आळंदी ते पंढरपूर संत सेना महाराज पायी दिंडी || Sant Sena Maharaj on foot dindi

Sant Sena Maharaj on foot dindi  1

आळंदी ते पंढरपूर संत सेना महाराज पायी दिंड्या

जय संत सेना मित्रांनो आषाढी वारी निमित्त आळंदी ते पंढरपूर विविध संतांच्या पायी दिंड्या निघतात.त्यात संत सेना महाराज यांच्या नावाने पण अनेक दिंड्या अनेक वर्षांपासून निघतात.Sant Sena Maharaj on foot dindi

त्यातील काही दिंड्याची थोडक्यात माहिती येथे देत आहोत.तुमच्या भागातून जर संत सेना महाराज यांच्या नावाने पायी दिंडी पंढरपूरला जात असेल तर खालील नंबर वर माहिती पाठवा 8275681609.

संत सेना महाराज पायी दिंडी क्षेत्र नेवासा 7

संत सेना महाराज पायी दिंडी परभणी

मागील ३१ वर्षांपासून संत सेना महाराज यांच्या नावाने परभणी येथून पंढरपूरसाठी पायी दिंडी काढली जाते.या दिंडीचा क्रमांक १६५ असून हि दिंडी रथाच्या पाठीमागे असते.या दिंडीचे चालक हे श्री कैलास माणिक भालेराव हे आहेत. हि दिंडी सर्वात जुनी दिंडी आहे.Sant Sena Maharaj on foot dindi

संत सेना महाराज पायी दिंडी क्षेत्र नेवासा 6

संत सेना महाराज यांच्या कार्याचा वारसा चालवणारी हि दिंडी आहे.कैलास भालेराव हे परभणी ते बांधवगड (मध्यप्रदेश)‌आशीही ध्वज यात्रा काढत असतात.हि ध्वज यात्रा संत सेना महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढत असतात.या ध्वज यात्रेच यावर्षी पाचवे वर्ष होते.बांधवगड हे ठिकाण संत सेना महाराज यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.Sant Sena Maharaj on foot dindi

ते मध्यप्रदेशातील उमरीया जिल्ह्यात आहे. श्री कैलास भालेराव हे संत सेना महाराज यांच्या जन्मभूमी ते कर्मभूमी पंढरपूर आशी यात्रा दरवर्षी अनेकांना घडवून आनतात.त्यांच्या या कार्याची दखल वै.बाबा महाराज सातारकर यांनी घेऊन कौतुक केले होते.

संत सेना महाराज पायी दिंडी गेवराई

संत सेना महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवनारी ह.भ.प.राजाभाऊ महाराज पंडित हे मागील २९ वर्षांपासून संत सेना महाराज पायी दिंडी गेवराई ते पंढरपूर आशी अखंडपणे काढतात.Sant Sena Maharaj on foot dindi

Sant Sena Maharaj on foot dindi  2

हा वारसा पुढेही चालुच राहणार असे ते सांगतात.गेवराई जिल्हा बीड येथे अत्यंत देखणे आसे संत सेना महाराज मंदिर त्यांच्या प्रयत्नातून समाजाने निर्माण केले आहे.संत सेना महाराज संस्थेला नोंदणी करून २८ वर्षे झाली आहेत.हि दिंडी पण माऊलींच्या पालखी मागे असते. या दिंडीत नाभिक समाजा बांधवासह इतर समाजांचे अनेक बांधव सहभागी असतात.

संत सेना महाराज पायी दिंडी छत्रपती संभाजीनगर

संत सेना महाराज यांच्या नावाने मागील १४ वर्षांपासून ह भ प श्री मुरलीधर महाराज मोरे (दादा) हे दिंडी काढतात. मोरे दादा यांची वारकरी शिक्षण संस्था असून या संस्थेत अनेक तरुण शिक्षणाबरोबर गायन,वादन, हरिपाठ, असे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतात.यांची वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र वडोद कान्होबा तालुका रत्नापुर (खुलताबाद) जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे.

Sant Sena Maharaj on foot dindi  3

ह भ प श्री मुरलीधर महाराज मोरे दादा यांचा संत सेना महाराज यांच्या जिवन चरीत्रावर सखोल अभ्यास आहे.संत सेना महाराज यांचे अनेक दुर्मिळ प्रसंग ते आपल्या कीर्तनातून सांगतात.जे पुस्तकात उपलब्ध नाहीत.दिंडीत ते स्वतः सहभागी असतात.Sant Sena Maharaj on foot dindi

संत सेना महाराज दिंडी छत्रपती संभाजीनगर -२

छत्रपती संभाजीनगर येथून संत सेना महाराज यांच्या नावाने दुसरी एक पायी दिंडी निघते,तीचे हे दुसरे वर्ष आहे.भांबड या ठिकाणाहून निघते.या दिंडीचे चालक हभप रामेश्वर महाराज भालेकर, हभप तुकाराम महाराज आपार, हभप माणिकराव महाराज हाडके,हभप नारायण महाराज गवारे,हभप कृष्णा महाराज चव्हाण आहेत.Sant Sena Maharaj on foot dindi

Sant Sena Maharaj on foot dindi  4

संत सेना महाराज पायी दिंडी क्षेत्र नेवासा

ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते ठिकाण म्हणजे क्षेत्र नेवासा होय.याठीकाणी नुकतेच संत सेना महाराज यांचे मंदिर उभारले आहे.या मंदिरात संत सेना महाराज यांची मुर्ती बांधवगड मध्यप्रदेश च्या हुबेहुब धर्तीवर आहे. हि महाराष्ट्रातील पहिलीच मुर्ती आहे.

Sant Sena Maharaj on foot dindi  5

या मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ संत सेना महाराज यांच्या मूर्तीची आरती अखंडपणे चालू आहे.हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. या ठिकाणाहून प्रथमच संत सेना महाराज यांच्या नावाने पंढरपूर ला जाण्यासाठी पायी दिंडी निघत आहे.दिंडीचे पहिले वर्ष आहे.दिंडी चालक ह भ प श्री सचिन महाराज पवार हे आहेत.Sant Sena Maharaj on foot dindi

समाज बांधवांना आवाहन

वरील सर्व दिंड्या आळंदी ते पंढरपूर पायी जात आहेत.ज्या ज्या ठिकाणाहून ज्या ज्या मार्गाने या दिंड्या जातील त्या त्या ठिकाणच्या समाज बांधवांनी या दिंडीचे स्वागत करावे,जेवनाची सोय करावी कारण हे दिंडी चालक संत सेना महाराज यांचा वारसा पुढे चालवत आहेत आणि प्रत्येकावर समाज ऋण असते.याची जानीव ठेवून आदरतिथ्य करावे.हि नंम्र विनंतीSant Sena Maharaj on foot dindi

Sant Sena Maharaj on foot dindi  6

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top