताच कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाचा पायाच उखडून टाकला.”

एकीकडे देवेन्द्र प्रसाद यादव हे ओबीसी आमदार आपल्या आमदारकीचा राजीनामा देतात व कर्पूरी ठाकूर यांना मुख्यमंत्रीपदाचा रस्ता तयार करून देतात. तर, दुसरीकडे एक दलित आमदार उच्चजातीयांचे बाहुले बनून कर्पूरी ठाकूर यांचे मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतात, ही फारच दुःखदायक घटना आहे.

आरक्षण लागू केल्यानंतर उच्चजातीय ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार जातीकडून अत्यंत अश्लील शिव्यांचा भडीमार सुरू झाला. मंडल आयोग लागू केल्यानंतर व्हि.पी. सिंगांना अशाच अश्लील शिव्यांचा मारा सहन करावा लागला होता. आजच्या घडीला माननीय नामदार भुजबळसाहेबांची अवस्था कर्पूरी ठाकूर व व्हि.पी. सिंगांपेक्षा वेगळी नाही.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

मराठा-गावगुंड ते मराठा-आमदारांपर्यंतचे संस्कारहिन लोक भुजबळसाहेबांना ज्या शिव्या देत आहेत, त्या शिव्या ऐकल्यानंतर फोरास रोडवरच्या दलाल-भडव्यांचीही मान शरमेने खाली जाईल! जननायक कर्पूरी ठाकूर यांना अश्लिल शिव्यांसोबतच जातीय अवमानना करणार्‍या शिव्याही खाव्या लागल्यात. त्यात एक शिवी होती-

Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur 2

‘‘कर्पुरी ठाकूर कर पूरा…. छोड गद्दी, धर वस्तूरा!’’

कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला केवळ आरक्षणापूरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती फार मोठी आहे. जेव्हा जेव्हा जागृत ओबीसी सत्तेच्या खूर्चीवर बसतो, तेव्हा तेव्हा तो समाजातील सर्व शोषित-पिडित जातीच्या उद्धारासाठी सत्ता राबवतो! हे करूणानिधी, कर्पूरी ठाकूर, राम नरेश यादव, नितीश कुमार आदि जागृत ओबीसी मुख्यमंत्र्यांनी सिद्ध केलेले आहे. “करूणानिधींनी मुसलमान-ख्रिश्चनांसकट स्वतःला वतनदार-क्षत्रिय समजणार्‍या जातींनाही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले आहे. भारतात दलितांना सर्वात जास्त आरक्षण देणारे राज्य तामीळनाडू आहे.”Why Maharashtra needs Karpuri Thakur?

दलितांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18 टक्के आरक्षण देणारे एकमेव तामीळनाडू राज्य आहे. आता जातनिहाय जनगणनेनंतर मुख्यमंत्री नितीशकुमारांनी बिहारमधील दलित जातींचे आरक्षण 16 टक्क्यांवरून 20 टक्के केलेले आहे. कर्पूरी ठाकूरांनी ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार जातींनाही आरक्षण दिले. “महिलांना स्वतंत्रपणे आरक्षण देणारे मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर हे देशात एकमेव आहेत.”

जातीअंताचे पाऊल उचलनारे कर्पुरी

कर्पूरी ठाकूरांनी जातीअंताकडे जाणारे आणखी एक दमदार पाऊल उचलले. त्या काळात स्वतःला क्षत्रिय समजणार्‍या जमीनदार जाती- राजपूत, ठाकूर, भुमीहार- या जातींच्या दरवडेखोरांच्या जातवार सशस्त्र सेना होत्या. आजच्या रणवीर सेना, करणी सेना या त्याचे अवशेष आहेत. “जमीनदार-वतनदारांच्या या जातवार सशस्त्र सेना बंदुका घेऊन दिवसा-ढवळ्या दलित वस्त्यांमध्ये घुसायच्या.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

व अंदाधूंद गोळीबार करून बाया, पोरं, म्हातारे, तरूण अशा सर्वांची निर्घृणपणे हत्या करायचे!” दलितांचा नरसंहार ही सर्वसामान्य बाब झाली होती बिहारमध्ये! अशा दहशतीच्या काळात मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूरांनी एक क्रांतीकारक कायदा केला.

कर्पुरी ठाकूर यांच्या बद्दल माहितीसाठी

image2

1670467785029 2

‘‘दलित वस्त्यांमध्ये बंदुकांचे वाटप’’

हा कायदा केला व दलित वस्तीत जाऊन स्वतःच्या हाताने बंदुका वाटप करण्याचे उद्घाटन केले. दलित वस्तीत एक जरी बंदुक असेल तर एकही राजपूत-ठाकूर या वस्तीत घुसण्याची हिम्मत करनार नाही, हा मुख्य उद्देश होता कर्पूरी ठाकूरांचा! हे असे क्रांतीकारक काम केवळ कर्पूरी ठाकूरच करू शकलेत कारण ते जागृत ओबीसी होते. फुलेआंबेडकरांचे नाव घेणारे काही मुख्यंमत्री देशात होऊन गेलेत, पण अशी हिम्मत ते दाखवू शकले नाहीत कारण ते जागृत ओबीसी नव्हते.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

जननायक कर्पूरी ठाकूर यांचे राजकीय व सामाजिक शत्रू जेवढे विरोधी पक्षात होते, त्यापेक्षा जास्त शत्रू स्वपक्षात होते. “अनेक आरोप त्यांच्यावर झालेत, मात्र आर्थिक भ्रष्टाचाराचा व बेकायदेशीर कामे करण्याचा एकही आरोप त्यांच्यावर कुणी करू शकले नाहीत.”

मुख्यमंत्री मातीच्या घरात

कर्पुरी ठाकूर त्यांचे गावाकडचे वडिलोपार्जित झोपडीवजा मातीचे कच्चे घर मरेपर्यंत तसेच होते. त्यांनी गरीबांना घरे व जमीनी देण्याचे अनेक कार्यक्रम राबवलेत, पण स्वतःसाठी एकही घर बांधले नाही. मृत्युच्यानंतर जेव्हा त्यांच्या बँकेचे पासबुक तपासले गेले, तेव्हा त्यात फक्त 500 रूपये जमा होते. 1952 साली पहिल्यांदाच जेव्हा ते बिहारचे आमदार झालेत.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

तेव्हा सरकारी परदेश दौर्‍यासाठी त्यांची निवड झाली. शिष्टमंडळातील सर्व आमदारांनी खास कोट शिवून घेतले होते. मात्र कर्पूरीजी कोट शिवू शकले नाहीत. त्यांनी आपल्या एका फाटक्या मित्राकडून एक फाटका कोट उसनवार घेतला व ते परदेश दौर्‍यावर गेलेत. युगोस्लाव्हियाच्या प्रधानमंत्र्यांनी तो फाटका कोट कर्पूरी ठाकूरांच्या अंगावर बघितला व त्वरीत एक नवा कोट आणून त्यांनी तो कर्पूरी ठाकूरांना सप्रेम भेट दिला.

विधानसभेत सायकलीवरून जाणारे ते पहिले व शेवटचे आमदार होते.

असा क्रांतीकारक मुख्यमंत्री देशातील प्रत्येक राज्याला भेटला तर काय परिवर्तन होईल? आज महाराष्ट्रात अशा मुख्यमंत्र्याची जास्त गरज आहे! कारण महाराष्ट्र आज फुले-शाहू-आंबेडकरांचा राहीलेला नाही, तो सत्तरीतल्या बिहारप्रमाणे जंगलराज झालेला झालेला आहे. “बिहारमधील जमीनदार-वतनदार जातींप्रमाणे महाराष्ट्रातील जमीनदार-जातही दंगलखोर, हिंसाचारी व खूनी-हत्यारी झालेली आहे. ओबीसींचे आरक्षण लुटमार करून खतम करायला निघालेली आहे. अशा काळात महाराष्ट्राला हवे आहेतः एक नवे कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्रीपदासाठी!”

महाराष्ट्राचे कर्पुरी कल्याण दळे

महाराष्ट्रात मायक्रो ओबीसी बलुतेदार जातींचे संघटन करून त्यांना जागृत करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम “कल्याणराव दळे” करीत आहेत. ते अभ्यासू व कार्यक्षम आहेत. समाजपरिवर्तनाचे त्यांचे कार्य ते अविरतपणे करीत आहेत. एका सर्वसामान्य नाभीक कुटुंबातून आलेले कल्याणराव गरीबीच्या खस्ता खात सामाजिक कार्य करीत आहेत.Why Maharashtra needs Karpuri Thakur?

कर्पूरी ठाकूरांची सर्व गुणवत्ता त्यांच्या अंगी ठासून भरली आहे. “त्यामुळे महाराष्ट्राचे कर्पूरी ठाकूर बनण्याची ऐतिहासिक जबाबदारी त्यांचेवर आज आलेली आहे. ओबीसी राजकीय आघाडी त्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री समजते. 2024 च्या निवडणूकीत ओबीसी राजकीय आघाडीतर्फे मुख्यमंत्री म्हणूण आम्ही त्यांचे नाव जाहीर करीत आहोत.” महाराष्ट्रातील सर्व शोषित-पिडीत जनतेला न्याय देण्याचे काम ते मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर बसून करतील यात आम्हाला काही शंका वाटत नाही. थन्यवाद!

हा प्रस्ताव मान्य होईपर्यांत सर्वांना जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!

प्रा. श्रावण देवरे

संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 94 227 88 546  dईमेलः obcparty@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top