नाभिक समाजातील विद्यमान सरपंचाची माहिती व्हावी यासाठी आज आपण नाभिक समाजातील सरपंचाची माहिती घेणार आहोत.Sarpanch in Nabhik Samaj
Sarpanch in Nabhik Samaj
नाभिक समाज हा अल्पसंख्याक असून गावागणीस एक किंवा दोन नाभिक समाजाचे कुटुंब असतात.आशा परिस्थिती तो सरपंच काय पण साधा ग्रामपंचायत सदस्य पण होऊ शकत नाही.मग सरपंच कसे काय होतील पण भारतात लोकशाही आहे.Sarpanch in Nabhik Samaj
ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाभिक समाजाला (OBC) आरक्षण असते.त्या आरक्षणातून बर्याच गावात नाभिक समाजाचे व्यक्ती सरपंच पदापर्यंत पोहोचले आहेत.आशाच काही नाभिक समाजातील सरपंचाची माहिती येथे घेनार आहोत. त्यापैकी पहिले सरपंच पुढीलप्रमाणे
नाभिक सरपंच भागवत राऊत
श्री भागवत संतरामजी राऊत हे जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथील सरपंच असून महाराष्ट्र नाभिक महामंडळ जालना जिल्हा अध्यक्ष पण आहेत.Sarpanch in Nabhik Samaj
सरपंच म्हणून मी दिनांक 12 ऑगस्ट 2021 पासून सरपंच पदा पदावर विराजमान असून मी गावांमध्ये आतापर्यंत वाडी वस्तीवर जाणारे तसेच शेतामध्ये जाणारे पानदरस्ते जवळपास
- साडेपाच ते सहा किलोमीटर रस्ते करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे मातोश्री पानंद रस्ते या योजनेतून केले आहे.
- तसेच गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी दोन शालेय इमारती मंजूर करून काम चालू केले आहे.
- गावामध्ये विविध ठिकाणी सिमेंट रस्ते करण्यात आले आहे.
- तसेच शाळेसमोर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहे.Sarpanch in Nabhik Samaj
- तसेच गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल या योजनेचाही सर्व गावकऱ्यांना लाभ दिलेला आहे.
- तसेच गावामध्ये इलेक्ट्रिक फोन वरती प्रत्येक पोलला एलईडी लाईट बसून गावामध्ये संपूर्ण प्रकाश करण्याचं काम केलेलं आहे.
- तसेच गावातील चौकामध्ये मंदिरासमोर बस स्टॉप वरती हायमास्ट लाईट बसून प्रकाश करण्याचं काम केलेलं आहे.
- तसेच गावामध्ये वयोवृद्ध लोकांसाठी बसण्यासाठी बाकड्याची सुविधा केलेली आहे.
- तसेच गावामध्ये जे कुटुंब ग्रामपंचायत चा टॅक्स रेग्युलर भरीन त्याला पिण्याचे पाणी मोफत दिले जाते.
- तसेच रेग्युलर टॅक्स भरून त्याला पिठाच्या गिरणी वरती दळण हे मोफत देण्याची सुविधा चालू केलेली आहे.
- तसेच मुलांना खेळण्यासाठी खुल्या व्यायाम शाळेची सुविधा करण्यात आलेली आहे.
- तसेच गावामध्ये पोलीस स्टेशन समोर पेव्हर ब्लॉक टाकून पोलीस स्टेशनची शोभा वाढवण्यात आलेली आहे.
- तसेच गावामध्ये अपंगांना दर दिवाळीला किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे.
- तसेच शाळेमध्ये मुलांना बसण्यासाठी डुइल्डेक्स (बेंच)ची सुविधा केलेली आहे.Sarpanch in Nabhik Samaj
- तसेच गावामध्ये भूमिगत गटार अंडरग्राउंड नाली हे काम करण्यात आलेले आहेत.
- तसेच गावाकडे जाणारा रस्ता हा उखडलेला असताना या रस्त्याचे काम होत नसल्याकारणाने स्वतः उपोषणाला बसून त्या रस्त्याची दुरुस्ती करून घेण्यात आलेली आहे.
- गावातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीला वरतून जाळी बसून अपघात होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे.
- तसेच मुस्लिम कब्रस्तान येथे व शाळा अंगणवाडी यांच्या भोवताली कंपाउंड वॉल चे काम करण्यात आलेले आहे.
- तसेच शाळेमध्ये बोर घेऊन पाण्याची सुविधा करून देण्यात आलेली आहे.
- तसेच शाळेमध्ये आणि मंदिरासमोर व गावामध्ये सार्वजनिक शौचालयाची सुविधा करून देण्यात आलेली आहे.
सरपंच भागवत राऊत -9764702100
भारत शांताराम मोरे
भारत शांताराम मोरे सरपंच ग्रामपंचायत सोनोरी ता पुरंदर जि पुणे येथे जानेवारी २०२३ पासून सरपंच पदाचा कार्यभार पाहत असून
- सरपंच झाल्यानंतर गावातील दुष्काळी शेती साठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून 90 लक्ष रुपये सीएसआर फंडामधून निधी आणून पाईपलाईन चे काम पूर्ण करून कायमस्वरूपी शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढला,
- 22महिला बचत गटांना संघटित करून त्यांचा ग्रामसंघ स्थापन करून बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले त्या कुटुंबांना आर्थिक सक्षमीकरणासाठी काम केले,Sarpanch in Nabhik Samaj
- गावातील ग्रामस्थांना रमाई घरकुल आवास योजना, यशवंत घरकुल आवास योजना,
- पीएमआरडीए अंतर्गत घरकुल योजनेचा पुरेपूर लाभ मिळवून दिला,
- दिव्यांग,विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली,
- प्राथमिक शाळा सीएसआर निधीतून बांधकाम पुर्ण करण्यात आले,Sarpanch in Nabhik Samaj
- देशातील पहिला हंसा प्रकल्पाअंतर्गत लोहयुक्त बाजरी चा आहार जि प प्राथमिक शाळेत सुरू केला, * शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी साठी सीएसआर निधीतून 14 लक्ष रुपयांचा फिल्टर प्लांट उभा केला,
- सध्या तीन गावांसाठी जलजीवन मिशन योजनेमधून 16 कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना प्रगतीपथावर आहे,
- कृषी विभागाच्या सर्व योजना गावात प्रभावीपणे अंमलबजावणी करून नवीन शेततळे, अस्तरीकरण, ट्रॅक्टर, औजारे ठिबक सिंचन याचा लाभ मिळवून दिला आहे,
- अटल भुजल विभागामार्फत पाण्याचे स्रोत बळकटीकरण करण्यासाठी ओढ्यामध्ये रिचार्ज शाप्ट करण्यात आले,
- गेल्या दोन वर्षात जन्म घेतल्याल्या मुलींना लहान सायकली वाटप करण्यात आल्या,
- गावांतील रस्ते बांधकाम सुरू आहेत काही नवीन कामे प्रगतीपथावर आहेत,
- आरोग्य शिबीर आयोजित करुन 60 वर्षे वयापुढील सर्वांची आरोग्य तपासणी केली,Sarpanch in Nabhik Samaj
- त्याबरोबर सर्व महिलांची आरोग्य तपासणी केली आहे, महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ अनेकांना मिळवून दिला आहे.
नाभिक समाजाबद्दल मत
नाभिक समाजाबद्दल सांगायचं झालं तर अगोदर समाज एकत्र करणं काळाची गरज आहे त्यासाठी समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन समाजाला दिशा देण्याचे काम करणे गरजेचे आहे, पारंपरिक व्यवसाय न करता काळाची गरज म्हणून आपल्या व्यवसायात आधुनिकीकरण केले पाहिजे,सगळ्यात महत्वाचे समाजाने निर्व्यसनी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत समाजातील उच्च शिक्षित आणि आर्थिक सक्षम असणार्यांनी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.Sarpanch in Nabhik Samaj
सरपंच सौ संगीता विठ्ठल गवळी
मी सौ संगीता विठ्ठल गवळी सरपंच ग्रामपंचायत माडगुळे, ता आटपाडी . जिल्हा सांगली.शिक्षण दहावी.जात हिंदू न्हावी.माझी सरपंच पदी 9/2/2021 रोजी पाच वर्षांसाठी निवड झाली.पती-विठ्ल महादेव गवळी (Bcom) हे आमच्या गावचे माजी सरपंच होते.
मी केलेली कामे पुढीलप्रमाणेSarpanch in Nabhik Samaj
- ग.दी.मांडगुळकर यांच्या आटपाडी येथील स्मारकासाठी पाठपुराव्यामुळे आज स्मारकाचे काम चालू आहे.
- गावातील युवकांसाठी व्यायाम शाळा (जीम) ची निर्मिती सर्व साहित्यासह करण्यात आली.Sarpanch in Nabhik Samaj
- बौद्ध समाजासाठी बौद्ध मंदिराची निर्मिती पूर्ण केली.
- गावातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आरो RO water प्लांटची निर्मिती केली.
- गावात पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेच्या माध्यमातून कोल्हापुरी पद्धतीचे दोन बंधारे तयार करण्यात आले आहेत व इतर बंधाऱ्याची काम चालू आहे.